Bigg Boss OTT 3
Bigg Boss OTT 3: तरुण कलाकारांना लाजवेल अशा उत्साहनं आणि ऊर्जेनं अभिनेता अनिल कपूर पडद्यावर वावरत असतात. एकामागोमाग एक सिनेमात महत्वपूर्ण भूमिका सकरणारे एव्हरग्रीन अनिल कपूर आता ‘बिग बॉस’ म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. आगामी ‘Bigg Boss OTT 3’ चं ते सूत्रसंचालन करणार आहेत. बिग बॉस म्हणून अनिल कपूर यांची पहिली झलक सोशल मिडियावर तूफान व्हायरल झाली आहे.
चाहत्यांना नव्या ‘बॉस’ विषयी उत्सुकता आहेत. काही दिवसांपूर्वी अनिल कपूर यांनी सोशल मिडियावर लिहिलं होत की, ‘सुना है…बिग बॉस ओटीटी 3 का होस्ट बडा गुड लुकिंग है’ तर हा गुड लुकिंग सूत्रसंचालक दस्तरखुद्द स्वत: अनिल कपूर असण्यावर आता शिक्कामोर्तब झालय. आता ही जबाबदारी ते कशी निभावतात हे लवकरच समजेल.
Bigg Boss OTT 3 यंदा सलमान खान नाही तर अनिल कपूर होस्ट करणार आहे. 21 जूनपासून जियो सिनेमावर हा शो दाखवण्यात येईल. या सीझनमधील सर्व स्पर्धक प्रेक्षकांच मन जिंकण्यासाठी सज्ज आहेत. बिग बॉसच्या प्रत्येक सीझनमध्ये कोणते स्पर्धक असणार यांची अनेकांना उत्सुकता असते. आत्तापर्यंत फक्त दिल्लीची वडा पाव गर्ल चंद्रिका हे एकच नाव कन्फर्म असल्याची माहिती समोर आली होती. पण, इंडिया टूडेच्या एका रिपोर्ट नुसार युट्यूबर्स पर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींचा संवेश आहे.
Bigg Boss OTT 3 ह्या सीजनमध्ये सहभागी स्पर्धक
बिग बॉसच्या या सीझन मध्ये सहभागी होणारा पहिला स्पर्धक आहे सई केतन राव. टीव्ही मालिका नियमित पाहणाऱ्यांसाठी हा ओळखीचा चेहरा आहे. केतनणं आत्तापर्यंत मेहंदी है रचने वाली, चाशनी आणि इमली या मलिकांमध्ये काम केलंय. पॉलमी पोलो दास हे दुसरं नाव आहे. पॉलमीनं 2016 मध्ये इंडियास नेक्स्ट टॉप मॉडेल शोच्या माध्यमातून कारकीर्द सुरू केली. त्यानंतर ‘सुहाणी सी एक लडकी’, ‘दिल ही तो है’ आणि कार्तिक पूर्णिमा मध्ये दिसली होती.
टिकटॉक कन्टेंट क्रिएटर आणि मॉडेल सना सुलतान ही तिसरी स्पर्धक आहे. सना आत्तापर्यंत वेगवेगळ्या पंजाबी म्युझिक व्हिडिओमध्ये दिसलिय. या सीझन मधील चौथी स्पर्धक आहे. अभिनेत्री सना मकबुल. ‘कितनी मोहब्बत है’, ‘इस प्यार कॉ कया नाम दु’ या मालिकांमध्ये तुम्ही सर्वांनीच सनाला पहिल असेल.
- लव्ह कटारीया – सोशल मिडिया इन्फ्लूएन्सर
- नीरज गोयत – बॉक्सर
- सना मकबुल – अभिनेत्री
- साई केतन – अभिनेता
- नेझी – रॅपर
- पॉलोमी दास – अभिनेत्री
- अरमान मलिक – सोशल मिडिया इन्फ्लूएन्सर
- पायल मलिक -सोशल मिडिया इन्फ्लूएन्सर
- कृतिका मलिक – सोशल मिडिया इन्फ्लूएन्सर
- शिवानी कुमारी – सोशल मिडिया इन्फ्लूएन्सर
- सना सुलतान – अभिनेत्री
- दीपिका चौरसिया – पत्रकार
- चंद्रिका दीक्षित – वडा पाव गर्ल
- विशाल पांडये – सोशल मिडिया सेन्सेशन
अभिनेत्री प्रमाणेच सोशल मिडिया इन्फ्लूएन्सर शिवानी कुमार देखील बिग बॉस ओटीटी सीझन 3 मध्ये असेल. उत्तर प्रदेशच्या शिवानीचे इन्स्टाग्रामवर 4 लाखांपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत. इन्फ्लूएन्सर विशाल पांडे हा सहावा स्पर्धक आहे. त्यांच्या फॅन्सची संख्याही मोठी आहे.
