Dr Manmohan Singh Death
Dr Manmohan Singh Death: नव्वदच्या दशकात भारताच्या आर्थिक धोरणांचे तसंच उदारीकरण आणि आर्थिक सुधारणांचे शिल्पकार अशी ओळख असलेले माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं गुरुवारी नवी दिल्लीत निधन झाले. नेहरू- गांधी कुटुंबातील सदस्याव्यतिरिक्त टेक असे पहिले पानप्रधान ठरले जे पहिल्या कार्यकाळानंतर पुन्हा एकदा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्यात यशस्वी ठरले. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, सरकारचे आर्थिक सल्लागार, अर्थमंत्री ते पंतप्रधान अशी कारकीर्द असलेल्या मनमोहन सिंगांनी अत्यंत नाजुक काळात भारताच्या अर्थव्यवस्थेला ताकद देण्याच कम केलं, असं जाणकार सांगतात.

भारत सरकारने त्यांच्या मृत्यूनंतर सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा (Dr Manmohan Singh Death) जाहीर केला आहे. रात्री निवास्थानी कॉँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, कॉँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी, केसी वेणुगोपाल यांच्यासंहित अनेक कॉँग्रेस नेते त्या रात्री पोहचले होते. 22 मे 2004 रोजी मनमोहन सिंग हे देशाचे 13 पंतप्रधान बनले त्यानंतर ते सलग 10 वर्ष देशाचे पंतप्रधान राहिले. केब्रीज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठांत त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, केंद्रीय अर्थमंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, देशाचे अर्थमंत्री आणि शेवटी पंतप्रधान, डॉ. सिंग यांचा देशाच्या आर्थिक राजकीय विश्वातील प्रवास हा थक्क करणारा आहे.
अत्यंत नाजुक काळात भारताच्या अर्थव्यवस्थेला ताकद देण्याचं कम केलं असं जाणकार सांगतात. त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कार्यकाळात सर्वात चर्चेला ठरलेला निर्णय म्हणजे भारत अमेरिका अनु करार होय त्यावेळी यूपीए 1 सरकारला बाहेरून पाठिंबा दिलेल्या डाव्या पक्षांनी या कराराला कडाडून विरोध केला होता. सरकार कोसळण्याची जोखीम असतानाही मनमोहन सिंग हा करार तडीस नेला. नेमका हा करार काय होता, त्याबाबत मनमोहन सिंग इतके आग्रही का होते. डाव्या पक्षांनी पाठींबा काढून् घेतल्यानंतर अल्पमतात आलेलं मनमोहन सिंग सरकार कसं वाचलं, ज्यासाठी त्यांनी आपलं पंतप्रधानपद आणि सरकार पणाला का लावलं होत.
Dr Manmohan Singh Death: पंतप्रधानांसह मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली
भारताच्या सर्वात प्रतिष्ठित नेत्यांपैकी एक असलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने संपूर्ण भारत शोककुल आहे. अतिशय सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले मनमोहन सिंग एक नामांकित अर्थतज्ञ म्हणून उदयास आले. देशाच्या अर्थमंत्री पदासह त्यांनी विविध सरकारी पदांवर कम केले. देशाच्या आर्थिक धोरणांवर त्यांची अमित छाप होती. संसदेत त्यांनी केलेली भाषण अभ्यासपूर्ण होती. नागरिकांचे आयुष्य सुधारण्यासाठी त्यांनी व्यापक प्रयत्न केले अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. गृहमंत्री वाहताना म्हंटलं आहे की, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनांची बातमी अत्यंत दु:खद आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर तसेच देशाचे अर्थमंत्री आणि पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाच्या कारभारात महत्वाची भूमिका बजावली.

