आईला विमान प्रवास घडवायचा राहून गेला, पण साडी नथ घेऊन गेले..

Chhaya Kadam

Chhaya Kadam:कानामध्ये छाया यांनी घातलेल्या साडी आणि नथीची खूप चर्चा झाली. या दोन्ही गोष्टी त्यांच्या आईच्या होत्या आणि म्हणूनच त्यांच्यासाठी त्या खूप खास होत्या.

छाया यांनी सांगितलं, “माझ्यासाठी कान फिल्म फेस्टिव्हल अटेंड करणं ही खूप मोठी गोष्ट होती. त्याच्याही आधी प्रत्येकवेळी मला माझी आई माझ्यासोबत लागायची. आईला विमानाचा प्रवास घडवता आला नाही. तो राहून गेला. आता ती गेल्यावर मला जास्त जाणवायला लागलं. मग जेव्हा हे कान फिल्म फेस्टिव्हलचं कळलं तेव्हा मग मनात आलं की, ही आईची साडी आहे, जी तिला नेसवायची राहूनच गेलं. तेव्हा मग मी आईला नाही, तर आईची साडी आणि आईची नथ जी तिच्या लग्नातली होती, ती सोबत घेऊन गेले.”

Chhaya Kadam
Chhaya Kadam

“जी गोष्ट हातातून सुटून गेली, त्याबद्दल आपण काही करू शकत नाही. पण वाटलं आपल्याला यातून काहीतरी समाधान मिळेल. त्यामुळे तिची नथ-साडी घातली आणि कानमध्ये फिरले त्यादिवशी. खूप गप्पा मारल्या तिच्याशी.”

‘आम्हाला त्या दिवशी खूप भारी वाटलं’

कानमध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या ‘ऑल वुई इमॅजिन अॅज अ लाइट’ची टीम जेव्हा मंचावर गेली, तेव्हा कौतुकासाठी अजून एक कारण होतं…या टीममध्ये सगळ्या मुली होत्या. या चित्रपटाची दिग्दर्शक पायल कपाडिया, अभिनेत्री कानी कस्तुरी, दिव्या प्रभा आणि छाया कदम.(Chhaya Kadam)

त्यामुळे खास बनलेल्या या क्षणांबद्दल छाया सांगतात, “आम्हाला स्वतःलाच ते इतकं भारी वाटत होतं ना. या फिल्मच्या पहिल्या मीटिंगपासूनची ताकद आहे की, त्या टीममध्ये मुली जास्त आहेत. आणि प्रत्येक मुलगी स्वतंत्र विचारांची आहे. अशा मुली एकत्र येऊन एक प्रोजक्ट करणं हे भारी होतं. त्यादिवशी खरंच आम्हालाच खूप मस्त वाटत होतं.

आमची अशी नेहमी चर्चा व्हायची की, आम्ही स्वतःचा असा मार्ग निवडला आहे. आपल्या आपल्या मार्गाने एकत्र जायचं अस ठरवलेल्या आम्ही एकत्र आलो. आमच्यासोबत लोकांनाही खूप मस्त वाटतंय.”

‘बायका कोणताही विषय वेगळ्या पद्धतीने हाताळू शकतात’

स्वतंत्र विचारसरणीच्या महिलांबद्दल बोलताना, काही महिन्यांपूर्वी दिसलेल्या मिसिंग लेडीजचा विषय निघाला. ‘मिसिंग लेडीज’मधील मंजू माईची या भूमिकेचे छायाने खूप कौतुक केले होते.

छायाला ही भूमिका कशी मिळाली आणि ती सिनेमा दिग्दर्शक किरण राव असेल असो किंवा आपण सर्वांनीच एक हलकीफुलकी दिग्दर्शिका पायल कपाडिया म्हणून त्याची कल्पना केली असेल… छायाला महिला दिग्दर्शकांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?

आधी मिसिंग लेडीजबद्दल बोलताना छाया म्हणाली, “त्यांनी माझे पूर्वीचे काम पाहिले असावे. त्याने मला फोन करून बोलावून घेतले. आणि पुढची कमला सुरू झाली.

त्यांनी पुढे सांगितलं की, “महिला दिग्दर्शकांबद्दल बोलायचं तर मी यापूर्वी पण महिला दिग्दर्शकांसोबत काम केलं आहे. मी ‘ये रे ये रे पावसा’ नावाचा चित्रपट केला होता. त्याची दिग्दर्शक शफक खान होती. जेव्हा तोच तोच मार्ग न स्वीकारता महिला वेगळ्या मार्गाने निघतात, तेव्हा मला खूप छान वाटतं.

जसं शफकच्या बाबतीत झालं की, तिचा फोन आला. एक मुलगी…नॉन महाराष्ट्रीयन मुलगी…ती मराठी सिनेमा दिग्दर्शित करत आहे. पहिल्याच मीटिंगमध्ये मी म्हटलं की, मी करतीये काम.”

