गायिका अलका याग्निक यांना ‘अचानक बहिरेपणा’,तुम्हीही हेडफोन लावून गाणी ऐकत असाल तर सावधान; जाणून घ्या या आजाराबद्दल

Alka Yagnik

Alka Yagnik: आपल्या सुमधुर आवाजाने 90 च्या दशकात बॉलीवूड मधील अनेक लोकप्रिय गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या गायिका अलका याग्निक Alka Yagnik यांना एका दुर्मिळ आजारचं निदान झालं आहे. त्यांनी सोशल मिडियावर या संदर्भात पोस्ट करून माहिती दिली. त्यांच्या एकण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे. अस त्यांनी सांगितल.

अलका यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्हायरल अटॅक नंतर त्यांना हा त्रास झाला. के दिवशी फ्लाइट मधून बाहेर पडताना त्यांना जांवळ की आपल्याला काहीच ऐकू येत नाही. अलका यांना या दुर्मिळ स्थितीबद्दल माहिती देताना चाहत्यांनी आणि सहकलाकारांना मोठ्या म्युझिक पासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.

Alka Yagnik
Alka Yagnik

इन्स्टाग्रामवर अलका याग्निक (Alka Yagnik) यांनी लिहल, “माझे सर्व चाहते, मित्र, फॉलोअर्स आणि हिटचिंतकांनो काही आठवड्यांपूर्वी मी फ्लाइट मधून बाहेर पडत होते आणि मला अचानक जाणवलं की मला काहीही ऐकू येत नाही. यानंतर माझे हे हितचिंतक व मित्र विचारत आहे की मी कुठे गायब आहे, त्यांच्यासाठी काही आठवड्यात थोडी हिंमत एकवटल्या नंतर मी या विषयावर बोलायच ठरवल आहे. मला दुर्मिळ सेन्सीरि नर्व्ह हिअरिंग लॉसचे निदान माझ्या डॉक्टरांनी केले आहे. हे एक व्हेरल अटॅकमुले झालं आहे. अचानक घडलेल्या या गोष्टींमुळे मला मोठा धक्का बसला आहे. मी त्याला स्वीकारण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे कृपया तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा.

अलका यांनी यावेळी त्यांच्या चाहत्यांना आणि इतर गायकांना महत्वाचा सल्ला दिला आहे. “मला हेडफोन्स आणि मोठ्या आवाजातील संगीतांबद्दल माझ्या चाहत्यांना आणि तरुण सहकाऱ्यांना इशारा देऊ इच्छिते. एखाद्या दिवशी मी माझ्या प्रोफेशनमुळे आरोग्याला होणाऱ्या हनीबद्दल नक्कीच बोलेन. तुमच्या सर्व पाठिंब्यामुले मी माझे आयुष्य पुन्हा रुळावर आणण्याची अशा करते आणि लवकरच तुम्हाला पुन्हा भेटेन अशी अशा बाळगते. या कठीण काळात तुमचा पाठिंबा माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे,” अस त्या म्हणाल्या

Alka Yagnik

हा आजार कशामुळे होऊ शकतो?

या आजाराबद्दल अधिक माहितीही ईएनटी स्पेशालिस्ट (कान-नाक-घसारोग तज्ञ) डॉ. नीता घाटे यांनी माहिती दिली. त्यांनी सर्वात आधी आपण कांनाची रचना समजून घेऊया. कणाचे तीन भाग आहेत.

  • बाहेरचा कान म्हणजे कर्णा, इयर कनाल (Ear Canal) आणि कानाचा पडदा.
  • मधला कान कानाच्या पडद्यापासून सुरू होऊन तीन हाडांची साखळी, घन, ऐरण व रिकीव.
  • आपल्या कानामध्ये Sensory Hair Cells आणि ऐकायची नस असते, जी मेंदुपर्यंत जाते.

जेव्हा आवाज होतो,तेव्हा ध्वनीलहरी निर्माण होतात आणि कानाच्या पडद्यामध्ये कंपन निर्माण होतात. हडच्या साखळीमार्फत ती कंपन आतल्या कानापर्यंत पोहोचतात आणि त्याचे रूपांतर इलेक्ट्रिक सिग्नल मध्ये होऊन ते मेंदू पर्यंत पोहोचतात आणि आपल्याला ऐकू येत. यामध्ये जेव्हा आतल्या कानाच्या पेशीला किंवा नसांना इजा झाल्यामुळे जे बहिरेपणा येत त्याला सेन्सीरिन्यूरळ हिअरिंग लॉस अस म्हणतात, अस त्यांनी सांगितले.

डॉ. नीता यांनी अशाप्रकारच्या बहिरेपणाची वेगवेगळी कारण सांगितली.

