Ajit Pawar NCP Candidate List 2024
Ajit Pawar NCP Candidate List 2024: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. महायुतीने आत्तापर्यंत 182 उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र महाविकास आघाडी आघाडीकडून अद्याप एकही उमेदवाराचं नाव जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे सर्वाना महाविकास आघाडीच्या यादीची प्रतीक्षा आहे. त्या सोबतच इतरही पक्षांनी व आघाड्यांनी आपले उमेदवार मैदानात उतरवले आहेत. राज्यातील 288 विधानसभा मतदार संघासाठी महायुतीकडून भाजपने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यानंतर आता शिंदेच्या शिवसेना पक्षाने 45 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने सुद्धा 38 जणांची यादी जाहीर केली आहे.
त्यामध्ये मनसेनं 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. त्यापूर्वी मनसे कडून 7 उमेदवारांची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे आता महाविकास आघाडीतील पक्षांच्या उमेदवारांची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. शिवसेना शिंदे गटाने 45 जणांची पहिली यादी जाहीर केली असून बहुतांश विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी घराणेशाहीला प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळालं. आता अजित पवारांनी 38 उमेदवारांची राष्ट्रवादीचि पहिली यादी जाहीर केली असून आमदार सुनील टिंगरेना वेटिंगवर ठेवलं आहे. टर विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचं तिकीट कापण्यात आलंय. त्यामुळे महायुतीच्या तिन्ही पक्षांनी मिळून आत्तापर्यंत 182 उमेदवारांची नवे जाहीर केली आहेत. मात्र अद्याप 106 उमेदवारांच्या नावांची प्रतीक्षा आहे. तर महाविकास आघाडीच्या 288 मतदारसंघातील उमेदवारांची प्रतीक्षा महाराष्ट्राला आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पहिल्या यादीत जास्तीत जास्त विद्यमान आमदारांना संधी देण्यात आली आहे. अजित पवार मतदार संघ बदलणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र अजित पवार हे बारामती विधानसभा मतदार संघातूनच निवडणूक लढणार आहेत. तर छगन भुजबळ यांना येवला मतदार संघातून निवडणूक लढतील. आदिती तटकरे यांनाही श्रीवर्धन मधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर धनंजय मुंडे हे परळीतून मैदानात असतील.
दरम्यान आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरलेयत. मनसेचे युवा नेते अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढणार आहेत. माहीममधून त्यांना पक्षाकडून उमेदवारी जाहीर झालीय. अमित ठाकरे विरोधात शिंदेच्या शिवसेनेचे सदा सरवणकर हे निवडणूक लढणार आहेत.
Ajit Pawar NCP Candidate List 2024: शिवसेना शिंदे गटाची पहिली 45 उमेदवारांची यादी
मतदार संघ | उमेदवार |
---|---|
1) कोपरी पाचपाखाडी | एकनाथ शिंदे |
2) साक्रि (अनुसूचित जाती) | मंजुळाती गावीत |
3) चोपडा (अनुसूचित जाती) | चंद्रकांत सोनावणे |
4) जळगाव ग्रामीण | गुलाबराव पाटील |
5) पाचो | किशोर पाटील |
6) मुक्ताईनगर | चंद्रकांत पाटील |
7) बुलढाणा | संजय गायकवाड |
8) मेहकर (अनुसूचित जाती) | संजय रायमुलकर |
9) दर्यापूर (अनुसूचित जाती) | अभिजीत अडसूळ |
10) रामटेक | आशीष जैस्वाल |
11) भंडारा (अनुसूचित जाती) | नरेंद्र भोंडेकर |
