Bigg Boss Marathi Season 5 Winner
Bigg Boss Marathi Season 5 Winner: नमस्कार मित्रांनो, एका छोट्याश्या गावातून येऊन सुरज चव्हाणने ‘बिग बॉस मराठी सीजन 5’ च्या (Bigg Boss Marathi Season 5 Winner) ट्रॉफीवर नाव कोरले आहे. पहिल्या आठवड्यापासूनच घरातील त्याचं वागणं, बोलण या सगळ्याच घरातील आणि घराबाहेरही चर्चा होत होती. अगदी शांतपणे सुरज त्याचा खेळ साऱ्यांच्याच पसंतीस पडला. त्यामुळे बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनच्या ट्रॉफीवर सुरजने नाव कोरलं आहे. सुरज चव्हाण विजेता होणार आहे याची चर्चा सोशल मिडियावर होती. पण हा सीझन सुरू झाल्यापासून सुरज चव्हाण हा संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर राज्य केले आणि महाराष्ट्राने त्याला तेवढेच प्रेम दिले आहे. तो जेवढ्या वेळेस नॉमिनेट झाला तेवढ्या वेळेस जनतेने त्याला सेफ केले.
त्याच प्रमाणे घरातल्या इतर स्पर्धकांना त्याने ज्या प्रकारे टाक्स् मध्ये टक्कर दिली याचंही अनेकदा कौतुक झालंय. इतकंच नव्हे तर बिग बॉसच्या घरातील कॅप्टन होण्याचीही संधी सुरजने मिळवली. त्यामुळे इतर स्पर्धकांपेक्षाही तो वरचढ ठरलाय. सुरज चव्हाण याने सोशल मिडियावर नाना तऱ्हेचे व्हिडिओ तयार करायला सुरुवात केली आणि म्हणता म्हणता तो सहोशल मिडियावर स्टार बनला. अत्यंत कठीण संघर्षातून त्याने आपल्या करिअरला सुरुवात केली आणि एका वेगळी ओळख मिळवून दिली. त्याचा साधेपणा आणि चांगुलपणा त्याची माणुसकी ही मराठी मनाला भावली आणि यंदाचा बिग बॉस मराठीचा महावीजेता म्हणून सुरज चव्हाणने बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनची मानाची ट्रॉफी उचलली. यावेळी त्याच्या आत्या आणि बहिणीच्या डोळ्यात आनंदाश्रू पहायला मिळाले.
सुरज चव्हाण हा विजेता व्हावा अशी इच्छा अख्ख्या महाराष्ट्राची इच्छा होतील जी आज पूर्ण झाली. त्यामुळे आता सगळीकडे केवळ सुरज चव्हाणचीच चर्चा आहे. बारामतीच्या या पठ्ठ्याने बिग बॉस सारख्या इतक्या मोठ्या शोचे विजेतेपद मिळवले आहे. यावेळी त्याला भेट म्हणून तूनवाल ई मोटर्स तर्फे स्कूटर मिळाली आहे. याची चावी त्याला बहाल करण्यात आली. यावेळी रितेशने त्याला विचारले की गाडीत बसवून कोणाला घेऊन जाणार जेव्हा त्याने आपल्या होणाऱ्या बायकोला घेऊन जाणार असे उत्तर दिले. त्यामुळे त्याच्या या उत्तराने उपस्थित सर्व जण खुश झाले. त्याचबरोबर त्याला पू. ना. गाडगीळ यांच्याकडून 10 लाख रुपयांचे गिफ्ट वॉऊचर मिळाले. सोबतच विजेत्या स्पर्धकाला देण्यात येणारी 14.60 लाख रुपयांची रक्कमही केदार शिंदे यांनी देऊ केली.
यावेळी ‘कलर्स मराठी‘ चे प्रोग्रामिंग हेड यांनी सांगितले की त्याच्या आगामी आईपण भारी देवा या चित्रपटात सुरज चव्हाणला काम करण्याची संधी मिळणार आहे. तेव्हा विजेत्या सुरजला त्याच्या मेहनतीची पोचपावती मिळाली आहे. सुरजने आपले आई वडील गमावले परंतु यावेळी त्याचे हे यश पाहून नक्कीच त्याचे आईवडील हे खुश झाले असतील. त्याला नेहमीच आपल्या आईवडिलांची आठवण येत राहिली होती. ट्रॉफी घेताना पाहताच सुरजच्या आत्या आणि त्यांच्या बहिणीच्या डोळ्यात पानी होते. हा क्षण त्यांच्यासाठी अत्यंत अविस्मरणीय असा क्षण होता. सुरज चव्हाणने आपला खरेपणा लोकांसमोर ठेवला आणि प्रत्येक संकटातून मत करत घरातल्याचिही त्याने मन जिंकून घेतलेली पहायला मिळाली.
