अनंत-राधिकाच्या लग्नाचे संपूर्ण शेड्यूल कसे असणार आहे…

Anant Ambani-Radhika Merchant Wedding Live

Anant Ambani-Radhika Merchant Wedding Live: आशियातील आघाडीचे उद्योजक अनि रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचा विवाह सोहळा मुंबई मध्ये पार पडणार आहे. (शुक्रवारी 12 जुलै रोजी) मुंबईतिल वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये लग्नाची धामधूम असेल. त्याआधी लग्नाच्या विधी सुरू झाल्या आहेत. सर्व फंक्शन शाही अंदाजात झाले आहेत. पण या लग्नासाठी मुकेश अंबानी कीती रुपये खर्च करत आहेत? अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या लग्नाआधी सर्व विधी झाल्या आहेत. आतापर्यंत संगीत, हळदी, साखरपुडा, ग्रँड प्री-वेडिंग सोहळा यांसारखे कार्यक्रम पार पडले आहेत.

या सोहळ्यात Anant Ambani-Radhika Merchant Wedding Live देश-विदेशातील अनेक सेलिब्रिटी, राजकारणी, उद्योजक सहभागी झाले होते. प्रसिध्द कॅनेडियन पॉप गायक जस्टीन बिबर यानं परफॉर्म करत उपस्थिती पाहुण्याचं मनोरंजन केले. 12 जुलै रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट विवाहबंधनात अडकणार आहे. 13 जुलै रोजी शुभ आशीर्वादचा कार्यक्रम आहे. जेष्ठ मंडळी सहभागी होऊन नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद देतील. या ग्रँड वेडिंगचे ग्रँड रिसेप्शन 14 जुलै रोजी आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये देशातील आणि जगातील बड्या व्यक्ति सहभागी होणार आहे.

Anant Ambani-Radhika Merchant Wedding Live
Anant Ambani-Radhika Merchant Wedding Live

अनंत अंबानी लवकरच बहिल्यावर चढणार आहे. एन्कोर हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ विरेन मर्चेंट आणि उद्योजिका शैला मर्चेंट यांची मुलगी राधिका मार्चनत हिच्याशी अनंत अंबानी लग्नगाठ बांधणार आहे. दोघांच्या लग्न सोहळ्यासाठी अवघे काही तास बाकी राहिले आहेत. त्यामुळे सध्या अंबानीच्या पाहुण्याची लगबग सुरू असल्याच पाहायला मिळत आहे. कालपासून अनंत राधिकाच्या लग्नासाठी देशातील आणि परदेशातील पाहुणे मंडळी मुंबईत दाखल होताना दिसत आहेत. काही देशांच्या पंतप्रधानांसह हॉलीवूड, बॉलीवूड आणि इतर सिनेसृष्टितिल कलाकार मंडळी मुंबईत पोहोचले आहेत. अनंत-राधिकाच्या लग्नाची तयारी झाली असून लग्नमंडपांचा पहिला व्हिडिओ समोर आला आहे.

अनंत अंबानी-राधिका मर्चेंटचं Anant Ambani-Radhika Merchant Wedding Live लग्न नीता-मुकेश अंबानी क्लचरल सेंटरमध्ये (NMACC) होणार आहे. माहितीनुसार, दुपारी 3 वाजता शुभ मूहर्तावर दोघं लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यामुळे सध्या अनंत-राधिकाचा लग्नमंडप पाहण्यासाठी सगळे उत्सुक आहेत. अशातच लग्न मंडपाचा पहिला व्हिडिओ समोर आला आहे. NMACC मधील लग्नंमंडपाचा व्हिडिओ अंबानी अपडेट्स या इन्स्टाग्राम पेजवरील स्टोरीमध्ये शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये, अनंत राधिकाच्या लग्नाचा मंडप शाही पद्धतीने सजवलेला दिसत आहे. आकर्षक विद्युत रोषणाई सुंदररीत्या केलेली पाहायला मिळत आहे. तसंच पाहुण्याची आसन व्यवस्था स्टेजसमोरचं केली आहे. लग्नातल्या प्रत्येक छोट्या गोष्टींची विशेष काळजी घेण्यात आली आहे.

