कॉंग्रेसची 23 जणांची दुसरी यादी जाहीर, जाणून घ्या, कोणाला मिळाली संधी?

Congress Candidate 2nd List

Congress Candidate 2nd List: विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस ने आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. त्या मध्ये राहिलेल्या उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीमध्ये महायुती व महाविकास आघाडी अशा युत्यामध्ये लढत होणार आहे. आशामध्ये दोन्ही आघाड्यांनी आपआपली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये कॉंग्रेस ने आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीमध्ये कॉंग्रेसने 48 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. दुसऱ्या यादीत एकुण 23 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत कॉंग्रेसने आपले 71 उमेदवार जाहीर केले आहेत. कॉँग्रेसने आपल्या दुसऱ्या यादीत आपल्या बड्या नेत्यांना उमेदवारी दिली आहे.

त्यात जालन्यातुन कैलास गोरंट्याल तर माजी विधानसभा उपाध्यक्ष वसंत पुरके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शिवाय ज्या जागेवरून नाना पटोले आणि संजय राऊत यांच्यात वाद झाला होता त्या नागपूर दक्षिण विधानसभा मतदार संघातील उमेदवारीचीही कॉंग्रेसने घोषणा केली आहे. आता दुसऱ्या यादीतील बहुतांश उमेदवार हे विदर्भातील आहे. सावनेर विधानसभा मतदार संघातून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तिथे अपेक्षे प्रमाणे कॉंग्रेस नेते सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा सुनील केदार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Congress Candidate 2nd List
Congress Candidate 2nd List

महाविकास आघाडीतिल जागावाटपांबाबत कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याबरोबर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांच्यासह राज्यातील काही कॉंग्रेस नेत्यांची दिल्लीत शुक्रवारी महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महाविकास आघाडीतिल जागा वाटपांबाबत सविस्तर चर्चा झाली यानंतर आज (26 ऑक्टोबर) कॉंग्रेसकडून 23 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.

भंडारा या अनुसूचित जाती आरक्षित जागेवर पूजा ठक्कर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर अर्जुनी मोरगाव येथून राष्ट्रवादी माजी आमदार दिलीप बनसोडे यांना कॉंग्रेसने तिकीट दिले आहे. अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आमगाव येथून विद्यमान आमदार कॉंग्रेसचे सहसराम कोरोटे यांच्या ऐवजी राजकुमार पुराम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याची लढत भाजपचे माजी आमदार संजय पुराम यांच्या बरोबर होणार आहे.

पहिली 48 उमेदवारांची यादी

मतदार संघ उमेदवार
1) अक्कलकुवा के. सी. पाडवी
2) शहादा राजेंद्र गावीत
3) नंदुरबार किरण दामोदर
4) नवापुर शिरिशकुमार नाईक
5) साक्री प्रवीण चौरे
6) धुळे ग्रामीण कुणाल पाटील
7) रावेर धनंजय चौधरी
8) मलकापुर राजेश एकाडे
9) चिखली राहुल बोंद्रे
10) रिसोड अमित झनक
11) धामगाव रेल्वे विरेन्द्र जगताप
12) अमरावती सुनील देशमुख
13) तिवसा यशोमती ठाकूर
14) अचलपूर अनिरुद्ध देशमुख
15) देवळी रणजीत कांबळे
16) नागपूर दक्षिण पश्चिम प्रफुल्ल गुडधे
17) नागपूर, मध्य बंटी शेळके
18) नागपूर उत्तर नितीन राऊत
19) साकोली नाना पाटोले
20) गोंदिया गोपालदास अग्रवाल
21) राजुरा सुभाष धोटे
22) ब्रम्हपुरी विजय वडेट्टीवार
23) चिमुर सतीश वारजूकर
24) हदगाव माधवराव पवार पाटील
25) भोकर तिरूपति कोंडेकर
26) नायगाव मीनल पाटील खदगावकर
27) पाथरी सुरेश वरपूडकर
28) फुलंब्री विलास औताडे
29) मीरा भाईंदर मुझ्झफर हुसेन
30) मलाड पश्चिम अस्लम शेख
31) चांदिवली नसीम खान
32) धारावी ज्योति गायकवाड
33) मुंबादेवी अमिन पटेल
34) पुरंदर संजय जगताप
35) भोर संग्राम थोपटे
36) कसबा रवींद्र धंगेकर
37) संगमनेर बाळासाहेब थोरात
38) शिर्डी प्रभावती घोगरे
39) लातूर ग्रामीण धिरज देशमुख
40) लातूर शहर अमित देशमुख
41) अक्कलकोट सिद्धराम मेहेत्रे
42) कऱ्हाड दक्षिण पृथ्वीराज चव्हाण
43) कोल्हापूर दक्षिण ऋतुराज पाटील
44) नागपूर पश्चिम विकास ठाकरे
45) करवीर राहुल पाटील
46) हातकणंगले राजू आवळे
47) पलूस कडेगाव विश्वजित कदम
48) जत विक्रमसिंग सावंत
Congress Candidate 2nd List
Congress Candidate 2nd List

