BookMyShow App Crashed
BookMyShow App Crashed: येणाऱ्या जानेवारी 2025 मध्ये मुंबईत एक मोठा संगीत कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. ज्याचे आयोजन मुंबई येथील डीवाय पाटील स्टेडियमवर करण्यात आले आहे. या कार्यक्रमात जगप्रसिद्ध ब्रिटिश ब्रॅंड कोल्डप्ले 18 आणि 19 जानेवारी 2025 रोजी आपले सादरीकरण करेल. हा कार्यकर्म या बॅंडच्या ‘म्युझिक ऑफ द स्फीयर्स वर्ल्ड टुर’ चा एक भाग आहे. यांच्या या शोच्या तिकीट ह्या ‘बुक माय शो‘ वर खरेदीसाठी उपलब्ध होणार होत्या, पण त्या तिकीट विक्री चालू केल्या नंतर काही मिनिटानंतर तिकीट बुकिंग चे ॲप आणि वेबसाइट क्रॅश झाली. हा प्रकार घडल्यानंतर सकाळपासून दुपारी बारा वाजेपर्यंत तिकीटांसाठी आतुरतेने वाट पाहणाऱ्या ग्लोबल रॉक ब्रॅंडच्या चाहत्यांनी सोशल मिडियावर आपला अंतप व्यक्त केला.
दरम्यान या शोची तिकीट विक्री दुपारी 12.15 होऊनही सुरू न् झाल्यामुळे चाहते आणखी संतापले पहायला मिळाले. यावेळी अनेक चाहत्यांनी हा सर्व प्रकार सोशल मिडियावर उघड केला. याबरोबर त्यांना तिकीट बुक करताना त्यांना आलेल्या एरर मेसेजचे स्क्रीनशॉटसही शेअर केले. दरम्यान बुक माय शो वर दुपारी 12.18 वाजता अखेर तिकीट विक्री सुरू झाली. तरीही काही चाहत्यांना ॲप वरून तिकीट बुक करण्यात अडचणी येत होत्या. कोल्डप्ले कॉन्सर्टच्या तिकीटांच्या किंमती 2,500 रु. टे 12,500 रु. पर्यंत आहेत, तर प्रीमियम लाउंज सीट 35,000 रुपयांना उपलब्ध आहेत.
कोल्डप्लेचा हा कॉन्सर्ट 18 आणि 19 जानेवारी 2025 मध्ये नवी मुंबईतिल डी. वाय पाटील स्टेडियममध्ये होणार आहे. दरम्यान कोल्डप्लेचा भारतात शेवटचा कॉन्सर्ट 9 वर्षापूर्वी झाला होता. त्यामुळे यंदाच्या कॉन्सर्टवर देशभरातील चाहत्यांच्या उड्या पडत आहेत. जाणून घ्या कोल्डप्लेच्या मुंबई येथील कार्यक्रमा बाबत तपशील.
BookMyShow App Crashed: कोल्डप्ले कार्यक्रमाच्या तिकीट बुकिंग आणि रक्कम
मिळालेल्या महितीनुसार, याकार्यक्रमाची तिकीट विक्री 22 सप्टेंबर 2024 रोज दुपारी वाजता बुक माय शो द्वारे सुरू होणार आहे. ज्याची किंमत 2,500, 3,500, 4,000, 4,500, 9,000, आणि 12,500 रुपये आहे. स्टेडियम फ्लोर ची किंमत 6,450 आणि प्रीमियम लाउंज सीट 35,000 रुपयांना उपलब्ध आहेत. प्रत्येक व्यवहारासाठी जास्तीत जास्त आठ तिकीटांची मर्यादा असेल. म्हणजेच एक व्यक्ति जास्तीत जास्त 8 तिकितेच खरेदी करू शकेल. आयोजकांनी स्पष्ट केले आहे कि, कोल्डप्ले कार्यक्रमाची तिकिटे केवळ ऑनलाइन उपलब्ध असतील. या ठिकाणी बॉक्स ऑफिस विक्री होणार नाही.
