Arvind Kejriwal:या कारणांमुळे अरविंद केजरीवाल देणार 2 दिवसांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा

CM Arvind Kejriwal Resignation

CM Arvind Kejriwal Resignation: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर दिल्लीच्या राजकीय वर्तुळावर मोठा भूकंप झाल्याचं पाहायला मिळत आहे. दिल्ली सरकारच्या मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे शुक्रवारी 13 सप्टेंबर जामिनावर तुरुंगातून बाहेर आले. दरम्यान आज 15 सप्टेंबर त्यांनी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोठं वक्तव्य केलं आहे. येत्या दोन दिवसांत मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देईन असं केजरीवाल म्हणाले. यावरून राज्याच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा चालू झाल्या आहेत. अशातच दिल्ली मधील जनतेक्ष देशभरातील नागरिकांना प्रश्न पडला आहे की केजरीवाल यांनी राजीनामा दिल्याची सूत्र कोणाच्या सोपवली जातील. आम आदमी पार्टी पुढील ,मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करणार?

तसेच दिल्लीच्या विधानसभा निवडणुका महाराष्ट्रातील निवडणुकांसोबतच घ्याव्यात, असेही त्यांनी म्हंटलं आहे. त्यामुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात आता वेगवान घडामोडी घडत असून अरविंद केजरीवाल यांच्याजागी मुख्यमंत्री कोण होणार? याचीच चर्चा देशभरात रंगली आहे. मात्र भाजपकडून केजरीवाल यांच्या राजीनाम्या मागील राजकारण सांगण्यात आलं आहे. तसेच केजरीवाल यांची राजीनामा देण्यासाठी 2 दिवसांचा कालावधी का मागितला, याचेही कारणही भाजप प्रवक्ते मंजिंदर सिंह सिरसा सांगितलं आहे.

अरविंद केजरीवाल म्हणाले मी दोन दिवसांनंतर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देईन. जनता त्यांचा निर्णय देत नाही, तोवर मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसणार नाही. प्रत्येक गल्लीबोळात जाईन, प्रत्येक घरात जैन आणि जो पर्यंत जनता सांगत नाही की, केजरीवाल प्रामाणिक आहे, तो पर्यंत मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसणार नाही.

CM Arvind Kejriwal Resignation
CM Arvind Kejriwal Resignation

मद्य धोरण घोटाळा प्रकरणी सीबीआयच्या अटकेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने नुकताच जमीन मंजूर केला होता. यानंतर अरविंद केजरीवाल यांनी रविवारी दिल्लीत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्याशी संवाद साधताना एक मोठी घोषणा केली. पुढील दोन दिवसांमध्ये आपण दिल्लीच्या नायब राज्यपालांकडे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याचं ते म्हणाले . पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच साधारण 5 ते 6 महिन्यात दिल्ली विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन नवी खेळी खेळल्याची चर्चा आहे. त्यावर आता भाजपनेही प्रतिक्रिया दिली असून दिल्लीत लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने 7 पैकी 7 जागांवर विनय मिळवल्याचंही भाजपने म्हटलं आहे.

CM Arvind Kejriwal Resignation: केजरीवाल यांचे म्हणने काय?

  • मी आणि मनीष सीसेदिया जनतेच्या दरबारात जाणार
  • मला जनतेला विचाराचंय की तुम्ही मला इनामदार मानता की गुन्हेगार?
  • मी येत्या दोन दिवसात आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार आहे.
  • मी प्रामाणिक असल्याचं जो पर्यंत जनता निर्णय डेट नाही, तोपर्यंत मी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसणार नाहीत.
  • दिल्ली विधानसभा निवडणुका महाराष्ट्र सोबत घ्याव्यात.

177 दिवस जेलमध्ये असतानाही अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिल नव्हता. मग सहा महिन्यानंतर जेलमधून बाहेर आल्यानंतर राजीनामा का द्यावासा वाटला यामागे रणनीती आहे.

येत्या दोन दिवसातमध्ये मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देईन. या काळात आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होईल. त्या बैठकीत माझ्याऐवजी आपमधील दूसरा कोणत्यातरी नेत्याची मुख्यमंत्रीपदी निवड केली जाईल. त्यानंतर मी आणि मनीष सीसोदिया दोघेही लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधू आम्ही गल्लोगली फिरून लोकांशी बोलू. जनतेला मी इनामदार वाटत असेल तर त्यांनी मला निवडून द्यावे. मी बेइमान असेल तर जनतेने मला निवडून देऊ नये. असे आवाहन अरविंद केजरीवाल यांनी केले.

