Maharashtra Budget 2024
Maharashtra Budget 2024: महाराष्ट्रात अर्थसंकल्पीय अधिवेशन गुरुवारी सुरू झाले आहे, आणि आज राज्याच्या आर्थिक महत्वाचा दिवस आहे. कारण, आज राज्याच्या अर्थसंकल्प जाहीर होणार आहे. अर्थखाते सांभाळणारे उपमुख्यमंत्री अजित पवार आजच्या सत्रात अर्थसंकल्प सादर करतील. आजच्या अर्थसंकल्पात मराठा आरक्षण, अल्पसंख्याक कल्याण आणि शेतकऱ्यांबाबत या वर्षीच्या अर्थसंकल्पात मोठी घोषणा करणार असल्याची चर्चा आहे. अर्थसंकल्प म्हणजे काय प्रकार असतो? अर्थसंकल्पात काय असतं? अर्थसंकल्प का सादर केला जातो? तो बनवण्याची प्रक्रिया कशी असते, या बद्दल आपण अधिक माहिती घेणार आहोत.
अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकड्याचा खेळ नव्हे तर वर्षभरात गाठवयाची उदीष्टे आणि त्यासाठी उपलब्ध संसाधणे यांचा तो ताळेबंद असतो. आर्थिक शिस्तीच्या दृष्टीने जमा व खर्च यांचे वास्तुनिष्ट अंदाज तयार करणे आवश्यक असते. अर्थसंकल्प मार्च महिन्यात सादर होत असला तरी तो तयार करण्याची व त्याचा आढावा घेण्याची प्रक्रिया Maharashtra Budget 2024 वर्षभर सुरू असते.
अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे काय?
Maharashtra Budget 2024 अर्थसंकल्पाचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे पूर्ण अर्थसंकल्प आणि दुसरे म्हणजे अंतरिम अर्थसंकल्प अंतरिम अर्थसंकल्प अशा सरकारद्वारे सादर केला जातो. जो निवडणुकीपूर्वी त्याच्या कार्यकाळाच्या शेवटच्या वर्षात सादर करावा लागतो. सत्तेवर असलेल्या सरकार चालू आर्थिक वर्षाचा संपूर्ण काळ सत्ता राबविणार असेल तर पूर्ण अर्थसंकल्प सादर केला जातो. मात्र, आर्थिक वर्ष झाल्यानंतर सरकारची मुदत संपत असेल व त्यानंतर निवडणुका होऊन नवीन सरकार स्थापन होणार असेल तर अस्तित्वात असलेल्या सरकारला पुढील पूर्ण वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्याचा अधिकार नाही. यासाठी अंतरिम अर्थसंकल्प ही सोय करण्यात आली आहे.
अर्थसंकल्पात मांडलेले मुद्दे-अजित पवार
Maharashtra Budget 2024
- राज्यातील पेट्रोल, डिझेलवरील करात समानता आणण्याची घोषणा. मुंबई, ठाणे, नवीन मुंबई महापालिका क्षेत्रातील डिझेलवरील सध्याचा कार 24 टक्क्यावरून 21 टक्के केला जाणार. तर, पेट्रोलवरील कर 26 टक्क्यावरून 25 टक्क्यांवर आणला जाणार. त्यामुळे मुंबई, ठाणे व नवीन मुंबईत पेट्रोल 65 पैशांनी व डिझेल 2 रुपये 07 पैशांनी स्वस्त होणार
- नागपूर जिल्ह्यातील रामटेकच्या विकासासाठी पहिल्या टप्प्यात 150 कोटीची तरतूद दुसऱ्या टप्प्यात 211 कोटींची विकासकाम करणार.
- मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेची घोषणा. राज्यातील 44 लाख 6 हजार कृषि पंपधारकांना साडेसात हॉर्सपॉवर पर्यंत मोफत वीज दिली जाणार.
- दिव्यांगांसाठी धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजनेची घोषणा.
- सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंतरराष्ट्रीय दर्जाचं स्कूबा डायव्हिंग केंद्रस्थापण करणार.
- बुलढाणा जिल्ह्यात नवीन आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात येणार.
- सरकारी योजणाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी दरवर्षी 50 हजार युवकांना कार्य प्रशिक्षण देण्यात येईल.
- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची घोषणा.
- शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध व्हावी यासाठी मागेल त्याला सौर ऊर्जा पंप दिले जातील.
- जलयुक्त शिवार अभियान 2 अंतर्गत यावर्षी 650 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद.
- स्वच्छ व हरित ऊर्जेचे ध्येय साध्य करण्यासाठी सर्व उपसा जलसिंचन योजणाचे सौर ऊर्जिकरण करण्यात येणार.
- नवी मुंबईत बांधण्यात येणाऱ्या युनिटी मॉलमध्ये महिला बचत गटाच्या उत्पादनांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल जाईल.
- मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा. प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत दिले जाणार.
सप्टेंबर 2023 मध्ये सुरू होते प्रक्रिया
Maharashtra Budget 2024 आगामी वर्षाच्या अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया साधारणपणे सप्टेंबर मध्ये महिन्यातच सुरू झालेली असते. वर्ष 2023-2024 वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्याचे काम गेल्या सप्टेंबर 2023 पासून सुरू होते. अर्थसंकल्प तयार करण्यासाठी प्रशासनाने राबवायच्या प्रक्रियेचे वेळापत्रक व सूचना वित्त विभाग जारी करतो. प्रत्येक विभागांतर्गत येणारी सर्व राज्याबाहेरील, राज्यस्तरीय व क्षेत्रीय कार्यालये आपापले खर्चाचे अंदाज संबधित विभाग प्रमुखांना सादर करतात.
मागील व चालू वर्षातील खर्चाचे कल, येत्या वर्षातील गरजा लक्षात घेऊन हे अंदाज तयार होतात. विभाग प्रमुख छाननी नंतर सदर अंदाज वित्त विभागास सादर करतात. खर्चाप्रमाणे महसूल व जमा यांचीही अंदाज पद्धतीने तयार केले जातात. याशिवाय, केंद्र शासनाकडून मिळणारी अनुदाणे करतील हिस्सा आदि बाबिहि लक्षात घेतल्या जातात. या अंदाजांचे महसुली व भांडवली यमी भरीत व दत्तयत असे वर्गीकरण केले जाते.
अर्थसंकल्पाला बजेट का म्हंटले जात?
तसं पाहायला गेले तर बजेट हा शब्दफ्रेंच शब्द Bougetteपासून आलाय. याचा अर्थ आहे. चामडयाची ब्रीफकेस होय. बजेट हा शब्द इंग्लंडमध्ये सर्वप्रथम 1733 मध्ये वापरण्यात आला. भारताची सत्ता जेव्हा इस्ट इंडिया कंपनीकडून ब्रिटिश पार्लमेंटकडे गेली, त्यानंतर भारताचा पहिलं अर्थसंकल्प 7 एप्रिल 1860 रोजी जेम्स विल्सन याने मांडला. स्वातंत्र्यपूर्वी स्थापन झालेल्या अंतरिम सरकारमधील लियाकत आली खान यांनी 1947-48 चा अर्थसंकल्प मांडला. स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले वित्तमंत्री आर. के. शण्मुखम शेट्टी यांनी स्वातंत्र्यानंतरचा पहिलं अर्थसंकल्प 26 नोव्हेंबर 1947 रोजी मांडला.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!