EVM मशीन वर केली ‘एलॉन मस्क’ यांनी शंका उपस्थित त्यावर राहुल गांधी दिली प्रतिक्रिया

EVM Machine

EVM Machine: निवडणुकीदरम्यान EVM मध्ये छेडछाड होत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून अनेकदा केला जातो. या निवडणुकीतही ईव्हीएम बरोबर छेडछाड होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. ईव्हीएम मुळे देशातील निष्पक्ष निवडणूक प्रक्रिया धोक्यात येत असल्याच त्यांनी म्हंटले होते. दरम्यान, आता राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला आहे. ईव्हीएम एक ब्लॅक बॉक्स असून कोणालाही त्याच्याशी छेडछाड करण्याची परवानगी नाही, असे ते म्हणाले. सोशल मिडियावर पोस्ट करत त्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली. त्यामुळे ईव्हीएमचा मुद्दा पुन्हा चर्चेत विषय ठरला आहे.

राहुल गांधी एलॉन मस्क यांच्या एका पोस्टला रिपोस्ट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी यावेळी रवींद्र वायकर यांच्या नातेवाईका विरोधात करण्यात आलेल्या गुन्हाचाही दाखला दिला आहे. भारतातील ईव्हीएम एक ब्लॅक बॉक्स (EVM Machine) असून कोणालाही त्याच्याशी छेडछाड करण्याची परवानगी नाही, असं राहुल गांधी म्हणाले. तसेच निवडणूक प्रतिक्रितिल पारदर्शकते बद्दल गंभीर चिंता व्यक्त केली जात असून जेव्हा एखादी संस्था जबाबदारी सांभाळत नाही, तेव्हा लोकशाहीला धोखा निर्माण होण्याची शक्यता असते, अशी प्रतिक्रिया ही त्यांनी दिली.

EVM Machine
EVM Machine

दरम्यान, एलॉन मस्क यांनी एक्स या समाज मध्यमांवर पोस्ट करत ईव्हीएम वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. एआय किंवा मानवाकडून हे यंत्र हॅक केले जाऊ शकते, अशी शक्यता मस्क यांनी वर्तविली होती. तसेच ईव्हीएमचा याचा वापर करू नये, अशी सूचना देखील त्यांनी केली होती. तत्पूर्वी अमेरिकेच्या निवडणुकीतील स्वतंत्र उमेदवार रॉबर्ट एफ केनेडी ज्युनियर यांनी ईव्हीएम बाबत एक पोस्ट टाकली होती. त्या पोस्टवरूनच एलॉन मस्क यांनी ईव्हीएम वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना राहुल गांधी यांनी रवींद्र वायकर यांच्या नातेवाईका विरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा दाखला दिला. मुंबई उत्तर पश्चिम मतदार संघातून निवडणूक लढविणाऱ्या एका अपक्ष उमेदवाराच्या प्रतिनिधीसंह दोघांविरोधात मतमोजणी केंद्रात मोबाइल घेऊन गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापैकी एक जण नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर यांचा नातेवाईक होता.

ईव्हीएम काय आहे?

सर्वसाधारण पणे ईव्हीएम म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (EVM Machine), ही मशीन बॅटरीवर चालते. मतदानादरम्यान मत दाखल करून घेण आणि मतमोजणी करण्याच काम ईव्हीएमचं असत. ईव्हीएम दरम्यान दोन भाग असतात. यातील पहिला भाग बॅलीटिंग युनिटचा आहे. दूसरा भाग कंट्रोल युनिट पोलिंग अधिकाऱ्याच्या निरीक्षणाखाली असत. ईव्हीएमचे दोन्ही भाग मोठ्या तरेने जोडलेले असतात. एका ईव्हीएम मध्ये 64 उमेदवारांची नाव दाखल होऊ शकतात. एका ईव्हीएममध्ये 3840 मत दाखल केले जाऊ शकतात. भारतात दोन पब्लिक सेक्टर कंपन्या ईव्हीएम टायर करतात. भरत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड बंगळुरू आणि इलेक्ट्रॉनिक्स् कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हैद्राबाद या दोन कंपन्या ईव्हीएम टायर करतात.

ईव्हीएम पहिल्यांदा कधी वापरत आला?

1982 मध्ये पहिल्यांदा ईव्हीएमचा वापर करण्यात आला. केरळच्या परूर विधानसभा जागेच्या 50 मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी उपयोग करण्यात आला. मात्र या मशीनसंबंधित नियमावली नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने ते निवडणूक रद्द केले. यानंतर ईव्हीएम नाशिनच्या वापरावर निर्बंध आणण्यात आले. यानंतर 1989 मध्ये संसदेने लोकप्रतिनिधी अधिनियम, 1951 मध्ये बदल करण्यात आले आणि निवडणुकीत ईव्हीएमच्या वापरावर तरतूद करण्यात आली.

