Ajit Pawar on Baramati Elections
Ajit Pawar on Baramati Elections: राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत एका मेळाव्याला संबोधित केलं. या मेळाव्यात अजित पवार यांनी लोकसभेला झालेल्या पराभवावर भाष्य केलं. विकासकामं करून देखील जर बारामतीकर वेगळा निर्णय घेणार असतील तर बारामतीला देखील वेगळा आमदार मिळाला पाहिजे, असं अजित पवार म्हणाले. त्यानंतर माझ्या आमदारकीच्या कार्यकाळाची आणि नव्या व्यक्तीच्या कामाची तुलना करावी, असं अजित पवार म्हणाले.
महाराष्ट्रात सध्या आगामी विधानसभा निवडणुकांची जोरदार चर्चा पहायला मिळत आहे. राज्यात निवडणुका नेमक्या कधी होणार? याची उत्सुकता मतदारांप्रमाणेच राजकीय पक्ष व त्यांच्या कार्यकर्त्यांनाही लागली आहे. जम्मू काश्मीर व हरियाणाच्या निवडणुका आयोगानं आधी जाहीर केल्या. त्यामुळे महाराष्ट्रातील निवडणुका दिवाळी आधी किंवा दिवाळी नंतर? या संदर्भात तर्क वितर्क लावले जात आहेत. या पाश्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून राज्यभर मतदारांशी संवाद साधला जात आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी आज बारामतीमध्ये पक्ष कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकीबाबत सूचक विधान केलं आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना महायुती कडून तिकीट देण्यात आलं होतं. मात्र सुप्रिया सुळे समोर त्यांना पराभव झाला. खुद्द अजित पवार यांना महायुती कडून तिकीट देण्यात आलं होत. मात्र सुप्रिया सुळे समोर त्यांचा पराभव झाला. खुद्द अजित पवारांच्या बारामती देण्यात आलं होत. मात्र सुप्रिया सुळेना सर्वाधिक मताधिक्य मिळालं. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांवर याचा परिणाम होणार असे अंदाज वर्तवले जात होते. या पाश्वभूमीवर अजित पवारांनी बारामती मधून निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचं सांगितल्यानंतर तर्क वितऱ्कांना उधाणआलं. त्याच संदर्भात अजित पवारांनी आज बारामती मध्ये बोलताना भाष्य केलं.
अजित पवारांनी यावेळी लवकरच निवडणुकांची घोषणा (Ajit Pawar on Baramati Elections 2024) होणार असल्याचे सुतोवाच केले. मागच सरकार 2019 च्या निवडणुकीत 26 नोव्हेंबरला स्थापन झालं होतं. त्यामुळे नवीन सरकार 26 नोव्हेंबरच्या आत स्थापन झालं पाहिजे असा एक नियम आहे. निवडणूक कधी होईल माहीत नाही. खूप जण निधीची मागणी करत आहेत. पण मी आता मी निधीसाठी फैलवर रिमार्क काहीही दिला, तरी मंजूर होईपर्यंत आचार संहिता लागेल. त्यामुळे सगळ्यांनी याच विचार करावा, असं अजित पवार म्हणाले आहेत.
Ajit Pawar on Baramati Elections: न मागता विकासकामं होत आहेत.. : अजित पवार
कारण मी शेवटी माणूस आहे, मला पण विचार येतो एवढी सगळी कामं करून बारामतीकर वेगळा निर्णय घेऊ शकतात. मग आपण तर दुसऱ्यांना खासदार करू शकतो. नितीन पाटलांना, प्रफुल पटेलांना खासदार केलं. आमदार राजेश विटेकरला केलेलं तुम्ही पहिलं. शिवाजीराव गर्जे यांना आमदार केलं. अशी जर गंमत होणार असेल तर झाकली मूठ सव्वा लाखाची चांगली. आपण लाखानं निवडून येणारी माणसं, मी पण आता 65 वर्षाचा झालो. आपण पण तसं समाधानी आहे. जिथं पिकतं तिथं विकत नसतं बारामतीकरांना कोणतरी मी सोडून आमदार मिळाला पाहिजे, मग तुम्ही माझी 1991 ते 2024 या माझ्या कारकिर्दीची तुलना करा आणि त्या माणसाचं कम बघा, असं अजित पवार (Ajit Pawar on Baramati Elections) म्हणाले.