ग्रॅमी अवॉर्डस, ब्रिट अवॉर्डसह अनेक पुरस्कारही या ब्रॅंडला मिळाले आहेत. पाश्चात्य देशांमध्ये क्रेझ आहे टि म्हणजे संगीताची, तिथे खासकरून रॉक बॅंड, पॉप म्युझिक, रॅप सॉन्ग यांचा चाहतावर्ग अमाप आहे. त्यातूनही यंदा क्रेझ आहे टी म्हणजे रॅप सॉन्गची. भारतातही प्रचंड क्रेझ आहे. त्यामुळे पश्चिमात्यसंगीतकार, गायकांचे कॉन्सर्टस् भारतात होणार असतील तर यासाठी तरुणांची मोठी गर्दी पहायला मिळते.
BookMyShow App Crashed: काय आहे कोल्डप्ले?
कोल्डप्ले हा ब्रिटिश रॉक ब्रॅंड आहे जो 1996 मध्ये युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथे मुख्य गायक आणि किबोर्ड वादक ख्रिस मार्टिन आणि लिड गिटार वादक जॉनी बकलँड यांनी स्थापन केला होता. त्यानंतर त्यांनी ब्रॅंडचे नाव “पेक्टोरालझ” असे केले. पुढे त्यांनी हे नावही बदलत “स्टारफिश” असे केले आणि शेवटी 1998 मध्ये “कोल्डप्ले” असे केले. कोल्डप्ले हे त्यांच्या आकर्षक लाइव्ह परफॉर्मन्ससाठी ओळखले जाते. त्यांच्या सर्वात मोठ्या हिट्सची लाइनअप दर्शविणारा चार तासांचा शो वितरित करेल. चाहत्यांना ‘विवा ला विदा’, ‘ए स्काय फूल ऑफ स्टार्स’, ‘पॅराडाइज’, ‘माय युनिव्हर्स’ आणि ‘इन माय प्लेस’ सारख्या क्लासिक ऐकायला मिळणे अपेक्षित आहे. जे फ्रंटमन क्रिस मार्टिन, गिटार वादक जॉनी बकलँड, बास वादक गाय बेरीमन आणि ड्रमर विल चॅम्पियन यांनी थेट सादर केले आहेत.
दरम्यान कोल्डप्लेच्या कार्यक्रमाबाबत अगोदरच उत्सुकता असताना प्रेक्षकांना आणखी एक बोनस भेट मिळण्याची शक्यता आहे. सांगितले जात आहे की, याच कार्यक्रमात आथिति कलाकारही स्टेजवर सादरीकरण करणार आहे. या कलाकाराचे नाव अद्याप उघड झाले नसले तरी, चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कोल्डप्ले कॉन्सर्टस त्याच्या थेट प्रक्षेपण आणि आश्चर्यकारक कामगिरीसाठी प्रसिद्ध आहेत. या कार्यक्रमाचा भाग म्हणून उपस्थितांना एलईडी कलाईचे पट्टे मिळतील जे संगीतासह समक्रमित होतील. संपूर्ण स्टेडियममध्ये एक चित्तथरारक प्रकाश शो तयार करतील. या बॅंडने मुंबईतिल चाहत्यांसाठी एक संस्मरणीय अनुभव देण्याचे आश्वासन दिले आहे. 2025 च्या सर्वात अपेक्षित कार्यक्रमांपैकी एक म्हणून या कार्यक्रमास ओळखले जात आहे.
BookMyShow App Crashed: जागतिक दौऱ्याच्या शो च्या तारीख
कोल्डप्लेच्या अधिकृत Instagram खात्याने अबू धाबी, हाँगकाँग आणि सोलमधील कामगिरीसह मुंबई शोची पुष्टी केली आहे. मुंबईत जाण्यापूर्वी या ब्रॅंडचा जानेवारीमध्ये अबू धाबीमध्ये दौरा होणार आहे.
- 11 जानेवारी 2025: अबू धाबी झायद स्पोर्टस् सिटी स्टेडियम
- 18 – 19 जानेवारी 2025: मुंबई डी. वाय पाटील स्टेडियम
दरम्यान कोल्डप्ले हा एक ब्रिटिश ॲलटर्ने टीव रॉक बॅंड आहे. ज्याची स्थापना गायक क्रिस मार्टिन आणि गिटार वादक जॉनी वकलँड यांनी 1996 मध्ये लंडन येथील युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये केली. जो आज जगभरात प्रसिद्ध आहे. केवळ प्रसिद्धच नव्हे तर त्यांचे चाहतेही प्रत्येक देशात लाखोंच्या घरात आहेत.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!