अनंत-राधिकाच्या लग्नाचे संपूर्ण शेड्यूल

Anant Ambani-Radhika Merchant Wedding Live अनंत राधिकाचे आज लग्न होणार आहे. हा शाही विवाह जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये होणार आहे. अनंत राधिकाच्या लग्नाचे संपूर्ण शेड्यूल पुढील प्रमाणे

  • दुपारी 3 वाजता वरात एकत्र येणार असून पगडी बांधण्यात सोहळा पार पडणार आहे.
  • रात्री 8 वाजता वरमाला सोहळा होईल.
  • लग्न, सात फेरे आणि सिंदूर दान सोहळ्याची वेळ रात्री 9.30 पासून सुरू होईल.
  • लग्नासाठी पाहुण्यांना पारंपारिक ड्रेस कोडमध्ये उपस्थित रहावे लागेल.
  • 13 आणि 14 जुलै असे दोन दिवस वेगवेगळ्या लोकांसाठी रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे.
Anant Ambani-Radhika Merchant Wedding Live

या उद्योगपतींनी लावली हजेरी

रिपोर्टनुसार, या लग्नात एचएसबीसी ग्रुपचे चेअरमन मार्क टकर, अरामकोचे सीईओ अमिन नासर मॉर्गन स्टेनलीचे एमडी मायकल ग्रीम्स, एडोबचे सीईओ शांतणू नारायण, मुबाडालाचे एमडी खलदुल अल मुबारक, सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे चेअरमन जे. ली. लॉकहिड मार्टिनचव सीईओ जेम्स टॅक्लेट, बीपीचे सीईओ मरे औचीनक्लोस, टेमासेकचे सीईओ दिलहान पिल्ले आणि एरिक्सनचे सीईओ बोरेज एकहोम, एचपीचे अध्यक्ष एनरीक लॉरेस, एडीआयए बोर्डचे सदस्य खालील मोहम्मद शरीफ फौलाथी, कुवेत गुंतवणूक प्राधिकारणांचे एमडी बदर मोहम्मद अल साद, नोकीयाचे अध्यक्ष टॉमी उईटो, ग्लॅक्सोस्मिथक्लाइनची सीईओ एम्मा वालम्सली, जीआयसिचे सीईओ लिम चाउ कीआट आणि मोईलीस अँड कंपनीचे उपाध्यक्ष एरिक कँटर यांच्याशिवाय आणखी बरेच उद्योगपति यावेळी सहभागी असतील अशी चर्चा सुरू आहे.

VVIP पाहुण्यांसाठी महागडे गिफ्ट्स

अनंत राधिकाच्या शाही विवाह सोहळ्यासाठी देशभरातूनच नव्हे तर जगभरातून अनेक दिग्गज, सेलिब्रिटी शबहंगी होणार आहेत. अंबानी कुटुंबियांकडून पाहुण्यांसाठी बडदास्त ठेवली जात आहे. व्हीव्हीआयपी मंडळीसाठी खास महागड गिफ्ट देण्यात येणार आहे. कोट्यवधी किंमतीचे घडयाळ देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. तर, इतर पाहुण्यांना काश्मीर, राजकोट, बनारस येथून मागवण्यात आलेले गिफ्ट देण्यात येणार आहे.

शाही विवाह सोहळ्यात 2500 खाद्यपदार्थांची रेचचेल

अनंत अंबानी राधिका मर्चेंटच्या शाही विवाह Anant Ambani-Radhika Merchant Wedding Live सोहळ्यात मेजवानीचा खास बेट असणार आहे. या विवाह सोहळ्यात 2500 खाद्यपदार्थांची रेलचेल असणार आहे. यातील 100 हून अधिक खाद्यपदार्थ हे नारळापासून तयार करण्यात येणार आहे.इंडोनेशियातिल एका कॅटरिंग कंपनी हे खाद्यपदार्थ तयार करणार आहेत. त्याशिवाय, 10 आंतराष्ट्रीय शेफ देखील असणार आहेत. लग्नात काशितील चाट, मद्रास कॅफेमधील फिल्टर कॉफी देखील असणार आहे. त्याशिवाय इटालियन अनि युरोपियन खाद्यपदार्थ असणार आहेत.

राजकीय नेत्यांची उपस्थिती राहणार

ग्रँड विवाह सोहळ्यानिमित्ताने देशातील अनेक दिग्गज राजकारणी उपस्थित राहणार आहेत. काही मुख्यमंत्री, राजकीय नेत्यांचा व्यक्तिश भेट घेत मुकेश अंबानी यांनी आमंत्रण दिले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्ररिय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, आसामचे मुख्यमंत्री हिंमता बिश्वास आदि उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय, केंद्रीय मंत्री यांच्यासह विविध देशाचे राजनयीक उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

शाही लग्नात 350 मिलियन डॉलरचा खर्च

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटयांच्या Anant Ambani-Radhika Merchant Wedding Live शाही विवाहसोहळ्यासाठी 250 पेक्षा जास्त नामवंत पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आलेय. पाहुण्यांना येण्या जाण्यासाठी अंबानी कुटुंबाने तीन फाल्कन-2000 जेट रेंटवर घेतले आहेत. या कार्यक्रमासाठी 100 हून अधिक खासगी विमाने वापरण्यात येऊ शकतात. असे क्लब वन एअरचे सीईओ राजन मेहरा यांनी सांगितले. डेली मेलच्या रिपोर्टनुसार अनंत अंबानीच्या या शाही लग्नासाठी मुकेश अंबानीनी 350 दशलक्ष डॉलर्स म्हणजे 2500 कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च केली आहे.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!