Balochistan Attack: बलुचिस्तान मध्ये सर्वात मोठा हल्ला, बंडखोरांनी 23 पंजाबींना गोळ्या झाडल्या

Balochistan Attack

Balochistan Attack: पाकिस्तानच्या बलुचीस्तान (Balochistan Attack) येथे बलुच बंडखोरांनी मोठा हल्ला केला. त्यांचा नेता नवाब बुग्तीच्या पुण्यतिथि निमित्त बलुच बंडखोरांनी 23 पंजाबींना ट्रॅक आणि बस मधून बाहेर काढून मारले. बलुच बंडखोरांनी 23 पंजाबींना ट्रॅक आणि बसमधून बाहेर काढून मारलं. बलुच लिबरेशन आर्मीच्या सशस्त्र सदस्यांनी ही वाहने थांबवली आणि त्यांची ओळखपत्रे तपासल्यानंतर पंजाबी वंशाच्या लोकांना ठार केले, असे सांगण्यात येत आहे. पाकिस्तानच्या मुसाखेल मधील राराशम जिल्ह्यातील ही घटना घडली. या प्रकाराचा पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ व राष्ट्राध्यक्ष आरिफ अली झरदारी यांनी निषेध केला. असून देशात कोणत्याही प्रकारच्या दशहतवादाला धारा नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

राराशम जिल्हातल्या आंतरप्रांतीय महामार्गावर ही घटना घडली. या महामार्गावरून जाणाऱ्या अनेक बसेसमधून हल्लेखोर प्रवाशांना सहाय्यक आयुक्त मुसाखेर नजीब काकर यांनी दिली आहे. पाकिस्तान मधील पंजाब प्रांताकडे जाणाऱ्या व पंजाब प्रांतातून येणाऱ्या बसेसला हल्लेखोर प्रामुख्याने लक्ष्य करत आहेत. या बसेसची तपासणी हल्लेखोरांकडून केली जात आहे. त्यानंतर फक्त पंजाब प्रांतातून आलेल्या नागरिकांना गोळ्या घातल्या जात आहेत.

हल्लेखोरांनी 10 वाहनांना आग लावली. या हल्ल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह रुग्णालयात पाठविले घटनास्थळी जाऊन मृतदेह रुग्णालयात पाठविले. बलुचीस्तान मुख्यमंत्री सरफराज बुग्ती यांनी या दहशतवाद हल्ल्याचा निषेध केला. त्यांनी मृतकांच्या कुटुंबियान बद्दल मनापासून संवेदना आणि सहानुभूति व्यक्त केली. हल्लेखोरांना सोडले जाणार नाही. तसेच त्यांना मदत करणाऱ्यांना देखील सोडले जाणार नाही.

Balochistan Attack

अशाच काही सशस्त्र गटाच्या सदस्यांनी वाहनांमधील लोकांची ओळखपत्र तपासली त्यानंतर कथितरित्या पंजाबातील पाकिस्तानातील पंजाब लोकांना वेगळं करण्यात आलं आणि त्यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर त्यांची वाहनं पेटवून देण्यात आली. असा आरोप पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी केला आहे. नजीबूल्लाह काकर या स्थानिक वरिष्ट अधिकाऱ्यांच्या मते, कट्टरतावादी गटातील जवळपास 30 ते 40 सदस्यांचा या घटनेत सहभाग होता. या सशस्त्र हल्लेखोरांनी 22 वाहने थांबवली. पंजाबात जाणाऱ्या आणि तिथून येणाऱ्या वाहनांवर देखरेख केली जात होती. वाहने थांबवून पंजाबातील लोकांची ओळख पटवली आणि त्यांना गोळ्या घालण्यात आल्या, असं नजीबूल्लाह यांनी एएफपी या वृत्तसंस्थेला सांगितलं.

बलुचीस्तान सरकार दहशत वाद्यांना पकडले- बलुचीस्तानच्या मुख्यमंत्र्यांची ग्वाही

सशस्त्र लोकांनी 10 वाहनांना आगीच्या भक्ष्यस्थानी दिलं. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह रुग्णालयात नेण्याची प्रतिक्रिया सुरू केली आहे. बलुचीस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुग्ती यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. दशहतवाद्याच्या भ्याड कृत्यामध्ये ज्यांनी प्राण गमावले त्यांच्या कुटुंबियांप्रति त्यांनी शोक व्यक्त केला. बुग्ती म्हणाले की, दशतवादी आणि त्यांचे समर्थक टिकू शकणार नाहीत. बलुचीस्तान सरकार दहशतवाद्यांना पकडले. मुसाखेल मधील हल्ल्याच्या सुमारे चार महिन्यांपूर्वी पंजाबमधील लोकांना लक्ष्य करून असाच हल्ला करण्यात आला होता. एप्रिलमध्ये नोश्कीजवळ नऊ प्रवाशांना बसमधून उतरवून त्यांची ओळखपत्रे पाहिल्यानंतर बंदुकधाऱ्यांनी त्यांची हत्या केली होती.

