पुण्यात पुन्हा भीषण अपघात; आमदाराच्या पुतण्याचा कारनामा! दोघांना चिरडलं, एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी

Pune Accident

Pune Accident: पोर्शे कार अपघात प्रकरण ताजे असतानाच पुण्यात पुन्हा एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कार चालकाने बेदरकारपणे गाडी चालून एका दुचाकीस्वाराला चिरडलं आहे. महत्वाचे म्हणजे, यावेळी ही कार खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या चालवत असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता विविध चर्चानादेखील उधाण आलं आहे. शनिवारी रात्री पुणे (Pune Accident) नाशिक महामार्गावर हा अपघात झाला आहे. या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून तर एक जण गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे. हा अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले.

आमदाराचा पुतण्या अपघातानंतर तिथून निघून गेला, त्यानं अपघातग्रस्तांना कोणतीही मदत केलेली नाही. तसेच अपघातावेळी त्यानं मद्यप्राशन केल होत, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. या अपघात प्रकरणी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरा पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. मयूर मोहिते पाटील अस आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याच नाव आहे. महत्वाचे म्हणजे ज्या वेळी अपघात झाला. त्यावेळी चालकाने मद्य प्राशन केल होत का? याचाही तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Pune Accident
Pune Accident

दरम्यान या अपघातानंतर आता आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी या संदर्भात वृत्त वाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे. हा अपघात रात्रीच्या अंधारात झाला आहे. हा अपघात नेमका कसा झाला. याची कुठलीही कल्पना मला नाही. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत. पण ज्यावेळी हा अपघात झाला पुतण्याने मद्यप्राशन केलेल नव्हत आणि हा अपघात झाल्यानंतर तो स्वत: पोलिस ठाण्यात हजर झाला, असे ते म्हणाले.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक (Pune Accident) महामार्गावर असणाऱ्या एकलहरे गावाजवळ ओम भालेराव हा मंचरहून कळंबच्या दिशेने क्रमांक एम. एच. 04 4429 गाडीने येत होता. त्यावेळी कळंब बाजूकडून मंचरकडे येणारी फॉरच्यूनर गाडी क्रमांक एम. एच. 14 के. जे. 7557 वरील चालकाने भरधाव वेगाने रोडच्या विरुद्ध बाजूने चालवून मोटर सायकलला जोरात धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात ओम भालेराव यांच्या डोक्याला मार लागला. तर दूसरा गंभीर जखमी झाला आहे. ओमला प्राथमिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे पाठवण्यात आले होते.

मात्र, त्याचा उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. अपघातानंतर मयूर हा घटनास्थळी न् थांबता निघून गेला. त्यामुळे नितीन भालेराव यांनी मंचर पोलिस स्टेशनमध्ये मयूर मोहिते विरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी अधिक तपास मंचर पोलिस करत आहेत.

माझा पुतण्या पळून गेला नाही, दारूही प्यायलेला नव्हता: आमदार दिलीप मोहिते पाटील

आमदाराचा पुतण्या अपघातानंतर तिथून निघून गेला, त्यानं अपघातग्रस्तांना कोणतीही मदत केलेली नाही. तसेच अपघातावेळी त्यानं मद्यप्राशन केल होत. त्यावर बोलताना दिलीप मोहिते पाटील म्हणाले की, माझा पुतण्या अद्याप पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिस अजूनही चौकशी करतील, पोलिसांनी माझ्या पुतण्याचे वैद्यकीय तपासणीसाठी सॅम्पल्स घेतलेले आहेत. अपघातग्रस्त तरुणाला माझ्या पुतण्यान अॅम्बूलन्समध्ये टाकल आहे. त्यामुळे इतर आरोपात मला तथ्य वाटत नाही. पण मी अपघातस्थळी नव्हतो. त्यामुळे या सर्व घडामोडीची मी नक्कीच शहानिशा करीन.

Pune Accident

दोघांना आपल्या वेगवान कारनं चिरडणारा पुण्याच्या आमदारांचा पुतण्या मयूर मोहिते नेमका कोण?

पुणे नाशिक महामार्गावर कळंब नजीक झालेल्या अपघात Pune Accident प्रकरणात खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयूर मोहितेनं भरधाव कार चालवत दोघांना चिरडल्याची घटना पुणे नाशिक महामार्गावर घडली. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर आहे. या घटनेतील मुख्य आरोपी मयूर मोहिते हा पुण्यातील खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या आहे. आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे सख्खे बंधु साहेबराव मोहितेचा मयूर मोहिते पाटील मुलगा आहे.

आमदार मोहितेंच्या पाठोपाठ पुतण्या मयूर सर्व राजकीय धुरा सांभाळतो. तो इंजिनियर असून सध्या कुटुंबाचा व्यवसाय सांभाळतो. तसेच, मयूर सध्या जिल्हा परिषेदेची निवडणूक लढण्याची तयारी करत असून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे.

Pune Accident: नेमका कसा घडला अपघात?

पुण्यातील खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्यानं बेदरकारपणे गाडी चालवून दोघांना आपल्या गाडीनं चिरडलं. या घटनेत ओम भालेराव (वय 19 वर्ष) तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या मयूर हा पुणे – नाशिक महामार्गावरून कारनं पुण्याच्या दिशेने येत होता. तो विरुद्ध दिशेने सुसाट गाडी चालवत होता. त्यावेळी समोरून आलेल्या डॉन दुचाकीस्वाराना त्याच्या भरधाव कारनं धडक दिली. अपघात इतका भीषण होता. की दुचाकी हवेत उडाली आणि दुचाकीवरील तरुण रस्त्याच्या कडेला जाऊन पडले.

यापैकी एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर अपघातातिल दूसरा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उचर सुरू आहेत. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून सखोल तपास सुरू आहे.

Pune Accident

मयूर मोहिते पाटलांविरुद्ध गुन्हा दाखल

मंचर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार शनिवारी (22 जून) रात्री 9.25 वाजता एकलहरे (ता. आंबेगाव, जि. पुणे) गावाच्या हद्दीतिल नाशिक पुणे जुना महामार्ग रोडवर मयूर मोहिते पाटील याने कारने ओम भालेराव यांच्या दुचकीला धडक दिली. कारने दिलेली धडक इतकी भीषण Pune Accident होती की, दुचाकी दूर उडाली. या अपघातानंतर मयूर मोहिते पाटील याने मदत न् करता कारमध्ये बसून होता. या घटनेनंतर मृतांच्या नतेवाईकांशी आणि जमा झालेल्या लोकांना मंचर पोलिस ठाण्याबाहेर मोठी गर्दी केली. त्यामुळे तनाव निर्माण झाला होता. या प्रकरणी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या मयूर मोहिते पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयूर मोहितेने मद्य प्राशन केले होते की नाही? याचा तपासही पोलिस करत आहे. दरम्यान, पुतण्याने मद्य प्राशन केलेले नव्हते, असे दिलीप मोहिते पाटलांनी माध्यमाशी बोलताना सांगितले.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!