विराट कोहली अन् रोहित शर्मा या दोघांची T-20 इंटरनॅशनल मधून निवृत्ती

Rohit Sharma Retirement

Rohit Sharma Retirement: विराट कोहली च्या पाठोपाठ टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माही टि-20 इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. भारताने टि-20 वर्ल्ड कपच्या फायनल मध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत विजेतेपद पटकावला. या विजेतेपदा बरोबरच विराट कोहली आणि रोहित शर्मा या भारताच्या दोन ‘ऑल टाइम ग्रेट’ क्रिकेटपटूनी या प्रकारातील आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. रोहितनं यापुढे वन-डे आणि टेस्ट क्रिकेट खेळत राहणार असल्याच जाहीर केलं आहे.

टि-20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला 7 रणांनी पराभूत करत विश्वविजेतेपद पटकावलं. भारतीय टीम आणि निवृत्तीची मोठी घोषणा केली. टीम इंडियाच्या विराट कोहलीनं टि-20 इंटरनॅशनल मधून निवृत्ती जाहीर केली आहे. पहिले फलंदाजी करताना भारताने 20 षटकात 7 बॅड 176 धावांची मजल मारली. यानंतर दक्षिण आफ्रिकेला भारताने 20 षटकात 8 बॅड 169 धावांवर रोखले. निर्णायक क्षणी अर्धशतक झळकवणार विराट कोहली सामनावीर ठरला, तर जसप्रीत बूमराहला मालिकावीरचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

विराट कोहली अन अक्षर पटेल यांच्या भागीदारीने डाव सावरला. दोघांनी ही चौथ्या विकेटसाठी 54 चेंडूत 72 धावांची भागीदारी केली. अक्षर पटेलने या भागीदारी आक्रमक पवित्रा आजमावत चौफेर फटकेबाजी केली, ही जोडी मैदानात टिकतेय असं वाटत असतानाच अक्षर पटेल धावबाद झाला. अक्षरने 31 चेंडूत 1 चौकार अनि 4 षटकार लावत 47 धावा केल्या.

Rohit Sharma Retirement
Rohit Sharma Retirement

भारताने 11 वर्षानी एखाद्या आयसीसी स्पर्धेचे विजेतेपद पटकावलंय. तर 17 वर्षानी टि 20 विजेतेपदाला गवसणी घातली.

विराटची निवृत्तीची घोषणा

विराट कोहलीला फायनलमहडील कामगिरीसाठी ‘प्लेयर ऑफ द मॅच’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. त्यावेळी बोलताना विराटणं टि-20 इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. विराटनं भावुक स्वरात त्याच्या मनातील भावना जगाला सांगितले. की, तो मॅचनंतर बोलताना म्हणाला की आता पुढच्या पिढीकडे धुरा सोपवण्याची वेळ आली आहे. हा माझा शेवटचा टि-20 वर्ल्ड कप होता. आम्हाला नेमकं हेच साध्य करायचं होतं. एखाद्या दिवशी तुम्हाला वाटत की तुम्हाला रन काढता येणार नाहीत, आणि तसंच होत. देव सर्वशक्तिमान आहे. एक संधी हवी असते. आता नाही तर कधीच नाही अशी ही परिस्थिति होती. ही माझी भारतासाठी शेवटची टि-20 मॅच होती.

Rohit Sharma Retirement

आम्हाला विजेतेपदाची ट्रॉफी उंचवायची होती. हे एक ओपन सीक्रेट होतं. मी पराभूत झाल्यानंतर हा निर्णय जाहीर केला नसता असं नाही. पुढच्या पिढीनं टि-20 क्रिकेटला चालना देण्याची वेळ आली आहे. आमच्यासाठी ही खूप मोठी प्रतीक्षा होती. तुम्ही रोहित शर्माकड पहा. तो 9 टि-20 वर्ल्ड कप खेळला आहे. हा माझा सहावा टि-20 वर्ल्ड कप होता. या विजेतेपदावर त्याचा हक्क आहे. सध्या भावनांवर नियंत्रण ठेवणे खूप अवघड आहे. मला वाटतंय की ही सर्व समजायला आणखी वेळ लागेल. विराट कोहलीनं 12 जून 2010 रोजी झीम्बाब्वे विरुद्ध टि-20 इंटरनॅशनल मध्ये पदार्पण केलं होतं. त्यानं 14 वर्षाच्या कारकीर्दीमध्ये 125 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्यानं यामध्ये 48.69 च्या सारसरी 4188 रन केले यामध्ये 38 हाफ सेंच्युरी आणि 1 सेंच्युरीचा समावेश आहे.

