Ganesh Chaturthi 2024
Ganesh Chaturthi 2024: दरवर्षी भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाचे वाजत गाजत स्वागत करतात. लाडक्या बाप्पा घरोघरी विराजमान होणार आहे. अख्खा महाराष्ट्र गणेशमय झालंय बाप्पाच्या स्वागतासाठी भाविक जय्यत तयारीमध्ये स्वागतासाठी भाविक जय्यत व्यस्त आहेत. विघ्नहर्त्या 10 दिवस आपल्याकडे पाहुणा येतो. त्याच्या स्वागतात आणि पाहुणचारमेड काही कमतरता राहिला नको आणि तो प्रसन्न मनाने आपल्या घरावरील विघ्न दूर करावी यासाठि शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि साहित्य जाणून घ्या.
गणपती बाप्पा प्रथम पूजनीय मानले जातात यामुळे कोणतीही पूजा किंवा विधी सुरू करण्यासाठी गणेशाची पूजा केली जाते. यंदा गणेश चतुर्थीला अनेक शुभ योग तयार होत आहेत. जाणून घेऊया गणेश चतुर्थीला कोण कोणते शुभ योग आहे.गणेश चतुर्थी हा गणरायाला समर्पित असलेला एक हिंदू सण आहे. जो संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गणेश चतुर्थीच्या तारखेपासून इतिहासा पर्यंत सर्व काही जाणून घेऊया.
Ganesh Chaturthi 2024: गणेश चतुर्थी का साजरी केली जाते?
हिंदू पौराणिक कथेवर आधारित भगवान गणेश भगवान शिव आणि देवी पार्वतीचा पुत्र असल्याचे मानले जाते. गणेश चतुर्थी हा दिवस गणपतीच्या जन्माचा उत्सव आहे. त्यामागची कथा निश्चित तुम्ही ऐकली असेल. पौराणिक कथेनुसार या दिवशी माता पार्वती स्नानासाठी जात असताना आपल्या अंगावरील मळापासूनएका लहानशा मुलाची मूर्ती तयार करते आणि त्यात प्राण ओतते. या लहान मुलाला देवी पार्वती आपले स्नान होईपर्यंत आपल्या कक्षा बाहेर पहारा देण्यास सांगते आणि कोणालाही आत प्रवेश न देण्याची सूचना देते. त्याप्रमाणे हा मुलगा आपल्या मातेच्या आज्ञेचे पालन करतो आणि कक्षाबाहेर पहारा देत असतो. त्याच वेळी देवी पार्वतीचे पती महादेव देवी तिला भेटण्यासाठी तिथे येतात. त्या क्षणी गणेश आणि महादेव दोघेही एकमेकांना ओळखत नसतात.
गणेश आपला पुत्र आहे हे भगवान शंकर यांना माहीत नसते. आणि महादेवच आपले पिता आहेत हे गणेश यांना माहीत नसते. त्यामुळे तो लहान मुलगा महादेवांना माता पार्वतीच्या कक्षात प्रवेश करण्यात सक्त मनाई करतो. त्यामुळे तो लहान मुलगा महादेवांना माता पार्वतीच्या कक्षात प्रवेश करण्यात मनाई करतो. महादेव देखील मागे हटत नाही. महादेवांना राग अनावर होतो आणि दोघांमध्ये वाद टोकाला जातो आणि शंकर आपल्या त्रिशूळाने त्या मुलाचे शिर धडापासून वेगळे करतात. तोपर्यंत माता स्नान आटोपून बाहेर येते आणि आपल्या मुलाची अशी अवस्था पाहून अत्यंत दुखी व संतप्त होते.
आपल्या मुलाला पुन्हा जीवंत करण्याचा हट्ट ती भगवान शंकराकडे धरते. त्यावेळी बगवण शंकर त्याच्या देवतांना उत्तर दिशेला सर्वात पहिल्यांदा जो प्राणी दिसेल त्याचे डोके आणण्यास सांगतात. त्यानुसार देवतांना हत्तीचे डोके सापडते. अखेर भगवान शंकर ते हत्तीचे डोके त्या लहान मुलाच्या धडाला जोडताना आणि श्री गणेश पुन्हा जीवंत होतात, अशी ही कथा आहे.
