पावसामुळे मॅच रद्द झाली, तर भारतीय टीमला मिळू शकते संधी; पहा कशी ते

T-20 World Cup 2024 Semi Final

T-20 World Cup 2024 Semi Final: टी-20 वर्ल्ड कप 2024 मध्ये भारताने एकही मॅच न हारता स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये आपले स्थान पक्क केल आहे. भारताने सुपर 8 मध्ये अफगाणिस्थान, बांग्लादेश आणि ऑस्ट्रेलिया या संघाचा पराभव केला आहे. आता सेमी फायनल मध्ये भारताचा सामना हा इंग्लंड सोबत होणार आहे. हा सामना गायनामध्ये गुरुवारी रात्री 8 वाजता सुरू होणार आहे. दोन वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात झालेल्या वर्ल्ड कप च्या सेमी फायनलमध्ये हे दोन संघ एकमेकांच्या विरुद्ध खेळले होते. त्या झालेल्या मॅचमध्ये इंग्लंडनी टीम ने भारताचा 10 विकेटने पराभव केला होता. या पराभवाचा बदला घेण्याची संधी भारतीय टीमला आहे.

टी-20 विश्वचषकात भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. गुरुवारी, 27 जून रोजी संध्याकाळी 8 (भारतीय वेळेनुसार) सामना सुरू होणार आहे. गयानाच्या प्रोव्हीडेंस स्टेडियम वर इंग्लंड आणि भारताचा आमनासामना (IND vs ENG T-20 World Cup 2024) होणार आहे. या स्पर्धेत टीम इंडिया आतापर्यंत विजयी राहिलेला आहे. गटविजेत्या इंग्लंडला ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघाकडून पराभवाचा सामना करावा लागलाय. या सामन्यावेळी जर पाऊस पडण्याची संभवणा सांगितली जात आहे. जर त्या ठिकाणी पाऊस पडला तर भारतीय संघ हा आता पर्यंत हारलेला नाही हा संघ एक नंबर चा संघ म्हणून डायरेक्ट फायनल खेळण्यास पात्र ठरेल. इंग्लंड हा संघ बाहेर जाईल.

T-20 World Cup 2024 Semi Final
T-20 World Cup 2024 Semi Final

पाऊस पडण्याची संभवना

भारतीय टीमनं 2007 साली झालेल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत विजेतेपद पटकावले होतं. त्यानंतर भारतीय संघाला चॅम्पियन होता आलेले नाही. ह्या वर्षीच्या स्पर्धेतील दमदार कामगिरी पाहून यंदा विजेतेपदाचा दुष्काळ संपेल, अशी भारतीय फॅन्सची मोठी अशा आहे. भारत विरुद्ध इंग्लंड (IND vs ENG) सेमी फायनलसाठी फॅन्समध्ये उत्साहाच वातावरण आहे. पण, त्यांच्या या उत्साहावर विरजण पडू शकत. कारण मंचवर पावसाच सावट आहे. AccuWeather नुसार मॅचच्या दरम्यान पावसाची शक्यता दर्शवली आहे.

T-20 World Cup 2024 Semi Final स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजता गयानामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे मॅच उशिरा सुरू होऊ शकते. स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत (भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 ते सकाळी 3.30 पर्यंत) पावसाची शक्यता 35 ते 68 टक्के आहे. त्याचबरोबर मॅचच्या दरम्यान गयानाच्या प्रोव्हीडेंस स्टेडियमवर ढगांची गर्दी असेल. मॅच दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता नाही, पण सतत होणाऱ्या पावसामुळे मॅचला विलंब होऊ शकतो. हवामान विभागानुसार गयानामध्ये सकाळी 60 टक्के पावसाची शक्यता आहे. भारत विरुद्ध इंग्लंड मॅचसाठी कोणताही रिझर्व्ह दिवस ठवलेला नाही. अर्थात या सामन्यासाठी 250 मिनिटे अतिरिक्त वेल आहे.

त्यामुळे हा सामना पूर्ण होण्यासाठी बराच वेळ लागेल. त्याबरोबर सेमी फायनलसाठीच्या नव्या नियमानुसार मॅचचा निकल लागण्यासाठी दोन्ही इनिंगमध्ये किमान 10 ओव्हर्सचा खेळ आवश्यक आहे. सुपर 8 मध्ये मॅचचा निकाल लागण्यासाठी 5-5 ओव्हर्सचा खेळ आवश्यक आहे.

रोहित शर्मा आणि बटलर जबरदस्त फॉर्मात

रोहित आणि बटलर शानदार फॉर्म मध्ये आहे. दोन्ही फलंदाज मैदानावर टिकले तर एकहाती स्मन फिरवू शकतात. षटकार आणि चौकरांचा पाऊस पाडणाऱ्या या फलंदाजांना तुम्ही कर्णधार अथवा उपकर्णधार करू शकता. बटलरने विश्वषटकात आतापर्यंत 6 डावात 47.75 च्या सरासरी 191 धावा केल्या आहेत. रोहित शर्माने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 92 धावांची झंझावती फलंदाजी केली होती. रोहित शर्माने ही 6 सामन्यात 192 धावा केल्या आहेत.

सध्या भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीची बॅट या विश्वचषकात शांत राहिला आहे. पण उपांत्य सामन्यात तो फलंदाजी करण्याची शक्यता आहे. सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत यांनाही दडपणाखाली महत्वाच्या खेळी खेळली आहे. हार्दिक पांड्याने अष्टपैलू कामगिरी केली आहे. फील सोल्ट आणि हॅरी ब्रूक यांनीही प्रभावी फलंदाजी केली आहे.

T-20 World Cup 2024 Semi Final: बूमराह जबरदस्त फॉर्म मध्ये

भारताचा हुकूमी एक्का जसप्रीत बूमराह शानदार फॉर्मत आहे. बूमराहने सहा सामन्यात 11 विकेट घेतल्या त्यांचा इकॉनॉमी फक्त 4 इतका आहे. अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि अरशदिप यांनाही भेदक मारा केलंय इंग्लंडच्या वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि ख्रिस जॉर्डन हे गोलंदाजीही प्रभावी ठरू शकतात. भारताचा कुलदीप यादव आतापर्यंत शानदार लयीत दिसलाय.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!