Bigg Boss Marathi 5
Bigg Boss Marathi 5: बिग बॉस मराठी 5 चे पर्व कधीपासून सुरू होणार? लाडक्या अभिनेत्याला बिग बॉस मराठी सीजन 5 चं होस्ट करताना कधीपासून पहायला मिळणार? बिग बॉस मराठी 5 ची तारीख कधी जाहीर करणार? अशा अनेक प्रश्नाची यत्तर आता समोर आली आहे. अखेर Bigg Boss Marathi 5 ची तारीख ठरली असून रितेश देशमुखचा नवा प्रोमो अमोर आलाय. ढोलताशांच्या गजरात रितेशची धडाकेबाज एंट्री या प्रोमोमध्ये दाखवण्यात आली आहे. प्रोमो पाहून सारेच म्हणतायत ‘आररर खतरनाक’ या प्रोमो ला बघून प्रेक्षकांना उत्सुकता लागलेली आहे.
हिंदी-मराठी मनोरंजन सृष्टि गाजवणारा सुपरस्टार रितेश देशमुख यंदाच पर्व होस्ट करत आहे. या पर्वात कोणते स्पर्धक असतील, कसे असतील हे ए अद्याप गुलदस्त्यात आहे. स्पर्धकांबद्दल कोणालाच काही माहिती नाही. पण रितेश भाऊ येणार म्हंटल्यावर यंदाच्या पर्वत स्पर्धकदेखील त्यांच्यासारखेच ‘लयभारी’ असणार एवढं मात्र नक्की. तेव्हा पासून मराठी रसिक प्रेक्षकांना हा सीझन कधीपासून सुरू होणार? याची उत्सुकता लागली होती. अखेर तरीक ठरली आहे. बिग बॉस मराठी च्या पाचव्या सीझनच्या ग्रँड प्रीमियरची तारीख झाली आहे.
बिग बॉस मराठी च्या गेल्या चार सीझनला प्रेक्षकांची उदंड प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे मराठी रसिक प्रेक्षक ;बिग बॉस मराठी’ च्या पाचव्या पर्वाची आतुरतेने वाट पहायला होते. बिग बॉस मराठी च्या चौथ्या सीझन नंतर जवळपास दोन वर्षानी पाचवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. पाचवा सीझनचा आता एक नवीन, सॉलिड, जबरी प्रोमो प्रदर्शित झाला असून यामधून बिग बॉस च्या घराचं दर कधी उघडणार हे समोर आलं आहे. नव्या प्रोमो मध्ये रितेश देशमुख एका वेगळ्याच रांगड्या अंदाजात दिसत आहे. प्रोमोमध्ये एक आगळीवेगळी ऊर्जा अन् जोश आहे. प्रोमो नुसार, यंदा ढोल ताशाच्या गजरात सगळे स्पर्धक बिग बॉस च्या चक्रव्युव्ह मध्ये शिरणार आहेत.
जे चांगले वागणार त्यांची रितेश वाहवाह करणार.. पण जे वाईट वागणार त्यांची तो एकंदरीत काय तर सगळ्यांची वाजणार अन् हा सीझन गाजणार कारण रितेश म्हणतोय. मी येणार तर कल्ला होणारच. आपल्या लाडक्या ‘बिग बॉस’ प्रेमीना नाराज न् करता रितेश देशमुख ने नव्या प्रोमोच्या माध्यमातून यंदाच्या सीझनची तारीख देखील जाहीर केली आहे. हा प्रोमो सोशल मिडियावर तूफान व्हायरल झाला आहे.
मजा, मस्ती, ड्रामा अन् राडा असणारे ‘बिग बॉस मराठी’ चे सुसज्ज आलीशान घर, 100 दिवस आणि अंतरंगी स्पर्धकांचा सतरंगी प्रवास.. फक्त 15 दिवसात सुरू होणार आहे. ‘Bigg Boss Marathi 5‘ चा ग्रँड प्रीमियर रविवारी 28 जुलैला रात्री 9 वाजता कलर्स मराठी वर होणार आहे. त्यानंतरचे भाग दररोज रात्री 9 वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहेत. तसंच जिओ सिनेमा अॅप वर भाग प्रदर्शित होणार आहेत.
