तब्बल 11 वर्षानी भारताला विजेतेपद; पहा हारलेली मॅच कशी फिरली ते

T-20 World Cup Final

T-20 World Cup Final: टि-20 विश्वचषकात रोमांचक झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी हारवले आणि दुसऱ्यांदा टि-20 विश्वविजेते T-20 World Cup Final पदावर नाव कोरले. पहिले फलंदाजी करताना भारताने 20 षटकात 7 बॅड 176 धावांची मजल मारली. यानंतर दक्षिण आफ्रिकेला भारताने 20 षटकात 8 बॅड 169 धावांवर रोखले. निर्णायक क्षणी अर्धशतक झळकवणार विराट कोहली सामनावीर ठरला, तर जसप्रीत बूमराहला मालिकावीरचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. बार्बाडोसच्या मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात अटीतटिच्या लढतीत टीम इंडियाने आफ्रिकेची झुंज मोडून काढली. हार्दिक पांड्याच्या अखेरच्या चेंडूवर आफ्रिकेच्या फलंदाजाने एक धाव काढली आणि भारतीय खेळाडूंनी मैदानात येऊन जल्लोष केला. कर्णधार रोहित शर्माला अश्रु अनावर झालेले पाहायला मिळाले.

सामन्यात नाणेफेक जिंकून टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. अंतिम सामन्यासाठी ही टीम इंडियाने प्लेइंग 11 मध्ये कोणतेही बदल केले नाहीत. परंतु या सामन्यात भारताची सुरुवात निराशाजनक झाली. कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत हे तिन्ही बिनीचे शिलेदार लवकर माघारी परतले. परंतु संपूर्ण स्पर्धेत खराब कामगिरीमुळे टीकेचा धनी झालेल्या विराटने महत्वाच्या सामन्यात आपली चमक दाखवली.

T-20 World Cup Final
T-20 World Cup Final

विराट कोहली अन अक्षर पटेल यांच्या भागीदारीने डाव सावरला. दोघांनी ही चौथ्या विकेटसाठी 54 चेंडूत 72 धावांची भागीदारी केली. अक्षर पटेलने या भागीदारी आक्रमक पवित्रा आजमावत चौफेर फटकेबाजी केली, ही जोडी मैदानात टिकतेय असं वाटत असतानाच अक्षर पटेल धावबाद झाला. अक्षरने 31 चेंडूत 1 चौकार अनि 4 षटकार लावत 47 धावा केल्या.

यानंतर मैदानात आलेल्या शिवम दुबेने विराट कोहलीला उत्तम साथ दिली. दोघांनी ही अखेरच्या ओव्हरला आफ्रिकन बॉलरची धुलाई करत धावा जमवण्यात सुरुवात केली. विराट कोहलीने यादरम्यान आपलं अर्धशतक ही पूर्ण केलं. शिवम दुबेच्या साथीने विराट कोहलीने पाचव्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी केली. अखेरच्या षटकात फटकेबाजी करण्याच्या नादात विराट कोहली मार्का यान्सरच्या गोलंदाजीवर बॅड झाला. विराटने 59 बॉलमध्ये 6 चौकार आणि 2 षटकार लावत 76 धावाकेल्या. विराट बाद झाल्यानंतर शिवम दुबेही फटकेबाजीच्या प्रयत्नात अखेरच्या षटकात बाद झाला.

T-20 World Cup Final

ज्या नंतर टीम इंडियाने निर्धारित षटकात 176 धावांपर्यंत मजल मारली. दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराज आणि नॉर्किया यांनी प्रत्येकी 2-2 तर यान्सर आणि रबाडाने 1-1 विकेट घेतली.

T-20 World Cup Final: आणि मॅच इथे फिरली!

पंधराव्या ओव्हरमध्ये अक्षर पटेलने 24 धावा दिल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 30 बॉलमध्ये 30 धावा हव्या होत्या. ओव्हर संपल्यानंतर अक्षर पटेलने वर्ल्डकप फायनल मध्ये भारतीय गोलंदाजी सगळ्यात महागडी ओव्हर स्वत:च्या नावे केली. हताश झालेल्या कर्णधार रोहित शर्माने जगातला अव्वल गोलंदाज असणाऱ्या जसप्रीत बूमराहच्या हातात बॉल दिल आणि दक्षिण आफ्रिकेकडे झुकलेला वर्ल्डकप भारताकडे परत येताना दिसू लागला. पंधराव्या ओव्हर मध्ये अक्षर पटेलने 24 धावा दिल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 30 बॉलमध्ये 30 धावा हव्या होत्या.

