‘धर्मवीर 2’ ची लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला “साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट उलगडणार..” जाणून घ्या कधी रिलीज होणार

Dharmaveer 2 Trailer

Dharmaveer 2 Trailer: “आपल्या संघटनेचा माज आहे, हा भगवा रंग, सनातन हिंदू संस्थेचा मान आहे हा भगवा रंग, छत्रपती शिवरायांचे स्वप्न होते, हा भगवा रंग आणि कोणाशीतरी आघाडी करून तुम्ही विकलात तो भगवा रंग” यया डायलॉगने सुरुवात झाली आहे. याबरोबर, आपणच आपल्या धर्माची लाज नाही राखली तर दुसरे कोणीतरी येऊन ती उतरवतील असे संवाद या ट्रेलरमध्ये पहायला मिळत आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या आयुष्यावर आधारित भूमिका देखील पहायला मिळाली आहे. हा बहुप्रतीक्षित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असून प्रेक्षक याला प्रतिसाद देणार हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून ‘धर्मवीर 2’ (Dharmaveer 2 Trailer) सिनेमाची चर्चा सुरू आहे. सिनेमाच्या टिझरचिही सोशल मिडियावर प्रचंड चर्चा झाली. आता सीमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ अशी टॅगलाइन आहे. धर्मवीर 2 सिनेमाच्या ट्रेलर अनावरण कार्यक्रम दिग्गजांच्या उपस्थितीत पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अभिनेते अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे यांनी हजेरी लावली.

काही आठवड्यांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बॉबी देओल, सचिन पिळगांवकर तसंच महेश कोठारे, महेश मांजरेकर आणि अशोक सराफ यांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात सिनेमाचं पोस्टर प्रकाशित करण्यात आलं आहे. पोस्टरवरील अभिनेता प्रसाद ओक याचा लुक बघून त्यांच कौतुक झालं होतं. पण टिझरमधील एका चुकीमुळे निर्माते आणि दिग्दर्शक यांना ट्रोल करण्यात आलं होत.

Dharmaveer 2 Trailer

शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ 2022 मध्ये दिग्दर्शक झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट चांगलाच गाजला होता. प्रवीण तरडे दिग्दर्शित या चित्रपटात आनंद दिघेची भूमिका प्रसाद ओक यांनी निभावली आहे. आता या चित्रपटाचा दूसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. ‘सनातन हिंदू संस्थेचा मन आहे हा भगवा रंग छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न होता हा भगवा रंग आणि कोणाशीतरी आघाडी करून तुम्ही विकलात तो भगवा रंग, अशा संवादासह धर्मवीर 2 (Dharmaveer 2 Trailer) चा ट्रेलर सादर करण्यात आला चित्रपटाच्या माध्यमातून सद्य राजकीय स्थितीवर भाष्य केलेल पहायला मिळाले.

शिवसेना नेते आनंद दिघे ययानच्या आयुष्यावर बेटलेल्या या चित्रपटाच्या सिक्वेलच्या ट्रेलरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे 2’ ट्रेलर लॉन्च सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिग्गज अभिनेते अशोक सराफ, गोविंदा, निवेदिता सराफ, सिद्धार्थ जाधव, अमृता खानविलकर या ट्रेलर लॉन्च वेळी उपस्थित होते. मराठीसह हिंदी भाषेत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 9 ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

टिझर सूद्दा जबरदस्त

दरम्यान, काही दिवसांपूर्वी चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. “ज्याच्या घरातील स्त्री दु:खी त्याची बरबादी नक्की..” असं सांगत ते संबंधित महिलेला मरण करणाऱ्या चांगलाच धडा शिकवल्याचे टिझरमध्ये पहायला मिळाले होते. धर्मवीर 2 बद्दल सांगायच झालं तर या सिनेमाची निर्मिती अभिनेते मंगेश देसाई यांनी केली असून, दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी सांभाळली आहे. यामध्ये अभिनेता प्रसाद ओक आनंद दिघे यांची, तर क्षितीश दातेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारली आहे.

मंगेश देसाई यांची पोस्ट

धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे भाग 1 च्या माध्यमातून धर्मवीर आनंद दिघे साहेबांच चरित्र सगळ्या जनतेसमोर आलं. धर्मवीर आनंद दिघे साहेब या माध्यमातून सर्व जगत पोहोचले आणि असा माणूस होणे नाही हेही सर्वाना समजेल. त्यांच्या आयुष्यातील अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या जनतेसमोर येणं गरजेचं आहे, म्हणूनच लवकरच धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे भाग 2.

Dharmaveer 2 Trailer

Dharmaveer 2 Trailer: केव्हा प्रदर्शित होणार ‘धर्मवीर 2’?

येत्या ऑगस्ट महिन्यात क्रांति दिनाचं औचित्य साधून ‘धर्मवीर 2’ (Dharmaveer 2 Trailer) हा चित्रपट एकाच वेळी मराठीसह हिंदी भाषेत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. असं सिनेमाचे निर्माते मंगेश देसाई यांनी सांगितलं. हा सिनेमा येत्या 9 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. दरम्यान धर्मवीर 2 सिनेमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील भूमिका साकारल्याचं म्हंटल जात आहे. पोस्टर लॉन्च दरम्यान, सचिन पिळगांवकर यांनी केलेल्या या वक्तव्यामुळं ही चर्चा रंगली होती.

काय म्हणाले अशोक सराफ?

‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे 2′ ट्रेलर (Dharmaveer 2 Trailer) लॉन्चवेळी अशोक सराफ यांनी भाषण केले. त्यावेळी त्यांनी म्हटले, ” एका राजकीय क्षेत्रातील व्यक्तीवर अशा चित्रपटाची निर्मिती होऊ शकते, हे पहिल्यांदाच बघितलं. राजकारण व अभिनय दोन वेगळी टोक असताना देखील एक सुंदर चित्रपट बनू शकतो, हे आम्ही धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट आला तेव्हा आम्ही हे पाहिलेलं आहे आणि आता चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचा ट्रेलर पाहिल्यानंतर उत्सुकता वाढली आहे. आता यापुढे काय बघायला मिळणार हे निश्चित कळत नाही. हा चित्रपट वेगळी कथा दाखवेल, असं निश्चित वाटतं. हा सिनेमा बनविणाऱ्या लोकांचं कौतुक वाटतं. कारण ते एका वेगळ्या विषयावर चित्रपट बनवतात आणि तो चित्रपट हिट होतो. चित्रपटाचा ट्रेलर बघता, धर्मवीर चा हा दूसरा भाग देखील हिट व्हायला हरकत नाही. मि सगळ्याना शुभेच्छा देतो.

त्यांनी या चित्रपटाचे दोन, तीन किंवा चार कितीही भाग बनवावेत. त्यांनी ते बनवले पाहिजेत आणि लोकांपर्यंत एका नेत्यांच जीवन कसं असतं, हे पोहोचवलं पाहिजे, ते दाखवलं पाहिजे असं मला मनोमन वाटत, असे मत मांडत अशोक सराफ यांनी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे 2 चित्रपटा बद्दल बोलायचे, तर 2022 मध्ये आलेल्या धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाचा पुढचा भाग आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे पहायला मिळाले होते. आता या दुसऱ्या भागाला देखील तसाच प्रतिसाद मिळणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!