‘बिग बॉस मराठी 5 (Bigg Boss Marathi 5)चा हा जबरदस्त प्रोमो पाहून चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अखेर तारीख समोर आली, रितेश दादा कल्ला होणार.. बरोबर वाजणार, थॅंक्यु रितेश देशमुख, व्वा, खूप उत्सुकआहोत, कडक अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी उमटवल्या आहेत.
Bigg Boss Marathi 5: या स्पर्धकांच्या नावाची चर्चा
तर यंदा सोशल मिडियावर काही नावं चर्चेत आहेत. त्यापैकी एक आहे. किरण गायकवाड, देवमाणूस फर्म किरण गायकवाड या शोमध्ये दिसू शकतो, असं म्हंटल जात आहे. तर दुसर नव हे शिवानी सोनार हीचण होतं. मात्र तिची नवीन मालिका नुकतीच सुरू झाल्यानंतर आता तिचं नव चर्चेतून बाहेर पडलं आहे. शिवाय मराठी सोशल मिडिया स्टार देखील बिग बॉसच्या घरात दिसू शकतात. अंकिता वालावलकर ही सहोशल मिडियावर बरीच चर्चेत असते. त्यामुळे बिग बॉसच्या घरात अंकिताची एंट्री होऊ शकते. त्याचप्रमाणे सोशल मिडियावरच्या तिच्या काही पोस्टमुळे तिला ट्रोलिंगला देखील समोर जावं लागतं.
म्हणूनच बिग बॉसच्या घरात येणारी पहिली स्पर्धक ही अंकिता असणार का? अशा चर्चा सध्या जोर धसरू लागल्या आहेत. पण अंकित बिग बॉसच्या घरात येणार का नाही हे येत्या 28 जुलै रोजी स्पष्ट होईल.
Bigg Boss Marathi 5: मनोरंजनाचा धमाका
मराठी मनोरंजनाचा बाप ज्याची वाट अख्खा महाराष्ट्र बघतोसुरू व्हायच्या आधीच ज्याच्या बद्दलच्या चर्चेला उधाण येत, असा आपल्या सगळ्यांचा आवडता कार्यक्रम ‘बिग बॉस मराठी’ अवघ्या काही दिवसातच सुरू होत आहे. तारीख जाहीर झाल्याने यंदा कोणते स्पर्धक बिग बॉस मराठी च्या घरात धूम करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. बिग बॉस मराठीछान बिगऊल आता वाजणार आणि स्पर्धकांच्या करामतीचा आता कस लागणार! प्रत्येकी आठवड्यात लागेल झटका आणि रंगणार मनोरंजनाचा धमाका. अशक्य अक्ष गोष्टींनी बनलेला बिग बॉस मराठी चा नवा सीजन प्रेक्षकांच्या भेटीसाठी आता सज्ज आहे. घरातील मज्जा, मस्ती, डाव, प्रतिडाव आणि नव्या होस्टची कमाल अशा साऱ्याच गोष्टी पाहण्याची अनुभवण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
बिग बॉस प्रेमींमध्ये उत्सुकता
नव्या पर्वाबद्दल आणि यंदाच्या स्पर्धकांबद्दल ‘बिग बॉस’ प्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. बिग बॉस मराठी च्या नव्या पर्वत आपल्या रितेश भाऊची लयभारी स्टाइल पहायला मिळणार आहे. कारण रितेश भाऊ म्हणतोय, आता मी आलोय.. कल्ला तर होणारच तो पण माझ्या स्टाईलने!!! बिग बॉस मराठी चा नवीन सीझन प्रेक्षकांना लवकरच कलर्स मराठी आणि jiocinemaवर पहाता येईल. बिग बॉसचा नवा सीजन येणार, लवकर पण तो केव्हा ? असं प्रश्न चाहते विचारताना दिसत आहेत. पण याची नेमकी तारीख मात्र निर्माते किंवा वाहिणीकडून जाहीर करण्यात आली नाहीये. त्यामुळं प्रशक काहीसे नाराज झाले आहेत. इतका सस्पेंस तर सिनेमामध्येही नसतो. असं म्हणत बिग बॉस मराठी सीझन 5 ची तारीख जाहीर करावी अशी मागणी नेटकरी करताना दिसत आहेत.
तसंच काही रिपोर्टनुसार येत्या 28 जुलैपासूनच या हा बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं म्हंटल जात आते. असं असलं तरी अधिकृतपणे अद्याप तारीख जाहीर करण्यात आली नाहीये.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!