“बायका कोणताही विषय वेगळ्या पद्धतीने हाताळू शकतात आणि त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं आहे. जसं किरणने ‘लापता लेडीज’मध्ये काहीच्या काही करून दाखवलं आहे.”

प्रत्येक कॅरेक्टरची एक तरी गोष्ट सोबत राहते

छाया कदम (Chhaya Kadam) यांच्या आजपर्यंतच्या भूमिका पाहिल्या तर न्यूडमधली चंद्राक्का असो, सैराटमधली सुमन ताई किंवा अगदी आताच्या लापता लेडीजमधील मंजू माई…सर्व स्त्रिया कणखर, स्वतःच्या शर्तीवर जगणाऱ्या आहेत.

वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार पचविणाऱ्या छाया कदम या स्वतः या व्यक्तिरेखांप्रमाणेच खंबीर आहेत का? आयुष्यातल्या भल्या-बुऱ्या प्रसंगात या भूमिकांनी त्यांना काय शिकवलं?

“वैयक्तिक आयुष्यातही मी कणखर आहे. छोट्या-छोट्या गोष्टींनी हार मानणारी मुलगी नाहीये. पण कधीकधी असं होतं ना की, लहान गोष्टींचा परिणाम होतो. त्यावेळी मी जी काही कॅरेक्टर्स केली आहेत, ती माझ्या मदतीला येतात. फिल्म खूप परिणाम करते.

मग मी स्वतःला समजावते की, चंद्राक्काकडे बघ ना…तिने यमुनाला शिकवलं की कसं स्वतःच्या हिमतीवर जगायचं किंवा अरे म्हटलं की कारे करायचं असतं… आता मंजू माई आली जी सांगते की, खुद के साथ रहना बहुत मुश्किल होता है…ते इतकं भारी आहे ना…”

“मला असं वाटतं की, मीच नाही तर प्रत्येक कलाकाराच्या बाबतीत हे होत असावं की, तुमच्या कॅरेक्टरची एखादी तरी गोष्ट तुमच्यासोबत राहते. ती कायम कोणत्याही चांगल्या वाईट प्रसंगी तुमच्यासाठी धावून येते.”

माझ्या डोळ्यांत दिसतं…मला नाही सापडलंय कॅरेक्टर

इतक्या वेगवेगळ्या भूमिका साकारणाऱ्या छाया कदम (Chhaya Kadam) यांना एखाद्या भूमिकेचा सूर सापडलाच नाही असं कधी होत असेल का असा प्रश्न पडला.

एखादं कॅरेक्टर शोधताना क्रिएटिव्ह ब्लॉक आलेत किंवा ते सापडतच नाहीये, असं कधी झालंय का, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी म्हटलं की, “असं होत असतं. कधीकधी अचानक एखाद्या सीनला असं होतं की, नाही सापडत. किंवा आपलं म्हणणं वेगळं असतं त्या कॅरेक्टरला घेऊन, त्याच्या इमोशन्सना घेऊन आणि दिग्दर्शकाचं म्हणणं वेगळं असतं. ते जुळत नाही, तोपर्यंत नाही स्क्रीनवर दिसत.”

त्यांना याबद्दलचा स्वतःचा अनुभव शेअर केला.

“आता नुकतंच माझं असं झालं एका कॅरेक्टरच्या बाबतीत. मला सापडतच नव्हतं. आणि मी रिटेकवर रिटेक करत होते…इतक्या वर्षांत कधी झालं नव्हतं. दिग्दर्शकाचं म्हणणं होतं की, काहीतरी करून होईल ते. पण मी मरेपर्यंत मला माहीत असतं की, ते दिसतंय डोळ्यांत माझ्या…मला नाही सापडलंय कॅरेक्टर.”

“अशावेळी कधीकधी मार्ग सापडतो, कधी नाही सापडत. पण असं खूप वेळा नाही होत. पण त्यादिवशी मी हात वर केले होते. दिसताना ते तसं नाही दिसणार कदाचित. कारण वेगवेगळे शॉट घेतलेले असतात. पण कलाकार म्हणून आपल्याला हे जाणवत असतं की या पेक्षा चांगला झाला असता हा सीन.”

सिने इंडस्ट्रीमध्ये एक काळ असा होता, जेव्हा लोकांना वाटायचं की हिरॉईन किंवा हिरो म्हणजे असेच दिसायला हवेत, त्यांची एक प्रतिमा डोक्यात असायची. पण गेल्या काही दिवसांते हे चित्र बदललेलं पाहायला मिळालं. लोकांचे नायक-नायिकेच्या रंगरुपाबद्दलचे ठराविक आडाखे आता बदलत आहेत आणि केवळ अभिनयाच्या जोरावर स्वतःला सिद्ध करणारे कलाकार पुढे येताना दिसत आहेत.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!