आर्थिक वर्षात सोन्याच्या दरात वाढ; चांदीही 80 हजारांच्या पार, जाणून घ्या आजचा भाव

Gold Price today: दिवसेंदिवस सोन्याचे दरात वाढ होत आहे. मार्च महिन्याच्या शेवटीपासून सोन्याच्या किंमतीत जी दरवाढ सुरू झाली आहे. ती वाढ थांबायच नाव घेतच नाही. तर दुसरीकडे एप्रिल, मे महिना हा लग्नसराईचा काळ असतो. अशावेळी सोन्याच्या दागिन्यांना प्रचंड मागणी असते. मात्र सोन्याची वाढती दरवाढ पाहून आता ग्राहकांनी देखील पाठ फिरवली आहे. 1947 मध्ये हेच सोने 88.62 रुपये प्रती 10 ग्रॅमने विकले जात होते. तेच सोने आता 2024 मध्ये 70,470/- रुपयांवर पोहचले आहे. म्हणजेच तेव्हापासून आतापर्यंत त्याची किंमत 784 पटीने वाढली आहे. तर चांदीचे भाव 107 रुपये किलो होता, तो आता 82 हजारावर गेला आहे.

देशांतर्गत बाजारपेठेत सोन्याच्या भावाने गुरुवारी सार्वकालिक उच्चांकी पातळी गाठली आहे. मुंबईच्या झवेरि बाजारातील घाऊक व्यवहारात सोन्याचा भाव प्रती ग्रॅम 70 हजार 470 रुपयांवर पोहोचला आहे. किरकोळ बाजारात त्याने कर आणि अन्य घटकांच्या समवेशासह त्याने 71 हजारांची

Gold Price today
Gold Price today

अमेरिकेचे मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरॉम पॉवेल यांच्या व्याजदर कपातीला अनुकूल वक्तव्यामुळे जगभरातील वायदे सौदयात सोन्याने उसळी घेतल्याचे दिसून आले. जागतिक धातू वायदे मंच ‘कॉमेक्स‘ वर 4 एप्रिलला पहिल्यांदा सोन्याच्या भाव प्रती औस ( अर्थात 28.35 ग्रॅमसाठी) 2,300 डॉलरवर पोहचला. चांदीची प्रती औस 27,05 डॉलर वर व्यवहार करत होती. मागील सत्रात चांदीचे भाव 26.25 डॉलरवर बंद झाला होता.

वस्तु वायदा बाजार मंच एमसीएक्सने दिलेल्या माहिती नुसार, सोन्याचे भाव गुरुवारी बाजार सुरू होताना प्रती 10 ग्रॅम 69 हजार 868 रुपये होता. नंतर तो उच्चांकी पातळी वर पोहोचून खाली घसरला. तो 69 हजार 801 या दिवसभरातील नीचांकी पातळीवर आला. सोन्याचे जूनमध्ये संपणारे वायदे 69 हजार 908 रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहचेल, अशी माहिती वस्तु वायदे बाजारमंच एमसीएक्सने दिली.

गेल्या सहा महिन्यात सोन्याच्या भावात घोडदौड कायम आहे. एमसीएक्स आणि कॉमेक्सवर सोन्याचे उच्चांकी पातळी गाठली आहे. अमेरिकेतील एडिपिची बिगर कृषि रोजगाराची अपेक्षेपेक्षा चांगली नोंदवली गेलेली आकडेवारी आणि अमेरिकेतील सेवा क्षेत्राची घसरण या बाबी असूनही सोन्याच्या भावातील तेजी कायम राहिली, अशी माहिती कमॉडिटी विश्लेषण यांनी दिली.

मुंबईच्या सराफ बाजारात घाऊक व्यवहारात चांदीची भावही किलोमागे 1,000 रुपयांनी वाढून 82,000 रुपयांपर्यंत पोहचला आहे. तर मागील सत्रात तो प्रती किलो 81,000 रुपयांवर होता.

Gold Price Today सोन्याच्या दरात वाढ का होते?

दरम्यान युएस फेडरल रिझर्व्हने व्याजदर कपातीचे संकेत दिल्यामुळे सोन्याचे जागतिक स्तरावर उच्चांक गाठला असून भारतातच त्याचे पडसाद उमटत आहे. आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून सोन्याने नवा उच्चांक गाठला असून सोनं 70 हजार रूपयाच्या पातळी जवळ पोहोचले आहे. मुंबईच्या सराफा बाजारात बुधवारी 24 कॅरेट सोन्याची विक्री किंमत 69,870 रुपये प्रती तोळा (10ग्रॅम) होती. मंगळवारच्या तुलनेत त्यात 760 रुपयांची वाढ झाली. 99.5 टक्के शुद्धतेचा मानक सोन्याच्या बुधवारी झवेरि बाजारात 69,090 रुपयांनी विकले जात आहे. एकंदरीत भविष्यात हेच सोनं 75 हजारांच्या वर पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Gold Price Today आर्थिक वर्षात सोन्याच्या दरात वाढ