  • कधीकधी बहिरेपणा अनुवंशीक असतं.
  • इन्फेक्शनमुळे सेन्सरिन्यूरल हिअरिंग लॉस होऊ शकतो. विशेषत:व्हायरल इन्फेक्शनमुळे कधीकधी अशा प्रकारचा अचानक बहिरेपणा येऊ शकतो.
  • गरोदरपणात आईचं वाढलेलं ब्लड प्रेशर असेल, काही इन्फेक्शन झाले असतील (उदा. गोवर-कांजिण्या) प्रसूती दरम्यान अडचणी आल्या असतील तर नवजात बाळाला बहिरेपणा येऊ शकतो. खूप आवाजाच्या ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तींना सेन्सरीन्यूरल हिअरिंग लॉस होऊ शकतो.
  • वयोमानाप्रमाणेही एकण्याच्या नसांची क्षमता कमी होऊन बहिरेपणा येऊ शकतो.
  • जंतुसंसर्ग, अपघात

याबरोबर गेल्या काही वर्षातल्या मानव निर्मित कारणांमुळे ही सेन्सरिन्यूरल हिअरिंग लॉस होऊ शकतो.

  • ध्वनिप्रदूषण
  • मोठ्या आवाजात गाणी लावण
  • सतत इयरफोन्स लावून ऐकल्यामुळे कानावर परिणाम होऊ शकतो. ट्रेन, बसमध्ये, रस्त्यावर चालताना तुम्ही एअरफोन्स लावता, तेव्हा आधीच आजूबाजूला गोंगाट असतो. त्यात तुम्ही अजून मोठा आवाज केरून गोष्टी एकता. त्यांचा ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.

दुर्मिळ आजारांमुळे ऐकण्याची क्षमता गमावली

अलका याग्निक यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर करून तिच्या तब्येतीची माहिती दिली आहे. तिने सांगितले की तिला दुर्मिळ शारीरिक समस्या आहे. ज्यामुळे तिच्या एकण्याच्या क्षमतेवर परिणाम होत आहे. डॉक्टरच्या म्हणण्यानुसार, त्याला व्हायरल अटॅकमुले हा त्रास झाला आहे. त्याने त्याच्या चाहत्यांना त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे.

अलका याग्निक एक प्रसिद्ध भारतीय गायिका आहे. त्या नव्वदच्या दशकातील सर्वोत्कृष्ट गायकांपैकी एक आहे त्यांचे संगीताशी असलेले नाते अनेक दशकांपूर्वी आहे. चार दशकांहून अधिक काळ त्यांचा आवाज लिकांच मनोरंजन करत आहे. या काळात त्यांनी ‘टू शायर है मै तेरी शायरी’, गली मे आज चाँद निकला, आगर टूम साथ हो अशा अनेक सुफीत गाण्यांना आपला आवाज दिला आहे.

Alka Yagnik: यांना कोणता दुर्मिळ आजार आहे?

गायिका अलका याग्निक यांना रेअर सेसरीनूरल नर्व्ह हिअरिंग लॉस (Sensorineural Nerve Hearing Loss) हा दुर्मिळ आजार झाला आहे. या आजारामध्ये कानापासून मेंदूपर्यंत जाणारी नस डॅमेज होते.

या आजारावर उपाय काय?

दरम्यान व्हायर इन्फेक्शनमुळे बहिरेपणा आला असेल तर, हळूहळू रुग्ण बार होताना, त्याला ऐकू येऊ लागते. पण हा आजार पूर्णपणे बार होत नाही, मात्र उपचारांमुळे काही प्रमाणात ऐकण्याची क्षमता परत आणता येऊ शकते. यामध्ये, औषधे, कॉक्लियर इम्प्लांट आणि श्रवणयंत्र यांचा समावेश आहे.

Alka Yagnik: सेन्सरीन्यूरल हिअरिंग लॉस म्हणजे काय?

अमेरिकन स्पीच लाँग्वेज हिंगरिंग असोसिएशनच्या वेबसाईटवरील माहितीनुसार कानाच्या आतल्या बाजूस इज वा दुखापत झाल्यास अशाप्रकारचा सेन्सरि न्यूरल हिअरिंग लॉस होतो. कानाच्या आतल्या भागात असणाऱ्या नर्व्ह- नसांमध्ये अडथळा आल्याने मेंदुसोबतच्या संपर्कात अडथळे येतात. काहींसाठी यामुळे क्षीण आवाज एकण कठीण होत. तर अनेकदा मोठे आवाज अस्पष्ट व दबल्या सारखेही ऐकू येतात.

अशा प्रकारे बधिरपणा हे बहुतेक दा कायम स्वरूप असून त्यावर औषध वा शस्त्रक्रिया परिणामकारक ठरत नाहीत. अशा प्रकारच्या बधिरसाठी हिअरिंग एड (Hearing Aid) म्हणजे श्रवणयंत्राची मदत घेता येऊ शकते. आजारपण, आनुवंशिकता, वाढतं वय, डोक्याला जोराचा मार लागणं, कानाच्या आतल्या बाजूच्या रचनेमध्ये त्रास होणं वा मोठे आवाज वा स्फोट ऐकण यामुळे अशा प्रकारचं बंधीरपणा येण्याची शक्यता असते.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!