Badlapur Encounter: अक्षय शिंदेचा पोलिसांनी केला एन्काऊंटर, त्याने पोलिसांवर झाडल्या होत्या गोळ्या

Badlapur Akshay Shinde Encounter

Badlapur Akshay Shinde Encounter: संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी घटना म्हणजेच बदलापूरमधील शाळेत लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे (24) याचा शेवट नेमका कसा झाला, याचा संपूर्ण घटनाक्रम आता समोर आलेला आहे. अक्षय शिंदे याला तळोजा कारागृहातून घेऊन जात असताना, त्याने त्या पोलिसांच्या व्हॅनमध्ये त्याच्या शेजारील पोलिसांच्या कंबरेची बंदूक खेचली. बंदूक खेचल्यानंतर पोलिसांच्या दिशेने बंदूक रोखून तो बोलत होता की, मी आता कोणालाही जीवंत सोडणार नाही असे म्हणत पोलिसांवर गोळीबार केला होता. तसेच गोळी झाडण्यापूर्वी तो वारंवार पोलिसांना शिवीगाळ करून मला कशासाठी घेऊन जात आहात? मी आता काय केले आहे? असे म्हणत होता.

पोलिसांवर त्याने गोळी झाडल्याने त्याला स्वसंरक्षणार्थ थार करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणात पोलिसांनी अक्षय शिंदे विरोधात हत्येचा प्रयत्न (Badlapur Akshay Shinde Encounter) प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. बदलापूर येथील लहान मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला ठाणे पोलिसांनी चकमकीमध्ये थार केल्यानंतर त्यांच्या विरोधात आता पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आता वरिष्ट पोलिस निरीक्षक संजय शिंदे यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांनी तक्रारीमध्ये घटनाक्रम सांगितला आहे. त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, तळोजा येथून अक्षय शिंदे याला मध्यवर्ती गुन्हे शोध पथक ठाण्याच्या दिशेने घेऊन येत होते.

त्यावेळी पोलिस वाहनांमध्ये मध्यवर्ती गुन्हे शोध पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय शिंदे अमली पदार्थ विरोधी पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे, पोलिस हवालदार अभिजीत मोरे आणि हरीश तावडे उपस्थित होते. यावेळी संजय शिंदे हहे वाहन चलकाच्या बाजूला बसले होते. तर वाहनामध्ये पाठीमागील बाजूस नीलेश मोरे, अभिजीत मोरे आणि हरीश तावडे हे अक्षय शिंदे याला ताब्यात घेऊन बसले होते. संजय शिंदे यांनी निघताना त्यांच्या पिस्तूल मध्ये पाच राऊंड लोड केले होते. पोलिसांचे वाहन शील डायघर पोलिस ठाण्याजवळ आले असता. नीलेश मोरे यांनी संजय शिंदे यांना मोबाइलवे संपर्क साधला. अक्षय शिंदे हा शिवीगाळ करत आहे. तसेच मला परत कशासाठी घेऊन जात आहात? मी काय केले आहे? असे बोलू लागल्याचे मोरे यांनी संजय शिंदे यांना सांगितले.

Badlapur Akshay Shinde Encounter
Badlapur Akshay Shinde Encounter

त्यानंतर संजय शिंदे यांनी वाहन थांबविले. अक्षय शिंदे याला शांत करण्यासाठी संजय शिंदे हे वाहनाच्या मागील बाजूस आले. वाहन मुंब्रा बाह्यवळण मार्गावर आले असता, अक्षय शिंदे याने अचानक नीलेश मोरे यांच्या कमरेला असलेले पिस्तूल खेचण्यास सुरुवात केली. नीलेश मोरे यांनी त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. परंतु मला जाऊ द्या असे म्हणत त्याने पोलिसांशी झटापट सुरू केली. या झटापटीत नीलेश मोरे यांचे पिस्तूल लोड असल्यामुळे एक गोळी नीलेश यांच्या मांडीत घुसली. त्यानंतर अक्षय शिंदे याने पिस्तूल घेऊन इतर पोलिसांच्या दिशेने रोखली. तसेच दोन गोळ्या झाडल्या अक्षय याची उद्विग्र देहबोली पाहून संजय शिंदे यांनी तात्काळ स्वसंरक्षणार्थ त्याच्या कंदील पिस्तूलीने एक गोळी अक्षयच्या दिशेने झाडली. यात अक्षय जखमी होऊन खाली पडला. याबाबत पोलिसांनी स्पष्टीकरण दिले आहे की, अक्षय शिंदे यांच्यावर पोलिसांनी स्वरक्षणार्थ कारवाई केली.