या दु:खद प्रसंगी मी त्यांच्या कुटुंबियांप्रति आणि समर्थकांप्रति संवेदना व्यक्त करतो. वाहेगुरुजी त्यांच्या आंत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची शक्ति देतो.
Dr Manmohan Singh Death: अल्पमतात आलेलं सरकार कसं वाचवलं?
हा सारा घटनाक्रम फारच नाट्यमय वळणावर आला होता. सरकार पडतंय की काय, अशी शक्यताही निर्माण झाली होती, असं राजकीय विश्लेषण सांगतात. 2004 साली सत्तेवर आलेल्या कॉंग्रेसकडे 153 तर एकुन यूपीए आघाडीकडे 224 खासदार होते. डाव्या पक्षांच्या 59 खासदारांनी यूपीए सरकारला बाहेरून पाठिंबा दिला होता. या कराराच्या मुद्यावरून 8 जुलै रोजी डाव्या पक्षांनी आपला पाठिंबा काढून घेतला आणि सरकारला बाहेरून पाठिंबा दिला होता. या कराराच्या मुद्यावरून 8 जुलै रोजी दावय्या पक्षांनी काढून घेतला आणि सरकार अल्पमतात आलं. त्यानंतर यूपीए सरकारनं सत्ता वाचवण्यासाठी इतर पक्षांचा पाठिंबा मिळवण्यासाठीची धडपड सुरू केली. त्यांना समाजवादी पक्षाचे कीती खासदार समर्थन देतील, याबाबत कॉँग्रेसला साशंकता होती.
कॉँग्रेसनं झारखंड मुक्ती मोर्चा (5 सदस्य) आणि नॅशनल कॉन्फरन्सला (2 सदस्य) देखील आपल्या बाजुनं वळवलं होतं. मात्र बहुजन समाज पार्टी तसेच अजित सिंह यांच्या नेतृत्वातील लोकदलनं सरकारला पाठिंबा देण्यास नकार दिला होता. यूपीए सरकार अगदी शेवटच्या क्षणापर्यंत छोटे छोटे पक्ष आणि अपक्षांच्या भरोशावर विसंबून राहिलं. याबाबत मनोरंजन भारती सांगतात. एकुणातच आहे ते सरकार टिकवण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत बरेच प्रयत्न केले गेले. मात्र हे सरकार टिकवण्यांमध्येही अमेरिकेचाच हस्तक्षेप आहे, अशाही उलट सुलट चर्चा त्यावेळी झाल्या होत्या. अगदी विरोधी पक्षांच्या खासदारांनी मतदानाला अनुपस्थित रहावं, म्हणून कॉँग्रेसकडून पैसे वाटण्यात आल्याचाही आरोप झाला. मात्र भलेही माझं सरकार पणाला लागलं त्रि चालेल पण मी हा करार करणार यावर मनमोहन सिंग ठाम होते.
प्रसिद्धीपासून दूर राहत काम करणारा नेता
एक अत्यंत अभ्यासू विद्वान आणि माजी नोकरशहा असलेले मनमोहन सिंग, (Dr Manmohan Singh Death) प्रसिद्धीपासून किंवा सत्तेच्या झगमगाटापासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी ओळखले जात होते. चर्चेत राहण्यापेक्षा ते नेहमीच कामावर लक्ष केंद्रित करण्यावर भर द्यायचे. त्यांच एक्स तेव्हाच ट्विटर हे सोशल मिडिया अकाऊंट बहुतांश वेळा कंटाळवाण्या नोंदीसाठी प्रसिद्ध होतं. तसंच त्यांच्या फॉलोअर्सची संख्याही मर्यादित होती. मनमोहन सिंग कमी आणि मोजकंच बोलायचे. ते अत्यंत शांत स्वभावाचे होते. मात्र असं असून देखील त्यांचे प्रशंसक होते, त्यांनी अनेकांचा आदर संपादन केला होता. परवण्यांचं बेकायदेशीर वाटप करण्यात आलेल्या अब्जावधी डॉलर्सच्या कोळसा घोटाळ्यावरील प्रश्नांना उत्तर देताना या विषयावरील मौनाचा बचाव करताना ते म्हणाले होते, हजारो उत्तरांपेक्षा मौन चांगलं.

2015 मध्ये त्यांना न्यायालयात हजर राहण्यास समन्स (Dr Manmohan Singh Death) बजावण्यात आलं होत. गुन्हेगारी कट विश्वासभंग आणि भ्रष्टाचाराशी संबंधित गुन्हाच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी हे समन्स बजावण्यात आलं होतं यामुळे मनमोहन सिंग अस्वस्थ, नाराज झाले होते. ते पत्रकरांचा म्हणाले होते, कायदेशीर छाननी किंवा प्रक्रियेसाठी ते तयार आहेत आणि सत्याचा विजय होईल.
पंतप्रधानाचा कार्यकाळ संपल्यानंतर वाढत्या वयाच्या मर्यादा असतानाही मुख्य विरोधी पक्ष असलेल्या कॉँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून मनमोहन सिंग त्या त्यावेळेच्या प्रश्नांशी जोडलेले राहिले भूमिका मांडत राहिले. ऑगस्ट 2020 मध्ये त्यांनी एका दुर्मिळ मुलाखतीत सांगितले होते की, कोरोंनाच्या संकटमुळे देशांच झालेलं आर्थिक नुकसान रोखण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी भारतानं तात्काळ तीन पावलं उचलली पाहिजे. कोरोंनाच्या अद्भुतपूर्व संकटामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत मांडी आली होती. त्याला तोंड देण्यासाठी मनमोहन सिंग यांनी सूचना केली होती.
ते म्हणाले होते, सरकारनं लोकांना थेट रोख रक्कमे द्वारे मदत करावी व्यवसाय उद्योगासाठी भांडवल उपलब्ध करून द्यावं आणि वित्तीय क्षेत्राला पाठबळ देत संकटातून बाहेर काढावं.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!