Eid-e-Milad Holiday: ईदची सुट्टी सोमवारी नाही तर.. जाणून घ्या, तुमच्या जिल्ह्यात सुट्टी आहे का नाही

Eid e Milad 2024 Holiday

Eid e Milad 2024 Holiday: सर्व महाराष्ट्रात गणेश उत्सव हा सण अत्यंत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सोबतच मुंबई म्हटल्यावर आपल्या दिसते ती गणेश भक्तांची गर्दी संपूर्ण मुंबई ही मोठ्या उत्साहात असते. सणासुदीचे दिवस म्हटले ली, या काळात मिळणाऱ्या सुट्ट्या हा तर अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. आतादेखील विकेंडला लागून येणारी ईद आणि अनंत चतुर्थीची सुट्टी पाहून अनेकांनी बाहेर फिरायला जाण्याचे किंवा निवांत आराम करण्याचे प्लॅन आखले असतील. पण मुंबई आणि उपनगरात कम करणाऱ्या नोकरदारांच्या या प्लॅनिंगचा विचका होण्याची शक्यता आहे. करण राज्य सरकारने ईदच्या सुट्टीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

ईद-ए-मिलाद निमित्त सोमवारी 16 सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर झालेली होती. मात्र महाराष्ट्र सरकारने मुंबई शहर आणि मुंबई उपनगर येथे ही सुट्टी रद्द केली आहे. या दोन जिल्ह्यात आता बुधवार 18 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलादची (Eid e Milad 2024 Holiday) सुट्टी असेल. तसेच उर्वरित जिल्ह्यांमध्ये त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेऊन सुट्टीबाबत निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र सरकारने शासन निर्णय काढून या निर्णयाची माहिती दिली आहे. काही मुस्लिम संघटना आणि लोकप्रतिनिधीनी याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारला दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले आहे. समाजिक सलोख कायम ठेवण्यासाठी मुस्लिम समाज बांधवांनी हा निर्णय घेतला आहे. निर्णयामुळे प्रशासन आणि पोलिस यंत्रणांवरील तान कमी होण्यास मदत होणार आहे.

अनंत चतुर्थीचा सण मंगळवारी 17 सप्टेंबर रोजी येत आहे. यामुळे मुंबई आणि आसपासच्या भागात विसर्जनसाठी मोठी गर्दी उसळते. दोन्ही सणांमध्ये शांतता आणि सलोख कायम राहावा, यासाठी मुंबई शहर आणि उपनगरात इतर जिल्ह्यांमध्ये मुस्लिमधर्मियांनी जुलूस काढण्याचा निर्णय 18 सप्टेंबर रोजी घेतला आहे. तसेच आदल्या दिवशी ईद-ए-मिलाद निमित्त ठीकठिकाणी मुस्लिम धर्मियांकडून जुलूस काढण्यात येत असतात. दोन्ही सण लागोपाठ आल्यामुळे काही मुस्लिम धर्मीय नेत्यानी सोमवारी असलेली सुट्टी ही बुधवारी जाहीर करण्यात यावी, अशी मागणी सरकारकडे केली आहे.

Eid e Milad 2024 Holiday
Eid e Milad 2024 Holiday

त्यामुळे 16 सप्टेंबर रोजी देण्यात येणारी शासकीय सुट्टी रद्द करून ती 18 सप्टेंबर रोजी मुंबई शहर व उपनगर या भागात देण्यात येणार आहे. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने, जिल्हाधिकाऱ्यांना पत्र काढून निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सलग दुसऱ्या वर्षी मुस्लिम समाजाने जुलूस काढण्यासाठी ईद ए मिलादचा दिवस सोडून दुसऱ्या दिवसाची निवड केली आहे. हिंदू आणि मुस्लिम समाजाला शांततेत आपले सण साजरे करता यावेत तसेच यामुळे गोंधळ निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेतला गेल्याचे सांगण्यात येत आहे. या दिवशी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक आणि घरगुती गणपती चे विसर्जन केले जाते. मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरलेले असतात. त्यामुळे वाद निर्माण होऊ नये आणि समाजिक सलोख कायम राहावा यासाठी ईद मिलादच्या शासकीय सुट्टीत बदल करण्यात आला आहे.