सातवी स्पर्धक आहे, चंद्रिका गेरा दीक्षित स्पर्धक आहे. चंद्रिका दिल्लीची वडा पाव गर्ल म्हणून प्रसिद्ध आहे. गायक नेजी हा आठवा स्पर्धक आहे. नेजी हा रॅपर देखील असून तो रणविर सिंहच्या ‘गली बॉय’ चा फॅन आहे. कुस्तीपटू नीरज गोयत हा नववा स्पर्धक आहे. कुछ रंग प्यार के मधील अभिनेत्री चेष्टा भगत देखील या सीझनमध्ये सहभागी होणार आहे. ती अकरावी स्पर्धक आहे. तर डिजे आणि रियलिटी शोचा कलाकारप निखिल मेहता हा बारावा स्पर्धक आहे.
तेराव आणि शेवटच नाव अभिनेत्री आणि टॅरो कार्ड रीडर मुनीषा खाटवाणी हे आहे. अर्थात ही नवे अधिकृत आहेत की नाही हे तर शो ऑन एअर झाल्यानंतरच कळेल.
तरुणांसाठी खास सल्ला
दरम्यान, एव्हरग्रीन अभिनेता म्हणून अनिल कपूर यांना ओळखल जात. वयाची साठी ओलांडूनही त्यांनी राखलेल्या फिटनेससाठी त्याच कौतुक होत. बॉलीवूडमध्ये दीर्घकाळ करियर करायच असेल, तर युवा कलाकारांनी मोठ्या मानधनाचा अट्टाहास सोडावा, त्यावर अडून राहून नये, त्या एवजी चांगल्या भूमिका आणि काम कस मिळेल, याकडे लक्ष द्याव, असा सल्ला ते देतात. हा सल्ला देतांनाच त्यांनी लेक सोनम आणि रेहा कपूर, तसंच मुलगा हर्षवर्धन कपूर या तिघांनी मनोरंजन सृष्टीत स्वत:च्या हिंमतीवर काम मिळवल्याबद्दल त्यांच कौतुकही केल आहे. अनिल नुकतेच हृतिक रोशन आणि दीपिका पडूकोण यांच्या ‘ फायटर’ या चित्रपटात दिसते.
कधीपासून पाहता येईल Bigg Boss OTT 3?
अनिल कपूर यांना अशाप्रकारे बिग बॉस ओटीटी सारख्या शोमध्ये पहिल्यांदाच होस्ट म्हणून जबाबदारी निभावत असून हे पर्व 21 जून पासून सुरू होत आहे. जिओ सिनेमावर Bigg Boss OTT 3 हे नवे पर्व पाहता येणार आहे. याआधीचे दोन्ही सीझन प्रेक्षकांना मोफत पाहता आले होते, यंदा मात्र प्रीमियम प्लॅन खरेदी करावा लागणार आहे.
अनिल कपूर यांच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास अलीकडेच ते ‘अॅनिमल’ आणि ‘फायटर’ या सिनेमात दिसले होते. त्यांचे दोन्ही चित्रपट हिट ठरले. आगामी काळात ते सुरेश त्रिवेणीच्या ‘सुभेदार’ या चित्रपटात दिसणार आहेत. याशिवाय ते YRF स्पाय युनिव्हर्स मध्येही दाखल होणार असल्याचे समोर आले आहे.
बिग बॉसच्या घराची थीम (Bigg Boss OTT House)
बिग बॉसच्या सेटचे डिझायनर ओमंग कुमार आणि त्यांची पत्नी वनिता यांनी सांगितले की, बिग बॉस ओटीटी सीजन 3 साठी एक वेडं करणार काल्पनिक जग आम्ही निर्माण केल आहे. या घरात ड्रॅगन्, युनिकॉर्न, कुलूप, किल्ली असं सगळ आहे. तसेच काही योद्धा देखील आहेत जे आर्टिफिशियन इंटेलिजन्स च्या माध्यमातून तयार करण्यात आले आहेत.
कुठे पाहता येणार Bigg Boss OTT चा तिसरा सीझन?
बिग बॉस ओटीटीचा तिसरा सीझन पाहायचा असेल तर प्रेक्षकांना Jio Cinema App डाउनलोड करून या ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रीप्शन घ्याव लागणार आहे, तसंच प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या साठी दर महिन्याला 29 रुपये त्यांना खर्च करावे लागणार आहेत.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!