बीएलएने दावा केला आहे की त्यांनी ऑपरेशन हेरॉक अंतर्गत 62 पाकिस्तानी सुरक्षा कर्मचाऱ्यांना मारल आहे. संपूर्ण बलुचीस्तान मध्ये ही कारवाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Balochistan Attack: बलुचीस्तान लिबरेशन आर्मीन घेतली जबाबदारी

ह्या हल्ल्याची जबाबदारी बलुचीस्तान लिबरेशन आर्मीन घेतली आहे. मात्र आमच्या लोकांनी फक्त साध्या वेशात प्रवास करणाऱ्या लष्करी अधिकारी व सेनिकांना लक्ष्य केलं आहे, असा दावा त्यांनी केला आहेत. त्यांना गोळ्या घालण्याआधी त्यांची ओळख पटवण्यात आली होती. असंही बलुचीस्तान लिबरेशन आर्मीकडून सांगण्यात आलं आहे. मात्र, पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांनी हा दावा फेटाळून लावला असून मृत्यू पावलेले लोक निरपराध नागरिक होते, असं ते म्हणाले आहेत.

Balochistan Attack: पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी निषेध व्यक्त केला

दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. पाकिस्तान मध्ये कोणत्याही प्रकारचा दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही, असं ते म्हणाले यावेळी शरीफ यांनी स्थानिक प्रशासनाला मृतांच्या नातेवाईकांना लागेल ती मदत पुरवण्याचे निर्देश दिले आहेट. तसेच जखमींना शक्य ती सर्व मदत करण्यासही त्यांनी सांगितलं आहे.

पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांनी हा मानवतेवरचा हल्ला असल्याचं नमूद करून हल्लेखोर हे पाकिस्तान व मानवता या दोघांचे शत्रू असल्याची टीका केली आहे. याआधीही एप्रिल महिन्यात अशाच प्रकारच्या हल्ला करण्यात आला होता. मुसाखेल मधील नोशकी भागात 9 प्रवाशांना एका बसमधून खाली उतरवून त्यांची ओळखपत्र तपासण्यात आली व त्यानंतर त्यांना गोळ्या झाडून थर करण्यात आलं होतं.

Balochistan Attack: एप्रिलमध्ये अशाच हल्यात पंजाबमधील 9 जणांना गोळ्या घालण्यात आल्या होत्या

या हल्ल्यापूर्वी एप्रिलमध्येही असाच हल्ला झाला होता, ज्यामध्ये लोकांना ओळखून गोळ्या घालण्यात आल्या होत्या. त्यानंतर नुष्कि, बलुचीस्तान जवळ ओळखपत्रे तपासल्यानंतर 9 जणांना गोळ्या घालण्यात आल्या. थर झालेले हे पंजाबचे होते. ऑक्टोबर 2023 मध्ये केच जिल्ह्यातील तुर्बत येथे अज्ञात हल्लेखोरांनी पंजाब मधील 6 मंजुरांची गोळ्या झाडून हत्या केली. 2015 मध्ये अशीच एक घडली होती जेव्हा बंदूकधारीनी तुर्बाजवळील कामगार छावणीवर हल्ला केला होता, ज्यात 20 कामगार ठार झाले होते.

Balochistan Attack

Balochistan Attack: विदेशी ऊर्जा कंपन्याही लक्ष्य

बलुचीस्तान हा पाकिस्तानातील सर्वात मोठा प्रांत आहे. पाकिस्तानातील इतर कोणत्याही प्रांतापेक्षा बलुचीस्तानात सर्वाधिक नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. मात्र तरीही इतर प्रांतांच्या तुलनेत या प्रांताचा सर्वात कमी विकास झाला आहे. बलोच लिबरेशन आर्मी आणि इतर बलोच कट्टरतावादी संघटनांनी सध्या हल्ले वाढवले आहेट. किस्तानच्या इतर भागातून बलुचीस्तानात येऊन काम करणाऱ्या पंजाबी आणि सिंधी लोकांना ते लक्ष्य करतात. त्याचबरोबर विदेशी ऊर्जा कंपन्यांनाही ते लक्ष्य करत आहेत. या कंपन्या बलुचीस्तानचं शोषण करत असल्याचा कट्टरतावाद्यांचा आरोप आहे.

कंपन्या या प्रांतामधील साधन संपत्तीचा वापर करून त्यातून नफा कमवतात, मात्र त्या नफ्याचं सर्वाना वितरण करत नाही, असा आरोप बलोच संघटना करत आहेत. याच एप्रिल महिन्यातही बलुचीस्तानात अशी घटना घडली होती. त्यावेळी 9 प्रवाशांना बसमधून खाली उतरवून त्यांची ओळख पटवत त्यांना गोळ्या घातल्या होत्या. गेल्या 24 तासांत बलोच लिबरेशन आर्मीनं विविध सरकारी उपक्रमांवर आणि ठिकाणावर हल्ले चढवले आहेत. बलुचीस्तानातील पोलिस स्टेशन आणि सुरक्षा दलांच्या छावण्याचाही समावेश आहे. युके आणि अमेरिकेसह अनेक पाश्चात्य देशांनी बलोच लिबरेशन आर्मीला जागतिक दहशतवादी संघटना घोषित केलं आहे.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!