Badlapur School Case News
Badlapur School Case News: देशामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या घटना ताज्या असताना, बदलापूरमध्ये एका प्रसिद्ध शाळेच्या स्वच्छतागृहात अवघ्या चार आणि सहा वर्षाच्या दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संबंधित संस्था ही बदलापूर मधील नामांकित शाळा आहे. येथील एका सफाई कर्मचाऱ्याने काही दिवसांच्या अंतराने दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार केले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पालक आणि बदलापूर मधील नागरिक प्रचंड संतापले आहेत. बुधवारी बदलापूर बंदची हाक देण्यात आली असुनं नागरिकांचा मोर्चा शाळेच्या गेटवर जाऊन धडकला आहे. मात्र. तीन तास उलटूनही शल्य प्रशासनाकडून नागरिकांशी चर्चा करण्यासाठी कोणीही पुढे आलेले नाही. या प्रकरणात पोलिसांची भूमिकाही संशयास्पद राहिल्याचा आरोप आहे. पोलिसांनी अनेक तास उलटूनही मुलींच्या पालकांशी तक्रार दाखल करून घेतली नव्हती. त्यामुळे पोलिसांवर कोणाचा दबाव होता. याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे.
बदलापूरातील नामांकित शाळेतील चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक शोषणप्रकरणात बदलापूरातील नागरिकांमध्ये रोष पहायला मिळाला. यावेळी शाळेच्या बाहेर जमलेल्या संतप्त बदलापूरकर आणि पालकांनी शाळेत जाण्याचा आग्रह केला. मात्र पोलिसांनी आंदोलकांना शाळेच्या गेटवर रोखलं. आंदोलकांचा रेटा वाढत चालल्याने परिस्थिति हाताबाहेर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सर्वपक्षीय पत्रकार परिषेदेत बदलापूरकरांना आज बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. व्यापारी, स्कूल बस संघटना, रिक्षा संघटना यांनीही बंदला पाठिंबा दिला आहे. शाळा प्रशासनाने बदलापूर करांच्या मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात येणार असल्याचं बदलापूरच्या मनसे शहराध्यक्षा संगीता चेंदवणकार आणि राष्ट्रवादी युवती कॉँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रियंका दामले यांनी सांगितले आहे. त्यानंतर संपूर्ण दिवस बदलापूर शहर बंद ठेवण्याचं आवाहन सर्वपक्षीय नेत्यांनी केलं आहे.
लहान मुलींच्या अत्याचार प्रकरणातील हलगर्जीपणा वरिष्ट पोलिस निरीक्षकांना भोवलं आहे, बदलापूर पूर्व पोलिस ठाण्याच्या वरिष्ट पोलिस निरीक्षक शुभद्रा शीतोळे यांची बदली करण्यात आली असून नवे वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणूनण किरण बाळवडकर यांनी पदभार स्वीकारला आहे. या प्रकरणात आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अक्षय शिंदे (24) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. अक्षय हा शाळेत (Badlapur School Case News) सफाई कामगाराचं काम करीत होता.
बदलापूरातील अत्याचार प्रकरणी सकाळपासून नागरिकांनी शाळेबाहेर आंदोलन सुरू केलं होतं, चिमुकल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अवघं बदलापूर एकवटलं होतं. आंदोलकांनी आरोपीला फाशी द्या, एवढी एकच मागणी लावून धरली होती. बघता बघता आंदोलनाला काही वेळासाठी हिंसक वळण लागलं होतं. सकाळपासून रेल रोको करणाऱ्या आंदोलकांनी सातत्यानं आवाहन करणाऱ्या पोलिसांवर दगडफेक सुरू केली, तर दुसरीकडे शाळेबाहेर एकवटलेल्या आंदोलकांनी शाळेचा गेट तोडून आतमध्ये प्रवेश केला आणि तोडफोड करण्यास सुरुवात केली. अशातच मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्याकडून खटला फास्ट ट्ररॅकवर चालवण्याचं आश्वासन दिलं, तरीदेखील आंदोलक एकाच मागणीवर ठाम होतं. आरोपीला फाशी द्या, अशी एकच मागणी आंदोलकांनी लावून धरली आहे. दरम्यान, आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाल्यानंतर गृहमंत्र्याकडून याप्रकरणाच्या चौकशीसाठी SIT ची घोषणा करण्यात आली आहे.
Badlapur School Case News: IPS अधिकारी आरती सिंह यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणविसांकडून बदलापूर प्रकरणी SIT नेमण्यात आली आहे. यासंदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक ट्विट केलं आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे कि, बदलापूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ट IPS अधिकारी आरती सिंह यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्याचे आदेश दिले आहेत. दोषींवर काठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी, हा खटला जलदगती न्यायालयात चलविण्यासाठी आजच प्रस्थाव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना सुध्दा त्यांनी दिले आहेत. बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत दोन चिमूरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचार झाल्यानंतर पालकांचा उद्रेक झाला आहे. सकाळपासूनच नागरिकांनी शाळेला घेरा घातला असून बदलापूर स्थानकात रेल रोको देखील केला आहे.
चिमूकल्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्या, अशी एकाच मागणी नागरिकांनी लावून धरली आहे. मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं, पोलिसांनी देखील आवाहन केलं, मात्र तरीदेखील नागरिक आपलं आंदोलन मागे घ्यायला तयार नाही. सर्व विद्यार्थ्यांचे पालक, नागरिक आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं.
Badlapur School Case News: नेमके प्रकरण काय?
बदलापूर पूर्वेतील आदर्श या नामांकित शैक्षणिक संस्थेत हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. शाळेतील छोट्या शिशु वर्गात शिकणाऱ्या तीन वर्षाच्या दोन मुलींवर हा प्रसंग घडला. एका मुलीने आपल्या पाल्यांना शाळेतील दादा नावाने परिचित असलेल्या एका व्यक्तीने आपल्या गुप्तांगाला हात लावल्याची माहिती दिली. त्यानंतर पालकांनी त्या मुलीच्या वर्गातील दुसऱ्या पालकांना याबाबत कळवले. त्यांना संशय आल्याने त्यांनी आपल्या मुलीला बदलापूर पूर्वेतील एका रुग्णालयात तपासणीसाठी नेले. या तपासणीनंतर रुग्णालयाने त्यांना अत्याचार झाल्याबाबत दुजोरा दिला. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि पालकांनी गुन्हा दाखल करण्यात मोठा वेल घेतल्याचा आरोप पालकांनी केला आहे. अखेर याप्रकणी 16 ऑगस्ट रोजी दहाच्या सुमारास अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
भारतीय न्याय संहिता आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियमन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये संतापाचे आणि भीतीचे वातावरण आहे.
Badlapur School Case News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनीही दिली प्रतिक्रिया
या घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली असून याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. असं आश्वासन दिले आहे. पोलिस आयुक्ताशी मी चर्चा केली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केलेली असून त्यावर खुनाचा प्रयत्न, बलात्काराचा प्रयत्न पोक्सो अशी कठोर कलमे लावण्याचे आदेश दिले आहेत. जलदगती न्यायालयात हा खटला चालवून आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे निर्देश मी दिले आहेत. जेणेकरून पुन्हा कुणी असे धाडस करणार नाही. तसेच संस्था चालकांवरही कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. संस्थाचालकांनी कर्मचाऱ्याला कामाला ठेवण्याआधी त्यांची पाश्वभूमी तपासणे गरजेचे आहे. यासाठी लवकरच नियमावली जाहीर केली जाईल. या प्रकरणात जे जे दोषी असतील त्या सर्वांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असं मुख्यमंत्री म्हणाले.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!