Airtel New 5G Plans
Airtel New 5G Plans: जिओ नंतर Vi आणि Airtel या भारतातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला प्रिपेड प्लॅनच्या दरात वाढ केली. आता कंपन्यांना जुन्या प्लॅन साठी रीचार्ज करणाऱ्यांसाठी देखील दोन्ही कंपन्यांनी नवीन किंमती आता लागू केल्या आहेत. आणि आता कोणीही त्यांच्या नंबरवर रीचार्ज करत असतील तर त्यांना नवीन वाढलेल्या किंमत भरावी लागणार आहे. वोडाफोन आयडिया (Vodafone Idea)ने शुक्रवारी (28 जून 2024)त्याच्या सर्व प्रिपेड आणि पोस्टपेड मोबाइल प्लॅन्सचे दर 10 ते 20 टक्यांनी वाढवले आहेट. एक दिवसांपूर्वी बाजारातील प्रमुख रिलायन्स जिओने रीचार्ज प्लॅनचे दार वाढवले होते. त्यानंतर शुक्रवारी भारती एयरटेलने प्रिपेड आणि पोस्टपेड दोन्ही ग्राहकांसाठी टॅरीफ प्लॅनमध्ये सुधारणा केल्या आहेत.
यापूर्वी, एयरटेल (Airtel New 5G Plans)आणि जिओने घोषणा केली होती की, नवीन टॅरीफ प्लॅन 3 जुलै पासून लागू होणार आहेट. याचा अर्थ पुढील आठवड्यापासून तुमचे मोबाईल बिल 10 ते 20 टक्क्यांनी वाढणार आहे. अनेक प्लॅनच्या किंमती 100 रुपयांपेक्षा ही जास्त वाढल्या आहेत. सर्वात आधी जिओने आपल्या डेटा प्लॅनमध्ये 25 टक्यांनी वाढ केली. त्यानंतर एयरटेलनेही प्रिपेड डेटा प्लॅनमध्ये 11 ते 21 टक्यांनी तर पोस्टपेड डेटा प्लॅनमध्ये 10 ते 20 टक्क्यांनी वाढ करण्यात आली. दरम्यान, Vi ने आपल्या डेटा प्लॅनमध्ये 25 टक्यांनी वाढ केली आहे. चला तर जाणून घेऊया वाढलेल्या दरांबाबत.

आज आपण तुम्हाला तुमच्या Airtel आणि Vodafone प्रिपेड प्लॅन्सवर कीती पैसे खर्च करावे लागतील ते पाहणार आहोत. Airtel आणि Vodafone Idea या दोन्हीवर 79 रुपये किमतीच्या बेस व्हाईस प्लॅनची किंमत आता 99 रुपये आहे. यात 50 टक्के अधिक मिनिटे व्हाईस कॉलिंग तसेच 200 MB डेटा आणि 28 दिवसांची वैधता देण्यात येते.
Airtel New 5G Plans: जिओने देखील वाढवलेल्या किंमती
रिलायन्स जिओनेही गुरुवारी रात्री रीचार्ज प्लॅन च्या किंमती वाढवण्याची घोषणा केली कंपनीने प्रिपेड आणि पोस्टपेड अशा दोन्ही प्लॅनच्या किंमती वाढवल्या आहेत. जिओच्या नवीन किंमतीही 3 जुलै पासून लागू होतील. भारतातील 5G नेटवर्क आणि मोठ्या दूरसंचार कंपन्याबद्दल बोलायचे तर, फक्त जिओ आणि एयरटेल हेच बाजारात टॉप राहिले आहेट. याचा अर्थ असा आहे की, किंमती वाढल्याने बहुतेक भारतीय मोबाइल यूजर्सवर परिणाम होईल.
Airtel आणि Vi नवीन प्लॅन्स
28 दिवसांचे प्लॅन्स
- Airtel आणि Vodafone Idea च्या 149 रुपयांच्या प्लॅनची किंमत आता 179 रुपये असेल. तर दोन्ही प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग आणि एकुन 2 GB डेटा मिळेल. तसेच हा प्लॅन 28 दिवसांसाठी वैध आहे.
- 219 प्लॅनची किंमत आता अनुक्रमे 265 आणि 269 रुपये झाली आहे, जे 28 दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग आणि 1 GB डेटा प्रतिदिन ऑफर करतात. तर 249 रुपयांच्या प्लॅनची किंमत आता Airtel आणि Vodafone Idea या दोन्हीसाठी 299 रुपये आहे. प्लॅनमध्ये 28 दिवसांसाठी दररोज 1.5 GB डेटासह अमर्यादित कॉलिंगची सुविधा दिली जाते.
