पेपर फूटी प्रकरणी आता केंद्र सरकारने कडक पावलं उचलली, नवीन कायदा लागू होऊ शकते 10 वर्षे जेल, 1 कोटी दंड

Anti Paper Leak Law

Anti Paper Leak Law: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) पेपर लिक प्रकरणी देशभर गदारोळ झाल्यानंतर केंद्र सरकारने शुक्रवारी एका कठोर कायद्याची अंमलबजावणी केली आहे. तीमुए स्पर्धात्मक परीक्षांमधील गैरप्रकार आणि अनियमितता रोखता येणार आहे. शुक्रवारी 21 जून रात्रीपासून लागू झालेल्या या कायद्यात गुन्हेगारांना कमाल 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 1 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. इंडियन एक्सप्रेसने या संदर्भातील वृत्त दिल आहे. परीक्षा प्राधिकरण, सेवा पुरवठादार किंवा इतर कोणत्याही संस्थेसह एखादी व्यक्ति किंवा व्यक्तीच्या गटाने संघटित गुन्हा केल्यास, त्यांना पाच वर्षापेक्षा कमी नसलेल्या परंतु दहा वर्षांपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होईल, आणि दंड 1 कोटी रुपयांची तरतूद या कायद्यात नमूद करण्यात आली आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC), स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC), रेल्वे, बँकिंग हर्ती परीक्षा आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे घेतलेल्या सार्वजनिक परीक्षांमध्ये अन्यायकारक मार्ग रोखणे हे या कायद्याने उदिष्ट आहे.

Anti Paper Leak Law
Anti Paper Leak Law

पेपर फूटी प्रकरणानंतर देशात ईच खळबळ उडाली आहे. निटची परिक्षाही रद्द करण्यात आली. त्यानंतर शिक्षण संस्थांमध्ये होणारे प्रवेश आणि नोकऱ्या यासाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये पेपर फूटी प्रकरणी आता केंद्र सरकारने कडक पावल उचलली आहे. याबाबत मध्य रात्री एक कायदाही (Anti Paper Leak Law) लागू करण्यात आला. याबाबतचा कायदा यावर्षीच फेब्रुवारीमध्ये मंजूर करण्यात आला होता. या कायद्या नुसार पेपर लिक केल्यास तीन ते पाच वर्षाची शिक्षा, त्याच बरोबर ढा लाखांचा दंड. जर हा गुन्हा सामूहिक पद्धतीने केल्यास वक कोटी रुपयांचा दंड अशी तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आला आहे. हा कायदा आता लागू करण्यात आला आहे.

पेपर फूटी झाल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

पेपर फुटीमध्ये अधिकाऱ्यांविरोधात ही आता कडक कारवाई केली जाणार आहे. जे अधिकारी या पेपर फुटीला जबाबदार असतील अशांना दहा वर्षांची शिक्षा आणि एक करोंड रुपयांचा दंड ठोठावला जाईल. शिवाय जे एग्जामिनेशन सर्विस प्रोवाइडर आहे. त्याचा या प्रकरणात हात असल्यास त्यांनाही एक करोंड रुपयांचा दंड अशी कडक तरतूद करण्यात आली आहे. शिवाय एग्जामिनेशन सर्विस प्रोवाइडर आणि अधिकारी मिळून जर पेपर फोडत असतील. ही गोष्ट सिद्ध झाल्यास पाच ते दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षाही ठोठावण्यात येईल. या बाबतची अधिसूचना लागू करण्यात आली आहे.

Anti Paper Leak Law: नीट परीक्षा रद्द

5 मे रोजी झालेली यूजीसी नेट परीक्षा 18 जून रोजी रात्री उशिरा रद्द करण्यात आली. ही परीक्षा पुन्हा एकदा नव्याने घेतली जाणार आहे. केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने परिपत्रक काढत या संदर्भातील निर्णय जाहीर केला. पेपर फुटल्याचा संशय असल्याने तसेच या परीक्षेची पारदर्शकता आणि पावित्र्य सुनिश्चित करण्यासाठी ही परीक्षा रद्द करण्यात आल्याच शिक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आलं.

शिक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, यूजीसी नेट परीक्षा रद्द केली. तसेच ही परीक्षा पुन्हा नव्याने घेतली जाणार आहे. नव्याने घेतली जाणारी ही परीक्षा नेमकी कधी होईल. या संदर्भात लवकरच निर्णय जाहीर करण्यात येईल. याबरोबच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवणात आला असून पेपर लिक प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल अशी शिक्षण मंत्रालयाने जाहीर केल आहे. याप्रकरणात जी कोणी व्यक्ति दोषी असेल, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही शिक्षण मंत्रालयाने स्पष्ट केल आहे.

Anti Paper Leak Law

Anti Paper Leak Law: काय आहे हा कायदा?

