अष्टपैलू अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन, वयाच्या 57 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Atul Parchure Passed Away

Atul Parchure Passed Away: अष्टपैलू अभिनयाच्या जोरावर नाटक, मराठी, हिंदी चित्रपट आणि छोटा पडदा गाजवलेले अष्टपैलू अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालं आहे. ते 57 वर्षाचे होते. परचुरे यांना कॅन्सरची लागण झाली होती. त्यानंतर ते त्यामधून बरे झाल्याचंही वृत्त होतं. पण सोमवारी त्यांची जीवणज्योत अखेर मालवली. मराठीक्ष हिंदी चित्रपट सृष्टीसाठी हा मोठा धक्का आहे. प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक सोनिया परचुरे ह्या अतुल परचुरे यांच्या पत्नी आहेत. कापूस कोंडयाची गोष्ट, गेला माधव कुणीकडे, तरुण तुर्क म्हातारे अर्क, तुज आहे तुजपाशी, नातीगोती, व्यक्ति आणि वल्ली, टिळक आणि आगरकर या नाटकातील त्यांची भूमिका चांगलीच गाजली. जागो मोहन प्यारे, भागो मोहन प्यारे या मालिकांमधील त्यांची भूमिकाही सर्वोच्च लक्षात राहणारी होती.

अलीबाबा आणि चाळीशीले चोर हा त्यांचा प्रदर्शित झालेला शेवटचा मराठी चित्रपट होता. ‘द कपिल शर्मा’ शो या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमातही अतुल परचुरे यांनी बराच काळ काम केलं. कपिल शर्माच्याच ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ या कार्यक्रमात त्यांनी काही महिन्यापूर्वी त्यांच्या कॅन्सर काळातील आठवणी सांगितल्या होत्या. चुकीच्या उपचारामुळे कॅन्सर बळावला, अशी माहिती त्यांनी दिली होती. अतुल परचुरे यांनी जिगरबाज वृत्तीने कॅन्सरवर मात केली होती. त्यानंतर त्यांनी पुन्हा काम करण्यास सुरुवात केली होती. मराठी रंगभूमीवर पुन्हा दाखल झालेल्या सूर्याची पिल्ले या नाटकातही त्याची भूमिका होती. पण कॅन्सर नंतरची त्यांची इनिंग दुर्दैवाने फार काळ चालली नाही. त्यांच्या निधनानं (Atul Parchure Passed Away) चित्रपटसृष्टीत हळहळ व्यकात होत आहे. अष्टपैलू अभिनेता, चांगला मित्र गमावल्याची भावना त्यांच्या सहकलाकारांनी व्यक्त केली आहे.

Atul Parchure Passed Away
Atul Parchure Passed Away

अतुल परचुरे रंगभूमीवर रमणारे अभिनेते होते. ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क, प्रियतमा, वासूची सासू, आम्ही आणि आमचे बाप या नाटकांमध्ये त्यांनी भूमिका साकारली. शिवाय आर. के. लक्ष्मण की दुनिया, जागो मोहन प्यारे, सारख्या हलक्या फुलक्या मालिकेत काम केलं. त्यांनी पु. ल. देशपांडे यांच्या समोर त्यांचीच व्यक्तिरेखा ‘व्यक्ति आणि वल्ली’ या नाटकात अत्यंत उत्तम पद्धतीने साकारली. कपिल शर्मा शो मध्येही त्यांनी सर्वाना खळखळुन हसवलं. आता ते पुन्हा सूर्याची पिल्ले या नाटकातून दमदार कमबॅक करणार होते. मात्र त्या आधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला.

Atul Parchure Passed Away: अतुल परचुरेच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार

अतुल परचुरेच्या पार्थिवावर आज (मंगळवार 15 ऑक्टोबर) सकाळी 11 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान अतुल परचुरे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, कापूस कोंडयाची गोष्ट, गेला माधव कुणीकडे, तरुण तुर्क म्हातारे अर्क, तुज आहे तुजपाशी, नातीगोती, व्यक्ति आणि वल्ली, टिळक आणि आगरकर या नाटकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. या शिवाय छोट्या पडद्यावरच्या जागो मोहन प्यारे, भागो मोहन प्यारे, अली मिळी गुपचिळी, होणार सून मी ह्या घरची, माझा होशील ना, या त्यांच्या मालिका प्रचंड गाजल्या मराठीसह अनेक हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.

Atul Parchure Passed Away

Atul Parchure Passed Away: चुकीचा उपचार आणि सेकंड ओपिनीयन

हा आपल्यासाठी आणि कुटुंबियांसाठी एक मोठा धक्का असल्याचं अतुल परचुकेनी मुलाखतीत सांगितलं होतं. पण ते आजारी आहेत. याची जाणीव त्यांच्या कुटुंबीयांनी कधीही करून दिली नाही. तुला काहीही होणार नाही असा विश्वास आईने दिल्याचा परचुरेनी सांगितलं होतं त्यावेळी मुंबईतील एका प्रतिष्ठित रुग्णालयात त्यांच्यावर उचर सुरू होते. पण त्यातून काहीच साध्य होतं नव्हतं किंवा जगण्याची अशाही मिळत नव्हती. त्यांच्यावर कदाचित चुकीचे उपचार सुरू असतील असंही त्यांनी सांगितलं. मग नंतर सेकंड ओपिनीयन घ्यायचं ठरवलं आणि पुण्यातील डॉ. शैलेश देशपांडे यांची भेट घेतली. अतुल परचुरे हे डॉ. देशपांडे यांना भेटल्यानंतर त्यांच्यासाठी ही एकदम क्लीन आणि क्लिअर केस होती. त्याच्यावर कोणतीही ॲक्टीव्ह ट्रीटमेंट सुरू झालेली नव्हती. पण देशपांडेनी उपचार सुरू केले आणि परचुरेनां जगण्याची आशा मिळाली.

Atul Parchure Passed Away

Atul Parchure Passed Away: कर्करोगावर मात करून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

या काळात परचुरे यांची अवस्था काळजी करण्यासारखी झाली होती. त्यांचे पाय सुजले होते, घसा कोरडा पडत होता. पाणी प्यायल्याशिवाय कोणताही घास घशाखाली उतरत नव्हता. रात्र-रात्र झोप येत नव्हती. नकारात्मक विचारही येत असल्यानं परचुरेनी सांगितलं होतं. असं असलं तरी डॉक्टरांनी परचुरेना एक आशेचा किरण दाखवला होता. त्याच मार्गावर नकारात्मक विचारांवर मत करून परचुरे आत्मविश्वासाने चालत राहिले. त्यामुळे आपण कर्करोगावर मत करून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आल्याचं अतुल परचुरेनी सांगितलं होतं.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!