Eid e Milad 2024 Holiday: हा सण मुस्लिम धर्मियांसाठी का महत्वाचा

इस्लामिक कॅलेंडरमध्ये ईद-ए-मिलाद ऊन नबी हा दिवस पैगंबर मुहम्मद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी अल्लाने पैगंबर यांना पृथ्वीवर पाठवलं होतं असं मानलं जातं. इस्लामिक कॅलेंडरच्या तिसऱ्या महिन्यात रबी उल अवलमध्ये साजरा केला जाणारा हा उत्सव आहे. याला ईद सारखंच पवित्र मानलं जातं. इस्लाम मध्ये हा देखील अत्यंत महत्वाचा सण आहे. या दिवशी मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव जमा होतात आणि जुलूस कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. 17 सप्टेंबर म्हणजे मंगळवारी अनंत चतुर्दशी आहे. या दिवशी लाडक्या बाप्पाचे विसर्जन केले जाणार आहे. या दिवशी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक आणि घरगुती गणपती चे विसर्जन केले जाते. मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरलेले असतात. त्यामुळे वाद निर्माण होऊ नये आणि समाजिक सलोख कायम राहावा यासाठी ईद मिलादच्या शासकीय सुट्टीत बदल करण्यात आला आहे.

Eid e Milad 2024 Holiday

Eid e Milad 2024 Holiday: समाजवादी पक्षाची मागणी मान्य

पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्मदिन ‘ईद ए मिलाद ऊन नबी निमित्तची शासकीय सुट्टी यंदाच्या वर्षी बुधवार 18 सप्टेंबर रोजी जाहीर करावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे ‘भिवंडी पूर्व’ चे आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री यांना पत्र लिहिले होते. 16 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाच्या राज्यात मिरवणूका आहेत. राज्यात सामाजिक सलोख कायम राहण्यासाठी मुस्लिम धर्मगुरू, लोकप्रतिनिधी आणि समाजसेवक यांनी पैगंबर हजरत मोहम्मद जन्मदिन उत्सवाचे जुलूस बुधवारी, 18 सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 18 सप्टेंबर रोजी शासनाने सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी केल्याचे रईस शेख यांनी सांगितले होते.

बाकीच्या जिल्ह्यांमध्ये सुट्टी कधी?

मुंबई शहर व मुबाई उपनगर या जिल्ह्यांव्यतिरिक्त राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी यांनी मुस्लिम धर्मियांकडून काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीचा दिनांक विचारात घेऊन सोमवार 16 सप्टेंबर 2024 रोजी जाहीर केलेली सार्वजनिक सुट्टी कायम ठेवावी किंवा रद्द करून बुधवार 18 सप्टेंबर 2024 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी याबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा, असे सामान्य प्रशासन विभागाने कळविले आहे.

Eid e Milad 2024 Holiday

या कारणांमुळे 16 सप्टेंबरची सुट्टी रद्द

राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद ए मिलाद या सणाची सुट्टी सोमवार 16 सप्टेंबर 2024 रोजी दर्शविण्यात आलेली आहे. ईद ए मिलाद हहा मुस्लिम धर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात. यावेळी जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मंगळवार 17 सप्टेंबर 2024 रोजी अनंत चतुर्दशी हा हिंदूंचा सण असल्याने दोन्ही समाजामध्ये शांतता आणि सामाजिक सलोख कायम राहण्याच्या हेतूने यावर्षी मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि इतर काही जिल्ह्यांमध्ये मुस्लिम धर्मियांनी बुधवारी, 18 सप्टेंबर 2024 रोजी जुलूस काढण्याचा निर्णय घेतला आहे.

Eid e Milad 2024 Holiday: नंदुरबार मध्ये देखील समाजाचा महत्वाचा निर्णय

नंदुरबार जिल्ह्यात ईद ए मिलाद अर्थात हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती निमित्त होणारी मिरवणूक 16 ऐवजी 19 सप्टेंबर रोजी करण्याचा निर्णय शहादा येथील मुस्लिम समाजाने घेतला आहे. समाजिक सलोख कायम ठेवण्यासाठी मुस्लिम समाज बांधवांनी हा निर्णय घेतला आहे. निर्णयामुळे प्रशासन आणि पोलिस यंत्रणांवरील तान कमी होण्यास मदत होणार आहे.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!