Zika Virus Pune
Zika Virus Pune: डेंग्यू, मलेरिया, चिकनगुणिया पाठोपाठ आता शहरात ‘झिका’ विषाणूने डोके वर काढले असून, रुग्ण संख्येत वाढ होत आहे. एरंडवण्यातील 28 वर्षीय गर्भवती महिलेलाही ‘झिका’ चा संसर्ग झाल्याने रुग्णसंख्या पाचवर गेली आहे. तपासणी अहवाल ‘पॉझिटिव्ह’ येऊनही या महिलेला कोणतीही लक्षणे नाहीत. सध्या या महिलेची प्रकृती स्थिर असून, मे महिन्यातील ‘अॅनोमली स्कॅन रिपोर्ट’ नॉर्मल असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. शहरात आतापर्यंत ‘झिका’ चे पाच रुग्ण आढळून आले आहेत. तिचे एरंडवण्यातील असून, दोघे मुंडव्यातील आहेत.
पुण्यात झिका (Zika Virus Pune)विषाणूचा प्रसार होत आहे. शहरात संसर्गाचे 6 रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये दोन गर्भवती महिलांचाही समावेश आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील एरंडवणे भागातील 28 वर्षीय गर्भवती महिलेमाधे झिका विषाणूची लागण झाल्याचे आढळून आलं आहे. महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याशिवाय आणखी 12 आठवड्यांच्या गर्भवती महिलेला झिका व्हायरसची लागण झाल्याचं आलं आहे. सध्या दोन्ही महिलांची प्रकृती स्थिर आहे.
ऐन वारीच्या तोंडावर पुण्यात झिका व्हायरसचा शिरकाव झाला आहे. कोथरूडच्या एरंडवने भागातील एका 46 वर्षीय डॉक्टर आणि त्याच्या 13 वर्षीय मुलीमद्धे झिकाची लक्षणे आढळली आहेट. त्यामुळे परिसरात चांगली खळबळ उडाली आहे. हवामान बदलामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुणिया त्याचबरोबर इतर साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने पहायला मिळत आहे.
झिका विषाणू आजार हा एडिस इजिप्त डासांमुळे होणारा आजार आहे. हे दास खरतर अमेरिकामध्ये आढळतात. डोकेदुखी, स्नायूंचा त्रास, शरीरावर बारीक पुरल, लाल, चट्टे उठणे, ताप ही या झिका आजाराची लक्षणे आहेत. तर या आजारापासून सावध राहण्यासाठी कोणते उपाय कराल पुढीलप्रमाणे
Zika Virus Pune: हे उपाय करावे
- झिका विषाणूपासून बचाव करण्यासाठी घराभोवती पाणी साचू देऊ नका, कारण पाणी साचलेल्या डबक्यामद्धे डासांची उत्पती मोठ्या प्रमाणात होते.
- घरामध्ये डास शिरणार नाही याची काळजी घ्या.
- डास चावणार नाही याची काळजी घ्या. घरात डास आले तर त्यासाठी कडूलिंबाचा पाला जाळा.
- संध्याकाळी दारे खिडक्या उघड्या ठेऊ नका. गडद रंगाचे व तोडके कपडे वापरू नये.
- कापराचा वापर करून तुम्ही 15 ते 20 मिनिटात डासांना दर पळवू शकता.
- कडूलिंब आणि नारळाचे टेल एकत्र करून आपल्या शरीरावर चोळा.
- दोन दिवस ताप राहिल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- पाच दिवसांतून एकदा घरातील पाण्याची सगळी भांडी रिकामी करून स्वच्छ घासावी. कारण भांड्याच्या ओलसर भागांत डासांची अंडी शकतात. टी भांडी पूर्णपणे वाळून कोरडी झाल्यानंतरच पुन्हा त्यात पाणी भरा.
- घरात मनी प्लॉट, बाम्बू प्लांट किंवा इतर कोणतीही वनस्पति ठेवत असाल तर त्यात पाणी सचून ठेऊ नका.
झिका व्हायरची लागण झाल्याची लक्षणं कोणती?
- त्वचेवर पुरळ येणे आणि त्याला खाज येणे. सर्दीसोबतच ताप असणे.
- खूप घाम येणे.
- स्नायूमध्ये वेदना असणे.
- तीव्र डोकेदुखी आणि खूप थकवा.
- भूक कमी होणे किंवा खाण्याची इच्छा न् होणे.
