Eid al-Adha 2024
Bakrid 2024: येत्या सोमवारी साजऱ्या होणाऱ्या ईद-उल-अदा अर्थात बकरी ईद निमित्त 67 खासगी आणि 47 महापालिका बाजारात प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी देण्याच्या मुंबई महानगरपालिकेच्या निर्णयाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने गुरुवारी नकार दिला.
महापालिकेच्या धोरणाचे उल्लघन झाल्यास तक्रार करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्याचे आदेश यापूर्वी उच्च न्यायालयाने दिले होते. या आदेशानुसार ही यंत्रणा कार्यान्वित आहे, असे नमूद करून न्यायमूर्ती एम. एस. सोनक आणि न्या. कमल खाता यांच्या खंडपीठाने याचिका कर्त्यांना कोणताही अंतिम दिलासा देण्यास नकार दिला. जीव मैत्री ट्रस्टने दाखल ए याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने याचिकाकर्त्यांकडून अखेरच्या क्षणी न्यायालयात धाव घेऊन अंतिम दिलासा देण्याची मागणी केली जात असल्याबाबत नाराजी व्यक्त केली.

याचिकाकर्त्यांनी 29 मे रोजीच्या महापालिकेच्या परिपत्रकाला सुधारित याचिकेद्वारे आव्हान देणे अपेक्षित आहे. परंतु, याचिकाकर्त्यांनी तसे केलेले नाही. त्यामुळे, याचिकाकर्त्यांना अंतरिम दिलासा देता येणार नाही. असेही खंडपीठाने याचिकाकर्त्यांची दिलासा देण्याची मागणी फेटाळताना स्पष्ट केले.
दुसरीकडे, बकरी ईदच्या (Eid al-Adha 2024) दोन ते तीन दिवस आधी अशा याचिका नेहमीच केल्या जातात. तसेच, बकरी ईदच्या पाश्वभूमीवर प्राण्यांच्या कत्तलिसाठी 67 खासगी दुकाने आणि 47 महापालिका बाजारात प्राण्यांच्या कत्तलीला परवानगी देण्यात आली असून ही परवानगी 17,18 आणि 19 जून या तीन दिवसांसाठीच देण्यात आल्याचा दावाही महापालिकेच्या वतीने करण्यात आला. त्याची दाखल देऊन न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिलासा देण्यास नकार दिला.
बकरी ईद निमित्त ठराविक ठिकाणी कुर्बानीची परवानगी
न्यायमूर्ती एम. के. सोनाक आणि न्यायमूर्ती कनल खाता यांच्या खंडपीठाने ट्रस्टची मागणी फेटाळून लावल्याने पालिका मंडई आणि काही खासगी मटन शॉपमध्ये कुर्बानी देण्याचा मार्ग तूर्तास मोकळा झाला आहे. मात्र, त्याव्यतिरिक्त रहिवासी सोसायटया आणि इतरत्र ठिकाणी कुर्बानी देणाऱ्याविरोधात कारवाई केली जाईल, असे ही पालिकेने हायकोर्टात स्पष्ट केल आहे.
Eid al-Adha 2024: काय आहे याचिका?
बकरी ईद निमित्त मुंबई महपालिकेनं 29 मे 2024 रोजी कुर्बानी संदर्भात परिपत्रक काढलेल आहे. या परिपत्रकानुसार विमानतळ, मंदिर, शाळा, रेल्वे स्थानक, आणि रुग्णालयाच्या आसपास कुर्बानीला थेट परवानगी दिल्यानं नियमाच उल्लघन होत असल्याचा दावा करत जीवमैत्री ट्रस्टनं हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. यात देवणार पशूवधगृहव्यतिरिक्त खासगी मटन शॉप तसेच पालिका मंडईत परवानगी देण्यात येऊ नये, अशी विनंती त्यांनी न्यायालयात केली आहे.
गुरुवरच्या सुनावणीत जीव मैत्री ट्रस्टच्यावतीने वकील राजुरी गुप्ता यांनी खंडपीठाला सांगितल की पालिकेच हे परिपत्रक बेकायदेशीर असून त्याला तातडीने स्थगिती देण्यात यावी. यावर पालिकेच्या वाटीन ज्येष्ठ वकील मिलिंद साठे यांनी युक्तिवाद केला. त्यांनी खंडपीठाला संगितले की, दरवर्षी ईदच्या तोंडावर अशा प्रकारच्या याचिका दाखल केल्या जातात. गेल्या वर्षी 8 जूनला आदेशात हायकोर्टाने अंतरिम दिलासा देत मुंबईत केवळ तीन दिवस म्हणजे 17 ते 19 जून दरम्यान 67 खासगी दुकानं तर 47 पालिका मंडईत कत्तलीला परवानगी देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त इतर कोणालाही परवानगी देण्यात आलेली नाही.
हायकोर्टाने दोन्ही बाजूकडील युक्तिवाद एकूण घेत याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा देण्यात नकार दिला तसेच शेवटच्या क्षणाला तातडीच्या धोरनाच किंवा कायदेशीर तरतुदीच उल्लघन झाल्यास तक्रार दाखल करण्यासाठी पालिकेन एक यंत्रणा ठेवली आहे, याची हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना जाणीव करून दिली.
