Baba Siddique: मोठी बातमी! बाबा सिद्दीकींच्या निघृण हत्याकरणाऱ्या पैकी 2 शूटर्स अटक, तर एक फरार

Baba Siddique Murder

Baba Siddique Murder: राष्ट्रवादीचे (अजित गट) नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री मुंबईत गोळ्या झाडून निघृण हत्या करण्यात आली. या हत्येनंतर महाराष्ट्रासह संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे. ऐन दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच 12 ऑक्टोबर रोजी भर रस्त्यावर हत्या झाली. या घटनेतील दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस तिसऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपींवर (Baba Siddique Murder) गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील एक आरोपी तर अवघ्या 19 वर्षाचा आहे. नुकतेच मीसुरडं फुटलेल्या या 19 वर्षाच्या आरोपीने बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडल्या आहेत. सिद्दीकी यांनी या वर्षी फेब्रुवारीमध्ये कॉँग्रेस सोडली आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत सामील झाले होते.

बाबा सिद्दीकी ही ऐंशीच्या दशकापासून, 1977-78 पासून राजकारणात सक्रिय होते. यंदा फेब्रुवारीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये प्रवेश करेपर्यंत म्हणजेच गेली जवळपास चार दशक ते कॉँग्रेसमध्ये सक्रिय होते. महराष्ट्र सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदही भूषवलं होतं. बाबा सिद्दीकी यांच्या बॉलीवूड कनेक्शन बाबतही कायम चर्चा होत असे. सलमान खान, शाहरुख खान, संजय दत्त अशा हिंदी सिनेसृष्टितिल नामवंत कलाकारांशी त्याचे निकटचे संबंध होते. या घटनेनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी म्हटले आहे की की आम्ही तत्काळ दोघा जणांना अटक केली आहे. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की विरोधक हे सत्तेकडेच नजर लावून बसले आहेत. पण आम्हाला राज्य सांभाळायचे आहे.

Baba Siddique Murder
Baba Siddique Murder

राजकीय क्षेत्रातील इतक्या महत्वाच्या स्थानी असलेल्या नेत्याची भररस्त्यात हत्या झाल्यानं मुंबईतील आणि एकूणच महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हा प्रश्न केवळ बाबा सिद्दीकीच्या हत्येनं समोर आला नाही, तर गेल्या आठ-दहा महिन्यातील गुन्हेगारीच्या घटना पाहिल्यावरही कायदा-सुव्यवस्था कोलमडली आहे का, असा प्रश्न उभा राहतो. कायदा-सुव्यवस्थेचा हा प्रश्न बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनीही उपस्थित केला आहे.

या गोळीबाराची जबाबदारी अनमोल बिश्नोईणे घेतली आहे. दाऊदचे निकटवर्तीय असल्याने हत्या केल्याचा उल्लेख कधीच पोस्टमध्ये केला आहे. बाब सिद्दीकी यांच्या हत्येनंतर अनेक तर्कवितर्क लावले जात होते. त्यांच्या हत्येमागे नेमकं कोण? असा प्रश्न महराष्ट्रासह समस्त देशाला पडला होता. एमआरएच्या प्रकल्पाशी कथित वादामुळे त्यांची हत्या झाली असावी असा दावा काही जण करत होते. मात्र आता लॉरेन्स बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. हिंदी भाषेत मजकूर टाकून बिश्नोई गँगने ही हत्या आम्ही केली आहे असं बाबा सिद्दीकी यांचं नव घेऊन सांगितलं आहे.

Baba Siddique Murder: हल्ल्याचा मास्टरमाइंड कोण?