12) दिग्रस | संजय राठोड |
13) नांदेड उत्तर | बालबाजी कल्याणकर |
14) कळमनुरी | संतोष बांगर |
15) जालना | अर्जुन खोतकर |
16) सील्लोड | अब्दुल सत्तार |
17) छत्रपती संभाजीनगर मध्य | प्रदीप जैस्वाल |
18) छत्रपती संभाजीनगर पश्चिम (अनुसूचित जाती) | संजय शिरसाट |
19) पैठण | विलास भूमरे |
20) वैजापुर | रमेश बोरनारे |
21) नांदगाव | सुहास कांदे |
22) मालेगाव बाह्य | दादाजी भुसे |
23) ओवळा माजिवाडा | प्रताप सरनाईक |
24) मागाठाणे | प्रकाश सुर्वे |
25) जोगेश्वरी (पूर्व) | मानिय वायकर |
26) चांदिवली | दिलीप लांडे |
27) कुर्ला (अनुसूचित जाती) | मंगेश कुडाळकर |
28) माहीम | सदा सरवणकर |
29) भायखळा | यामिनी जाधव |
30) कर्जत | महेंद्र थोरवे |
31) अलिबाग | महेंद्र दळवी |
32) महाड | भरतशेठ गोगावले |
33) उमरगा (अनुसूचित जाती) | ज्ञानराज चौगुले |
34) परंडा | तानाजी सावंत |
35) सांगोला | शहाजीबापु पाटील |
36) कोरेगाव | महेश शिंदे |
37) पाटण | शंभुराजे देसाई |
38) दापोली | योगेश कदम |
39) रत्नागिरी | उदय सामंत |
40) राजापूर | किरण सामंत |
41) सावंतवाडी | दीपक केसरकर |
42) राधानगरी | प्रकाश आबीटकर |
43) करवीर | चंद्रदीप नरके |
44) खानापुर | सुहास बाबर |
45) एरंडोल | अमोल पाटील |
Ajit Pawar NCP Candidate List 2024: राष्ट्रवादी कॉँग्रेस (अजित पवार गट) 38 उमेदवारांची यादी
मतदार संघ | उमेदवार |
---|---|
1) बारामती | अजित पवार |
2) येवला | छगन भुजबळ |
3) आंबेगाव | दिलीप वळसे पाटील |
4) कागल | हसन मुश्रीफ |
5) परळी | धनंजय मुंडे |
6) दिंडोरी | नरहरी झिरवाळ |
7) अहेरी | धर्मराव बाबा अत्राम |
8) श्रीवर्धन | आदिती तटकरे |
9) अंमळनेर | अनिल भाईदास पाटील |
10) उदगीर | संजय बनसोडे |
11) अर्जुनी मोरगाव | राजकुमार बडोले |
12) माजलगाव | प्रकाश दादा सोळंके |
13) वाई | मकरंद पाटील |
14) सिन्नर | माणिकराव कोकाटे |
15) खेड आळंदी | दिलीप मोहोते पाटील |
16) अहमदनगर शहर | संग्राम जगताप |
17) इंदापूर | दत्तात्रय भरणे |
18) अहमदपूर | बाबासाहेब पाटील |
19) शहापूर | दौलत दरोडा |
20) पिंपरी | अण्णा बनसोडे |
21) कळवण | नितीन पवार |
22) कोपरगाव | आशुतोष काळे |
23) अकोले | किरण लहामटे |
24) वसमत | चंद्रकांत उर्फ राजू नवघरे |
25)चिपळूण | शेखर निकम |
26) मावळ | सुनील शेळके |
27) जुन्नर | अतुल बेनके |
28) मोहोळ | यशवंत माने |
29) हडपसर | चेतन तुपे |
30) देवळाली | सरोज आहीरे |
31) चंदगड | राजेश पाटील |
32) इगतुरी | हिरामन खोसकर |
33) तुमसर | राजे कारमोरे |
34) पुसद | इंद्रनील नाईक |
35) अमरावती शहर | सुलभा खोडके |
36) नवापुर | भरत गावीत |
37) पाथरी | निर्णला विटेकर |
38) मुंब्रा कळवा | नजीब मुल्ला |
पहिल्या यादीत काही नावे वगळण्यात आली आहेत. नवाब मलिक यांना उमेदवारी देणार की नाही याबाबत अजूनही सस्पेंस कायम आहे. पहिल्या यादीत नवाब मलिक यांचा समावेश नाही. तर त्यांची मूलही सना खान हिचाही समावेश नाही. त्यामुळे या पिता पुत्रांना दुसऱ्या यादीची वाट पाहावी लागणार आहे. शिवाय झिशान सिद्दीकी यांची ही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. तर कॉँग्रेस मधून राष्ट्रवादीत आलेल्या सुलभा खोडके यांना अमरावतीतुन तर हिरामन खोसकर यांना इगतपुर मतदान संघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!