CM Arvind Kejriwal Resignation
CM Arvind Kejriwal Resignation

CM Arvind Kejriwal Resignation: भाजपने टीका केल्या

दरम्यान अरविंद केजरीवाल यांची राजीनामा देण्याची घोषणा हा त्यांचा ‘पीआर स्टंट’ असल्याची खोचक टीका भाजपने केलीय. भाजप प्रवक्ते प्रदीप भंडारी वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की, हा केजरीवाल यांचा ‘पीआर स्टंट’ आहे. दिल्लीच्या जनतेपुढे त्यांचा प्रामाणिकपणाचा बुरखा फाटला असून भ्रष्टाचारी नेत्याचा चेहरा समोर आला आहे., हे त्यांना समजलं आहे, असंही भंडारी म्हणाले. आम आदमी पार्टी देशभरात भ्रष्टाचारी पार्टीच्या रुपानं ओळखली जाऊ लागली आहे. त्यामुळं केजरीवाल अशा प्रकारची स्टंटबाजी करून मलिन झालेली प्रतिमा स्वच्छ करू पाहताहेत. मात्र दिल्लीची जनता सुज्ञ आहे, असंही त्यांनी म्हंटलं.

केजरीवाल म्हणतात की त्याचं बँक बॅलेन्स शून्य आहे. मग त्यांनी इतका मोठा शीश महाल कसा उभा केला. ते म्हणतात की, ते दिल्लीच्या प्रत्येक गल्लीबोळात जाईन, प्रत्येक घरात जैन आणि जनता सांगत नाही केजरीवाल प्रामाणिक आहे. तोपर्यंत मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसणार नाही. याचाच अर्थ ते सोनिया गांधीचं मॉडल आत्मसात करू पाहताहेत. तिसरी गोष्ट अशी की, आम की, आम आदमी पार्टी दिल्लीची निवडणूक हारणार आहे, हे त्यांच्या लक्षात आलं असून आता जनता त्यांना मत देणार नाही याची जाणीव झाल्यानं ते विधान मार्गाने लोकांना भुरळ घालताहेत. मात्र या तिन्ही गोष्टी जनतेच्या लक्षात आल्या असून दिल्लीची जनता आता त्यांच्या आमिषाला बळी पडणार नाही, असंही भंडारी म्हणाले.

CM Arvind Kejriwal Resignation: राजीनामा देण्यामाग कोणती रणनीती?

  • प्रामाणिक असल्याची प्रतिमा जपणं
  • मुख्यमंत्री पदाची लालसा नाही हे दाखवून देणं पदत्याग केल्यानं सहानभूती निर्माण करणं
  • नवे नेतृत्व देऊन पक्षाला उभारी देणं
  • निवडणुकीत आक्रमक पणे उतरणं
  • कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणं
CM Arvind Kejriwal Resignation
CM Arvind Kejriwal Resignation

CM Arvind Kejriwal Resignation: मुख्यमंत्री पदासाठी या नेत्यांचा विचार केला जाऊ शकतो

1)गोपाल राय

केजरीवालांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यास या पदासाठी गोपाल राय यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो ते आम आदमी पार्टीचे संयोजक आहेत. केजरीवालांच्या अनुपस्थितीत ते पक्ष संघटनेच कामकाज पाहतात.

2)आतिशी मार्लेना

मुख्यमंत्री पदासाठी आतीशी यांच्या नावाची देखील चर्चा आहे. त्या सध्या दिल्लीच्या सार्वजनिक बांधकाम व शिक्षकमंत्री म्हणून काम पाहत आहेत. त्या कालकजी मतदार संघाच्या आमदार आहेत. प्रसार माध्यमांमध्ये त्या आपमध्ये केजरीवाल व सीसोदिया यांच्यानंतर च्या तिसऱ्या मोठ्या नेत्या म्हणून रोजी मार्लेना ओळखीच्या आहेत.

3) कैलाश गहलोत

दिल्लीच्या मंत्री मंडळातील मंत्री कैलाश गहलोत यांच्याकडे एकुन आठ खाती आहेत. यामध्ये कायदा, न्याय व विधिमंडळ व्यवहार वाहतूक, प्रशासकीय सुधारणा, माहीत व तंत्रज्ञान, महसूल, वित्त आणि नियोजन या खात्यांचा समावेश आहे. केजरीवालांच्या मंत्री मंडळातील इतर कोणत्याही नेत्याकडे इतकी खाती नाहीत.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!