Ghatasthapana: घटस्थापनेचा योग्य पूजाविधी आणि महत्व, अशी करा घटस्थापना!

Ghatasthapana 2024

Ghatasthapana 2024: भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये वैविध्यपूर्ण उत्सव अगदी उत्सहात साजरे केले जातात. त्यामधील एक म्हणजेच सर्वांच्या आवडीचा सण शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र सण मानला जातो. या नऊ दिवसांत दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. या दिवसांमध्ये अनेक भाविक उपवासही करतात. संपूर्ण मराठी वर्षात अनेक नवरात्र साजरी केली जात असली, तरी शारदीय नवरात्रोत्सवाला अनन्य साधारण महत्व आहे. यंदा सन 2024 मध्ये (Ghatasthapana 2024) नवरात्रोत्सव दहा दिवसांचा असल्याचे म्हंटले जात आहे.नवरात्रोत्सव हे आश्विन शुक्ल पक्षात प्रतिपदेच्या तिथी पासून सुरू होऊन नवमी पर्यंत असते. शारदीय नवरात्र हे शाक्तपंथिय मानले जाते. शारदीय म्हणण्याचे कारण इतकेच की हे शरद ऋतूच्या प्रारंभी येते. त्यामुळे घटस्थापना 03 ऑक्टोबर 2024 रोजी सूर्योदयापासून केली जाईल. आपापल्या कुळाप्रमाने घटस्थापना करावी, असे सांगितले जात आहे.

नवरात्रात घटस्थापनेचे विशेष महत्व आहे. कलश स्थापना किंवा घटस्थापना नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच प्रतिपदा तिथीला केली जाते. घटस्थापनेला देवीचे रूप मानले आहे. देवी या कलशाच्या रूपात घरात आगमन करते. शारदीय नवरात्र हा हिंदू धर्मातील एक उत्सव तसेच देवीशी संबंधित व्रत आहे. शारदीय आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमी पर्यंत देवीची उपासना केली जाते. यानंतर आश्विन शुद्ध दशमीला विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा केला जातो. आश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून, नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेचा नऊ दिवस मनोभावे पूजा केली जाते. भारतामध्ये सर्वत्र हा नवरात्र मध्ये प्रत्येकाच्या पद्धतीने वेगवेगळी अशी देवीची पूजा, उपासना केली जाते. या कालावधीत पावसाळा बहुतेक संपलेला असतो. शेतातील पिके तयार होत आलेली असतात, काही तयार झालेली असतात.

Ghatasthapana 2024
Ghatasthapana 2024

अशा नैसर्गिक वातावरणात नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होते. अखंड नंदादीप, दररोज झेंडूच्या फुलांची माळ, देवीपुढे सप्तशतीचा पाठ अशा प्रकारे शारदीय नवरात्री व्रत केले जाते. यंदा सण 2024 मध्ये (Ghatasthapana 2024) नवरात्रोत्सव दहा दिवसांचा असल्याचे म्हणते जात आहे. सन 2024 मध्ये घटस्थापना कधी आहे? दसरा विजय मुहूर्त कधी आहे? जाणून घेऊया..

Ghatasthapana 2024: शारदीय नवरात्रीतिल घटस्थापना कधी आहे?

कोणतीही नवरात्र हे साधारणपणे नऊ दिवसांचे असते, पण तिथीचा सही झाल्याने ते आठ दिवसांचे, किंवा वृद्धी झाल्यास ढा दिवसांचे असू शकते. यंदाच्या नवरात्रोत्सव ढा दिवसांचा असल्याचे म्हंटले जात आहे. 03 ऑक्टोबर 2024 रोज आश्विन मासारंभ होत असून, याच दिवशी घटस्थापना केल्यानंतर शारदीय नवरात्ररंभ होत आहे. 02 ऑक्टोबर 2024 च्या रात्री 12 वाजून 18 मिनिटांनी भाद्रपद अमावस्या समाप्त होत असल्यामुळे याच वेळेपासून आश्विन शुद्ध प्रतिपदा सुरू होत आहे. त्यामुळे घटस्थापना 03 ऑक्टोबर 2024 रोजी सूर्योदयापासून केली जाईल. आपापल्या कुळाप्रमाने घटस्थापना करावी, असे सांगितले जात आहे.

पूजेचे साहित्य आणि घटस्थापना कशी करावी

हळद कुंकू, नागीनीची पणे, सुपारी, नारळ, दूर्वा, पाच फळे, कापसाची वात, चौरंग, तांदूळ, हळकुंड, देवीचे टाक किंवा मूर्ती किंवा फोटो, ज्वारी, गहू किंवा सात वेगवेगळे धान्य (मुग, मसूर, गहू, बाजरी, ज्वारी, हरभरा, तांदूळ), देवीची ओटी, अखंड नंदादीप, निरांजन, कापुर, उदबत्ती, नैवेद्य.