Rohit Sharma Retirement: रोहितची निवृत्तीची घोषणा

रोहितनं फायनलनंतर झालेल्या पत्रकार परिषेदेमध्ये त्याचा निर्णय जाहीर केला. हा माझा देखील शेवटचा टि-20 इंटरनॅशनल सामना होता. या प्रकाराला निरोप देण्याचा यापेक्षा अधिक चांगला शन नाही. मी भारतीय टीममधील माझी कारकीर्द याच प्रकारातून सुरू केली. विश्वकप जिंकणे हे माझे ध्येय होतं. मला या भावना शब्दात मांडणं अवघड आहे. हा माझ्यासाठी प्रचंड भावुक प्रसंग आहे. मला कोणत्याही परिस्थिति मध्ये विजेतेपद पटकावयचं होत. आम्ही मिळवू शकलो, याचा मला आनंद आहे,असं रोहित ने सांगितले.

रोहित शर्माची T20 कारकीर्द

Rohit Sharma Retirement रोहित शर्मानं 159 T20 इंटरनॅशनल मध्ये 4231 रण केले आहेत. या प्रकारात सर्वाधिक 5 सेंच्युरी झळकवण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. रोहित दोन वेळा टि-20 वर्ल्ड कप जिंकणारा एकमेव भारतीय खेळाडू आहे. तो 2007 मधील टि-20 वर्ल्ड कप विजेत्या टीमचा सदस्य होता. त्यानंतर 17 वर्षानी 2024 साली त्यानं कॅप्टन म्हणून ही स्पर्धा जिंकली आहे. रोहितनं या टि-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया कडून सर्वाधिक रन केले. रोहितनं 8 सामन्यात 156.70 च्या स्ट्राइक रेटणं 257 रन केले. यामध्ये 3 हाफ सेंच्युरीचा समावेश आहे. या टि-20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या बॅटर्सच्या यादीमध्ये रोहित दुसऱ्या क्रमांकावर राहिला. अफगाणिस्थान रहमनउल्ला गुरबाजनंच फक्त रोहितपेक्षा जास्त 281 रन केले.

Rohit Sharma Retirement

Rohit Sharma Retirement: लीडरशिप

Rohit Sharma Retirement क्रिकेटमध्ये निडरता किंवा धाडस ही आपल्या संघातील फलंदाजांची ओळख बनावी अशी रोहितची इच्छा होती. करीयरच्या अखेरच्या टप्प्यावर असताना रोहितनं स्वत:मध्ये तसा बदल करून दाखवला. 37 वर्षे वी असताना रोहितनं कट टाकली आणि हे धाडस कोणत्या प्रकारच असायला हवं याचा आदर्श घालून दिला. तुमच्या नेहमीच्या क्रिकेटिंग शॉटच्या मंडतीनंच तुम्हाला तसं शक्य आहे. हेही रोहितनं दाखवून दिलं. पण त्याचवेळी कलात्मक फटक्यांमध्ये रिव्हर्स स्वीपचा समावेश करत त्यानं नवीन काहीतरी शिकून त्याचा वापरही केला.

Rohit Sharma Retirement

तुम्हाला कधीतरी त्यासाठी विराटच्या मार्गावरही चालवं लागत. त्यानं संघाला कठीण स्थितीतून बाहेर काढण्यासाठी परत जुन्या पद्धतीनं फलंदाजीचा पट मांडला आणि यश मिळवलं. रोहितला विजयानंतरच्या चमकेगिरी विषयी फारस आकर्षण नाही. त्यामुळे त्यानं एक असा संघ बांधला जो ठराविक लक्ष्य मिळवण्यासाठी संघर्ष करेल. असे लक्ष्य जे कदाचित अखेरच्या क्षणापर्यंत त्यांना माहितीही नसेल.

रोहिटकडे जे खेळाडू होते त्यांच्यातील सर्वोत्तम गुणांचा त्यानं वापर करून घेतला. कदाचित रोहितला स्वतालाही त्याचा अंदाज नसेल. रोहितच्या संघानं प्रत्येक आव्हानाला प्रत्युत्तर दिलं आणि त्यामुळे त्यांनी वर्ल्डकप जिंकला अॅम समोर कोणताही संघ असो किंवा कोणत्याही प्रकारची स्थिति असो. भारताने टॉस जिंकला की हरला यानंही त्यांना काही फरक पडत नव्हता. रोहित स्वत:पुढे आला खांद्यावर जबाबदारी स्वीकारली सर्वांना रस्ता दाखवला. भारताच्या फलंदाजी मध्ये त्यानं बॅटनंच सगळ काही बोलून दाखवले. चांगला स्कोअर करण्यासाठी किंवा जाम बसवण्यासाठी त्यानं वेळ दडवला नाही. एक तर वेगानं धावा करायच्या मग बॅड झालं तरी हरकत नाही, हा मार्ग त्यानं स्वीकारला होता.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!