Ganesh Chaturthi 2024: गणेश चतुर्थीचा मुहूर्त आणि शुभ योग
पंचांगानुसार गणेश चतुर्थीला ब्रम्ह योगासोबत सर्वार्थ सिद्धी योग आणि इंद्र योग, चित्रा आणि स्वाती नक्षत्रही तयार होत आहेत. धार्मिक मान्यतेनुसार, भगवान गणेशाचा जन्म मध्यान्ह काळात झाला होता. म्हणूनच गणेश पूजेसाठी मध्यान्हची वेळ ही सर्वोत्तम वेळ मानली जाते. 7 सप्टेंबर रोजी मध्यान्ह गणेश पूजनाचा मुहूर्त सकाळी 11.03 ते दुपारी 1.34 पर्यंत असेल, ज्याचा कालावधी 2 तास 31 मिनिटे आहे. त्याचबरोबर 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थीला गणेश विसर्जन होणार आहे.
(टीप: वरील सर्व बाबी MHTimes24 केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MHTimes24 कोणताही दावा करत नाही.)
Ganesh Chaturthi 2024: गणेश चतुर्थीचे महत्व
शिवाजी महाराजांच्या करकीर्दी पासून हा उत्सव ऐतिहासिकदृष्ट्या साजरा केला जातो. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक उत्सवाला सुरुवात केली ज्यामुळे भारताच्या स्वातंत्र्य युद्धा दरम्यान समाजातील सर्व जातींच्या लोकांमध्ये एकता निर्माण झाली.
या सणाला खूप सांस्कृतिक आणि धार्मिक महत्व आहे. कारण भारतातील आणि त्यापलिकडे भक्तगण भगवान गणेशाची पूजा करण्यासाठी यशासाठी आणि अडथळे दूर करण्यासाठी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी एकत्र येतात. असे म्हंटले जाते. जे लोक गणेशाची पूजा करतात. ते त्यांच्या महत्वकांक्षा आणि ध्येय पूर्ण करण्यास सक्षम असतात. गणरायाची मनोभावे पूजा करणाऱ्यांची इच्छा पूर्ण होते आणि जे कोणी त्यांची प्रार्थना करतात. त्यांची पापांची मुक्तता होते. अशी भक्तांची श्रद्धा आहे.
Ganesh Chaturthi 2024: गणेश चतुर्थी साजरी कशी करतात?
उत्सवाच्या सुरुवातीला घरात सुंदर सजावट केली जाते. गणेशमूर्तीचि प्राणप्रतिष्ठा केली जाते. उपासना करण्याच्या 16 पद्धती आहेत. मूर्तीला लाल चंदन लावले जाते आणि पिवळ्या व लाल फुलांनी सजवले जाते. गणरायाला जास्वंदाचे फूल आणि दूर्वा अत्यंत प्रिय आहेत, त्या अर्पण केल्या जातात. तसेच गणेश उपनिषद आणि इतर वैदिक स्त्रोत्राचा उच्चार केला जातो. त्याशिवाय नारळ, गूळ आणि 21 मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. मोदक हा गणेश यांचा आवडता पदार्थ मानला जातो. उत्सवाच्या शेवटी ढोल वाजवून, भक्तीने गायन आणि नृत्यासह मूर्तीच्या मोठ्या मिरवणुका जवळच्या नदीकडे नेल्या जातात. विधीचा एक भाग म्हणून मूर्तीचे विसर्जन केले जाते. गणेश आपले आई वडील म्हणजेच शिव आणि पार्वतीचे घर असलेल्या कैलास पर्वतावर परत जातात, असे मानले जाते.
Ganesh Chaturthi 2024: मूर्तीची प्रतिष्ठापना करताना दिशा लक्षात ठेवा
तुम्हीही गणपतीची मूर्ती घरी आणत असाल किंवा गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रतिष्ठापना करत असाल तर दिशा नक्की लक्षात ठेवा. ज्योतिषशास्त्रानुसार देवाची मूर्ती योग्य दिशेने आणि योग्य पद्धतीने स्थापित करणे महत्वाचे मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार गणपतीची मूर्ती घराच्या ईशान्य कोपऱ्यात स्थापित करावी. ईशान्य कोपऱ्यात रिकामी जागा नसल्यास मूर्तीची स्थापना पूर्व, पश्चिम किंवा उत्तर दिशेलाही करता येते. महाराष्ट्रासह देश-विदेशातही या सणाला खास महत्व दिले जाते. गणेश चतुर्थीला लॉक मोठ्या थाटामाटात आणि वाद्य वाजवून गणपतीची मूर्ती घरी आणतात. हा उत्सव 10 दिवस चालतो. काहीजण आपल्या सोयीनुसार 1, दीड, 3, 7, दिवसही गणेशोत्सव साजरा करतात. गणपतीची पूर्ण विधिपूर्वक पूजा केली जाते. त्यानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाला निरोप दिला जातो.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!