Abhijit Katke IT Raid
Abhijit Katke IT Raid:महाराष्ट्र केसरी पहिलवान अभिजीत कटके यांच्या पुण्यातील घरी प्राप्ती कार विभागाने छापा टाकला आहे. त्यांच्या घरातून महत्वाची कागदपत्रे पथकाने ताब्यात घेतली आहेत. नेमक्याच विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत कटके यांच्या घरी छापा पडल्यामुळे खळबळ उडाली आहे. पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपकडून बंडखोरी करणार असल्याची चर्चा असलेले भाजपचे नेते अमोल बालवडकर यांच्या सासरी म्हणजेच चंद्रकांत कटके यांच्या घरी आयकर विभागाचे छापे पडले आहे. सकाळी सात वाजल्यापासून आयकर विभागाचे अधिकारी त्यांच्या घराची झाडाझडती घेत आहेत. अभिजीत यांचे वडील चंद्रकांत कटके त्यांच्या वाघोली येथील घरात मंगळवारी सकाळी प्राप्ती कार विभागाचे अधिकारी पोहोचले होते.
आलेल्या आयकर विभागाच्या पथकाने कागदपत्रांची झाडाझडती घेत, कटके यांच्याकडे विचारपूसही केली. दरम्यान कोथरूड विधानसभा मतदारसंघात भाजपकडून बंडखोरी करण्याच्या प्रयत्नातिल असल्याची भाजपचे माजी नगरसेवक अमोल बाळवडकर यांचे सासरे हे चंद्रकांत कटके आहेत. त्यांच्या घरी छापा टाकल्यामुळे ही राजकीय खेळी असल्याची चर्चा रंगली आहे. तसेच सोमवारी रात्री उशिरा खेड शिवापुर टोल नाक्यावर नाकाबंदी 5 कोटी रुपये नेणाऱ्या मोटारीला पोलिसांनी अडविले. त्याच्याकडील रक्कम जप्त करीत कारवाई केली आहे. ही रक्कम शिंदे गटाच्या आमदाराची असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, याबाबत अधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला आहे.
भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर हे कोथरूड विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकहोते. भारतीय जनता पक्षाने चंद्रकांत पाटील यांना संबंधित मतदार संघातून उमेदवारी जाहीर केली जाते. दरम्यान यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बालवडकर यांच्या घरी जाऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. त्याचबरोबर भाजपच्या इतर वरिष्ट नेत्यांनीही त्याच्यासोबत चर्चा केली होती. बालवडकरांचे सासरे चंद्रकांत कटके यांचे वाघोलीत घर आहे. त्याठिकाणी छापा टाकल्यामुळे खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र केसरी अभजीत कटके यांनी एकदा महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळवला. तर दोन वेळा उपमहाराष्ट्र ठरले आहे. कटके पुण्यातील शिवरामदादा तलामीचा पहिलवान असून 2015 मध्ये युवा महाराष्ट्र केसरीचा मन मिळवला होता. त्यांनी 2016 मध्ये ज्युनिअर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते.
आयकर विभागाने महाराष्ट्र केसरी अभिजीत चंद्रकांत कटके (Abhijit Katke IT Raid) व वाघोली परिसरातील 15 जमीन विकासकांच्या घरी व कार्यालयावर आयकर विभागाने आज पहाटेच धाड टाकली. धाड टाकल्याची बातमी सकाळी सर्वत्र पसरली. आयकार विभागाची की ईडीचि धाड याबाबत चर्चा सुरू होती. प्रथम कटके यांच्याच घरी धाड टाकल्याची चर्चा होती. नंतर वाघोली व परिसरातील गावातील 15 विकासकांच्या घरी व कार्यालयात धाड टाकल्याचे समोर आले. वाघोली, आहाळवाडी फुलगाव, वढू बुद्रुक, अष्टापूर आदि ठिकाणी राहणारे हे जमीन विकसक आहेत. पहाटे पाच वाजताच हे धाड सत्र सुरू झाले. या सर्वांच्या कार्यालयात व घरावर आयकर विभागाने धाड टाकली. दुपारपर्यंत हे धाड सत्र सुरू होते.
अभजीत कटके हे माजी नगरसेवक व कोथरूड विधान सभेसाठी इच्छुक उमेदवार अमोल बालवडकर यांचे मेहुणे आहेत. कोणाकडे कीती मालमत्ता मिळते याचीच चर्चा परिसरात सुरू आहे.
