Badlapur Crime News
Badlapur Crime News: चिमुकल्या मुलींच्या अत्याचारानंतर संतप्त बदलापूर करांनी सकाळी साडेनऊ वाजल्यापासून बदलापूर रेल्वे स्थानकात ठिय्या आंदोलन करत रेल्वे मार्ग रोखून धरला होता. सातत्याने विणवण्या करून, मंत्री, वरिष्ट पोलिस अधिकारी यांच्या अवाहना नंतर ही आंदोलक जुमानत नसल्याने अखेर पावणे सहाच्या सुमारास पोलिसांनी आंदोलकांवर लाठी हल्ला करत दहा मिनिटात रेल्वे रुळ मोकळा केला. पोलिसांच्या लाठी हल्ल्यानंतर आंदोलन रुळावरून हटके. यावेळी काहीनी पोलिसांवर दगडफेक ही केली. बदलापूरातील आदर्श शाळेत झालेल्या चिमूकल्यांच्या अत्याचार नंतर सकाळपासून शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळी सहा वाजल्यानंतर आंदोलकांनी आपला मोर्चा रेल्वे स्थानकाकडे वळवला. आंदोलकांनी रेल्वे रुळावर ठिय्या मांडला.
त्यामुळे बदलापूर कर्जत रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाली. त्यामुळे हजारो रेल्वे प्रवाशांना त्याचा फटका बसला. पोलिस सातत्याने आवाहन करूनही आंदोलक हटत नव्हते. रेल्वे पोलिस, वरिष्ठ पोलिस अधिकारी, मंत्री गिरीश महाजन यांच्या सह स्थानिक लोकप्रतिनिधींनी आंदोलकांची समजूत काढली. मात्र त्यानंतरही आंदोलन हटत नव्हते. त्यांना पांगवण्यासाठी आता पोलिसांनी लाठीचार्ज केला. तब्बल 12 तासानंतर पोलिसांनी ही कारवाई केली असून आंदोलकांना पांगवण्यात पोलिसांना यश आलं आहे.
बदलापूर मधील एका नामांकित शाळेमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची घटना घडली. शाळेतील सफाई कर्मचाऱ्यानेच हे कृत्य केल्याचं समोर आलं. त्या नराधमाला फाशी द्या अशी मागणी करत सकाळी साडे सहा पासून आंदोलकांनी आंदोलन सुरू केलं. आंदोलकांनी यासाठी बदलापूर रेल्वे ट्ररॅक अडकून ठेवला होता. आरोपीला फाशी द्या, अशी एकच मागणी आंदोलकांनी लावून धरली आहे. दरम्यान, आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झाल्यानंतर गृहमंत्र्याकडून याप्रकरणाच्या चौकशीसाठी SIT ची घोषणा करण्यात आली आहे.
Badlapur Crime News: मध्य रेल्वेची वाहतूक अंबरनाथपर्यंत सुरू
बदलापूरातील आंदोलनाच्या पाश्वभूमीवर मध्य रेल्वेने अंबरनाथ पर्यंत वाहतूक सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, रेल्वेकडून याबाबतची अनाऊन्समेंट करण्यात आली आहे. कर्जत मार्गावरील अप अनि डाउन मार्गावरील गाड्या अंबरनाथ पर्यंत सुरू आहेत. लांब पल्ल्यांच्या गाड्या दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आल्या आहेत. बदलापूर स्थानकावरील आंदोलनामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.
