Dahi Handi 2024
Dahi Handi 2024: श्रीकृष्ण जयंती आणि गोपाळकाला म्हणजे सर्वांच्या आवडीचा सण असतो. एकदा का गोपाळकाला आला की आस लागते ती, कोणाची दहीहंडी (Dahi Handi 2024)सर्वात उंच असते ती बघण्याची. ‘गोविंदा आला रे’ म्हणत उंच उंच मनोऱ्यावर चढत दहीहंडी फोडण्याची मजा काही औरच असते. हा सोहळा ‘याची दही याची डोळा’ पाहणे ही सुद्धा सुखद अनुभव देणारे आहे. त्यामुळेच देशभरात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात दहीहंडी साजरी केली जाते. दहीहंडी म्हणजे एक वेगळा जोश उत्साह असतो. ‘अरे बोल बजरंग बळी की जय’ म्हणत बाल गोपाल एकमेकांच्या साथीने उचंच उंच मानवी मनोरे रचतात.
मुंबई आणि आसपासच्या शहरातील सर्वात मोठी दहीहंडी फोडण्याचा मान मिळावा यासाठी गोविंदा पथकांची धडपड सुरू असते. त्यांच्या या जोशाला यंदाही अनेक गोविंदा पथक मुंबईत मोठ्या आणि मानाच्या दहीहंड्या फोडण्यासाठी सज्ज झाले आहेत. एकूणच मुंबईतील दहीहंडी निमित्त एक वेगळा माहोल, उत्साह असतो. जर तुम्हालाही मुंबईतील दहीहंडी उत्सवाचा अनुभव घ्यायचा असेल तर मुंबई आणि परिसरातील पाच प्रसिद्ध आणि मानाच्या दहीहंड्याना नक्कीच भेट देऊ शकता.
तुम्ही ऐकलं असेल की कान्हा जेव्हा लहान होता तेव्हा तो नटखट होता. गोपिकांच्या घागरी फोडायचा, घरातील दही लोणी पळवायचा. दही आणि लोणी पळवण्यासाठी तो मित्रांची म्हणजे गोपाळांची मदत घ्यायचा. अनेक मित्रांना एकमेकांच्या खांद्यावर चढवून उंच मनोरा करून त्याच्यावर कृष्णा चढून दह्याने भरलेली मटकी फोडायचा. यामुळे सर्वानाच लोणी आणि दह्याचा आस्वाद घेता यायचा. कालांतराने हाच एकउत्साहाचा आणि धाडसाचा खेळ बनला आहे. दहीहंडीची चर्चा आणखी एका गोष्टीने होते ती म्हणजे त्यांचे सार्वजनिक रूप आणि त्यांच्यावरील बक्षीस आहे. दहीहंडी वरती लाखोंच्या किंमतीत बक्षिसांची लयलूट केली जाते. बक्षिसे जिंकणारे गोविंदा ही तितके मेहनती असतात. अनेक दिवस ते सराव करत असतात.
थरांची स्पर्धा.. बाळ गोपाळांचा जल्लोष.. बक्षिसांची लयलूट असा मोहोल दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने वर्तक नगरात पहायला मिळणार आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ‘संस्कृती प्रतिष्ठान’ आयोजित दहीहंडी उत्सवात यंदा पहिले नऊ थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला 11 लाखांचे बक्षीस दिले जाणार आहे. तसेच रोख रक्कम, आकर्षक सन्मान चिन्ह देऊन गोविंदांना गौरवण्यात येणार आहे. यासोबत या दहीहंडी उत्सवाला कलाकार आणि राजकीय नेते देखील भेट देणार असल्याने गोविंदांचा उत्साह द्विगुणित होणार आहे. यंदा तुम्हीही मुंबईमध्ये असाल तर दहीहंडीचा उत्सव पहायचा असेल तर कुठे जायचं याची माहिती घेऊयात.
Dahi Handi 2024: मुंबई मधील या आहेत प्रसिद्ध मानाच्या दहीहंड्या
1) संकल्प प्रतिष्ठान, जांबोरी मैदान, वरळी
राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीचे नेते सचिन अहिर यांच्या ‘श्री संकल्प प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्ट’ च्या माध्यमातून वरळीत मोठ्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले जाते. वरळीतील जी. एम. भोसले मार्गावरील जांबोरी मैदानावर ही दहीहंडी (Dahihandi) बांधली जाते. ही दक्षिण मुंबईची सर्वात उंच आणि मनाची दहीहंडी मानली जाते. या दहीहंडीला बॉलीवूड मधील अनेक दिग्गज सेलिब्रिटी उपस्थित राहत असल्याने ही दहीहंडी प्रसिद्ध आहे.