Congress Candidate 2nd List: दुसरी 23 उमेदवारांची यादी

मतदार संघ उमेदवार
1) भुसावळ राजेश मानवतकर
2) जळगाव जामोद स्वाती वाकेकर
3) अकोट महेश गणगणे
4) वर्धा शेखर शेंडे
5) सावनेर अनुजा केदार
6) नागपूर दक्षिण गिरीश पांडव
7) कामठी सुरेश भोयर
8) भंडारा पूजा तवेकर
9) अर्जुनी मोरगाव दिलीप बनसोडे
10) आमगाव राजकुमार पुरम
11) राळेगाव वसंत पुरके
12) यवतमाळ अनिल मांगुलकर
13) अर्णी जितेंद्र मोघे
14) उमरखेड साहेबराव कांबळे
15) जालना कैलास गोरंट्याल
16) संभाजीनगर पूर्व मधुकर देशमुख
17) वसई विजय पाटील
18) कांदिवली पूर्व कालू भडेलीया
19) सायन कोळीवाडा गणेश कुमार यादव
20) श्रीरामपुर हेमंत ओघले
21) निलंगा अभय कुमार साळुंके
22) चारकोप यशवंत सिंह
23) शिरोळ गणपतराव पाटील
Congress Candidate 2nd List

कॉंग्रेसच्या यादीतील प्रमुख चेहरे

कॉंग्रेसच्या यादीत महत्वाची बाब आहे ती म्हणजे विद्यमान आमदारांना दिलेली संधी आणि देवणदर फडणवीस यांच्या विरोधात दिलेला उमेदवार कॉंग्रेसने देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम या मतदारसंघातून प्रफुल्ल गुडधे यांना संधी दिली आहे. तसंच पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, नसीम खान, रवींद्र धंगेकर या सगळ्या दिग्गजांना पहिल्या यादीत स्थान देण्यात आलं आहे.

Congress Candidate 2nd List
उमेदवाराचे नाव पक्ष मतदारसंघ
प्रफुल्ल गुडधे कॉंग्रेस नागपूर दक्षिण पश्चिम
बाळासाहेब थोरात कॉंग्रेस संगमनेर
पृथ्वीराज चव्हाण कॉंग्रेस कऱ्हाड
रवींद्र धंगेकर कॉंग्रेस कसबा
अमित देशमुख कॉंग्रेस लातूर शहर
नसीम खान कॉंग्रेस चांदिवली
Congress Candidate 2nd List

महाविकास आघाडीने पत्रकार परिषेद घेऊन 270 जागांवर एकमत झाल्याचे म्हंटलं आहे. तसंच त्यानंतर आधी शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार ) या दोन पक्षांनी याद्या जाहीर केल्या. त्यानंतर आता कॉंग्रेसने एकुण 48 जणांना उमेदवारी दिली आहे. आगामी काळात आणखी काय काय घडतं ते पाहणं महत्वाचं असणार आहे.

महाविकास आघाडीचा 90-90-90 चा फॉर्म्युला ठरला

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत जागावाटपांवरून मतभेद सुरू होते. यासंदर्भात महाविकास आघाडीतिल नेत्यांच्या अनेक बैठकाही पार पडल्या. त्यानंतर 85-85-85 जागांचा फॉर्म्युला समोर आला होता. मात्र त्यानंतर पुन्हा या फॉर्म्युल्यात बदल करण्यात आल्याची माहीत समोर आली. यानंतर आता 90-90-90 चा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सांगण्यात आली आहे.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!