अनेकदा त्याला नॉमिनेट करण्यात आले परंतु त्याला भरगोस मतं मिळाली आणि तिथून तो टॉप 5, टॉप 4, टॉप 3, करत टॉप 2 मध्ये पोहोचला आणि या पर्वाची विजेता झाला. अनेकांनी त्याला गेम कळत नाही असे म्हटले परंतु पाहता पाहता न भूतो न् भविष्यती असा इतिहास रचत सुरजने बिग बॉस मराठीची ट्रॉफी जिंकली आहे. सध्या त्याच्या फॅन्समध्ये आणि महराष्ट्रात आनंदाचे वातावरण आहे.
Bigg Boss Marathi Season 5 Winner: टॉप 6 मधून सुरजने मारली बाजी
निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, धनंजय पोवार, अंकिता वालावलकर, जान्हव्ही किल्लेकर आणि सुरज चव्हाण हे बिग बॉस मराठीचे फायनलिस्ट होते. यामध्ये आधी जान्हवी किल्लेकर ही नऊ लाख रुपये घेऊन त्यांनंतर अंकिता वालावलकर घराबाहेर पडल्या. टॉप चार स्पर्धकांमधून धनंजयला माघार घ्यावी लागली. त्यामुळे सुरज, अभिजीत आणि निक्कीने टॉप 3 मध्ये धडक दिली. यामध्ये सुरजने बाजी मारत टॉप 2 मध्ये स्थान मिळवलं. अखेर प्रेक्षकांनी निर्णय डेट सुरजला बिग बॉस मराठीचा विजेता केलं.
Bigg Boss Marathi Season 5 Winner: चित्रपटात झळकणार!
छोट्या खेडेगावातून आलेल्या सुरजने झगमगाटी विश्वास स्वत:चे एक विशेष स्थान निर्माण केले आहे. बिग बॉस मराठी 5 मुळे सुरज प्रेक्षकांच्या समोर आल्यानंतर आता लवकरच तो मोठ्या पडद्यावरही झळकण्यासाठी सज्ज झाला आहे. सुरज आपल्या आगामी राजाराणी चित्रपटात आपला दमदार अभिनय करताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी राजाराणी च्या पोस्टरने सर्वांची मनं जिंकली होती. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित एक प्रेमकथा उलगडणार आहे, ज्यामध्ये सुरज महत्वपूर्ण भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नायकाच्या दोस्ताच्या भूमिकेत त्याला पाहणे फारच रंजक ठरणार आहे. त्याचा राजाराणी हा चित्रपट 18 ऑक्टोबर 2024 पासून सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
यावेळी ‘कलर्स मराठी’ चे प्रोग्रामिंग हेड यांनी सांगितले की त्याच्या आगामी आईपण भारी देवा या चित्रपटात सुरज चव्हाणला काम करण्याची संधी मिळणार आहे. तेव्हा विजेत्या सुरजला त्याच्या मेहनतीची पोचपावती मिळाली आहे.
Bigg Boss Marathi Season 5 Winner: दोन जोडी कपड्यांत आलेला सुरज!
बिग बॉस मराठी च्या पाचव्या सीझनमध्ये सुरुवाती पासूनच सुरज चव्हाणची सर्वत्र चर्चा होताना दिसली होती. त्याने घरातील इतर स्पर्धकांसोबत मिळून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते. पण सुरज जेव्हा बिग बॉस मराठी शोमध्ये सहभागी होण्यासाठी आला तेव्हा त्याच्याकडे फक्त दोन टि शर्ट आणि तुटलेली चप्पल होती. या शोच्या सेटवर आल्यानंतर त्याला कपडे दिले गेले. या परिस्थितीतून वर आलेल्या सुरजने अल्पावधीतच आपल्या साधेपणाने आणि वागणुकीने सगळ्यांची माने जिंकली.
सुरजने आपले आई वडील गमावले परंतु यावेळी त्याचे हे यश पाहून नक्कीच त्याचे आईवडील हे खुश झाले असतील. त्याला नेहमीच आपल्या आईवडिलांची आठवण येत राहिली होती. ट्रॉफी घेताना पाहताच सुरजच्या आत्या आणि त्यांच्या बहिणीच्या डोळ्यात पानी होते. हा क्षण त्यांच्यासाठी अत्यंत अविस्मरणीय असा क्षण होता. सुरज चव्हाणने आपला खरेपणा लोकांसमोर ठेवला आणि प्रत्येक संकटातून मत करत घरातल्याचिही त्याने मन जिंकून घेतलेली पहायला मिळाली.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!