बाबा सिद्दीकी यांच्यावर एकुन तीन जणांनी गोळीबार केला आहे. या गोळीबारात बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. तिसऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके राज्यात तसह राज्याच्या बाहेर रवाना झाली आहेत. मात्र या तीन आरोपीशिवाय या प्रकरणात आणखी एकाचा समावेश असल्याचा पोलिसांचा संशय आहे. पोलिसांच्या संशयानुसार हा चौथा आरोपी गोळीबार करणाऱ्या तिघांना मार्गदर्शन करत होता. मात्र हा चौथा आरोपी नेमका कोण आहे? याची कोणतीही माहिती अद्याप पोलिसांच्या हाटी लागलेली नाही. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी निर्मल नागर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1), 109, 125 आणि 3(5) तसेच शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम 3, 25, 5 आणि कलम 27 तसेच महाराष्ट्र पोलिस कायद्याच्या कलम 137 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

2 शूटर्स अटक, 1 जण फरार

हरियाणा आणि युपीच्या शूटर्सनी हत्या केली. पोलिसांनी 3 पैकी 2 शूटर्सना अटक केली आहे. एकजण फरार आहे. एक शूटर हरियाणाचा तर 2 उत्तर प्रदेशातील बहराईचचा आहे. ते 40 दिवस मुंबईत थांबले होते आणि सिद्दीकी यांचे घर आणि मुलाच्या कार्यालयाची रेकी करत होते. शनिवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास वांद्रे येथील खेर नागर येथील आमदार पुत्र झिशान यांच्या कार्यालयाबाहेर तीन हल्लेखोरांनी गोळ्ओबार केला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑटोमध्ये आलेल्या 3 शूटर्सनि दोन बंदुकांमध्ये 6 राऊंड फेर केला. बाबांना तीन गोळ्या लागल्या. त्यांच्या पोटात 2 आणि छातीवर 1 गोळी लागली तिघांनी तोंडाला रुमाल बांधले होते. दुसरीकडे, मुंबई पोलिसांनी कॉन्ट्रॅक्ट कीलिंगला दुजोरा दिला आहे. शिव धर्मराज आणि गुरमेल अशी या हटीएटिल आरोपींची नवे आहेत.

शिव आणि धरमराज हे बहराइच, युपीचे रहिवासी आहेत. दोघांना यापूर्वी कोणताही गुन्हा नोंद नाही. गुरमेल हा हरियाणाचा रहिवासी आहे. धर्मराज आणि गुरमेल यांना अटक करण्यात आली आहे. शिवा फरार आहे. त्याला या हत्येचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Baba Siddique Murder

Baba Siddique Murder: काय म्हंटले आहे सोशल मिडियावरच्या त्या पोस्टमध्ये?

देश आणि संपत्ती हे माझ्यासाठी महत्वाचे नाही. आज पर्यंत मी फक्त सत्कर्म केले, कायम मैत्रीचे कर्तव्य मी पाळले. सलमान खान आम्हाला हे सगळे नको होते. तुम्ही आमच्या भावाला त्रास दिला. आज जो बाबा सिद्दीकी सभ्य, मनमिळवू आणि स्वच्छ प्रतिमा असल्याचे दाखवत आहे तो एकेकाळी त्याच्यावर मोक्का लागला होता. बाबा सिद्दीकीच्या हत्येचे करण अनुज थापन आणि दाऊदचे बॉलीवूड, राजकारणी लोकांशी करत असलेले डीलिंग हेच आहे. आमची कोणाशीच वैयक्तिक वैर नाही पण जो कोणी सलमान खान आणि दाऊदची मदत करेल त्याचा हिशोब आम्हाला ठेवावा लागेल. आमच्या कोणत्याही भावाला जर तुम्ही मारले तर आम्ही उत्तर देणारच, आम्ही कधीच पहिला वार केला नाही. जय श्री राम

Baba Siddique Murder

Baba Siddique Murder: मलबार हिल परिसरातील मंत्र्यांच्या बंगल्याच्या सुरक्षेत वाढ

दरम्यान, बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर मलबार हिल परिसरातील माणत्याच्या बंगल्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मलबार हिल परिसरातील इतर मंत्र्यांच्या बंगल्याबाहेरही गस्ती वाढवण्यात आली आहे. मलबार हिल परिसरातील अतिमहत्वाच्या पॉइंटवर नाकाबंदी करण्याच्या वरिष्ट पोलिस अधिकाऱ्यांकडून सूचना देण्यात आल्या आहेत.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!