Dussehra 2024
Dussehra 2024: वर्षभरात अनेक सण उत्सव साजरे केले जातात. सण-उत्सवाच्या दृष्टीने आश्विन महिना खूप महत्वाचा आहे. या महिन्यात हिंदू धर्मातील महत्वाच्या सणांपैकी असलेले काही सण साजरे होतात. शारदीय नवरात्रीच्या समाप्तीनंतर दुसऱ्याच दिवशी दसऱ्याचा (Dussehra 2024) सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. याला विजयादशमी असंही म्हणतात. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या या दिवसाला भारतीय संस्कृतीत विशेष महत्व आहे. या दिवशी रामाने रावणाचा वध केला होता. त्यामुळे या दिवशी रावण दहनही केलं जातं, यासोबत या दिवशी शस्त्रांची पूजाही केली जाते. त्यानुसार वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असलेला दसरा हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या शुभ मुहूर्तावर सार्वजनिक ठिकाणी मोकळ्या मैदानात रावण दहनाचे आयोजन केले जाते. दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पानं सोनं म्हणून वाटली जातात.
या दिवशी धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते, त्याचं प्रतीक म्हणून सोनं म्हणजेच आपट्याची पानं, पाटी-पुस्तक अर्थात सरस्वती देवी आणि शस्त्रांस्त्राचं पूजन केलं जातं. अशात यंदा अष्टमी आणि नवमी एकच दिवशी साजरी होत आहे. त्यामुळे अनेकांच्या मनाच दसऱ्याच्या तिथिबाबत संभ्रमावस्था आहे. तुमच्याही मनात ही स्थिति असेल तर काळजी करू नका. आजचा आपला हा लेख त्याच विषयावर असून आजच्या या लेखात आपण जाणून घेणार आहोत. दसरा नेमका कोणत्या तिथीला आणि शुभ मुहूर्त काय? पण या सर्वात तुम्हाला कधी असा प्रश्न पडला का, की दसऱ्याला आपट्याची पानं सोनं म्हणून का दिली जातात? जाणून घेऊया.
Dussehra 2024: दसरा शुभ मुहूर्त
हिंदू पंचांगानुसार, आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी 12 ऑक्टोबर रोजी आहे, त्यानुसार सकाळी 10 वाजून 59 मिनिटांनी, दशमी तिथी प्रारंभ होईल, तर 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 09 वाजून 08 मिनिटांनी समाप्त होईल. त्यामुळे तिथीनुसार, 12 ऑक्टोबर रोजी दसरा साजरा केला जाणार आहे. या दिवशी विजय महूर्त दुपारी 02 वाजून 03 मिनिटे ते 02 वाजून 49 मिनिटांपर्यंत आहे. त्याच वेळी, पूजेचा शुभ मुहूर्त दुपारी 01 वाजून 17 मिनिटे ते 03 वाजून 35 मिनिटांपर्यंत आहे. या काळात प्रभू श्रीरामाची पूजा करणे फलदायी ठरेल. दसरा हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते.
(टीप: वरील सर्व बाबी MH टाइम्स 24 केवळ माहिती म्हणून वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MH टाइम्स 24कोणताही दावा करत नाही.)
विजयादशमीची पूजाविधी
मान्यतेनुसार, विजया दशमीला दसरा पूजन दुपारी करणे शुभ मानले जाते. त्यानुसार, दुपारी पूजा करा. त्यानुसार घरच्या ईशान्य कोपऱ्यात 8 कमळाच्या पाकळ्यांनी अष्टकोनी चक्र बनवा. त्यानंतर, अष्टदलाच्या मध्यभागी अपराजिताय नम: या मंत्राचा जप करा आणि माता दुर्गासह प्रभू रामाची पूजा करा. आता रोळी,अक्षत, फुले इत्यादी पूजा साहित्य अर्पण करून देवाला नैवेद्य अर्पण करा. देवीची आरती करा. काही ठिकाणी शेणापासून 9 गोळे आणि 2 वाट्या बनवल्या जातात. यातील एका वाटीत नाणी आणि दुसऱ्या वाटीत रोळी, तांदूळ, जव आणि फळे ठेवा. जर तुम्ही पुस्तकाची किंवा शस्त्रांची पूजा करत असाल तर या वस्तु पूजेच्या ठिकाणी ठेवा आणि त्यावर रोळी आणि अक्षत अर्पण करा त्यानंतर आपल्या क्षमतेनुसार, दक्षिणा आणि अन्नदान करा. संध्याकाळी रावणाचे दहन केल्यास आपट्याची पाने घरातील सदस्यांना द्यावे ज्येष्ठाचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घ्यावा.