ईव्हीएमच्या वापराचा अधिकार मिळाल्यानंतर 1992 मध्ये कायदा आणि न्याय मंत्रालयाने कायद्याच्या दुरुस्तीची अधिसूचना जारी केली होती. यानंतरही ईव्हीएमच्या वापरावर 1998 पासून संमती मिळाली. यंदाच्या वर्षी मध्यप्रदेश, राज्यस्थान आणि दिल्लीच्या 25 विधानसभा जागांवर निवडणुका झाल्या. 1999 मध्ये 45 जागांवर झालेल्या निवडणुकीत ईव्हीएमचा वापर करण्यात आला. यानंतर 2000 नंतर देशातील सर्व लोकसभा, विधानसभा, पोटनिवडणुकीत ईव्हीएम वापरात वाढ सुरू झाली. 2001 मध्ये तमिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल आणि पॉंडीचेरीच्या सर्व जागांवर ईव्हीएमने निवडणुका घेण्यात आल्या. 2001 नंतर तीन लोकसभा आणि 110 हून जास्त विधानसभा जागांवर ईव्हीएमचा वापर करण्यात आला.

ईव्हीएम हॅक होऊ शकते का?

  • निवडणूक आयोगाकडून इलेक्ट्रॉनिक वोटिंग (EVM Machine) मशीन पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा करण्यात आला आहे. वेळोवेळी ईव्हीएम मशीन हॅक होण्याचा आरोप करण्यात येतो.
  • प्रसिद्ध केलेल्या वृतानुसार, काही वर्षांपूर्वी अमेरिका मिशिगन युनिव्हर्सिटीशी संबंधित वैज्ञानिकांनी एक डिव्हाईस माशीनशी जोडून दाखवल होत त्यानुसार, मोबाईलवरून मॅसेज पाठवून माशीनमधील निकाल बदलता येऊ शकतात.
  • यावेळी भारतातील अधिकतम संस्थांनी हा दावा फेटाळला होता.
  • दुसरीकडे मॅसाच्युसेक्ट इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉलीशी संबंधित तज्ञ दहिराज सिन्हा यांच्यानुसार, लाखों वोटिंग मशीन हॅक करण्यासाठी खूप जास्त पैशांची आवश्यकता असेल आणि या कांसाठी मशीन निर्माता आणि निवडणूक आयोजित करणारी संस्था सामील असणं गरजेचे आहे.
  • यासाठी छोटा रिसिव्हर सर्किट आणि एक एंटिना माशीनशीस जोडण्याची आवश्यकता असेल.
  • वायरलेस हॅकिंगसाठी माशीनमध्ये एक रेडिया रिसीवर आवश्यक आहे, ज्यात एक इलेक्ट्रॉनिक सर्किट आणि एंटिना असत. मात्र निवडणूक आयोगाच्या डाव्यानुसार, भारतीय वोटिंग माशीनमध्ये अस कोणत्याही प्रकारच सर्किट नसत.
EVM Machine: काय आहे प्रकरण?

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर यांचा नातेवाईक मतमोजणी केंद्रात फोन वापरल्याने अडचणीत आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी वायकर यांचा नातेवाईक मंगेश पंडिलकरवर गुन्हा दाखल केला आहे. मंगेश पंडिलकर यांनी 4 जून रोजी गोरेगाव येथील सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालाच्या घोषणेदरम्यान मतमोजणी केंद्रात फोन वापरला होता.

मंगेश पंडिलकर हा फोन वापरत असल्याचे वनराई पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. ईव्हीएम मशीन अनलॉक करण्यासाठी ओटीपी जनरेट करण्यासाठी हा मोबाइल फोन वापरला असल्याचे बोललं जात आहे. मोबाइल फोनचा डेटा तपासण्यासाठी पोलिसांनी तो मोबाइल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे पाठवला आहे. याप्रकरणी वनराई पोलिसांनी मंगेश पांडीलकर आणि निवडणूक आयोगाचे कर्मचारी एनकोर ऑपरेटर दिनेश गुरव नोटिस बजावली आहे. एनकोर ही एक सिस्टिम ये, ज्यात डेटा एंट्री होत असते. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

ईव्हीएमची आवश्यकता का?

बुध कॅप्चरिंगच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी, निष्पक्ष आणि स्वतंत्र निवडणुकीसाठी ईव्हीएमची आवश्यकता निर्माण झाली. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा ईव्हीएमवर सवाल उपस्थित करण्यात आला. यादरम्यान भारतीय जनता पार्टीचे उमेदवार लालकृष्ण आडवाणी आणि तत्कालीन जनता पार्टीचे अध्यक्ष सुब्रमन्यम स्वामी यांनी ईव्हीएमच्या माध्यमातून निवडणुकीत गोंधलाचआरोप केला होता. यानंतर सर्वच निवडणुकीत ईव्हीएमच्या मुद्यावरून गदारोळ करण्यात आला.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!