गर्भवती महिलांनी कोणती काळजी घ्यावी
डेंग्यू, मलेरिया, चिकनगुणिया या आजाराप्रमाणेच ‘झिका’ चे रुग्ण पावसाळ्यात आढळतात. डेंग्यू आणि झिका चा संसर्ग एकाच डासा पासून होतो. त्यामुळे या दोन्ही आजारांची लक्षणे सारखीच असतात. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुणिया सोबतच झिका चाही संसर्ग वाढण्याची शक्यता असते. झिका चे रुग्ण पूर्वी देशात आढळून येत नव्हते. मात्र, गेल्या काही वर्षापासून पावसाळ्यात हे रुग्ण आढळत आहेट. सध्या आढळलेल्या रुग्णाची लक्षणे सौम्य आहेट. गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. असे संसर्गरोगतज्ञ डॉ. अमित द्रविड यांनी नमूद केले.
गर्भवती महिलांनी का काळजी घ्यावी?
झिका मुळे मृत्यू होण्याचे प्रमाण कमी आहे. तरीही गर्भवती महिलांना या विषाणूचा संसर्ग झाल्यास होणाऱ्या बाळाला मेंदूविकार जडण्याची शक्यता असते. याशिवाय बाळाला जन्मजात दोष उद्धवन्याची शक्यता असते. त्यामुळे गर्भवती महिलांनी पावसाळ्यात विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे तज्ञांनी सांगितले.
Zika Virus Pune: झिका व्हायरस कसा पसरतो?
झिका हा संसर्गजन्य रोग आहे. हा रोग डासाद्वारे पसरतो. एडिस इजिप्त आणि एडिस आल्बोपिक्ट्स या प्रजातीचे डास चावल्याने हा रोग होतो. तसेच हा गंभीर आजार लैंगिक संबंधातून देखील पसरू शकतो. जर गर्भवती महिलेला संसर्ग झाला असेल तर बाळालाही या व्हायरसचा संसर्ग होऊ शकतो.
आरोग्य विभागाचे प्रयत्न अपुरे
झिकाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने ताप रुग्ण सर्वेक्षण, गर्भवती महिला सर्वेक्षण, डासांचे सर्वेक्षण व इतर उपाययोजना केल्याचे सांगितले, तरीही संसर्ग काही आटोक्यात येताना दिसत नाही. सध्या राज्याची आणि महापालिका आरोग्य यंत्रणा ही पालखी नियोजनात गुंतल्याने त्याचा परिणाम होताना दिसून येत आहे.
पहिल्या रुग्णाला संसर्ग कुठून झाला
पुण्यात झिकाची Zika Virus Puneलागण झालेल्या पहिल्या रुग्णाला संसर्ग कुठून झाला, याचे धागेदोरे आरोग्य यंत्रणेला सापडत नाहीत. त्यामुळे कम्युनिटीत झिकाचा संसर्ग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये 46 वर्षाचा डॉक्टर आणि त्याच्या 15 वर्षाच्या मुलीला झिकाचं निदान झालं आहे. त्यानंतर मुंढवा येथे 47 वर्षाची एक महिला आणि तिच्या 22 वर्षाच्या मुलालाही झिकाचं निदान झाल्याचं अमोर आलं आहे. दरम्यान पुण्यात झिकाचा धोका वाढताना दिसत आहे. डासांपासून हा आजार पसरत असल्याचे पहायला मिळतंय. ऐन वारीच्या तोंडावर झिकाझे सात रुग्ण आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे, आफ्रिका, अमेरिका आणि दक्षिण भारतात आढळतो.
मात्र लग्न झालेल्या रुग्णांनी कुठेही प्रवास केलेला नाही, त्यामुळे झिका पुण्यात आला कुठून हा मोठा प्रश्न अनुत्तरित आहे. पुण्यातील झिका विषाणू संसर्गाचा पहिला रुग्ण एरंडवणे परिसरातच आढळून आला आहे. 46 वर्षीय डॉक्टरचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. डॉक्टरानंतर त्याच्या 15 वर्षाच्या मुलीचा नमूनाही पॉझीटीव्ह आढळला. याशिवाय मुंढवा परिसरात दिन बाधित लॉक आढळले असून त्यापैकी एक 47 वर्षीय महिला आणि दूसरा 22 वर्षीय पुरुष आहे.
पुणे महापालिका आरोग्य विभाग रुग्णांवर लक्ष ठेऊन आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, खबरदारीचा उपाय म्हणून संक्रमित डासांना रोखण्यासाठी फॉगिंग आणि फ्यूमीगेशन यासारख्या उपाययोजना केल्या जात आहेत. झिका विषाणू संक्रमित एडिज डासांच्या चाव्याद्वारे पसरतो. हा दास डेंग्यू आणि चिकणगुणिया यांसारख्या विषाणूचा प्रसार करण्यासाठी देखील ओळखला जातो. 1947 मध्ये युगांडामध्ये हा विषाणू पहिल्यांदा ओळखला गेला.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!