Abhijit Katke IT Raid: महाराष्ट्र केसरी चा मानकरी अभिजीत कटके आहे तरी कोण?
- पैलवान अभिजीत कटके हा एकवेळा महाराष्ट्र केसरी तर दोन वेळा उपमहाराष्ट्र केसरी आहे. त्यानंतर टु हिंद केसरीचा मानकरी ठरला.
- पुण्याच्या गणेश पेठेतल्या शिवरामदादा तालमीचा अभिजीत कटके हा पैलवान आहे.
- अभिजितला अमर निंबाळकर, भारत म्हस्के आणि हणमंत गायकवाडयांचं मार्गदर्शन लाभलं आहे.
- अभिजीतनं 2015 साली युवा महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला होता.
- 2016 साली त्यानं ज्युनिअर राष्ट्रीय कुस्तीत कांस्यपदकाकहा मन मिळवला होता.
- अभिजीत वयाच्या बावीशीतही एक परिपक्व पैलवान म्हणून ओळखला जातो.
अभिजीत कटके हा पुण्यातील माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांचे सख्खे मेहुणे
महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी अभिजीत कटकेच्या (Abhijit Katke IT Raid) पुण्यातील घरी आयकर विभागाने छापा टाकला आहे. अभिजीत कटके हे भाजपचे पुण्यातील नेते आणि माजी नगसेवक अमोल बालवडकर यांचे सख्खे मेहुणे आहेत. अमोल बालवडकर हे पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून येणारी निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. मात्र, भारतीय जनता पक्षाने चंद्रकांत पाटील यांचीच उमेदवारी या मतदारसंघातून जाहीर केली आहे. त्याआधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमोल बालवडकर यांच्या घरी जाऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. त्याचबरोबर भाजपच्या इतर वरिष्ट नेत्यांनी देखील बालवडकर यांना माघार घेण्याची सूचना केली होती. मात्र अमोल बालवडकर यांनी ते येणारी विधानसभा निवडणूक लढवणार की नाही हे अद्याप जाहीर केलेले नाही. त्याआधी पडेलया या छाप्यामुळे खळबळ उडाली आहे.
अभिजीत कटके यांच्यावरील कारवाईला राजकीय पाश्वभूमी?
कोथरूड विधानसभा मतदार संघात चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे अमोल बालवडकर नाराज झाले होते. त्यांनी नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती. अमोल बालवडकर सोबत अंतर्गत राजकीय वातावरण चंद्रकांत पाटील यांनी निर्माण केलं होतं. अशी माहिती स्वत: अमोल बालवडकर यांनी दिली होती. दरम्यान अमोल बालवडकर हे अभिजीत कटके यांचे मेहुणे आहेत. त्यामुए कुठे तरी राजकीय सुदबुद्धीने ही कारवाई केली गेली का? असा प्रश्न ही उपस्थित होत आहे.
आपल्या कुटुंबाला त्रास देणाऱ्यांना पराभवाचा सामना करावा लागेल असा इशारा अमोल बालवडकर यांनी दिले. मंगळवारी सकाळी पैलवान अभिजीत कटकेच्या घरावर इन्कम टॅक्सकडून छापा टाकण्यात आला असून अभिजीत ज्या तालमीत सराव करतो त्या तालमीत देखील इन्कम टॅक्सचे अधिकारी पोहचलेत. परंतु तालमीत काय मिळणार मातीच मिळणार आहे, असे अमोल बालवडकर म्हणाले.
Abhijit Katke IT Raid: याबाबत अमोल बालवडकरांची प्रतिक्रिया
आज सकाळी माझे मेहुणे हिंदकेसरी महाराष्ट्र केसरी अभिजीत कटके यांच्या घरावर इन्कम टॅक्सची धाड पडली आहे. देशात महाराष्ट्राचे नावं ज्याने उंचावले त्याच्या घरी छापा पडणं हे आमच्यासाठी चिंतेची गोष्ट आहे. त्यांचे चुकीचे व्यवसाय नसताना देखील त्यांच्या घरावर राजकीय कारणास्तव त्यांच्या घरावर छापा टाकला. कारण तो फक्त माझा मेहुणा आहे, म्हणून त्याच्या घरवर धाड पडली का, असं मला प्रश्न पडतोय, असं अमोल बालवडकर म्हणाले.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!