Bigg Boss Marathi
Bigg Boss Marathi: बिग बॉस मराठी च्या भाऊच्या धक्क्यावर सध्या रितेश देशमुख घरातल्या सगळ्याच स्पर्धकांना धारेवर धरल्याचं पहायला मिळतआहे. एल संपूर्ण आठवड्यात घरातल्या तर सदस्यां बरोबर जान्हवी किल्लेकरचे टोकाचे वाद झाले. त्यामुळे यंदाच्या आठवड्यात भाऊच्या धक्यावर रितेशने जान्हवीची चांगलीच हजेरी घेतली आहे. त्याचप्रमाणे तिच्या बोलण्यावरूनही रितेशने तिला चांगलेच खडेबोल सुनावले. या सगळ्यानंतर अंकिताने केलेल्या खुलश्यामुळे रितेश भाऊलाही धक्काच बसला. जान्हवी आणि वर्षाताईमध्ये झालेल्या वादावर महाराष्ट्रातून जान्हवीवर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. त्यावर रितेशने तिला म्हटलं की, जेवढे प्रोजेक्ट तु केलेही नसशील तेवढे वर्षाताईनी रिजेक्ट केले असतील.
बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) भाऊच्या धक्क्यावर आज बॉलीवूड खिलाडी अक्षय कुमार येणार आहे. ‘खेल खेल में’ चित्रपटाच्या संपूर्ण टीमने भाऊच्या धक्क्यावर उपस्थिती लावली आहे. यावेळी सगळ्यांनी मिळून रंगमंचावर कल्ला केल्याचं पहायला मिळालं. त्यातच आता त्याच्या ‘झापुक झुपूक’ वर खिलाडी अक्षय कुमारने ठेका धरला. त्यामुळे आता सुरज महाराष्ट्रातच नाही तर देशात फेमस झाला असल्याचंही मिळतंय.
कलर्स मराठीकडून अक्षय कुमारच्या झापुक झुपूक डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर शेअर करण्यात आलाय. त्यावर अनेकांनी कमेंट्स करत सुरजचं कौतुक केलं आहे. बिग बॉस मराठी च्या मंचावर ‘खेल खेल में’ या चित्रपटाची टीम कल्ला करणार आहे. त्यांच्या कल्ल्याने रविवारचा ‘भाऊचा धक्का’ एकदम झापुक झुपूक होणार आहे.
यानंतर भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने सांगितले की जान्हवीने आपल्याच जवळच्या मैत्रिणीबद्दल अशी चुगली केली. तेव्हा जान्हवीने केलेली ही चुगली ऐकुन घरात सर्वांनाच धक्का बसला. सुरुवातीला जान्हवी तिची चूक मान्य करत नव्हती त्यामुळे रितेश रागात म्हणाला, “जान्हवी नीट ऐका.. मी जे बोलतोय ते खरं बोलतोय.. तुम्ही सोफ्यावर बसून लिव्हिंग एरियामध्ये बोलत होता. सगळं आपण करतोय आणि क्रेडिट निक्की घेऊन जाते.” निक्कीला सुद्धा जान्हवी असं बोलेल यावर विश्वास बसत नव्हता.
सूरज चव्हाण, योगिता चव्हाण, पंढरीनाथ, निक्की, घनश्याम, निखिल दामले हे सदस्य घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी या आठवड्यात नॉमिनेट झाले आहेत. आता यापैकी कोण घरचा निरोप घेणार याचा उलगडा येत्या काही तासांत होणार आहे.
Bigg Boss Marathi: जान्हवीला आली चक्कर!
