Champai Soren News
Champai Soren News: विधानसभा निवडणुकांच्या पाश्वभूमीवर झारखंडमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन (Champai Soren News) यांनी एक्सवर पोस्ट करत पक्षाच्या नेतृत्वावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. जसे की “झारखंड 12 वे मुख्यमंत्री म्हणून इंडिया आघाडीने 31 जानेवारीला त्यांची निवड केली होती. पण हुल दिवसानंतर मला कळलं की पुढच्या डॉन दिवसांसाठी आयोजित करण्यात आलेले माझे सगळे कार्यक्रम पक्षाच्या नेतृत्वाने स्थगित केले आहेत. एका मुख्यमंत्र्यांचे नियोजन कार्यक्रम इतर कुणीतरी स्थगिती करत असेल, तर लोकशाहीत याहून मोठा अपमान होऊ शकतो का?” कार्यक्रमात सहभागी होण्यापासून त्यांना रोखणं अ त्यांचा अपमान असल्याचं चंपई सोरेन यांनी म्हंटल आहे.
त्यांनी पुढे लिहिलं की, “एवढा अपमान होऊनही मी म्हणालो की नियुक्ती पत्राचं वितरण सकाळी आहे आणि त्यानंतर दुपारी विधिमंडळ पक्षाची बैठक आहे, तर मी आधी तिथे जाऊ बैठकीला येईल. पण मला यासाठी परवानगी देण्यात आली नाही.” चंपई सोरेन यांनी त्यांच्या पोस्टमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा हा त्यांचा पक्ष सोडून दुसऱ्या कोणत्या पक्षात सहभागी होण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यांनी लिहिलं आहे की, राज्यात होऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकी पर्यंत सर्व पर्याय खुले आहेत. त्यांनी लिहिल आहे की, मी त्या बैठकीतच सांगितल होत की, आजपासून माझ्या आयुष्याच्या एका नवीन अध्यायाला सुरुवात झाली आहे. चंपई सोरेन यांनी या अफवानचं खंडन केलं आहे.

आता माझ्याकडे तीन पर्याय होते. पहिला पर्याय राजकारणातून कायमचं निवृत्त होण्याचा, दूसरा पर्याय स्वत:ची नवीन संघटना सुरू करण्याचा आणि तिसरा या मार्गात कुणाची साथ मिळाली तर त्यासोबत पुढचा प्रवास करण्याचा. पायात साधी चप्पल, ढगळा शर्ट आणि पॅंट, डोक्यावर पांढरके केस हीच चंपई सोरेन यांची ओळख आहे. याच साधेपणासह त्यांनी आयुष्य काढलं आहे. कोणी एखानदी अडचण सोशल मिडियात त्यांना टॅग करून मांडली की तात्काळ त्या समस्येवर समाधान काढायचं ही त्यांची कामाची पद्धत आहे. चंपई हे सगळं करतात. हेमंत सोरेन तुरुंगात गेल्यानंतर चंपई सोरेन झारखंडचे मुख्यमंत्री बनले. मात्र, हेमंत सोरेन तुरुंगातून बाहेर आल्यानंतर चंपई सोरेन यांना मुख्यमंत्रीपद सोडवं लागलं. तेव्हापासूनच ते नाराज होते, असं म्हंटलं जातं.
चंपई सोरेन यांनी या अफवानचं खंडन केलं आहे. ते म्हणाले, मी नाराज असल्याची अफवा कशी पसरली, याबाबत मला कल्पना नाही. प्रसारमाध्यमं कोणत्या बातम्या चालवत आहेत. याबाबत मला अजिबात कल्पना नाही, मी जिथे होतो तिथेच आहे. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी चंपई सोरेन यांना विचारलं की तुम्ही दिल्लीला कधी जाणार आहात? यावर ते म्हणाले, आता तरी मी घरी जातोय, पुढच काही सांगू शकत नाही.
Champai Soren News: मुख्यमंत्रीपद नव्हे या कारणांमुळे नाराजी
सूत्रांनी सांगितलं की झारखंडच्या आगामी विधानसभा निवडणुकीत चंपई सोरेन (Champai Soren News) यांनी घातशीला मतदारसंघातून त्यांच्या मुलासाठी उमेदवारी मागितली होती. मात्र त्यांची विनंती नाकारल्यानंतर त्यांचे पक्षाशी मतभेद झाले आहेत. ते आता केवळ काही राजकीय समीकरण बसवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते कोलकाता येथे जाऊन भाजपा नेत्यांना भेटून आल्याचे दावे केले जात आहेत. ते भाजपात कधी दाखल होणार हे लवकरच स्पष्ट होईल. मनी लॉंडरिंग तुरुंगात असलेले हेमंत सोरेन 28 जून रोजी तुरुंगातून सुटले. त्यानंतर हेमंत सोरेन यांच्यासाठी चंपई यांना मुख्यमंत्रीपद सोडवं लागलं होतं. त्यांना मुख्यमंत्रीपद सोडायला सांगितल्यानंतर सुरुवातीला ते तयार नव्हते, अशा काही बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र पक्षातील इतरांपूढे त्यांच काही चाललं नाही.
Champai Soren News: राज्याच्या विधानसभेतील स्थिति काय?
81 सदस्य असलेल्या झारखंड विधानसभेत इंडिया आघाडी एकुन 45 सदस्य आहेत. इंडिया आघाडीची राज्यात सत्ता आहे. झारखंड मुक्ती मोर्चाचे राज्यात 26 आमदार आहेत. तर त्यांच्याबरोबर कॉँग्रेसचे 17 राजदचा रक व कम्युनिस्ट पार्टीच्या एका आमदाराचा समावेश आहे. दुसऱ्या बाजूला झारखंडच्या विधानसभेत भाजपाचे 24, ऑल झारखंड स्टुडंट्स युनियनचे तीन, राष्ट्रवादी कॉँग्रेस एक (अजित पवार गट), संयुक्त जनता दलाचा एक आणि एका अपक्ष आमदारासह एनडीएकडे एकूण 30 आमदारांचं संख्याबळ आहे.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!