Manoj Jarange
Manoj Jarange: मराठा आरक्षणामध्ये सगे सोयऱ्यांचाही समावेश करण्यात यावा या मागणीसाठी सुरू असलेल मनोज जरांगे पाटील यंच आमरण उपोषण स्थगित झालं आहे. जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटीमध्ये सुरू असलेल्या या उपोषणाचा गुरुवार, 13 जून सहा दिवस होता गेल्या काही दिवसांपासून जरांगे यांची प्रकृती खालावली होती. अखेर राज्य सरकारी मध्यस्थी यशस्वी झाली असून जरांगे पाटील यांनी एक महिन्यासाठी उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली आहे. सगेसोयऱ्यांसाह मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारला एक महिन्याचा वेळ द्यावा, अशी विनंती देसाई यांनी केली होती. त्यानंतर जरांगे यांनी हे उपोषण स्थगित केलं आहे.
जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या भेटीला सरकारच्या शिष्टमंडळात खासदार संदीपान भूमरे, राज्याच्या महायुती सरकारमधील मंत्री शंभुराज देसाई यांनी 1 महिन्यात सगेसोयरे मागणीसह जरांगे यांनी सरकार कडे दिलेल्या मागण्यावर निर्णय होणार असल्याचा शब्दह दिल्यावर मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण स्थगित केल आहे. यावेळी छत्रपती संभाजी नगरचे नुकतेच झालेले खासदार संदीपान भूमरे, राणा जगजितसिंह यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सरकार सग्यासोयऱ्यांच्या कायद्याबद्दल सकारात्मक असून सरकारचे प्रतिनिधि म्हणून 1 महिन्यात या विषयांवर निर्णय घेण्याचे आश्वासन मंत्री शंभुराज देसाई यांनी उपस्थित जनसमूदाय समोर दिल्यावर उपस्थितांनी एक मराठा लाख मराठ्यांचा घोष केला. सरकारला यामुळे 13 जुलै पर्यंतचा वेळ मिळाला असून या दरम्यान ते आपला शब्द पुरा करतील अशी अपेक्षा जरांगे यांनी व्यक्त केली.
यानंतर खालावलेल्या तब्येतीमुळे जरांगे यानं उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हालविण्यात आले आहे.
Manoj Jarange News: मनोज जरांगे काय म्हणाले होते?
सरकारला आम्हाला खेळवत राहील तर मी विधानसभेला उभं राहीन असा इशाराही त्यांनी दिला होता. ते म्हणाले, उपोषण असे कसे स्थगित होईल. त्यांनी त्यांचे लोक इथे पाठवून जाहीर कराव की हे कीती दिवसात करतील.
57 लाख नोंदी मिळाल्यात त्याच्या आधारे कायदा कीती दिवसात पारित करतील कीती दिवसात आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतील? हे स्पष्ट करायला हव. उपोषण स्थगित होईल पण.. कीती दिवसात करणार आहेत ? का लगेच करणार आहेत? असे प्रश्न अनेक परक्ष आहेत.
जरांगे यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे;
- ओबीसी नेते स्वत:ला प्रगलभ विचारायचे म्हणून घेतात आणि इकडे बसणार आणि तिकडे बसणार म्हणतात, जिथे तेढ निर्माण होईल. तिथे तुम्ही बसणार का शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेऊन नुसते भाषण ठोकतात.
- हे सरकारच षड्यंत्र आहे. मुख्यमंत्र्याला आम्ही चांगले मानतो शिंदे साहेबांना आजपर्यंत आम्ही चांगल मानतो. मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीने अजून काय नवीन षड्यंत्र रचले काय माहीत? काय आमच्या बांधवांना ते दिल्लीला घेऊन जाऊ लागलेत.
- ओबीसी नेते समजूनच घेत नाहीत मुळात म्हणजे ओबीसीना धक्काच लागत नाही ओबीसीचा यांच्याशी संबंध येत नाही मराठा हाच कुणबी आहे कुणबी हाच मराठा आहे ते जाणून बुजून समाजात तेढ निर्माण करत आहेत. मुख्यमंत्र्याना मी आजही चांगल मानतो मात्र त्यांचे ओएसडी लोकांना घेऊन दिल्लीला पळत आहेत मुंबई संपली आत दिल्लीला पळत आहे. काय साचा बनवून आणला असेल मला बदनाम करण्यासाठी किंवा मराठ्यांना बदनाम करण्यासाठी.
