Amit Thackeray
Amit Thackeray: उद्धव ठाकरे यांनी वर्धापन दिन सोहळ्यात मनसेची टिंगल करताना ‘बिनशर्त पाठिंबा’ असा उल्लेख केला होता. त्यांच्या या टीकेला मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा ‘बिनशर्त पाठिंबा’ हा विनोद कळायला मला 10 मिनिटे लागली. इकडे वरळीत राज साहेबांनी (Raj Thackeray) त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. तेव्हा मुलाला आमदार बनवताना काही वाटलं नाही का? ही गोष्ट त्यांनी विसरायला नको होती, असे अमित ठाकरे यांनी म्हटले.
राज साहेबांनी मनसे पक्ष हा स्वत:च्या हिंमतीवर आणि मेहनीतीवर काढला. पक्ष मोठा व्हायला वेळ लागला तरी त्यामध्ये राजसाहेबांनी मेहनत आहे. विधानसभा निवडणुकीत तुम्हाला मनसेचा उत्साह वाढलेला दिसेल, असे अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी म्हटले. यावेळी एका पत्रकाराने अमित ठाकरे यांना तुम्ही विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का, असा प्रश्न विचारला. त्यावर अमित ठाकरे यांनी, ‘मी निवडणुकीला उभं राहाव, अशी तुमची इच्छा आहे का? असा प्रतिप्रश्न विचारला. संबंधित पत्रकाराने हो म्हणतात, मग तुम्ही साहेबांना जाऊन सांगा, असे अमित ठाकरेंनी म्हणतात एकाच हशा पिकाला.
विधानसभा निवडणुकीसाठी मनसे पक्ष कामाला लागला आहे. आज विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी बैठक होती. मी सगळ्या विधानसभा मतदार संघांमध्ये फिरणार आहे. मी लोकांना भेटून त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहे. आमची विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. असेही अमित ठाकरे यांनी म्हटले.
वरळीत बिनशर्त पाठिंबा दिल्याने मुलगा आमदार झाला
पत्रकारांशी बोलताना अमित ठाकरे (Amit Thackeray) म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी ‘बिनशर्त पाठिंबा’ हा केलेला विनोद समजायला 10 मिनिटे लागली. वरळीत राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता, तेव्हा त्यांना काही वाटले नाही. तेव्हा पाठिंबा घेतला यमी मुलाला आमदार केले. या गोष्टी विसरता काम नये. राज ठाकरेंनी जो पक्ष काढला आहे, तो स्वतःच्या मेहनतीवर काढला आहे. पक्ष मोठा व्हायला वेळ लागला असेल तरीही तो आपल्या मेहनतीवर काढलेला पक्ष आहे हे कुणीही विसरू नये.
विधानसभा निवडणुकीत आम्ही आमची शक्ति दाखवू, असे अमित ठाकरे यांनी ठामपणे सांगितले. तसेच आमदार निवडून दिला की, त्यांच्याकडे काम करण्यासाठी पाच वर्ष असतात. कोरोंना काळात वरळी मतदारसंघ, वरळी कोळीवाड्याच्या ज्याप्रकारे फिरायला पाहिजे होते. तसे ते फिरताना दिसले नाहीत. शेवटच्या तीन महिन्यांमध्ये काम करून काही होणार नाही. या गोष्टी लोकांशी बोलल्यावर कळतील. आम्ही त्यांना या अपेक्षेने बिनशर्त पाठिंबा दिला नव्हता.
उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?
19 जून रोजी षण्मुखाणंद सभागृहात शिवसेनेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर नाव न् घेता टीका केली होती. त्यांनी म्हटलं होत की, “या निवडणुकीत आपलं कोण आणि परक कोण? हे स्पष्ट झालं आहे. फक्त उद्धव ठाकरे नको म्हणून काही लोकांनी भाजपला ‘बिनशर्त’ पाठिंबा दिला”
उद्धव ठाकरेंच्या टीकेला मनसेच प्रत्युत्तर
उद्धव ठाकरेंच्या मनसेवरील टीकेवर आता मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं की, हिरव्या मतांनी थोडाबहुत विजय संपादित केलेल्या लोकांना पाणचट जोक मारायची सवय झाली आहे, ती अद्याप गेलेली नाही. यापूर्वी कोरोंनातही ते अशाच स्वरूपाचे जोक मारायचे. पण एक नक्की सांगतो येणाऱ्या विधानसभेत या पाणचाट जोक मारणाऱ्यांचे लोक कपडे देखील शाबूत ठेवणार नाहीत. मराठी माणसांनी त्यांना यावेळी मतदान केल नाही. जे काही मतदान झालं ते हिरवं मतदान झालं, जो काही विजय झाला तो हिरवा विजय झाला.
