आग आटोक्यात आल्यानंतर मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई BKC मेट्रो कडून दिलगिरी व्यक्त

BKC Metro Station Fire

BKC Metro Station Fire: वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मेट्रो स्टेशनच्या परिसरात लागलेली आग आटोक्यात आल्यानंतर आता बीकेसी मेट्रो पूर्ववत झाली आहे. मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनमध्ये आग लागल्याची माहिती समोर आली होती. या घटनेनंतर मेट्रो सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली आहे. मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशन हे अंडरग्राऊंड आहे. या मुले सर्व धूर हा स्टेशनमध्ये आला त्यामुळे आग लागल्याची माहिती समोर आली. मेट्रो स्टेशनमध्ये आग लागल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. तात्काळ मेट्रो सेवा थांबवण्यात आली आणि मेट्रोमधून प्रवाशांना तात्काळ बाहेर काढण्यात आले. ही घटना दुपारी एक वाजेच्या सुमारास बीकेसी मेट्रोच्या काम सुरू असलेल्या परिसरात ही आग लागली होती. त्यानंतर मेट्रो काही वेळासाठी बंद करण्यात आली होती. आता पुन्हा दुपारी 2.45 मिनिटांनी ही मेट्रो सुरू करण्यात आली आहे.

मुंबई मेट्रोने आग लागल्यानंतर यासंबंधीत एक निवेदन प्रसिद्ध केलं असून त्यामध्ये म्हटलंय की, “मुंबई मेट्रो कॉर्पोरेशन (MMRC) कडून कळविण्यात येते की, आज 15 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी अंदाजे 1.00 वाजता बीकेसी मेट्रो स्थानकाच्या अद्याप कार्यान्वित नसलेल्या A4 प्रवेश/निकास द्वारा बाहेर आग लागली. या प्रवेश द्वारा जवळ सध्या कामे सुरू असून हे सध्या प्रवाशांसाठी खुले करण्यात आलेले नाही. या आगीमुळे काही भागात धूर पसरला. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बीकेसी स्थानकावरील सेवा तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आली होती.

BKC Metro Station Fire
BKC Metro Station Fire

मात्र आरे – जोगेश्वरी -वांद्रे दरम्यानची इतर मेट्रो सेवा नेहमीप्रमाणे सुरू होती. मुंबई अग्निशमन दलाने परिस्थिति नियंत्रणात आणली असून एमएमआरसी आणि डीएमआरसीचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. फेर ब्रिगेडने आग पूर्णपणे विझवल्यानंतर आणि दुपारी 2.45 वाजता त्यांची परवानगी मिळाल्यानंतर बीकेसी स्थानकावरील सेवा पूर्णवत करण्यात आल्या या घटनेत कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झालेली नाही. प्रवाशांना झालेल्या गैरसोयी बद्दल आम्ही दिलगिरी आहोत.

BKC Metro Station Fire: ही आहे मुंबईतील अंडरग्राऊंड मेट्रो

मुंबईतील पहिल्या भूमिगत मेट्रो मार्ग 3 (कुलाबा – वांद्रे – सिप्झ) हा पहिला आणि एकमेव पूर्णपणे भूमिगत मेट्रो मार्ग आहे. या मार्गावरील पहिला टप्पा आरे ते बीकेसी या दरम्यान मेट्रो सेवा सुरू झाली आहे. 5 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले. या मार्गावर 10 स्थानके असून त्यापैकी 9 भुयारी तर एक जमिनीवरील आहे. या मार्गाचे अंतर 12.44 किलोमीटर इतके आहे.

BKC Metro Station Fire

असा असेल दूसरा टप्पा

  • दूसरा टप्पा- बीकेसी ते कफ परेड
  • एकुन स्थानके – 17
  • अंतर – 21.35 किलोमीटर
  • गड्यांमधील कालावधी – दोन गड्यांमधील कालावधी 3.2 मिनिटे
  • गाड्यांची संख्या – दुसऱ्या टप्प्यातील गाड्यांची संख्या 22 गाड्या

मेट्रो 3 मार्ग हा मेट्रो – 1, 2, 6 आणि 9 यांना तसेच मोनोरेलला जोडला जाणार आहे. याशिवाय, उपनगरी रेल्वे मार्गाला चर्चगेट आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे त्याशिवाय मुंबईतील विमानतळांनाही हा मार्ग जोडला जाणार आहे. या मेट्रो 3 रेल्वेमार्गामुळे प्रवाशांचा वेल वाचवण्यास मदत होत आहे. तसेच रस्त्यावरील सहा लाख वाहने कमी होतील. या मार्गाचा पहिला टप्पा (आरे ते बीकेसी स्थानक) सुरू झाला आहे.

BKC Metro Station Fire: अग्निशमन दलाला आग नियंत्रणात आणण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले

मेट्रो स्टेशन हे जमिनीपासून 40-50 फुट खाली आग लागल्याने मोठे धुराचे लोट हे स्थानकावर (BKC Metro Station Fire) झाल्याची माहिती समोर आली त्यामुळे बीकेसी स्थानकावरील मेट्रोचा प्रवास तात्पुरता बंद करण्यात आला होता. आता तो सुरू करण्यात आला आहे. तसंच आग ही मोठ्या प्रमाणात लागल्यामुळे ती नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाला मोठी कसरत आणि शर्यतीचे प्रयत्न करावे लागले आहेत. दुपारी अडीच वाजता सर्व बाजूने आग नियंत्रणात आल्याची माहिती महानगर पालिकेकडून देण्यात आली आहे. या आगीत वित्तहानी झाली आहे तर कोणतीही जीवितहानी नसल्याची ही माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.

BKC Metro Station Fire

आरे – जोगेश्वरी – वांद्रे कॉलनी दरम्यानची इतर मेट्रो सेवा नेहमीप्रमाणे सुरू होती. मुंबई अग्निशमन दलाने परिस्थिति नियंत्रणात आणली असून एमएमआरसी आणि डीएमआरसीचे वरिष्ट अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. फायर ब्रिगेडने आग पूर्णपणे नियंत्रणात आणल्यानंतर आणि दुपारी 2.45 वाजता त्यांची परवानगी मिळाल्यानंतर बीकेसी स्थानकावरील सेवा पूर्णवत करण्यात आल्या. या घटनेत कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झालेली नाही. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी आहोत असंही मेट्रोने म्हटलं आहे.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!