पेट्रोलच्या वाढत्या दराला पर्याय म्हणून, तुमच्यासाठी जगातील पहिली CNG बाइक!

CNG Bike Bajaj

CNG Bike Bajaj: जगातील पहिली सीएनजी CNG Bike Bajaj बाइक आज पुण्यात लॉन्च झाली आहे. बजाज कंपनीने सीएनजी बाइकची निर्मिती केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते बाइक लॉन्चचा सोहळा पार पडला. सीएनजीवर धावणारी ही पहिली बाइक आहे असा दावा बजाज कंपनीने केला आहे. 125 सीसीचं इंजिन असलेली ही बाइक आहे. या बाइकसाठी केंद्र सरकारने देशात सीएनजी पंपाची संख्या वाढवावी अशी अपेक्षा राजीव बजाज यांनी व्यक्त केली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरवाढीमुळे वाहनचालक त्रस्त आहेत. सरकारकडून पेट्रोल डिझेलला पर्याय शोधण्यास येत असीन सध्या सीएनजी वाहनांना मोठी मागणी असून चारचाकी सीएनजी वाहनांची बाजारात चालली असल्याचं पहायला मिळते. त्यातच, आता बाजाजकडून जगातील पहिली सीएनजी बाइक CNG Bike Bajaj लॉन्च करण्यात आली आहे.

केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते आज पिंपरी चिंचवडमध्ये या बाईकचा लॉचिंग सोहळा पर पडला. यावेळी ही सीएनजी बाइक जगातील पहिली सीएनजी दुचाकी असल्याचा दावा बाजाजकडून करण्यात आला आहे. पेट्रोल आणि सीएनजी अशी हायब्रिड बाइक असून 2 किलो सीएनजी मध्ये तुम्ही 230 कीमी पर्यंतचा प्रवास करू शकता. तर 2 लीटर पेट्रोल आणि 2 किलो सीएनजी मध्ये तुम्हाला 330 किमीचा टप्पा गाठला येईल.

CNG Bike Bajaj
CNG Bike Bajaj

पेट्रोल च्या वाढत्या दराने त्रस्त झालेल्या दुचाकीस्वारांची आता लवकरच मुक्तता होणार आहे. कारण बाजाजने वाढत्या पेट्रोलच्या दराला पर्याय म्हणून सीएनजी बाइकची निर्मिती केली. ज्या बाईकच अनावरण आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरीच्या हस्ते झालं. जगातील ही पहिली सीएनजी बाइक असल्याचा दावा बजाज कंपनीने केला आहे. या बाईकमुळे दुचाकीस्वारांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळेल. अशी अपेक्षा ऑटोमोबाईल क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. सीएनजी बाइक ही बजाज ची गॅरंटी आहे, असं आम्ही म्हणू शकतो.

आता तुम्हाला तुमच्या भाषणात नितीन गडकरींची गॅरंटी असा उल्लेख कराल, अशी अपेक्षा म्हणू शकतो. आता म्हणत राजीव बजाज यांनी केंद्रीय मंत्र्यांकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. सीएनजी पंपची देशभरात कमतरता आहे. या सीएनजी पंपची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवावी. अनुषंगाने राजीव बजाज यांनी ही अपेक्षा व्यक्त केली आहे. तर नितीन गडकरी यांनीही आपल्या भाषणात बोलतांना बाइकच्या किंमतीबाबत अपेक्षा व्यक्त केली.

CNG Bike Bajaj

CNG Bike Bajaj डिझाइन आणि फीचर्स

बजाजच्या नवीन सीएनजी बाइकचे डिझाइन प्रीमियम आहे. ते आकाराने थोडे लांब आहे. त्याच्या सितच्या खाली एक सिलेंडर देण्यात आले आहे. त्यामुळे त्याची सीट लांब ठेवण्यात आली आहे. बाइक बघून तुम्हाला वाटणार नाही की ही CNG बाइक आहे, बजाज म्हणाले की, या बाइकने 11 सेफ्टी टेस्टिंग पास केल्या आहेत. या बाइकमध्ये डिजिटल स्पीडोमीटर आहे. बजाज सीएनजी मोटरसायकलला सुमारे 5 लीटरची छोटी पेट्रोल टाकी मिळेल. याशिवाय सुमारे 4-5 किलोची मोठी सीएनजी टाकीही मिळेल.

बाइकमध्ये मजबूत टॅंक, सिल्व्हर कलर अॅक्सेसरीज, राऊंड, हेडलाइट, हँडलबार ब्रेसेस, नकल गार्ड आणि फ्रंट डिस्क ब्रेक असतील. बाइकमध्ये अॅडव्हेंचर बाईकप्रमाणे सीटची ऊंची, चांगले ग्राऊंड क्लिअरन्स आणि अॅडव्हेंचर स्टाइल असेल. यात मोठा साइड पॅन्, 5 स्कोप अलॉय व्हील्स, पिलियनसाठी मजबूत ग्रॅब रेल, रिब्ड सीट, टेलिस्कोपीक फ्रंट फोर्क्स, मागील मोनो-शॉक सेटअप, टायर हगर अनेक कलर ऑप्शन आहेत. बजाज फ्रिडम 125 मध्ये 125 cc इंजिन आहे जे 9.5 PS पॉवर आणि 9.7 Nm टॉर्क देईल. आणि त्याची रेंज 330 किलोमीटर असेल. बाइकमध्ये 2 लीटरचा CNG सिलिंडर असून 2 लीटरची इंधन टाकीही आहे. ही बाइक तीन व्हेरीएंट मध्ये उपलब्ध आहे.

CNG Bike Bajaj
व्हेरीएंट किंमत (एक्स शोरूम)
Freedom 125 Disc LED1.10 लाख रुपये
Freedom 125 Drum LED1.05 लाख रुपये
Freedom 125 Drum 95,000 रुपये
CNG Bike Bajaj

राजीव कपूर काय म्हणाले?

कपूर यांनी सांगितले की, बजाज फ्रिडम सीएनजी बाइकमध्ये सर्वात लांब सीट उपलब्ध आहे. बाइक लिक्ड मोनो सस्पेन्शनने सुसज्ज आहे. राजीव कपूर यांनी सांगितले की, या बाइकची डिझाइन अशी आहे की पाहता क्षणी टी तुम्हाला आवडेल. ही एक गेम चेंजर बाइक ठरेल. ही बाइक पाहताच नितीन गडकरींनी विचारले की त्यात सिनजी सिलिंडर कुठे आहेत? बाइकच्या डिझाईनचेही कौतुक केले.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!