Ghatasthapana 2024
  • नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरातील मंदिरात कलशाची स्थापना करून देवी आईची प्रतिष्ठापना केली जाते. घटस्थापना शुभ मुहूर्तावर विधी विधानाने करावी. कलशाची स्थापना मंदिराच्या उत्तर-पूर्व दिशेला करावी.
  • चौरंग ठेऊन कलशाची स्थापना करावी. सर्व प्रथम गंगाजल शिंपडून ते स्थान पवित्र करा. यानंतर पाट किंवा चौरंगावर कुंकूने स्वस्तिक बनवून कलश स्थापित करा. पाटाच्या चौरंगाच्या आजू बाजूला रांगोळी काढा.
  • कलशात आंब्याचे पण ठेवून त्यात पाणी किंवा गंगाजल भरावे. एक सुपारी, काही नाणी, तांदूळ, दूर्वा, हळकुंड एकत्र करून कलशात टाकावे. कलशाचा आठ ही बाजूस हळदी कुंकवाची बोटे ओढा.
  • कलशाच्यावर नारळ लाल कपडाने गुंडाळून ठेवा. तांदळापासून अष्टदल बनवा आणि देवीचे टाक किंवा मूर्ती ताम्हण्यात ठेवा. कलशाच्या स्थापनेबरोबरच एक अखंड नंदादीप प्रज्वलित केले जाते.
  • कलशाची स्थापना केल्यानंतर देवीची पूजा करा. हातात लाल फुले व तांदूळ घेऊन देवीचे ध्यान केल्यानंतर मंत्राचा जप करून मातेच्या चरणी फुले व तांदूळ अर्पण करा.
  • देवीचा भोग गाईच्या तुपापासून बनवावा. केवळ गाईचे तूप अर्पण केल्याने रोग आणि समस्यापासून मुक्ती मिळते.

घटस्थापना झाल्यावर त्या घट किंवा कलशाभोवती बारीक तांबडी माती पसरावी आणि त्या मातीत नवधान्य-भात, गहु, जोंधळे, मका, हरभरे इत्यादि प्रवे आणि पुन्हा माती पसरवावी. प्रतिपदेपासूनच घरात जव पेरण्याचा विधान आहे. नवमीच्या दिवशी हे जव डोक्यावर ठेवून एखाद्या नदी किंवा तलावात विसर्जित करावे. अष्टमी आणि नवमी या महातिथी असतात. या दोन्ही दिवसात पारायण केल्यावर हवन करावे आणि आपल्या सामर्थ्यनुसार सवाष्ण, ब्राम्हण, कुमारिकांना जेवायला द्यावं.

(टीप: वरील सर्व बाबी MH टाइम्स 24 केवळ माहिती म्हणून वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MH टाइम्स 24कोणताही दावा करत नाही.)

Ghatasthapana 2024

Ghatasthapana 2024: नवरात्रात पूजा अशा पद्धतीने करावी

  • आश्विन शुक्ल प्रतिपदेला ब्रम्ह महूर्तात स्नान करावे.
  • घरातील कोणत्याही पवित्र जागेत स्वच्छ मातीने वेदी बनवावी.
  • वेदित जव आणि गव्हाचे दाणे मिसळून पेरावे.
  • वेदिवर किंवा त्याचा जवळच्या पवित्र जमिनीची पूजा करावी आणि त्या ठिकाणी सोन, चांदी, तांबा किंवा मातीचे घट स्थापित करावे.
  • यानंतर त्या कलशात किंवा घटात आंब्याचे पानं, दूर्वा आणि पंचामृत टाकून त्याच्या तोंडाला पवित्र सूत्र बंधावे.
  • कलश किंवा घट स्थापने नंतर गणपतीची पूजा करावी.
  • या नंतर त्या वेदीच्या बाजूने देवी आईची कोणतीही धातू, दगड, माती आणि तसविरीची विधी विधानाने स्थापना करावी.
  • नंतर मूर्तीचे आसन, पाद्य, अर्थ, आचमन, स्नान, कापड, गध, अक्षत, फुले, धूप दिवा, नैवेद्य, आचमन, पुष्पांजली, नमस्कार आणि प्रार्थना करून पूजा करावी.
  • पाठाचे वाचन केल्यावर दुर्गेचि आरती करून प्रसाद वाटप करावा.
  • कन्याना जेवण द्या, नंतर स्वत: फळे खा.

देवीच्या नवरात्रोत्सवात सर्व भक्त 10 दिवस एकत्र येतात. देवीची पूजा अर्चा करतात. देवीला प्रसन्न करतात तसेच तिच्यासाठी 10 दिवसांचा उपवासही करतात. या दिवसांत ठीकठिकाणी गरबा देखील खेळला जातो.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!