सार्वजनिक परीक्षा कायदा 2024 हा पेपरफूटी विरोधात कायदा म्हणून ओळखला जातो. परीक्षेत पारदर्शक आणणे हा त्याचा उद्देश आहे. या कायदाच्या कार्यक्षेत्रात UPSC, SSC, भारतीय रेल्वे, NTA आणि बँकिंग परीक्षा यांसारख्या परीक्षांचा समावेश करण्यात आला आहे. प्रश्नपत्रिका फोडणे किंवा संगणक नेटवर्कशी छेडछाड केल्यास तुम्हाला या कायदा अंतर्गत शिक्षा होऊ शकते.

कायद्यानुसार बेकायदेशीर कृत्ये

Anti Paper Leak Law नव्या कायद्यानुसार एखादी व्यक्ति किंवा संस्थेच्या बेकायदेशीर ठरणाऱ्या कृत्यांमध्ये खालील मुद्यांचा समावेश आहे.

  • कोणत्याही प्रश्नपत्रिका, अन्सर की किंवा तिचा भाग लिक करणे. लिक करण्यासाठी इतरांना मदत करणे किंवा अशा कृत्यात सहभागी असणे.
  • बेकायदेशीररित्या प्रश्नपत्रिका किंवा ओएमआर शिट बाळगणे.
  • परीक्षेदरम्यान प्रश्नाची उत्तरे पुरवणे, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या उमेदवाराला मदत करणे, उत्तरपत्रिका- ओएमआर शिटबरोबर छेडछाड करणे.
  • सरकारने ठरवून दिलेल्या नियमांच जाणीवपूर्वक उल्लघन करणे.
  • अंतिम गुणवत्ता यादीसाठी महत्वाच्या कागदपत्रांशी छेडछाड करणे.
  • परीक्षेशी संबंधित कॉम्प्युटर नेटवर्क किंवा साधनांशी छेडछाड करणे, बनावट वेबसाइट तयार करणे, खोटी परीक्षा घेणे बनावट कागदपत्रे पुरवणे.
  • परीक्षेशी संबंधितांना कोणत्याही प्रकारची धमकी देणे.
NEET आणि NET चा गोंधळ

गेल्या आठवडाभरात NEET आणि NET या दोन परीक्षांमधील गोंधळ समोर आला होता. त्यानंतर हा कायदा लागू करण्यात आला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं 18 जून रोजी घेण्यात आलेली UGC-NET परीक्षा (राष्ट्रीय पात्रता परीक्षा) दुसऱ्याच दिवशी रद्द केली होती. परीक्षेदरम्यान अनियमितता समोर आल्यानंतर या प्रकरणी निर्णय घरण्यात आला होता. NTA च्या वतीने ही परीक्षा घेण्यात आली होती. त्यात जवळपास नऊ लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी परीक्षा दिली होती.

विद्यापीठ अनुदान आयोगाला सायबर गुन्हे खात्याकडून 19 जून रोजी म्हणजे परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी काही महत्वाची माहिती मिळाली होती, त्यानंतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचं आयोजन करताना तिच्या पवित्र्याशी तडजोड झाली असल्याच प्राथमिक दृष्ट्या स्पष्ट होत असल्याचं मंत्रालयानं प्रसिद्धपत्रकात म्हटल आहे. परीक्षेमध्ये पारदर्शकता असावी आणि परीक्षा प्रक्रियेच पावित्र्य राखल जाव यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याच सरकारन सांगितल.

तर NEET परीक्षेत 1563 विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या ग्रेस मार्कचा मुद्दा वादाचा ठरला होता. त्यानंतर हे ग्रेस मार्क रद्द करून त्यांची पुनर्परिक्षा घेणार असल्याच NTA सुप्रीम कोर्टात सांगितल होत. वेळेचे नुकसान झाल्याचे करण डेट 1563 विद्यार्थ्याना मनमानी पद्धतीने ग्रेस मार्क देण्यात आले होते. असा आरोप करत परीक्षा रद्द करण्याची मागणी यात करण्यात आली होती.

Anti Paper Leak Law: कायदा कधी मंजूर करण्यात आला?

सार्वजनिक परीक्षा कायदा 2024 (Anti Paper Leak Law) असे या कायद्याचे नाव आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहात हा कायदा मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर या कायद्याला राष्ट्रपतींनी मंजूरी दिली होती. पारदर्शी पद्धतीने परीक्षा व्हाव्यात हा या कायद्याचा उद्देश आहे. शिवाय कोणत्याही प्रकारची गडबड परीक्षेत होवू नये यासाठी हा कायदा करण्यात आला आहे. राजस्थान, हरियाणा, गुजरात, बिहार आणि आता नीट परीक्षेत गडबड झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे सरकारने तातडीने पावले उचलत हा कायदा लागू केला आहे.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!