नॅशनल क्रॅश अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि आयुष्मान खुराना, हॉरर युनिवर्समध्ये एंट्री

Vampires of Vijayanagar

Vampires of Vijayanagar: ‘मुंज्या’ सिनेमा हा आदित्य सरपोतदार दिग्दर्शित आणि दिनेश विजान निर्मित सुपरहिट झाला. ह्या सिनेमाने प्रेक्षकांना घाबरवलही आणि हसवलंही. हा सिनेमा हॉरर कॉमेडी आहे, हा सिनेमा सर्वाना आवडलेला आहे ह्या नंतर ही जोडी आणखी एक धमाका करण्याच्या तयारीत आहे. व्हॅम्पायर्सवर (Vampires) सिनेमा आणण्याची त्यांची योजना आहे. तसचं यामध्ये फ्रेश जोडी पाहायला मिळू शकते.

या सिनेमामध्ये आपल्याला नॅशनल क्रॅश रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) ही हॉरर युनियर्समध्ये (Horror Universe) मध्ये एंट्री करण्यासाठी सज्ज झाली आहे. रश्मिका आता हॉरर चित्रपटात झळकणार आहे. रश्मिका ही तिच्या गोड हास्य आणि निरागस चेहऱ्यामुळे तरुणांच्या गळ्यातील ताईट बनली आहे. रश्मिका मंदाना अभिनेता आयुष्मान खुराना सोबत (Ayushmann Khurrana) या हॉरर कॉमेडी चित्रपटात (Vampires of Vijayanagar) रोमान्सचा तडका लावताना दिसणार आहे.

Vampires of Vijayanagar
Vampires of Vijayanagar

हा सिनेमा निर्मित करणारे दिनेश विजान यांची हॉरर कॉमेडी ही खासियतच आहे. या अगोदर निर्मित केलेले ‘स्त्री’ आणि आता ‘मुंज्या’ या सिनेमामुळे त्यांनी बॉलीवूडमध्ये जान आणली. त्यांनी ‘भेडिया’ हा सुध्दा निर्मित केलेला आगळावेगळा सिनेमा आहे. आता आगामी Vampires वर आधारित सिनेमाही याच हॉरर कॉमेडीचा भाग असणार आहे. पिंकव्हीला च्या रिपोर्टनुसार, या सिनेमाच ‘व्हॅम्पायर्स ऑफ विजय नगर’ (Vampires of Vijayanagar) असणार आहे. या सिनेमात तुम्हाला आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana)आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) ही फ्रेश जोडी सिनेमात बघायला मिळू शकते. या अगोदर आयुष्मान खुराना याने दिनेश विजान यांच्या ‘बाला’ सिनेमात काम केलं आहे. सिनेमाच्या या सेटवर बरेच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात मेकर्स ला सिनेमाच शूट सुरू होणार आहे.

दिनेश विजान यांनी आपल्या सिनेमाची सुरुवात ही 2018 साली ‘स्त्री’ या सिनेमापासून सुरुवात केली. तब्बल 6 वर्षानंतर ‘स्त्री 2’ प्रदर्शित होणार आहे. सध्या दिनेश विजान यांचे ‘व्हॅम्पायर्स ऑफ विजय नगर’ या सिनेमाच स्क्रिप्टवर काम सुरू आहे. लवकरच यांच्या प्री प्रोडक्शनला सुरुवात होईल. नोव्हेंबर पर्यंत शूटिंगला सुरुवात होणार आहे. आयुष्मान खुराना करण जोहर यांच्या एका स्पाय थ्रीलर सिनेमातही दिसणार आहे. शिवाय बॉर्डर 2 मध्येही तो झळकणार आहे. तर रश्मिका ही ‘पुष्पा 2’ मध्ये श्रीवल्ली बनून परत येत आहे.

ह्या फ्रेश जोडीची हॉरर युनिवर्समध्ये एंट्री

बॉलीवूडमध्ये सध्या हॉरर कॉमेडी चित्रपट हे चालत आहे. एका बाजूकडे मुंज्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कनेक्शनचा 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर दुसऱ्याबाजूकडे स्ट्री 2 या सिनेमाचा ट्रेलर समोर आल्यापासून प्रेक्षकांना त्यांची प्रतीक्षा लागली आहे. यातच आता रश्मिका मंदाना ही हॉरर कॉमेडी रोमान्स चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. आदित्य सरपोतदार दिग्दर्शित आणि दिनेश विजान निर्मित यांच्या आगामी हॉरर सिनेमात रश्मिका मंदाना आणि आयुष्मान खुराना झळकणार आहेत.

या सिनेमात मुख्य भूमिका

श्रद्धा कपूर, राजकुमार राव, कृती सेनन आणि वरुण धवन यांच्या नंतर आता आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदाना ही सूद्दा हॉरर चित्रपटांकडे वळताना दिसत आहेत. या सिनेमात दिग्दर्शक आदित्य सरपोतदार आणि दिनेश विजान यांच्या ‘व्हॅम्पायर्स ऑफ विजय नगर’ या चित्रपटात अभिनेता आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदाना हे दोघे स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

सिनेमासाठी एका अभिनेत्री नाव चर्चेत, तर एकीची निवड

दिनेश विजान यांच्या ‘व्हॅम्पायर्स ऑफ विजय नगर’ Vampires of Vijayanagar या चित्रपटाबाबत चर्चा सुरू आहे. या सिनेमासोबत अभिनेत्री समंथा प्रभूच नाव सूद्दा जोडले जात होत. परंतु यामध्ये समंथा ची निवड न करता रश्मिकाची निवड झाल्याच समोर आलं आहे. या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात मेकर्स ला सिनेमाच शूट सुरू होणार आहे. या सिनेमाची संपूर्ण प्लॅनिंग झाली असल्याचं ही समोर आले आहे. या सिनेमात रश्मिका आणि आयुष्मान यांच्या भूमिका देखील काहीशा वेग वेगळ्या असणार आहे. सध्या सिनेमाच्या कथेवर काम सुरू आहे.

रश्मिका चा रोमान्स

मिडिया रिपोर्टसनुसार, आदित्य सरपोतदार दिग्दर्शित आणि दिनेश विजान यांच्या आगामी हॉरर कॉमेडी सिनेमासाठी मुख्य कलाकारांची निवड झालेली आहे. ‘व्हॅम्पायर्स ऑफ विजय नगर’ (Vampires of Vijayanagar) या सिनेमात आयुष्मान आणि रश्मिका हॉरर डेब्यू करताना दिसतील, आयुष्मानने याआधी दिनेश विजानसोबत ‘बाला’ या सिनेमात एकत्र काम केल आहे.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!