गेल्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला सोनं प्रती 10 ग्रॅम 61 हजार रुपयांच्या पातळी जवळ होते. त्यानंतर सोन्यात वर्षभरात जागतिक भू-राजकीय परिस्थितीमुळे विविध काळात परिणाम झाले, दरम्यान मंगळवारी 2 एप्रिल रोजी सोन्याचा भाव 550 रुपयांनी वाढला त्यानंतर 3 एप्रिलला सोन्याचा भाव पुन्हा 500 रुपयांनी वाढून 69 हजार 500 रुपये प्रती तोळा झाला. त्यामुळे एक तोळा सोन्यासाठी जीएसटीसह 71 हजार 585 रुपये मोजावे लागणार आहेत. तर चांदीचे भाव 76 हजार रुपये किलोवर स्थिर आहे.

फेडरल रिझर्व्हचे प्रमुख जेरॉम पॉवेल यांनी चालू वर्षात व्याजदरात कपातीचे ठोस संकेत देणारे वक्तव्य केले आहे. यामुळे सोन्याच्या भावात सुरू असलेली तेजी कायम राहण्यास मदत झाली आहे.

Gold Price Today सोन्यासह चांदीच्या ही दरात वाढ

एकीकडे सोन्याच्या दरात वाढ होत असताना दुसरीकडे चांदीच्या ही दरात वाढ होत आहे. एमसीएक्स वर चांदीच्या दरात मोठि वाढ झाली असून चांदीचे दर 1 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. मुंबईच्या सराफ बाजारात घाऊक व्यवहारात चांदीची भावही किलोमागे 1,000 रुपयांनी वाढून 82,000 रुपयांपर्यंत पोहचला आहे. तर मागील सत्रात तो प्रती किलो 81,000 रुपयांवर होता. तर MCX वर सध्याचा चांदीचा भाव हा 82,000 रुपये प्रती किलो आहे.

Gold Price Today सोन्याचे दर

Gold Price today सोन्याचे दर म्हणजेच मापनानुसार सोन्याची प्रती युनिट किंमत होय. सामन्यात प्रतीग्रॅम किंवा किलोग्रॅम या युनिटचा वापर सोन्याचा दर ठरवताना केला जातो. पुरवठा-मागणी, जागतिक आर्थिक परीस्थिति, भू-राजकीय घटना आणि चलनातील चढउतार यांसह अनेक घटकांद्वारे सोन्याचा दर निर्धारित केला जातो.

सोने हा पृथ्वी वरील अत्यंत मौल्यवान धातूंपैकी एक आहे. याचा वापर नाणी, दागिने तसेच गुंतवणुकीचे साधन म्हणून शतकानुशतके केला जात आहे. आर्थिक अनिश्चितता, राजकीय अस्थिरता आणि चलनवाढीच्या काळात गुंतवणूकदार सोन्याच्या पर्यायांकडे वळतात. कठीण काळामध्ये सोन्याचा वापर केला जातो.

युएस डॉलर, युरो, ब्रिटिश पाउंड आणि जपानी येण यांच्यासह विविध चलनामध्ये सोन्याची किंमत निश्चित केली जाते. लंडन बुलीयन मार्केट असोसिएशनद्वारे (LBMA) निश्चित करण्यात आलेला दर हा सोन्याच्या किंमतीसाठी वापरला जाणार बेंचमार्क आहे. दिवसातून दोन वेळा हा दर निर्धारित केला जात असतो.

एलबीएएद्वारे ठरवलेली सोन्याची किंमत ही जागतिक बाजारपेठेतील बँकांच्या समूहाच्या ट्रेडिंगवर अवलंबून असते. ही किंमत सोन्याच्या जागतिक बाजारपेठेद्वारे बेंचमार्क म्हणून वापरली जाते. या व्यतिरिक्त COMEX गोल्ड फ्यूचर्स कॉन्ट्रॅक्ट आणि शांघाय गोल्ड एक्सचेंज गोल्ड यांचा वापर देखील सोन्याच्या दराचा बेंचमार्क म्हणून केला जातो.

सोन्याच्या दरामध्ये अल्प कालावधीमध्ये बदल होऊ शकतो. काही वेळेस एकाच दिवसात सोन्याच्या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात चढ उतार पाहायला मिळतो यामागे अनेक घटक कारणीभूत असतात.

  1. दागिने उत्पादक, गुंतवणूकदार आणि केंद्रीय बँकांकडून होणारी मागणी.
  2. महागाई, व्याज दर आणि चलन विनिमय दरांसह जागतिक आर्थिक परिस्थितीतील बदल.
  3. युद्ध नैसर्गिक आपत्ती तसेच देशांचे व्यापारसंबंधित वाद.
  4. खान उत्पादन, सोन्याच्या पुरवठ्यासह त्याचा पुन:वापर अनि सेंट्रल बँक सेल्स.
  5. बाजारातील चढ उतार, मागणी पुरवठ्यामधील बदल यांमुळे सोन्याचा दर प्रत्येक दिवशी बदलत असतो.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!