GDP Growth Rate Q1
GDP Growth Rate Q1: चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाही अखेर म्हणजेच, एप्रिल ते जून या काळात आर्थिक विकासाची गती मंदावली आहे. आर्थिक विकासाचे प्रतीक असलेले जिडीपी (GDP Growth Rate Q1) या तिमाहीत गेल्या 15 महिन्यातील सर्वात कमी, 6.5 टक्के नोंदवला गेला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत भारताच्या जिडीपीचा दर 8.2 टक्के इतका होता. शासकीय आकडेवारीनुसार देशाचा जिडीपी घसरण्याचं प्रमुख करण म्हणजे कृषि क्षेत्राची खराबी कामगिरी. गेल्या काही महिन्यांमध्ये देशभरातील बहुतांश भागात कृषि क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. कृषि उत्पादने इतकं कमी झालं की त्याचा थेट जिडीपीवर परिणाम झाला आहे. एकीकडे केंद्र सरकारकडून सांगितलं जातंय की भरत ही जगातली सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे.
एकीकडे केंद्र सरकारकडून सांगितलं जातंय की भारत ही जगातली सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. दुसऱ्या बाजूला भारताच्या जिडीपीत सातत्याने घासण पहायला मिळत आहे. यंदा पहिल्या तिमाहीत जिडीपी घसरला असला तरी अर्थव्यवस्थेच्या वाढीची गती स्थिर आहे. यावर्षी एप्रिल ते जून या काळात चीनने 4.7 टक्के जिडीपी नोंदवला आहे. त्यातुलनेत भारताचा 6.7 टक्के जिडीपी हा अधिक आहे. जानेवारी ते मार्च 2023 या काळात भारतीय जिडीपी 6.2 टक्के होता. जो पुन्हा चीनच्या त्या काळातील जिडीपीपेक्षा अधिक होता. त्यामुळे चीनने यंदा गेल्या वर्षापेक्षा बारी कामगिरी केल्याचं दिसून येत आहे.
राष्ट्रीय सांख्यिक कार्यालयाने शुक्रवारी जाहीर केलेल्या माहितीनुसार, मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतिल 3.7 टक्के वाढीच्या तुलनेत यंदा पहिल्या तिमाहीत कृषि क्षेत्राचा वाढदर 2 टक्के नोंदवला गेला आहे. वित्त स्थावर मालमत्ता आणि व्यावसायिक सेवा क्षेत्राचा वाढदर देखील मागील आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीच्या 12.6 टक्क्यांच्या तुलनेत यंदा 7.1 टक्के झाला आहे.
वास्तुनिर्मिती (मॅन्यूफॅक्चरिंग) क्षत्राने चांगली कामगिरी करत दोन्ही वर्षातील पहिल्या तिमाहीची आपसात तुलना करता मागील वर्षातील 5 टक्क्यांच्या तुलनेत 7 टक्के झाला आहे. यावर्षी वास्तविक जिडीपी 43.64 लाख कोटी रुपये झाला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत तो 40.91 लाख कोटी रुपये झाला होता. वीजनिर्मिती, गॅस, पाणीपुरवठा आणि अन्य उपयुक्त सेवा 3.2 टक्क्यांच्या तुलनेत वाढून 10.4 टक्के झाल्या आहेत. बांधकाम क्षेत्रही 8.6 टक्क्यांच्या तुलनेत विस्तारुण 10.5 टक्के झाले आहे. गेल्या 15 महिन्यांतील सर्वात कमी आहे. ही आकडेवारी समोर आल्यानंतर आता RBI गव्हर्नल शक्तीकांत दास यांनी अर्थव्यवस्थेच्या मंदीचे करण सांगितले आहे.
GDP Growth Rate Q1: अर्थव्यवस्था का मंदावली? RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले कारण
एप्रिल जून या कालावधीत कृषि क्षेत्राने सुमारे (GDP Growth Rate Q1) दोन टक्के वाढ नोंदवली आहे. मान्सून खूपच चांगला झाला असून काही भाग वगळता संपूर्ण देशात पसरलेला असल्याने पीक पेरणीचा दृष्टिकोण खूपच आशादायी आहे. या परिस्थितीत 7.2 टक्क्यांचा अंदाजित वार्षिक विकास दर गाठण्याचा आम्हाला वाजवी विश्वास आहे, ते म्हणाले. दास म्हणाले की, व्यावसायिक बांका आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्या आरबीआयच्या पूर्व परवानगी शिवाय त्यांचे लेखा परीक्षक काढून टाकू शकत नाहीत. लेखापरीक्षक कोणत्याही दबावाखाली कम करत नाहीत याची खात्री करण्यासाठी ही मान्यता अनिवार्य करण्यात आली आहे, असे ते म्हणाले.