ओव्हर संपल्यानंतर अक्षर पटेलने वर्ल्डकप फायनल मध्ये भारतीय गोलंदाजांची सगळ्यात महागडी ओव्हर स्वत:च्या नावे केली. हताश झालेल्या कर्णधार रोहित शर्माने जगातला अव्वल गोलंदाज असणाऱ्या जसप्रीत बूमराहच्या हातात बॉल दिल आणि दक्षिण आफ्रिकेकडे झुकलेला वर्ल्डकप भारताकडे परत येताना दिसू लागला. सोळाव्या ओव्हरमध्ये बूमराहने फक्त चार धावा खर्च केल्या आणि मोक्याच्या क्षणी कच खाणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज गडबडले.

T-20 World Cup Final

5 सिक्स मारलेल्या हेनरीक क्लासेनला हार्दिक पांड्याने उजव्या यष्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू छेडायचा मोह झाला आणि सतराव्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर क्लासेन आउट झाला. सतराव्या ओव्हरमध्ये पांड्याने फक्त चार धावा केल्या आणि मैदानात उभ्या असलेल्या डेव्हिड मिलर आणि मार्का यान्सर यांच्यावर दबाव वाढला. आता प्रश्न होता. बूमराह शेवटची ओव्हर कधी टाकतो?

रोहित शर्माने शेवटची जोखीम घ्यायची ठरवली आणि आठरावी ओव्हर जसप्रीत बूमराहला दिली. जसप्रीतने त्याच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवला आणि साखळी फेरीत दक्षिण आफ्रिकेला फलंदाजीच्या जोरावर सामना जिंकवून दिलेल्या मार्का यान्सरचा त्रिफळा उडाला. अठराव्या ओव्हरमध्ये बूमराहने फक्त दोन धावा दिल्या आणि शेवटच्या दोन ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 20 धावांची गरज होती.

या स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक विकेट घेतलेला. अर्शदीप सिंगने एकोणिसाव्या ओव्हरसाठी बॉल हातात घेतला आणि गोलंदाजीला सुरुवात केली. त्याच्या समोर होता भारताविरुद्ध कसोटी सामन्यात धावा केलेला केशव महाराज, अर्शदीप अतिशय शिस्तबद्ध मारा करत एकोणिसाव्या ओव्हरमध्ये फक्त चार धावा दिल्या आणि शेवटच्या ओव्हर मध्ये दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 16 धावा हव्या होत्या.

T-20 World Cup Final:शेवटची ओव्हर महत्वाची ठरली

शेवटची ओव्हर टाकण्याची जबाबदारी आयपीएलमध्ये ट्रोल झालेल्या हार्दिक पांड्यावर येऊन पडली आणि हार्दिकने पहिल्याच चेंडूवर दक्षिण आफ्रिकेची शेवटची आस असणाऱ्या डेव्हिड मिलरला आउट केलं. 16 धावा हव्या असल्याने डेव्हिड मिलरणे लॉन्ग ऑफला चेंडू फटकावला आणि सूर्यकुमार यादवाने सीमारेषावर त्याच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा कॅच घेतला.

T-20 World Cup Final

कॉमेंटरी मध्ये नवज्योत सिंग सिद्धू म्हणत होता की, “हार की जबडे में हात डालके भारत ने जीत खिच कार लाई है.”

हार्दिक पांड्याच्या दुसऱ्या बॉलवर कासिगो रबाडाच्या बॅटरी कड घेऊन बॉल सीमारेषा कडे गेला आणि आफ्रिकेला चौकार मिळाला. आता शेवटच्या चार बॉलमध्ये 12 धावांची गरज होती आणि हार्दिकने पुन्हा एकदा डॉट बॉल टाकला आणि चोकर्सचा शिक्का बसलेल्या आफ्रिकेला पराभवाचा जवळ ढकळलं. 3 बॉलमध्ये 12 धावांची गरज असताना हार्दिक पांड्याने मिड विकेटला एक धाव दिली आणि शेवटच्या 2 बॉलमध्ये दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 10 धावा हव्या होत्या. समोर होता केशव महाराज आणि गोलंदाजी करत होता भारताचा उपकर्णधार हार्दिक पांड्या. आता दोन बॉलमध्ये 9 धावांची गरज होती. हार्दिकने या बॉलवर कासिगो रबाडाला आउट केलं आणि भारताचा विजय निश्चित केला.

2013 नंतर भारत पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकणारा होता. गेलेल्या वर्ल्ड कप हार्दिक आणि जसप्रीतने भारताच्या हातात आणून ठेवला होता आणि यात अतिशय कंजूस गोलंदाजी करणाऱ्या अर्शदीपचाही तेवढाच वाटा होता. कधीकाळी बलाढ्य फलंदाजीसाठी ओळखला जाणारा भारतीय संघ आणि भेदक गोलंदाजीच्या जोरावर विश्वविजेता बनला होता.

दक्षिण आफ्रिकेचं विश्वविजयाचं स्वप्न मात्र आधुरं राहिलं होतं.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!