मी कढई वेगळी भूमिका घेतली नाही. तरी निवडणुकीच्या वेळी काय झालं तुम्ही बघा काहीजण बेताल वक्तव्य करतात. पण अशा वक्तव्याचं कधीच आम्ही समर्थन केलं नाही. सत्ताधारी पक्षाच्या एका आमदारानं एक विधान केलं त्याचाही आम्ही निषेधच केला. सगळ्यांना मॅट मांडण्याचा अधिकार घटनेनं दिला आहे. असंही अजित पवारांनी नमूद केलं. सकाळ पासून उठून कामं करावी लागतात पण काही जण आमची चेष्टा करतात, त्याचबद्दल म्हणनं काही नाही, जे आहे ते आहे, असं अजित पवार म्हणाले. ही बारामतीच्या भवितव्याची निवडणूक आहे. सत्तेत असू तर अर्थकारणाला गती मिळणार आहे, असं अजित पवार म्हणाले.
Ajit Pawar on Baramati Elections: मीही एक माणूस आहे
बारामतीत आपण सर्वांगीण विकास केला. राज्यात सर्वाधिक निधी दिला. मीही एक माणूस आहे. मला कधीकधी विचार येतो की एवढी सगळी कामं करू नाही बारामतीकर वेगळा निर्णय घेऊ शकतात.आता मलाही राजकारणात 33-34 वर्ष झाली आहेत. मी तर आता दूसरा खासदार राज्यसभेवर (Ajit Pawar on Baramati Elections) पाठवू शकतो. त्याआधी संसदीय समितीनं सुनेत्रा पवार प्रफुल्ल पटेलांना उमेदवारी दिली होती. मध्ये राजेश विटेकर आमदार केलं. शिवाजीराव गर्जेना केलं. आता राज्यपाल नियुक्त आमदाराचं काय होतंय माहिती नाही, पण जर यंदाच्या निकालांसारखी गंमत होणार असेल तर आपली झाकली मूठ सव्वा लाखाची म्हणायचं, अशी टिप्पणी अजित पवारांनी केली.
मी आता समाधानी आहे
दरम्यान आज पर्यंतच्या कारकीर्दीवर आपण समाधानी असल्याचं अजित पवार यावेळी म्हणाले. आता मीही 65 वर्षाचा झालोय. मी समाधानी आहे. जिथे पिकतं, तिथे विकत नसतं. एकदा बारामती करांना कुणीतरी मी सोडून आमदार मिळायला हवा. मग तुम्ही 91 ते 2024 च्या माझ्या कारकिर्दीची आणि त्या नव्या माणसाच्या करकीर्दीची तुलना करा, असं आवाहन अजित पवारांनी केलं आहे.
मी कधी वेगळी भूमिका घेतली नाही. तरी निवडणुकीच्या वेळी काय झालं तुम्ही बघा काहीजण बेताला वक्तव्य करतात. पण अशा वक्तव्याचं कधीही आम्ही समर्थन केलं नाही. सत्ताधारी पक्षाच्या एका आमदारानं एक विधान केलं त्याचाही आम्ही निषेधच केला. सगळ्यांना मतं मांडण्याचा अधिकार घटनेनं दिला आहे, असंही अजित पवारांनी नमूद केलं.
काय म्हणाले अजित पवार
अजित पवारांनी यावेळी लवकरच निवडणुकांची घोषणा होणार असल्याचे सुतोवाच केले. मागचं सरकार 2019 च्या निवडणुकीत 26 नोव्हेंबरला स्थापन झालं होतं. त्यामुळे नवीन सरकार 26 नोव्हेंबरच्या आत स्थापन झालं पाहिजे असा एक नियम आहे. निवडणूक आयोग कधी निवडणूक घेईल माहिती नाही. खूप जण निधीची मागणी करत आहेत. पण आता मी निधीसाठी फाइलवर रिमार्क काहीही दिला, तरी मंजूर होईपर्यंत आचार संहिता लागेल. त्यामुळे सगळ्यांनी याचा विचार करावा, असं अजित पवार म्हणाले आहेत.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!