Chhatrapati Sambhajinagar Honour Killing News
Chhatrapati Sambhajinagar Honour Killing News: तथाकथित प्रतिष्ठेपायी बापानेच पोटच्या मुलीचे कुंकू पुसल्याची संतापजनक घटना छत्रपती सांभाजीनगर शहरात घडली आहे. विरोध असताना मुलीने जातीबाहेर लग्न केल्याच्या रागातून सासऱ्याने जावयाला रस्त्यातच चाकूने भोकसून हत्या केली. 14 जुलै रोजी घडलेली ही ऑनर किलिंगची घटना तरुणाच्या मृत्यूनंतर समोर आली आहे. या घटनेत शहर आणि राज्यात खळबळ उडाली आहे. अमित मुरलीधर साळुंखे अशी हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. तर गीताराम भास्कर कीर्तीशाही (मुलीचे वडील) आणि अप्पासाहेब कीर्तीशाही (मुलीचा चुलत भाऊ) असही हत्या करणाऱ्या आरोपीची नवे आहेत.
बालपणीच्या मैत्रिणीवर प्रेम करत दोघांनी पळून जाऊन आंतरजातीय लग्न केलं. याचा राग मनात ठेऊन मुलीच्या वडिलांनी आणि भावाने तरुणाची चाकूने भोकसून हत्या केली. आंतरधर्मीय विवाहामुळे हत्या केल्याची घटना ‘सैराट’ सिनेमाप्रमाणे केल्याची कुजबूज शहरभर पहायला मिळत आहे.
छत्रपती सांभाजीनगरचा इंदिरानगर (Chhatrapati Sambhajinagar Honour Killing News) हा भाग तसा गजबजलेला. तेथील हे दोघे रहिवासी त्या मुलीके सांगितले की, आमच्या लग्नाला माझ्या आई-वडिलांचा, चुलत भावाचा विरोध होता. त्याच म्हणण होत की ते वेगळ्या जातीचे आहेत. त्यांची जात आपल्यासारखी नाही. त्याच्यामुळे त्याचा विरोध होता. असं विद्या यांनी त्यांच्या कुटुंबियांकडून दोघांच्या लग्नाला असलेल्या विरोधाबाबत आमच्याशी बोलताना सांगितले. विद्या या नवबौद्ध समाजातील तर अमित गोंधळी समाजातून येतात.
नेमकं काय घडलं?
छत्रपती सांभाजीनगरचा (Chhatrapati Sambhajinagar Honour Killing News) इंदिरानगर हा भाग तसा गजबजलेला. तेथील मुरलीधर साळुंखे (मुलाचे वडील) व गीताराम भास्कर कीर्तीशाही (मुलीचे वडील) हे दोघे पक्के मित्र होते यांच्या मैत्रित कधी जात आडवी आली नाही. पण त्यांच्या मुलांच्या प्रेमामध्ये जात आडवी आली त्यामुळे कीर्तीशाही घरातील मुलीचा संसार उधवस्थ झाला आणि साळुंके यांचे संपूर्ण कुटुंब. विद्या आणि अमित हे दोघे सुद्धा लहान पणापासूनचे मित्र पण या मैत्रीचे रूपांतर काही दिवसांनी प्रेमामध्ये झाले. पण या दोघांच्या प्रेमाचा विरोध हा विद्या च्या घरच्यांना होता. कारण विद्याचं लग्न हे तिचे घरचे दुसरीकडे जमवत होते. हे तिने अमित ला सांगितले व त्या दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला.
एप्रिल मध्ये ते दोघे पुण्यात आले आणि लग्न केले. काही दिवस पुण्यामध्ये राहिले, काही दिवसांनी अमित च्या घरच्यांचा फोन आला. छत्रपती संभाजीनगर ला येण्यास सांगितले. ते दोघे संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar Honour Killing News) ला मे महिन्याच्या सुरुवातीला आले. त्यानंतर अमित चे घरचे आणि ते दोघे असे सर्वजण मिळून पोलिस स्टेशनला गेले. त्या सर्वांचा जबाब नोंदुण घेऊन विद्या च्या घरच्यांना सुद्धा बोलून घेण्यात आले. तिच्या वडिलांना फोन लावण्यात आला व तिच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले की ‘ मी तिथे येणार नाही, पण ते दोघे इंदिरानगर मध्ये दिसता कामा नये’ अशी धमकी पोलिसांसमोर दिली. विद्याने पोलिसांकडे असा दावा केला की आम्हाला संरक्षण द्या.