Dussehra 2024: दसऱ्याचे महत्व
दसरा या शब्दाला दशहरा असे देखील म्हणतात. तसेच विजयाच्या संदर्भात या दिवसाला दशहरा, दसरा तसेच विजयादशमी असेही म्हणतात. या दिवशी प्रभू श्री रामाने लंकेचा राजा रावणाचा वध करून विजय मिळवला होता. हा सण हिंदू सणांमध्ये प्रमुख्याचा मानला जातो. साडेतीन मुहूर्तापैकी एक महूर्त असणार दसरा. पौराणिक कथेनुसार या दिवशी दुर्गा देवीने देवी चंडीकेचे रूप धारण करून महिषासुर नावाच्या रक्षसाचा वध केला होता. दसरा हा सण वाईटावर चांगल्याचा विजयाचा प्रतीक म्हटला जातो. आश्विन शुक्ल पक्ष दशमीच्या दिवशी प्रभू रामाने रावणाचा वध करून सीतेला सोडवले होते. तेव्हापासून दसरा साजरा करण्याची पद्धत आहे. तसेच या दिवशी रावणासह कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या पुतळ्याचेही दहन केले जाते.
आपट्याच्या पानाचं महत्व
दसऱ्या दिवशी सर्व लॉक एकमेकांना आपट्याची पणे वाटतात. आपट्यांच्या पानांची एक पौराणिक कथा आहे. रघुकुलातील श्रीराम चंद्राच्या पूर्वजांनी खूप संपत्ती कमावली होती. पण ती त्यांनी दान केली आणि त्यानंतर त्यांनी वनप्रस्थाश्रम स्वीकारला. हे राजे अरण्यात राहत असताना त्यांचे कुलगुरू कौल्स मुनी येथे आले. त्यांनी त्या राजांकडे 14 कोटी सुवर्ण मुद्रा दान म्हणून मागितली होती. वास्तविक ते राजे तेव्हा वनप्रस्थाश्रम निघाले तेव्हा त्यांच्याकडे धन नव्हते. तरीही गुरूंची मागणी पूर्ण करण्यासाठी त्यांनी इंद्रदेवांना युद्धाचे आव्हान दिले. पण त्या युद्धात इंद्रदेवांच्या पराभव झाला. त्यानंतर त्या राजांनी मला तुमचं राज्य नको, 14 कोटी सुवर्ण मुद्रा हव्या आहेत, अशी मागणी इंद्रदेवांकडे केली, असे इंद्रदेवांनी सांगितले.
त्याचप्रमाणे इंद्रदेवांनी आपट्याच्या पानांच्या रूपाने सोन्याचा वर्षाव केला. त्यामुळे आपट्याचे पण आपण विजयादशमिला सोने म्हणून लुटतो. आपट्याच्या पानांना सोन्याचे प्रतीक मानले जाते. अशी आख्यायिका सांगितली जाते असे तज्ञ म्हणतात. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी सोनं म्हणून आपट्याची पणे वाटली जातात आणि ‘सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा’ असं म्हणतात.
Dussehra 2024: आपल्या प्रियजनांना दसऱ्याच्या शुभेच्छा द्या
- सोनेरी दिवस, सोनेरी पर्व, सोनेरी क्षण, सोनेरी आठवण, सोन्यासारख्या लोकांना, दसऱ्याच्या शुभेच्छा!
- आला आला आला दसरा, सोनं एकमेकांना वाटण्याचा.. उणे वाईट दहन करून, फक्त आनंद लुटण्याचा.. हॅप्पी दसरा!
- आपट्याची पाने, झेंडूची फुले, घेवूनी आली विजयादशमी, दसऱ्याच्या आज शुभ दिनी, सुख समृद्धी लाभो तुमच्या जीवनी.. दसरा सणानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा..!
- सोनं वाटण्याइतका मी श्रीमंत नाही, पण नशीबानं जी सोन्यासारखी माणसं मला मिळाली.. सोन्यासारखे तुम्ही आहातच.. सदैव असेच राहा.. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
- विजय मिळवला म्हणूनी, साजरी विजयादशमी.. झेंडूफुलांच्या माळा रंगीत, शोभती घरोघरी, वाहनी.. दसऱ्याच्या व विजयादशमी च्या हार्दिक शुभेच्छा!
- आंब्यांच्या पानांची केली कमान, अंगणात काढली रांगोळी छान, आश्विन शुद्ध दशमीचा सण दसरा, आपट्याची पणे देऊन करा साजरा.. दसरा व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्या!
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!