Badlapur Girls Assault
Badlapur Girls Assault: पहिली ते बारावी पर्यंतच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक आहेत. दुसरीकडे 10 मार्च 2022 च्या शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक शाळेत, ‘सखी सावित्री’ समितीचेही बंधन घालण्यात आले आहे. मात्र, राज्यातील सुमारे 60 टक्के जिल्हा परिषदांसह खासगी अनुदानित, स्वयं अर्थ सहाय्यिता शाळांमध्ये ना सीसीटीव्ही कॅमेरे ना सखी सावित्री समिति, अशी विदारक स्थिति असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. अंगणवाड्यांमध्ये देखील कॅमेरे नाहीत.
मुंबईलगतच्या ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूरमधील शाळेमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली. या शाळेच्या सुरक्षेमध्ये काही त्रुटी आढळून आल्या. घरापाठोपाठ मुलांसाठी सगळ्यात महत्वाची आणि विश्वासाची जागा असते, टि त्यांची शाळा. पण ही शाळा मुलांसाठी किती सुरक्षित आहे, हे तपासण्यासाठी किंवा शाळा मुलांसाठी सर्वतोपरी सुरक्षित वातावरण तयार करू शकेल, यासाठी काही नियम, सूचना आहेत का? कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिते बद्दलची विशाखा समिति असणं जसं बंधनकारक आहे, तशीच विशाखा समिति आता शाळांमध्ये स्थापन करण्यात येणार आहे. शाळांमध्ये सखी सावित्री समिति असणंही आवश्यक आहे. काय आहे ही सखी सावित्री समिति?टि काय काम करते? सुरक्षेच्या दृष्टीने शाळांमध्ये इतर कोणत्या उपाययोजना असणं आवश्यक आहे?

बोर्डाच्या परीक्षेवेळी प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही असायला हवा, पण त्या ठिकाणी कॅमेरे नसतातच असा अनुभव बोर्डाच्या अधिकाऱ्यांना आला आहे. अकरावी, बारावीतिल विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक हजेरी बांधकारक असून त्यांच्या वर्गातही कॅमेरे बंधनकारक आहेत. मात्र, त्यानुसार कार्यवाही शून्यच आहे. बदलापूर दुर्घटनेनंतर शालेय शिक्षणमंत्र्यांनी (Badlapur Girls Assault) यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून शिक्षणाधिकाऱ्यांपर्यंत माहिती घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनाही खात्रीशीर माहिती मिळाली नसल्याने विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. त्यावर आता दोन दिवसांनी बैठक घेतली जाणार असल्याचेही सांगण्यात आले.
Badlapur Girls Assault: सखी सावित्री समिति
शाळांमधला अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांसाठीचे उपक्रम यासाठी जसे काही नियम असतात. तसेचनियं विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही करण्यात आले आहेत. शाळांमध्ये सखी सावित्री समिति स्थापन करण्यात यावी, अशी घोषणा मार्च 2022 मध्ये करण्यात आली. राज्यातील रव शाळांमध्ये मुला-मुलींच्या सुरक्षितेसाठी व निकोप आणि समतामुलक वातावरण निर्मितीसाठी शासन स्तरावरून सखी सावित्री समितीचे गठन करण्यात येत आहे. असं शासनाच्या परिपत्रकात म्हंटलंय.
Badlapur Girls Assault: पत्रकार परिषदेत दीपक केसरकर काय म्हणाले?
बदलापूरच्या घटनेबाबत (Badlapur Girls Assault) देताना केसरकर म्हणाले, बदलापूरला घडलेला प्रसंग अतिशय धक्कादायक आहे. सकाळी हे कळल्यानंतर मि तातडीने डिपार्टमेंटची बैठक बोलावली. सात महिन्यापूर्वी मी सर्व डेप्युटी डायरेक्टरची बैठक घेतली होती. सखी सावित्री समितीने प्रत्येक शाळांमध्ये तातडीने काम सुरू करण्याचे आदेश दिले होते. या शाळांमध्ये ती समिति झालीय की नाही? त्याबद्दलची माहिती या रिपोर्टमध्ये लिहिली नाही. मुलींचं संरक्षण हा पहिला विषय असतो. आदेश दिल्यानंतर अशा समित्या स्थापन झाल्या नसतील, त्याचा परिणाम जर मुलींवर होणार असेल तर त्या अधिकाऱ्यांवर तातडीनं कारवाई करण्याचे आदेश मी आजच्या आज दिले आहेत. असे प्रसंग पुन्हा घडू नयेत, म्हणून आम्ही चर्चा करत आहोत.