पुण्यामध्ये या दोघांचे कोर्टमॅरेज झाल्या नंतर, सुद्धा अमित च्या घरच्यांनी विद्या च्या घरच्यांचा राग जावा. यासाठी त्यांनी त्या दोघांचे 13 जूनला बौद्ध पद्धतीने लग्न लावून दिले. त्यांचे फोटो सोशल मिडियावर टाकण्यात आले. तरीही विद्याच्या घरच्यांची नाराजी दूर झाली नाही. गीताराम भास्कर कीर्तीशाही (मुलीचे वडील) आणि अप्पासाहेब कीर्तीशाही (मुलीचा चुलत भाऊ) यांनी मुरलीधर साळुंखे (मुलाचे वडील) यांना मिळून धमकी देण्यात आली. ‘ते म्हणाले की आमच्या मुलीशी लग्न करून आमच्या समोर राहतो, या दोघांना इंदिरानगर मध्ये राहू देऊ नका नाहीतर आम्ही त्या दोघांच्या जीवाचे बरे वाईट करू’ अशी धमकी दिली. अमित च्या वडिलांनी त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला. तेव्हा पासून कीर्तीशाही परिवाराने साळुंखे परिवाराला खुनस देण्यास सुरवात केली.
दुसरीकडे अमित आणि विद्या यांचा संसार चांगला चालला होता. अमितला संभाजीनगर मधील एका मॉल मध्ये जॉब मिळाला होता. तो तिथे कामाची सुरुवात करणार होता. लग्न झाले तेव्हा विद्या फस्ट इयर ला जाणार होती. तेव्हा अमित ने तिला सांगितले की मी तुला शिकवीन मी तुझे ॲडमिशन करून देईल. सर्व काही सुरळीत असताना, आला 14 जुलै रात्री अमितचे जेवण झाले आणि तो पब्जी खेळत बसला. त्याच्या मित्रांनी त्याला घरच्या बाहेर बोलवल त्याच्या घराच्या बाहेर एक मोठे झाड आहे त्याच्या खाली बसून तो आणि त्याचे मित्र पब्जी खेळत होते. अमित ला काही मिनिटे झाली होती, घरातून बाहेर येऊन तेव्हा त्याच्या बारक्या भावाला फोन आला आणि तो घरातून बाहेर आला बघतोय तर काय अमित रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. मदत मागत होता.
मृत्यूशी झुंज देणाऱ्या अमितला घाटे रुग्णालयात नेहण्यात आले. रुग्णालयात जात असताना तो जिवाच्या अकांताने सांगत होता की आपल्यावर अप्पासाहेब कीर्तीशाही ने वार केले. एकूण 7 वार केले, पोटातील आतडे बाहेर काढले. असा दावा विद्याने केलाय. अमितच्या घरच्यांनी केलेल्या आरोपानुसार, अमितला त्याच्या मित्रांनी त्याला पब्जी खेळायला बोलावले आणि झाडाच्या इथली लाइट अचानक गेली, रस्त्यावरील लाइट सुद्धा गेली. तेव्हा तिथे गीताराम कीर्तीशाही (मुलीचे वडील) आणि अप्पासाहेब कीर्तीशाही (मुलीचा चुलत भाऊ) हे दोघेतिथे आले आणि विद्याच्या वडिलांनी अप्पासाहेब, याला अमितला संपून टाकण्यास सांगितले आणि त्याने अमित वर वार केले.
अमित खाली कोसळला अमितचे मित्र मदतीला आले नाही. जे आले त्यांना या दोघांनी हत्याराचा धाक दाखवला अमितला रुग्णालयात नेहण्यात आले. त्याच्या पोटात खोलवर वार घुसल्यामुळे तेव्हापासूनच त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, 12 दिवसानंतर अमितची मृत्यूशी झुंज गुरुवारी उपचार दरम्यान अमितचा मृत्यू झाला.
Chhatrapati Sambhajinagar Honour Killing News: ऑनर किलिंग घटनेने शहर हादरले
ऑनर कीलिंग च्या घटनेने संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar Honour Killing News) शहर हादरून गेलं आहे. दरम्यान, याप्रकरणातील आरोपी वडील गीताराम कीर्तीशाही आणि मुलीचा चुलत भाऊ अप्पासाहेब कीर्तीशाही हे दोघेही सध्या फरार असून पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला. अमितच्या मृत्यूनंतर त्याचे नातेवाईक आक्रमक झाले आहे. फरार आरोपींना तातडीने अटक करा अशी मागणी केली आहे. नातेवाईकांकडून जवाहरनगर पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन करण्यात आलं.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!