Eid al-Adha 2024: पालिकेला हायकोर्टाचा दिलासा
बकरी ईद (Eid al-Adha 2024) निमित्त देण्यात येणाऱ्या कुर्बानीसाठी मुंबई पालिकेनं काढलेल्या परिपत्रकाला मुंबई उचक न्यायालयात आव्हान देण्यात आलंय. ‘जीव मैत्री ट्रस्ट’ नं देवणार पशुवधगृहाबाहेत होणाऱ्या कुर्बानीला सरसकट विरोध करत दाखल केलेल्या याचिकेवर त्यांना तातडीने दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं गुरुवारी नकार दिला. दिलासा मागण्यासाठी शेवटच्या क्षणाला कोर्टात येऊ नका, दाद मागण्यासाठी इतरही यंत्रणा आहेत. अस हायकोर्टनं म्हंटलेलं असतानाही याचिकाकर्ते शुक्रवारी मुख्य न्यायमूर्तीच्या खंडपिठापुढे दाद मंगण्याच्या तयारीत आहेत.
पशुवधगृहातील प्राण्याचे इअर टॅगिंग करणार
ईद निमित्त देवनारच्या पशुवधगृहात आणण्यात येणाऱ्या म्हैसवर्गीय प्राणी आणि बकऱ्यांचे इयर टॅगिंग करण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले असून त्यांची अमलबजावणी करण्याची तयारी सुरू आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाला महानगरपालिकेमार्फत उपकरणे आणि मनुष्यबाल उपलब्ध करण्याची सूचनाही आयुक्तांनी केली आहे.
महाराष्ट्र पशुसंवर्धन कायदा, 1976 (सुधारित 1995)अन्वेये अतिरिक्त पशुधन विकास अधिकारी बकरी ईदच्या कालावधीत म्हैसवर्गीय प्राण्यांच्या तपासणी करण्यासाठी संगणक आणि डेटा एंट्री ऑपरेटर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत.पशुसंवर्धन विभागाने प्राण्याच्या आरोग्य तपासणीसाठी 30 डॉक्टर उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच, बकऱ्यांची मोठी संख्या पाहता इअर टॅगिंगच्या प्रक्रियेतून शासनामार्फत सवलत मिळवण्यासाठीचा पाठपुरावा महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.

यंदा बकरी ईदनिमित्त (Eid al-Adha 2024) देवणार पशुवधगृह येथे पुरवण्यात येणाऱ्या सेवा- सुविधांसाठी एक हजाराहून अधिक कर्मचारी तैनात करण्यात येणार असून या परिसरातील कचऱ्याचे निर्मूलन सुरक्षा व्यवस्था, आरोग्य सेवा, कीटकनाशक विभाग, रुग्णवाहिका, आपत्कालीन व्यवस्थापनासाठी फेर मार्शल, तक्रार निवारण कक्ष, माहिती व तंत्रज्ञान आदि विभागांचे अधिकारी कामगार व इतर कर्मचारी या कालावधीत कार्यरत असणार आहेत. बकरी ईदच्या पाश्वभूमीवर देवणार पशुवधगृहात विविध सेवा- सुविधासह पालिका प्रशासन सज्ज झाले असून या कामाच्या पूर्वतयारीचा अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी बुधवारी घेतला. बकरी ईद निमित्ताने देवनार पशुवधगृहात सर्व प्रकारच्या व्यवस्थाचे चोख नियोजन करत प्रत्येक विभागाने आपापली जबाबदारी योग्यरित्या पार पाडावी.
तसेच, यंत्रणांनी आपआपसात उत्तम समन्वय साधावा असे आदेश अश्विनी जोशी यांनी दिले आहेत. ईदच्या कालावधीत पाऊस कोसळण्याची शक्यता, नागरिकांची होणारी गर्दी, प्राण्याची संख्या, तसेच उपहारगृह आदि सुविधा देताना सुरक्षिततेचा प्राधान्य देण्याच्या सूचनाही त्यांनी यंत्रणांना केली.
बकरी ईदच्या पाश्वभूमीवर महानगरपालिकेकडून उपलब्ध करण्यात आलेल्या सोई सुविधा
- बकरी ईदच्या (Eid al-Adha 2024) 15 दिवसांच्या कालावधीदरम्यान देवणार पशुवधगृहात अंदाजे 7 हजार 500 दशलक्ष टन कचऱ्याचे निर्मूलन करण्यासाठी रोज 300 कामगार, 5 पीकअप व्हॅन, 2 जेसिबी, 4 डंपर, मृत जनावरे वाहून नेहण्यासाठी 4 वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
- नागरिकांसाठी परिसरातील 250 सुविधा केंद्रासह 81 मोबाइल शौचलयांची व्यवस्था करण्यात येत आहे.
- व्यापाऱ्यांची नोंदणी व प्राण्याचे आवक-जावक व्यवस्थापन करण्यासाठी क्युआर कोड यंत्रणेचा वापर करण्यात आला आहे.
- नागरिकांसाठी 2 आरोग्य केंद्र आणि 4 रुग्णवाहिका तसेच जनावरांसाठी 2 प्रथमोपचार केंद्रांची व्यवस्था करण्यात येत आहे.
- नागरिकांच्या तक्रार निवारण व आपत्कालीन परिस्थिति हाताळण्यासाठी 24 तास कार्यरत नियंत्रण कक्ष असेल. तसेच, नागरिकांना मदतीला 9930501294 हेल्पलाइन उपलब्ध आहे.
- प्रथम येणाऱ्यास् प्रथम प्राधान्य या तत्वावर प्राण्यांना निवरे उपलब्धतेनुसार वाटप करण्यात येणार आहेत.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!