2) छबिलदास लेन, दादर
मुंबईतील दादर परिसरातील साजरा होणारा हा दहीहंडी उत्सव सर्वात मोठा दहीहंडी उत्सव आहे. येथे फक्त गोविंदांचीच पथके नाही, तर तरुणीच्या पथकेही मटकी फोडण्याचे प्रयत्न करतात. हा दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी हजारोंची गर्दी जमते.
3) वांद्रे कॉलनी दहीहंडी, वांद्रे-
भारतीय जनता पार्टीचे मुंबई अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांच्या पुढाकाराने वांद्रे कॉलनी येथे दहीहंडी आयोजन केले जाते. मुंबईतिल सर्वात लक्षवेधी दहीहंडी म्हणून या दहीहंडीचा नावलौकिक आहे. मुंबईतील अनेक मोयहत दहीहंडी पथकांना येथे येण्यासाठी खास आमंत्रण दिले जाते. तसेच ही हांडी मुंबईच्या जवळ असल्याने इथे बाळगोपाळांसह बघणाऱ्यांची मोठी गर्दी असते.
4) मागाठाणे दहीहंडी, बोरिवली-
शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार प्रकाश सुर्वे यांच्या वतीने दरवर्षी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले जाते, ही राजकीय दहीहंडी असल्याने येथे हंडी फोडण्यासाठी मुंबई भरातून गोविंदाचे संघ पोहोचतात . दरवर्षी लाखोंची बक्षिसे ही येथे ठेवली जातात. येथे टीव्ही आणि बॉलीवूड जगतातील सेलिब्रिटी ही दरवर्षी सहभागी होतात.
5) संस्कृती युवा प्रतिष्ठान दहीहंडी, ठाणे
शिवसेना (शिंदे गट) आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने संस्कृति युवा प्रतिष्ठान मार्फत बांधण्यात येणारी दहीहंडी (Dahi Handi 2024) म्हणजे ठाण्यातील एक प्रसिद्ध दहीहंडी महोत्सव आहे. गेल्या काही वर्षात या महोत्सवाने एक प्रभावी प्रतिष्ठा निर्माण केली आहे. 2012 मध्ये जय जवान गोविंदा मंडळाने येथे 43.79 फुट आणि 9 थरांचा मनोरा रचून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवले, तेव्हापासून दरवर्षी होणारा हा दहीहंडी उत्सव पाहण्यासाठी बॉलीवूड आणि राजकारणातील सर्व सेलिब्रिटी येथे पोहोचतात. ठाणे जिल्ह्यातील वर्तकनगर भागातील महापालिकेच्या शाळा परिसरात यांचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षात येथील बक्षिसांची रक्कम एक कोटी रुपयांपर्यंत पोहोचली होती. यावेळी ठाण्यात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ‘संस्कृती प्रतिष्ठान’ आयोजित दहीहंडी उत्सवात यंदा पहिले नऊ थर लावणाऱ्या गोविंद पथकाला 11 लाखांचे बक्षीस दिले जाणार आहे.
Dahi Handi 2024: ‘जागतिक विश्वविक्रमास’ 25 लाखांचे बक्षीस
नऊ थरांचा विक्रम मोडून दहा थर रचत जागतिक विक्रम करणाऱ्या गोविंदा पथकाला 25 लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. यंदा प्रो गोविंदा सीझन 2 देखील मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. गोविंदा हा खेळ मातीपासून ते मॅट पर्यंत पोहचला आणि अपघाताचे सत्र थांबले जावे, हा प्रो. गोविंदा मागील उद्देश आहे, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. तसेच राज्य सरकारने गोविंदा खेळाचा क्रिडा प्रकारात समावेश केला आहे. गोपाळकाल्याला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 75 हजार गोविंदांचा मोफत विमा काढण्यात येत आहे. यंदाचा गोविंदा अपघातमुक्त व्हावा यासाठी प्रयत्न करू या, असे आवाहनही सरनाईक यांनी केले.
Dahi Handi 2024: पोलिस प्रशासन सज्ज
मुंबईत 27 तारखेला साजऱ्या होणाऱ्या दहीहंडी सणाच्या पाश्वभूमीवर मुंबईत पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला जाणार आहे. शहरात कायदा व सुव्यवस्थेला जर कुणी गालबोट लावले किंवा कायद्याला आव्हान देणाऱ्या गोष्टी केल्या तर त्याची हयगय केली जाणार नाही याची पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!