रितेशने सर्वांसमोर सत्य सांगितल्यावर जान्हवी ढसाढसा रडू लागली. निक्कीला सुद्धा रितेशने केलेला खुलासा ऐकुन धक्का बसला होता. बेडरूममध्ये गेल्यावर जान्हवीला चक्कर आली. चक्कर येऊन पडल्यावर तिला उचलून उपचारासाठी पाठवण्यात आल्याचं नव्या प्रोमोमध्ये पहायला मिळत आहे. आता जान्हवीला चक्कर आल्यावर घरात कोणता नवीन ड्रामा होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. बिग बॉसच्या घरात जान्हवी बारी होऊन परतल्यावर निक्की तिच्याशी कशी वागेल? दोघींनी मैत्री कायम राहील की नाही? आता या गोष्टी पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
अक्षय कुमार आणि ‘खेल खेल में’ ची टीम कल्ला करणार
रितेशने केवळ शाळा न् घेता सूरज, योगिता यांसारख्या खेळाडूंचं कौतुक देखील केलं. तसेच कोणालाही न् घाबरता अजून मोकळेपणाने खेळा असा सल्ला देखील अभिनेत्याने या दोघांना दिला आहे. आता भाऊच्या धक्क्यावर रविवारी अक्षय कुमार यनार आहे. अक्षय येताच वर्षा उसगांवकरांना म्हणतो, “वर्षा कीती वर्षानी दिसलीस तु” यावर अभिनेत्री हसू लागतात. तर, धनंजयला अक्षय विचारतो, “काय डीपी दादा मटण मिळालं की नाही घरात?” यावर धनंजय म्हणतात, “नाही पहिल्याच आठवड्यात मिळालं” यानंतर घरात एकच हशा पिकतो. अक्षय कुमारसमोर सूरज सध्या सोशल मिडियावर ट्रेडिंग असणाऱ्या झापुक झुपूकगाण्यावर डान्स करत असल्याचं नव्या प्रोमोमध्ये पहायला मिळत आहे. सूरजला डान्स करताना पाहून रंगमंचावर रितेश, अक्षयने देखील झापुक झुपूक गाण्यावर ठेका धरल्याचं पाहायला मिळालं.
बिग बॉस मराठीचा हा नवा प्रोमो नेटकऱ्यांच्या देखील चांगलाच पसंतीस उतरला आहे. सुरज चव्हाणचा डान्स तर अक्षय कुमारला पण आवडला, गुलीगतने आता अक्षय कुमारला सुद्धा डान्स करायला लावलं अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या प्रोमोवर केल्या आहेत. आता बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या आठवड्यात कोणता स्पर्धक घराचा निरोप घेणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
Bigg Boss Marathi: सोशल मिडियावर नेटकऱ्यांच्या कमेंट्स
अक्षय सुरजला या झापुक झुपूक डान्सवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने कमेंट करत म्हटलं की, गुलीगतनं अक्षय कुमारला पण नाचवलं.. कसं झापुक झुपूक झापुक झुपूक. दुसऱ्या युजरने म्हटलं की, सूरज चव्हाण रिस्पेक्ट बटन. आणखी एका युजरने कमेंट करत म्हटलं की, सूरज चव्हाण टू इमेज बिल्डर आहेस भावा. तुला काही कळो न कळो.. आम्हाला तुझ्यातला माणूस कळाला.. महाराष्ट्राने डोक्यावर घेतलेली, चांगली वाटणारी माणसं तिथे जाऊन माती खात आहेत आणि तु तिथला धुळीचा कन न कन स्वच्छ करून वातावरण सकारात्मक ठेवत आहेस.. कोणी माज दाखवून दादा झालं तर कोणी इमेज किलर होऊन स्वत:च्याच प्रतिमेची पतंग करून उडवत बसलं.. पण तु तुझी इमेज बिल्ड केलीस.
Bigg Boss Marathi: अंकिताने ‘मौंजुलिका’ टॅग जान्हवीला का दिला?
अंकिता हॅशटॅग ‘मौंजुलिका’ हे जान्हवीला देताना म्हणते की, तिच्या बाबतीत कळतच नाही, टि कधीतरी एकदम रागात असते तर कधीतरी टी वर्षाताईचे पायही चेपून देते. त्यावर रितेश आश्चर्यचकित होऊन विचारतो की, जान्हवीने वर्षाताईचे पाय दाबले? त्यावर अंकिता म्हणते की, होय सर काल तिने पाय चेपून दिले तेही तेल लावून. त्यावर पुन्हा रितेश म्हणतो की, हा प्रवास खरंच खूप चांगला आहे की, तो गळ्यापासून पायापर्यंत आला आहे. पुन्हा अंकिता म्हणते की, यामुळे आम्हाला कळतच नाही की, कोणती जान्हवी खरी आहे. त्यानंतर बिग बॉस मेरे ढोलना हे गाणं लावतात, त्यावर अंकिता आणि जान्हवी दोघीही थीरकताना दिसतात.
Bigg Boss Marathi: आर्याचे मॅसेज वाचणार अक्षय कुमार?
बिग बॉस मराठी च्या आजच्या भागात अक्षय कुमार रॅपर आर्याच्या फोनमधील मॅसेज वाचणार आहे. पण आर्या मात्र अक्षयला जोरात मॅसेज वाचून दाखवण्याची परवानगी देत नाही, त्यामुळे आता खिलाडी अक्षय कुमार आर्याचे मॅसेज वाचणार की नाही हे जाणून घेण्यासाठी आजचा भाऊचा धक्का नक्की पहा.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!