- मध्य रेल्वेची वाहतूक अंबरनाथ पर्यंत सुरू, रेल्वेची अनाऊन्समेंट
- कर्जत मार्गावरील अप आणि डाउन मार्गावरील गाड्या अंबरनाथपर्यंत सुरू
- लांब पल्ल्याच्या गाड्या दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आल्या
- बदलापूर स्थानकावरील आंदोलनामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मध्य रेल्वेची सध्या अतिशय वाईट परिस्थिति आहे. अजूनपर्यंत तरी अंबरनाथ पर्यंतचं लोकल धावत आहेत. अंबरनाथच्या पुढे कर्जत असले किंवा खोपोली या मार्गावर लोकल पुढे जात नाहीये. सर्व लोकल सध्या कल्याण ते अंबरनाथ या सेक्शनमध्ये सध्या सुरू आहेत. मध्य रेल्वेच्या अंबरनाथ ते खोपोली दरम्यानच्या 30 लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
Badlapur Crime News: राज्य सरकारच्या मध्यस्थीला यश नाही
आंदोलकांनी आंदोलन मागे घ्यावं यासाठी पोलिसांनी आवाहन केलं होतं. तसेच राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनीही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश आलं नाही. आरोपीला आजच फाशी द्या अशी मागणी करत आंदोलकांनी माघार घेण्यास नकार दिला. त्यामुळे अखेर सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि आंदोलकांना पांगवलं यावेळी आंदोलकांकडूनही पोलिसांवर दगडफेकीचा प्रकार घडला. काही पोलिस यामध्ये जखमी झाल्याची माहिती आहे. सध्या परिस्थिति नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Badlapur Crime News: पोलिसांकडून बंदोबस्त वाढवण्यात आलाय
बदलापूर रेल्वे स्थानकात परिस्थिति जैसे थे आहे. आज सकाळपासून आंदोलकांनी स्थानकांवर जमण्यास सुरुवात केली होती. अद्याप आंदोलक मागे हटलेले नाहीत. पोलिसांसह सर्व यंत्रणा आंदोलकांना बंदोबस्त वाढवण्यात आलाय. आजूबाजूच्या शहरातील पोलिस फौजफाटा घटनास्थळी दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.
मध्य रेल्वेच्या 30 लोकल गाड्या अंबरनाथ ते खोपोली दरम्यान रद्द
11 लोकल गाड्या डायव्हर्ट करण्यात आल्या आहेत. मुंबईकडून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या कोयना एक्सप्रेस रिरूट करून व्हाया कल्याण चालवण्यात आली आहे. तब्बल 3 तास बदलापूर स्थानकात एक्सप्रेस थांबली होती. अंबरनाथ पुढील वाहतुकीसाठी ज्यादा बसेसची मागणी मध्य रेल्वेने केली आहे.
Badlapur Crime News: आंदोलकांकडून रेल रोको
बदलापूर चिमुकल्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात आंदोलन केलं जात आहे. अशातच आंदोलकांनी रेल्वे ट्ररॅकवर उतरून आंदोलन केलं. बदलापूर बंदच्या दरम्यान आंदोलनकर्ते आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. बदलापूर रेल्वे स्थानकात आंदोलन मागे घेण्याचं आवाहन करणाऱ्या पोलिसांवर दगडफेक केली. तर दुसरीकडे शाळेच्या बाहेर एकवटलेले आंदोलक शाळेचे गेट तोडून आतमध्ये घुसले आणि त्यांनी शाळेची तोडफोड केली. शाळेबाहेरील जमलेल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूरांच्या नळकांड्या फोडल्या, काही काळ हिंसक झालेल्या आंदोलन पुन्हा शांततेत सुरू झालं असून सध्या पोलिसांचा मोठा फौजफाटा बदलापूरात तैनात करण्यात आला आहे.
बदलापूर पूर्वेतील आदर्श शाळेतील दोन चिमूकल्यावर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जातो आहे. सकाळपासून पालकांनी आदर्श शाळेबाहेर आंदोलन सुरू केले आहे. या घटनेतील दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान याप्रकरणाच्या चौकशीसाठी आता सरकारने विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाने एक्स या समाज मध्यमांवर पोस्ट करत या संदर्भात माहिती दिली.
Badlapur Crime News: नेमके प्रकरण काय?
बदलापूर पूर्वेतील आदर्श या नामांकित शैक्षणिक संस्थेत हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. शाळेतील छोट्या शिशु वर्गात शिकणाऱ्या तीन वर्षाच्या दोन मुलींवर हा प्रसंग घडला. एका मुलीने आपल्या पाल्यांना शाळेतील दादा नावाने परिचित असलेल्या एका व्यक्तीने आपल्या गुप्तांगाला हात लावल्याची माहिती दिली. त्यानंतर पालकांनी त्या मुलीच्या वर्गातील दुसऱ्या पालकांना याबाबत कळवले. त्यांना संशय आल्याने त्यांनी आपल्या मुलीला बदलापूर पूर्वेतील एका रुग्णालयात तपासणीसाठी नेले. या तपासणीनंतर रुग्णालयाने त्यांना अत्याचार झाल्याबाबत दुजोरा दिला. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि पालकांनी गुन्हा दाखल करण्यात मोठा वेल घेतल्याचा आरोप पालकांनी केला आहे. अखेर याप्रकणी 16 ऑगस्ट रोजी दहाच्या सुमारास अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
भारतीय न्याय संहिता आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियमन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये संतापाचे आणि भीतीचे वातावरण आहे.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!