या प्रकरणात आता अक्षय शिंदे विरोधात हत्येच्या प्रयत्नाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर चकमकीनंतर अक्षय शिंदे याचा मृत्यू झाल्याने याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Badlapur Akshay Shinde Encounter: गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

अक्षय शिंदेच्या एन्काऊंटर नंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अक्षय शिंदेच्या पूर्वपत्नीने लैंगिक आत्याचाराची तक्रार केली होती. त्यासंदर्भात चौकशी करण्याकरता वॉरंट घेऊन पोलिस त्याला नेट होते. त्याने पहिल्यांदा पोलिसांची बंदूक हिसकावून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. त्याने पोलिसांवर आणि हवेत गोळीबार केला. पोलिसांनी स्वत:च्या संरक्षणार्थ गोळी चालवलेली आहे. त्यानंतर अक्षय शिंदेला दवाखान्यात नेण्यात आलं. यामध्ये या आरोपीचा मृत्यू झाला आहे.

Badlapur Akshay Shinde Encounter

Badlapur Akshay Shinde Encounter: आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला 6 प्रश्न विचारले आहेत

  • बदलापूरच्या शाळेचे ट्रस्टी कुठे आहेत? त्यांना वाचवण्याचा प्रयत्न भाजप सरकार का करतंय?
  • शिंदेचे स्थानिक आमदार वामन म्हात्रेला का वाचवलं जातंय? महिला पत्रकाराशी गैरवर्तन करणाऱ्यांना म्हात्रेला सरकार का वाचवतंय?
  • आंदोलनकर्त्या बदलापूरकरांविरोधातील दाखल गुन्हे मागे घेतले जाणार का? गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांनी उशीर केला म्हणून ते नागरिक पोलिसांविरोधात केवळ आंदोलन करत होते.
  • शाळेचे विश्वस्त भाजपशी संबंधित असल्याची माहिती आहे. त्यांना वाचवलं जातंय अशी चर्चा आहे. हे खरं आहे का?
  • सरकार या सगळ्या प्रश्नांची उत्तर देईल का?

Badlapur Akshay Shinde Encounter: सुषमा अंधारेनी उपस्थित केले हे प्रश्न

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. सुषमा अंधारे म्हणाल्या की बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हा कुणी महात्मा नाही. त्याला फाशीची शिक्षा ही व्हायलाच हवी, त्याला ही शिक्षा होत असताना कायद्याची प्रक्रिया पाळली गेली पाहिजे. या देशाचा शत्रू असणाऱ्या कसाबला फाशी देताना कायद्याची संपूर्ण प्रक्रिया पाळली होती. तीच प्रक्रिया अक्षय शिंदे प्रकरणात पार पडायला हवी होती. अक्षय शिंदेचा झालेला हा एन्काऊंटर ही एका अर्थाने बदलापूर प्रकरणातील सत्य बाहेर येण्याआधीच त्याला दडपून टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय.

Badlapur Akshay Shinde Encounter
Badlapur Akshay Shinde Encounter

सुषमा अंधारेनी या घटनेसंबंधीत 5 प्रश्न विचारले आहेत:

  • हैदराबाद बलात्कार प्रकरणाच्या नंतर ज्या चार जणांचा एन्काऊंटर झाला, त्या प्रकरणात जी स्वसंरक्षणाची स्क्रिप्ट वापरली गेली, तीच स्क्रिप्ट या प्रकरणात वापरली गेली आहे हे फार उल्लेखनीय आहे.
  • अक्षय शिंदे जर एवढा हिंस्त्र आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता तर त्याची ने आण करताना पोलिसांनी पुरेशी काळजी का घेतली नाही?
  • अक्षय शिंदेकडून पोलिसांच्या पायावर गोळी लागले पण पोलिसांकडून मात्र ती गोळी नेम धरून अक्षय शिंदेला लागते आणि त्यात त्याचा जीव जातो. हे असं कसं घडलं?
  • पहिल्या दिवसापासूनच या संपूर्ण प्रकरणाची जी एकूण तपासयंत्रणा जी राबवली जात होती, ती संशयास्पद होती. पोलिसांचा तपासच संशयास्पद रीतीने होत होता. बदलापूर प्रकरणातील शाळेची संबंधित संस्थाचालक आपटे अजूनही फरार आहे. त्याला अटक का केली गेली नाही?
  • अक्षय शिंदेच्या दोन्ही हातात बेड्या असताना त्याने पोलिसांच्या कमरेची बंदूक काढून पोलिसांवर गोळीबार करणं त्याला शक्य आहे का?

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!