- सखी सावित्री समिति प्रत्येक शाळेत राहावी अशा सूचना देण्यात आल्या होत्या, या शाळेत ही समिति होती. की नाही याची माहिती घेणार. मुलींची सुरक्षा ही प्राथमिकता आहे. आदेश दिल्यावरही जर सखी सावित्री समिति स्थापन जल नसेल. त्याचा परिणाम मुलींवर होणार असेल, तर त्या ब्लॉग एज्युकेशन ऑफिसवर तातडीने कारवाईचे आदेश दिले.
- 13 ते 16 ऑगस्ट दरम्यान प्रकार घडला, 18 ऑगस्टला तक्रार करण्यात आली, 12 तास दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे संबंधित खात्याच्या ज्या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. शाळेला नोटिस बजावण्यात आला आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना आठवले. शिक्षिका दीपाली देशपांडे, कामिनी गायकर, निर्मला बोरे यांना निलंबित करण्यात आलं आहे.
- विशाखा समिति आता शाळेतही अनिवार्य ऐल, मोठ्या विद्यार्थिनींसाठी विशाखा समिति असेल. याचा निर्णय आजच घेतला. हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. अशी वेळ पुन्हा कोणावर येऊ नये.
- प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही कम्पल्सरि करण्यात आला आहे. सरकारी सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचं काम प्रगतीपथावर आहे. खासगी शाळांना कम्पल्सरि आहे, पण या शाळेतील सीसीटीव्ही बंद असल्याचं आढळून आलं. त्यामुळे सीसीटीव्ही बंद असेल तर जबाबदारी शाळेची असेल.
- पीडित चिमूरडी आणि कुटुंबाला सर्वप्रकारची मदत केली जाईल. चिमूकलीचं समुपदेषण केलं जाईल. तिला दुसऱ्या शाळेत प्रवेश हवा असेल तर त्यासाठी मदत होईल.
- अशा घटना पुन्हा घडू नये म्हणून चर्चा करतोय. सखी सावित्रीप्रत्येक शाळेत स्थापन झाली तर मुलींना दिलासा मिळेल. पोस्को ॲक्टनुसार इ-बॉक्सची संकल्पना समजू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक शाळा हॉस्टेलमध्ये तक्रार बॉक्स ठेवण्यात येत आहे.
Badlapur Girls Assault: सखी सावित्री मध्ये कोण कोण असायला हवं?
शाळेच्या व्यवस्थापन समितीचे म्हणजेच मॅनेजमेंट कमिटीचे अध्यक्ष या समितीचे अध्यक्ष असतात.
सदस्य
- शाळेतील महिला शिक्षक प्रतिनिधि
- समुपदेशक
- वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ (महिला)
- अंगणवाडी सेविका
- पोलिस पाटील ग्रामपंचायत सदस्य (महिला)
- पालक (महिला)
- शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधि (2 मुले, 2 मुली)
या समितीचे सचिव शाळेचे मुख्याध्यापक असावेत, असं सांगण्यात आलंय.
Badlapur Girls Assault: या समितीचे काम काय आहेत?
- आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या परिसरातल्या सगळ्या मुलांची (Badlapur Girls Assault) शाळेमध्ये नोंदणी करणं आणि त्यांची 100 टक्के उपस्थिती राहील यासाठी प्रयत्न करणं.
- स्थलांतरित पालकांच्या आणि शाळाबाह्य असणाऱ्या मुलांच सर्वेक्षण आणि त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणं.
- विद्यार्थ्यांच्या शारीरिक, भावनिक आणि बौद्धिक विकास, त्यांच्यावरचा ताण कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांचं आणि पालकांच समुपदेशन
- शाळेत समतेचं वातावरण रहावं यासाठी लिंगभेद विरहित आणि सर्वसमावेशक उपक्रम राबवणं.
- डॉक्टरांच्या मदतीने आरोग्य शिबिर आणि आरोग्य समुपदेशन
- बालविवाह, त्यांचे दुष्परिणाम याविषयी जागृती निर्माण करणं, बालविवाह रोखणं
- सामाजिक, आर्थिक, भौगोलिकदृष्ट्या वंचित आणि दुर्बल घटकांमधल्या मुलांच्या शिक्षणासाठी CSR च्या माध्यमातून मदत.
- शासकीय योजनांची माहिती देऊन अंमलबजावणीसाठी प्रयत्न करणं.
- शाळेतल्या विद्यार्थ्यांना अत्याचारबद्दलची तक्रार दाखल करण्यासाठी POCSO कायद्यातल्या ई-बॉक्सची माहिती देणं, महाराष्ट्रराज्य बालहक्क संरक्षण आयोगाने तयार केलेल्या CHIRAG ॲपबद्दलची माहिती, 1908 या चाइल्ड हेल्पलाइन बद्दलचे सूचना फलक शाळेत लावण्याची खातरजमा समितीने करणं अपेक्षित आहे.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!