गुरुपौर्णिमा अशी साजरी करा, तुमच्या मित्रमैत्रिणी सोबत; जाणून घ्या महत्व, तिथी आणि मुहूर्त

Guru Purnima 2024

Guru Purnima 2024: नमस्कार मित्रांनो आषाढ महिना सुरू झाला की, मराठी सणांना सुरुवात होते. आषाढ महिन्यातील दुसरी आणि महत्वाची तिथी (Guru Purnima 2024) गुरुपौर्णिमा, आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा साजरी केली जाते. हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेला अधिक महत्व आहे. आपल्या गुरुप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस महाभारताची रचना करणारे महर्षि वेद व्यास यांचा जन्मदिवस म्हणून ओळखला जातो.

वेद व्यासांनी चारही वेदांच्या संबंधित ज्ञान प्राप्त करून त्याविषयी सांगितले. त्यांच्या महान योगदानामुळे दरवर्षी आषाढ पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी गुरूनची पूजा केली जाते. या दिवशी अनेकजण व्यासमुनीसह श्रीविष्णूची देखील पूजा करतात. जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि महत्व.

Guru Purnima 2024
Guru Purnima 2024

हिंदू धर्मात गुरु शिष्य परंपरेला विशेष महत्व आहे. यात गुरूला अत्यंत महत्वाचे स्थान असून गुरूला देवाचा दर्जा आहे. अशा या गुरुना आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथी समर्पित असते. या गुरुपौर्णिमेला वेद पौर्णिमा असेही म्हणतात. पंचांगानुसार यंदा 21 जुलै 2024 (Guru Purnima 2024) रोजी गुरुपौर्णिमा साजरी होत आहे. गुरुपौर्णिमा गुरु आणि शिष्य यांच्या पवित्र नात्याचे प्रतीक आहे. यंदाची गुरुपौर्णिमा विशेष आहे. करण या दिवशी अनेक दुर्मिळ संयोग जुळून येत आहेत. त्यामुळे या तिथीचे महत्व अधिक वाढले आहे. जाणून घेऊया या संयोगाबद्दल अधिक माहिती.

Guru Purnima 2024: गुरुपौर्णिमा तिथी

हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथी 20 जुलै रोजी संध्याकाळी 6 वाजता सुरू होईल आणि 21 जुलै रोजी दुपारी 3 वाजून 47 मिनिटांनी संपेल. ज्योतिष शास्त्रानुसार पौर्णिमा तुरीचे व्रत चंद्रोदय दिवशी केले जाईल. त्यामुळे पौर्णिमेचे व्रत 20 जुलैला करण्यात येईल तर 21 जुलै गुरुपौर्णिमेच्या दिवशी दानधर्म करावे.

प्रीती संयोग

प्रीती संयोग शुभ आणि सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. प्रीती संयोगाचा स्वामीग्रह बुध आहे. हा योग 14 संयोगांपैकी एक आहे. जो अत्यंत शुभ मानला जातो. यावेळी गुरुपौर्णिमेला प्रीती योग जुळून आहे. हा योग 21 जुलै रोजी रात्री 09वाजून 11 मिनिटांनी सुरू होईल आणि 22 जुलै रोजी सायंकाळी 05 रोजी सायंकाळी 05 वाजून 58 मिनिटांनी समाप्त होईल. या योगात केलेली सर्व कामे यशस्वी होतात.

(टीप:- या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत MHटाइम्स24 कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Guru Purnima 2024

Guru Purnima 2024: गुरुपौर्णिमा महत्व

गुरुपौर्णिमा हा सण शिष्याद्वारे आध्यात्मिक गुरु आणि शैक्षणिक शिक्षकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी साजरा केला जातो. सर्व गुरु आपल्या शिष्याच्या कल्याणासाठी आपले संपूर्ण जीवन अर्पण करतात. आध्यात्मिक गुरु नेहमीच शिष्याना आणि दुखी लोकांना मदत करत आले आहे आणि अशी अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. जेव्हा गुरूंनी आपल्या ज्ञानाने अनेक दु:खी लोकांचे प्रश्न सोडवले आहेत. स्वामी विवेकानंद आणि गुरु नानक हे असे गरू होते. ज्यांनी सदैव जगाच्या कल्याणासाठी कार्य केले. भारता व्यतिरिक्त भूतान आणि नेपाळसारख्या देशांमध्येही गुरुपौर्णिमा साजरी केली जाते, आपल्या देशाची गुरुशिष्य परंपरा भारतातून इतर देशांमध्ये पसरली आहे. आध्यात्मिक गुरु नेहमीच स्थळांतरावर राहिले आणि या स्थलांतरामुळे भारतातील या परंपरा इतर देशांमध्येही पसरल्या.