उद्धव ठाकरेंच्या विरोधात काही संबंधच येत नाही. तुम्ही हिंदुत्व सोडल आम्ही सोडलेलं नाही. आम्ही हिंदुत्वाच्या बाजून होतो, देशाच्या दृष्टिकोनातून आम्ही पाठिंबा दिला होता. उद्धव ठाकरे कदाचित हे विसरले असतील की ज्यावेळी यांचे नगरसेवक चोर त्यांचे नगरसेवक चोर आणि आता स्वत:वर वेळ आली की रडत बसायच, असही देशपांडे यांनी म्हटलं आहे.
आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील लिडवर अमित ठाकरे काय म्हणाले?
अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी वरळी विधानसभेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या कामगिरीवर भाष्य केले. आता शेवटच्या तीन महिन्यामध्ये काम करून काही होणार नाही. एका आमदाराला पाच वर्ष मिळतात. करोंनापासून वरळी कोळीवाड्यात त्यांनी ज्याप्रकारे फिरायला पाहिजे होते. तसे ते फिरताना दिसले नाहीत. या गोष्टी लोकांशी बोलल्यावर कळतील. आम्ही त्यांना या अपेक्षेने बिनशर्त पाठिंबा दिला नव्हता. वरळीतून संदीप देशपांडे यांना उतरवण्यासंदर्भात काय बोलणी झाली असतील तर ती मला माहीत नाहीत, असे अमित ठाकरे यांनी म्हटले.
या वेळी अमित ठाकरे यांनी ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनाही टोला लगावला. वरळीत मनसेचा पदाधिकारी उभा राहिला तर त्याचे डिपॉझीट जप्त होईल, असे परब यांनी म्हटले होते. मनसेच डिपॉझीट होईल. हे आत्ताच सांगायला, अनिल परब हे का सर्व्हे कंपनीत काळा लागल आहेत का? ही गोष्ट लोकांना ठरवून द्या ना. गेल्या विधानसभा निवडणुकीत वरळीतून आदित्य ठाकरे यांना 20 ते 25 हजारांच लिड होत. लोकसभा निवडणुकीत हे लिड 7 हजारांपर्यंत खाली आले. तुम्ही याबाबत लोकांशी बोलले पाहिजे, त्यानंतर विचार करून बोलले पाहिजे, असा सल्ला अमित ठाकरे यांनी अनिल परब यांना दिला.
राजू पाटील काय म्हणाले?
कंबरेच काढून गुंडाळलेले ‘शर्त’ आणि ‘शर्ट’ असले फुटबळ शब्दच्छल करतात. ‘दादू’ काहीच दिवसांपूर्वी आपणही मोदीजिंना पाठिंबा दिला होतात तेव्हा काय काढल होतंत? #लब्बाडलांडगं ढ्वांग_ करतंय अशी पोस्ट राज्य पाटील यांनी केली आहे. तसच उद्धव ठाकरेंच एक भन्नाट व्यंगचित्रही त्याबरोबर पोस्ट केल आहे. ही पोस्ट आता चांगलीच चर्चेत आली आहे.
शेवटचे तीन-चार महीने फिरून काही होत नाही
आमदार निवडून दिला की त्यांच्याकडे काम करण्यासाठी पाच वर्ष असतात. कोव्हीड काळात वरळी मतदार संघात कुणीही फिरकल नाही. आता शेवटचे तीन-चार महीने फिरून फारसा काही फरक पडणार नाही. आम्ही बिनशर्त पाठिंबा यासाठी कुणालाच दिला नव्हता. अस म्हणत अमित ठाकरेंनी आदित्य ठाकरेनाही टोला लगावला आहे.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!