व्याजात कपात होईल का या प्रश्नावर दास म्हणाले चलन विषयक धोरण समिति यावर निर्णय घेईल तथापि आम्ही महागाई दर चार टक्क्यांवर ठेवण्यावर आणि स्थिरता राखण्यावर अधिक लक्ष केंद्रित करत आहोत जे देशाच्या आर्थिक विकासासाठी शेवटी उपयुक्त ठरेल. ते म्हणाले.
1)आर्थिक विकासाच्या गतीवर निवडणुकांचा परिणाम
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणतात की, जून तिमाहीत आर्थिक विकासाच्या गतीवर निवडणुकांचा परिणाम झाला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणूकांमुळे आचारसंहितेच्या अंमलबजावणीचा पहिल्या तिमाहीत सरकारी खर्चावर परिणाम झाल्याचे त्याचे मत आहे. आधारसंहितेमुळे सार्वजनिक खर्चात घट झाली. ज्याचा परिणाम पहिल्या तिमाहीतिल आर्थिक आकडेवारीवर झाला.
2)आगामी तिमाहीत आर्थिक विकासाला वेग
ते पुढे म्हणतात, सरकारी खर्चात घाट होण्याचे कारण बहुधा पहिल्या तिमाहीत लागू झालेली निवडणूक आचार संहिता आहे. आम्हाला अशा आहे की, येत्या तिमाहीत सरकारी खर्चात वाढ होईल आणि यामुळे आर्थिक (India GDP Rate)वाढीला आवश्यक पाठिंबा मिळेल. पहिल्या तिमाहीत कृषि विकास दर केवळ 2 टक्के होता. चंगल्या पावसामुळे याथी सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. एकूणच, येत्या तिमाहीत आर्थिक विकास दरात सुधारणा अपेक्षित आहे.
3)आर्थिक विकास दर आरबीआयच्या अंदाजापेक्षा खूपच कमी
जून तिमाहीतिल आर्थिक विकास दराची अधिकृत आकडेवारी चर्चेत आहे, कारण ती आरबीआयच्या अंदाजापेक्षा खूपच कमी आली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताचा आर्थिक विकास दर 7.1 टक्के राहील असा, अंदाज रिझर्व्ह बँकेने व्यक्त केला होता.
4) या घटकांमुळे विकास दरावर परिणाम
शक्तिकांत दास म्हणाले की, पहिल्या तिमाहीत रिझर्व्ह बँकेने 7.1 टक्के विकास दराचा अंदाज व्यक्त केला होता. पण राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या पहिल्या आगाऊ अंदाजात विकास दर 6.7 टक्के राहिला. उपभोग, गुंतवणूक, उत्पादन, सेवा आणि बांधकाम यांसारख्या GDP वाढीला चालना देणाऱ्या मुख्य घटकांचा विकास दर 7 टक्क्यांहून अधिक आहे. केवळ दोनच घटकांमुळे विकास दर कमी झाला आणि ते म्हणजे सरकारी खर्च आणि शेती.
5) मुख्य आर्थिक सल्लागार काय म्हणाले?
यापूर्वी सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार (सीईए) व्ही अनंत नागेश्वरन यांनीही जिडीपी विकास दरासाठी निवडणुकांना जबाबदार धरले होते. 2024 च्या लोकसभा निवडणुका आणि सरकारच्या भांडवली खर्चात कपात झाल्यामुळे पहिल्या तिमाहीत आर्थिक विकास दरावर परिणाम झाल्याचे त्यांनीही म्हंटले आहे.
GDP Growth Rate Q1: जिडीपी म्हणजे काय?
सकल राष्ट्रीय उत्पादन (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट) म्हणजेच जिडीपी हे कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिति मोजण्याचं एक मापक आहे. एखाद्या देशाचा जिडीपी म्हणजे त्या देशाने त्या वर्षी देशांतर्गत उत्पादक केलेल्या वस्तु आणि सेवांची एकत्रित किंमत होय. जेव्हा आपल्याला वेगवेगळ्या देशांच्या आर्थिक स्थितीची तुलना करायची असते. तेव्हा जिडीपीचा वापर केला जातो. तसेच देशांतर्गत गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी उत्पादन किती वाढले, हे देशाच्या राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय उत्पन्न किंवा राष्ट्रीय खर्चावरून ठरवता येतो.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!