Guru Purnima 2024: गुरुपौर्णिमा पूजा पद्धत

  • गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान विष्णुचे स्मरण करावे.
  • देवघरात श्रीविष्णु, देवी लक्ष्मी आणि व्यासमुनीचा फोटो स्थापित करून व्रत करावे.
  • श्रीविष्णुची मूर्ती स्थापन करण्यापूर्वी पंचामृताने अभिषेक करून वस्त्र अर्पण करावे. तसेच देव लक्ष्मी आणि व्यासमुनीची पूजा करावी.
  • पूजा झाल्यानंतर सद्रूरुचालीसाचे पठन करा. नैवेद्य म्हणून फळे, मिठाई आणि खीर ठेवा.

ह्या गोष्टी खास गुरुपौर्णिमेशी संबंधित

  • गुरुपौर्णिमेच्या दिवशी केवळ गुरु नव्हे, तर कुटुंबातील जेष्ठ सदस्य जसे की आई-वडील, भाऊ-बहीण इत्यादींनाही गुरूसमान मानले पाहिजे.
  • गुरूच्या ज्ञानानेच विद्यार्थ्याला ज्ञान प्राप्त होते. आणि ज्ञानानेच अज्ञान आणि अंधकार दूर होतो. गुरुची कृपाच शिष्यासाठी ज्ञानवर्धक आणि लाभदायक ठरते. जगाचे सर्व ज्ञान गुरूंच्या आशीर्वादानेच मिळते.
  • गुरुकडून मंत्र प्राप्त करण्यासाठी हा दिवस उत्तम आहे. या दिवशी शिक्षकांची देखील सेवा करावी मान सन्मान द्यावा.
  • तुमची इच्छा असेल तर तुम्ही गुरुपौर्णिमेच्या सणाला गुरु ग्रहांची पूजा देखील करू शकता, तो देवाचा गुरु मानला जातो. त्याच्या आशीर्वादानेच तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल ज्याच्या कुंडलीत गुरु कमजोर आहे, त्यांना ज्ञान ग्रहण करण्यात अडचण येते.

महर्षि वेदव्यास आणि गुरुपौर्णिमा यांचा संबंध

वैदिक मान्यतेनुसार, प्राचीन काळी ब्रम्हसूत्र, महाभारत, श्रीमद भागवत आणि अठरा पुराण यांसारख्या साहित्याचे लेखन महर्षि वेदव्यास यांचा जन्म आषाढ पौर्णिमेच्या तिथीला झाला होता. असे मानले जाते, ते ऋषि पराशर यांचे पुत्र होते. धार्मिक ग्रंथानुसार महर्षि वेदव्यास हे तिन्ही कालखंडातील तज्ञ मानले जातात. कलियुगात धर्माबद्दलची लोकांची आवड कमी होईल हे त्यांना त्यांच्या दिव्य दृष्टीतून कळले होते. धर्मात रस कमी झाल्यामुळे माणसाची देवावरची श्रद्धा कमी होईल. कर्तव्यापासून विचलित होईल आणि त्याचे आयुष्य अल्प होईल. संपूर्ण वेदाचा अभ्यास करणे अशक्य होईल, महर्षि व्यासांनी वेदांचे चार भाग केले जेणेकरून कमी बुद्धिमत्ता आणि कमी स्मरणशक्ती असलेल्या लोकांनाही वेदांचा अबयास करता येईल.

ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद याची रचना व्यसजीनी केली. अशाप्रकारे वेदांचे विभाजन केल्यामुळे ते वेद ब्यास ओळखले जाऊ लागले. त्यांनी वैशंपायन, सुमंतूमुनी, पैला आणि जैमिन या आपल्या प्रिय शिष्यांना या चार वेदांचे ज्ञान दिले. महर्षि वेदव्यासजिंच्या शिष्यांनी त्यांच्या बुद्धीनुसार चार वेदांचा अनेक शाखा आणि उपशाखांमध्ये विभागले महर्षि व्यास यांनी महाभारताची रचना केली होती. महर्षि व्यसजीना आपले आदिगुरु मानले जाते. गुरुपौर्णिमेचा प्रसिद्ध स्न् व्यास जयंती म्हणूनही साजरा केला जातो. म्हणून या सणाला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात आणि या दिवशी आपण आपल्या गुरुना व्यास जिंचा भाग मानून त्याची पूजा केली पाहिजे.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!