- Airtel वर 298 आणि Vodafone Idea वरील 299 रुपयात मिळणाऱ्या प्लॅनची किंमत आता 359 झाली असून आता 28 दिवसांसाठी दररोज 2 GB डेटासह अमर्यादित कॉलिंग ऑफर केला जातो.
56 दिवसांचे प्लॅन्स
- Airtel आणि Vodafone Idea या दोन्हीवरील 399 रुपयांच्या प्लॅनची किंमत आता 479 रुपये आहे आणि 56 दिवसांसाठी अमर्यादित व्हाईस कॉलिंग दररोज 1.5 GB डेटा ऑफर केला जातो.
- 449 रुपयांच्या प्लॅनची किंमत आता Airtel वर 549 रुपये आणि Vodafone Idea वर 539 रुपये आहे. प्लॅनमध्ये 56 दिवसांसाठी दररोज 2 GB डेटा आणि त्याच कालावधीसाठी अमर्यादित व्हाईस कॉलिंग ऑफर केले जाते.


84 दिवसांचे प्लॅन्स
- 379 रुपयांच्या प्लॅनची किंमत आता Airtel वर 455 रुपये आणि Vodafone Idea वर 459 रुपये आहे. हे एकूण 6 GB डेटा तसेच 84 दिवसांच्या कालावधीसाठी अमर्यादित व्हाईस कॉलिंग ऑफर केले जाते.
- Airtel वर 598 आणि Vodafone Idea वर 599 रुपयांच्या प्लॅन आता दोन्ही वापरकर्त्यांसाठी 719 रुपयांना मिळेल तसेच या प्लॅनमध्ये 84 दिवसांसाठी अमर्यादित व्हाईस कॉलिंग आणि दररोज 1.5 GB डेटा ऑफर केला जातो. त्याचप्रमाणे Airtel वरील 698 आणि Vodafone Idea वरील 699 प्लॅनची किंमत आता दोन्ही वापरकर्त्यांसाठी 839 रुपयांना मिळेल तसेच या प्लॅनमध्ये 84 दिवसांसाठी अमर्यादित व्हाईस कॉलिंग आणि दररोज 2 GB डेटा ऑफर केला जातो.
Airtel आणि Vi चा एक वर्षाचा प्लॅन
- Airtel वर 1498 आणि Vodafone Idea वर 1499 च्या प्लॅनची किंमत आता 1799 असेल आणि त्यात 365 दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग आणि एकूण 24 GB डेटा देण्यात येतो.
- Airtel वरील 2,498 रुपयांच्या प्लॅनची किंमत आता 2,999 रुपये आहे आणि Vodafone Idea वरील 2,399 रुपयांच्या प्लॅनची किंमत आता 2,899 रुपये आहे. दोन्ही प्लॅन्स 365 दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग आणि प्रती दिन 2 GB डेटा देतात.
Airtel New 5G Plans: डेटा बुस्टर पॅक
Airtel आणि Vodafone Idea वर 48 रुपये किंमतीच्या 3 GB डेटा प्लॅनची किंमत आता 58 रुपये झाली असून दोन्ही ऑपरेटरसाठी 98 रुपये किंमत असलेल्या 12 GB डेटा प्लॅनची किंमत आता 118 रुपये आहे.
50 GB प्लॅन ज्याची किंमत पूर्वी दोन्ही वापरकर्त्यांसाठी 251 रुपये होती, आता Airtel वर त्या रीचार्जसाठी 301 रुपये आणि Vodafone Idea वर 298 रुपये मोजावे लागतील. लक्षात घ्या की या प्लॅनची Airtel वर अमर्यादित वैधता आहे, परंतु Vodafone Ideaवर, ते 28 दिवसांसाठीच वैध आहेट. या याव्यतिरिक्त, Vodafone Idea 100 GB डेटा प्लॅन ऑफर करते जे 56 दिवसांसाठी वैध आहे आणि त्याची किंमत 418 रुपये आहे.
Airtel New 5G Plans: नवीन दर कधीपासून लागू होतील?
भारती एयरटेलने सांगितले की, Airtel 3 जुलै 2024 पासून त्यांच्या मोबाइल रीचार्जच्या दरांमध्ये बदल करत आहे. एंट्री लेवल प्लॅन वर अतिशय नाममात्र किमतीत वाढ होईल (प्रती 70 पेक्षा कमी दिवस) भारती एयरटेल चे म्हणणे आहे की , भारतातील दूरसंचार कंपन्यांसाठी आर्थिकदृष्ट्या हेल्दी बिझनेस मॉडेल सक्षम करण्यासाठी मोबाइल सरासरी अव्हरेज रेव्हेन्यू यूजर्स 300 पेक्षा जास्त असावा.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!