- वेळोवेळी असच होत राहिले रात समाज तरी कीती दिवस गप्प बसणार आहे? कदाचित माझे शेवटचे उपोषण असेल असेच तुम्ही खेळवत राहिले तर मी डायरेक्ट विधानसभेच्या तयारीला लागेल.
- मी शिंदे साहेबांना आणि गृहमंत्री फडणवीस साहेबांना सांगतो की मी असच उपोषण स्थगित करू शकत नाही, काही गोष्टी सविस्तर माहिती झाल्या पाहिजे, सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी तुम्ही लगेच करणार का कीती दिवस सात करणार आहेत केसेस लगेच मागे करणार की कीती दिवसात करणार हे मला डिटेल पाहिजे, असे जरांगे म्हणाले.
- आम्ही थोडे दिवस उपोषण करू तरी कीती दिवस उपोषण करणार तुम्ह जाणून- बुजूनच आम्हाला मारायला निघाला असता तर लागतील गोरगरीब मराठा सर्व जाती धर्माचे लोक विधानसभेच्या तयारीला. एवढा मोठा विषय मराठ्यांच्या आयुष्याचा आहे, लांबून गोळ्या मारून होत असत का? प्रत्यक्ष चर्चा करूनच होईल माझ्या मते प्रतीक्षा चर्चा करून विषय गोडी गुलाबीने हाताळा उगाच तयारी नका करू जाळ रचून षड्यंत्र रचून.
- मला माझ्या समाजाला आरक्षण पाहिजे ते कोणीही द्या आमचा शिंदे साहेबावरती सरकार वरती आजही विश्वास आहे. देवेंद्र फडणवीस हे शत्रू नाहीत आमचे हे मी मागे सांगितले आहे. ते कार्य करतात. ते आपल्याला जमत नाही. जातीच्या आणि आरक्षणाच्या विरोधात बोलले की मी कोणाचे खपवून घेत नाही त्यांनी हे सर्व बंद कराव ते काय माझे शत्रू आहेत का?
- आमच्या सगळ्यावरतीच विश्वास आहे. आम्हाला आरक्षण द्या, कोणीही द्या मराठी त्यांना डोक्यावर घेऊन नाचतील.
आरक्षणाचा प्रश्न कायद्याच्या चौकटीत राहून सोडवू
पुढे बोलताना, मराठा आरक्षणाचा प्रश्न कायद्याच्या चौकटीत राहून सोडवू, यावर येणाऱ्या हरकती या मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर ठेवल्या जातील. अस शंभुराज देसाई म्हणाले, तसेच मागील दोन महीने राज्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू होती. त्यामुळे या संदर्भातील निर्णय घेण्यास विलंब झाला. मात्र, या संदर्भात मी उद्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. सगेसोयऱ्यांच्या नियमांची अधिसूचना काढण्याबाबत लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, अस आश्वासनही त्यांनी मनोज जरांगे यांना दिल.
सरकारवर केला होता आरोप
जरांगे पाटील यांनी यापूर्वी ‘चर्चा करून गोड बोलून माझा काटा काढण्याचा डाव आहे, असा अंदाज दिसतोय,’ असा गंभीर आरोप सरकारवर केला होता. माझ्या आंदोलनाची सरकारकडून दखल घेतली जात नसून मला खेळवणं सुरू आहे. सरकारनं या आंदोलनाची दखल घेतली नाही तर मराठा समज चांगला हिसका दाखवेल, असं इशारा जरांगे यांनी दिला होता. गेल्या दोन दिवसांमध्ये हे उपोषण माग घेण्यासाठी सरकारी पातळीवरून जोरदार प्रयत्न झाले, त्याला अखेर यश आल आहे.
सरकारला अलटीमेटम
मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारला एक महिन्याचा वेळ द्यावा, अशी विनती देसाई यांनी केली होती. त्यानंतर जरांगे पाटील यांनी हे उपोषण 13 जुलैपर्यंत स्थगित केल आहे. येत्या 13 जुलै पर्यंत सर्व गोष्टींची रीतसर पूर्तता करावी अस जरांगे यांनी सरकारला यावेळी सांगीतलं. मराठा आंदोलनाच्या काळातील सर्व गुन्हे मागे घ्यावेत अशीही मागणी त्यांनी केली. पण गंभीर गुन्हे मागे घेता येणार नाहीत, असे देसाई यांनी यावेळी स्पष्ट केल.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!