Hit and Run Case
Hit and Run Case: पुण्यात हिट अँड रन (Hit and Run Case) प्रकरण ताजं असतानाच नागपुरातही तसाच प्रकार घडला. पण, या हिट अँड रन प्रकरणानं एक वेगळं वळण घेतलं आणि हळूहळू अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या.
जवळपास ३०० कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या वादातून एका वृद्धाची सुपारी देऊन हत्या करण्यात आली. वृद्धाला कारने धडक देऊन अपघाताचा बनाव करण्यात आला. मृतकाच्या चुलत भावाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार समोर आला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या प्रकरणात मृतकाच्या सुनेनेच सुपारी दिल्याची बाब समोर आली आहे. तिने ड्रायव्हरच्या मदतीने हा प्रकार घडवून आणला असल्याची माहिती चौकशीतून समोर आली आहे. अर्चना पुट्टेवार असे तिचे नाव असून ती सरकारी अधिकारी आहे. पोलिसांनी तिला अटक केली आहे.
पुरुषोत्तम पुट्टेवार (८२, शुभनगर, मानेवाडा) यांचा २२ मे रोजी मानेवाडा चौकाजवळ कारच्या धडकेत मृत्यू झाला होता. त्यांची ३०० कोटींची वडिलोपार्जित मालमत्ता आहे. त्यांच्या कुटुंबात पत्नी शकुंतला, मुलगा डॉ.मनिष, सून व मुलगी आहे. पुट्टेवार यांच्या पत्नीचे ऑपरेशन झाले असल्याने डॉक्टर असलेल्या मुलाने त्यांना दवाखान्यात ठेवले होते.पुट्टेवार २२ मे रोजी तेथून मुलीच्या घरी जात असताना कारच्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला. अजनी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
दरम्यान, पुट्टेवार यांच्या चुलत भावाने वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांची हत्या झाल्याची भीती व्यक्त केली. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना केल्या. त्याआधारे तपास युनिट-४ कडे सोपवण्यात आला. पोलिसांच्या चौकशीत त्यांच्या घरातील कार चालक सार्थक बागडे याची भूमिका संशयास्पद आढळून आली. या दिशेने चौकशी केली असता सचिन धार्मिक आणि नीरज निमजे ऊर्फ नाईंटी यांची नावे समोर आली.
पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन विचारणा केली असता सार्थक बागडे याच्या सांगण्यावरून त्याने पुत्तेवारची हत्या केल्याची कबुली दिली. सार्थकच्या सांगण्यावरून त्याने मोक्षधाम घाटातील ऑटोमोबाइल फर्मकडून जुनी कार खरेदी केली. या कारने पुट्टेवार यांना धडक देण्यात आली होती. पुट्टेवारच्या अगदी जवळच्या लोकांनी त्याला हत्येचे कंत्राट दिल्याचा संशय होता.
पण, ज्या संपत्तीसाठी ही हत्या झाली ती संपत्ती नेमकी किती आहे?
आर्चनाच्या माहेरी कोटी रुपयांची संपत्ती आहे. आतापर्यंत पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, अर्चनाच्या माहेरी पार्लेवार कुटुंबाकडे जवळपास 22 कोटी रुपयांची संपत्ती आहे. या व्यतिरिक्त आणखी काही संपत्ती आहे का याची शहानिशा पोलीस करत आहेत. यात नागपुरातील मध्यवर्ती भागात उंटखाना परिसरात 5500 स्क्वेअर फुटांचा प्लॉट आणि व्यावसायिक दुकानं आहेत. या प्रकरणात तपास सुरूच असून संपत्तीत आणखी काही भर पडते का? याकडेही पोलिसांचं लक्ष आहे.
हीच संपत्ती अर्चना आणि प्रशांत पार्लेवार या दोन्ही सरकारी अधिकारी असलेल्या बहिण-भावाला पाहिजे होती. त्यामुळे त्यांनी योगिताच्या वडिलांच्या हत्येची सुपारी दिली.
सरकारी अधिकारी असतानाही सासऱ्याची हत्या का केली?
- अर्चना पार्लेवार-पुट्टेवार या सरकारी अधिकारी आहेत. तरीही त्यांनी माहेरच्या संपत्तीच्या वादातून वृद्ध सासऱ्याचा खून केला. या कुटुंबाचे दोन्ही बाजूने नाते आहे. अर्चना यांची नणंद योगिता या अर्चना यांचे भाऊ प्रवीण यांच्या पत्नी होत्या. प्रवीण यांचा मृत्यू झाला.
- अर्चना यांचा भाऊ प्रविण पार्लेवारचा योगिता पुट्टेवारसोबत विवाह झाला होता. मृत पुरुषोत्तम पुट्टेवार हे योगिता यांचे वडील होते. प्रविण पार्लेवार यांचा 2007 मध्ये मृत्यू झाला.
- त्यानंतर योगिता यांनी पार्लेवार कुटुंबाच्या म्हणजे नवऱ्याच्या संपत्तीवर दावा सांगितला. आपल्या मुलीला सासरची संपत्ती मिळावी यासाठी पुरुषोत्तम पुट्टेवार प्रयत्न करत होते. तर आपल्या माहेरची संपत्ती नणंदेला जाऊ नये यासाठी अर्चना प्रयत्नशील होत्या. संपत्तीचा हा सर्व वाद कोर्टात गेला होता.
- नवऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर संपत्ती मिळणार नाही,’ असं आरोपी अर्चनाने तिच्या भावाची पत्नी योगिता यांना बजावलं. योगिता यांना दोन मुली असल्यानं कोर्टात तिची बाजू वरचढ ठरत होती. योगितांच्या वतीनं त्यांचे वडील मृत पुरुषोत्तम पुट्टेवार हेच पूर्ण प्रकरण हाताळत होते. त्यामुळे पुरुषोत्तम यांचाच काटा काढला तर हे संपत्तीच्या वादाचं प्रकरण आणखी कमकुवत होईल.
- पुरुषोत्तम गेल्यानंतर योगिताच्या बाजूनं कोणीही लढणारं नसेल असा विचार करत अर्चना यांनी शांतपणे पुरुषोत्तम यांच्या हत्येचा कट रचला असं पोलिसांनी सांगितले. फक्त माहेरच्या संपत्तीसाठी अर्चनानं वृद्ध सासऱ्याचा खून केला. पण, या प्रकरणात सरकारी अधिकारी असलेली अर्चनाच नाहीतर तिच्या सरकारी अधिकारी असलेल्या भावाचाही समावेश आहे.
Hit and Run Case: असा रचला प्लॅन
सचिन धार्मिकने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याला पोलिसी खाक्या दाखविल्यावर त्याने अर्चनाचे नाव घेतले. सचिनचे वडील बीसी चालवितात. अर्चना त्यांच्या बीसीची सदस्य आहे. तिला ड्रायव्हरची आवश्यकता होती. तिने सचिनच्या वडिलांना विचारणा केली. सचिनची सार्थकसोबत मैत्री आहे. त्याने त्याची डॉ.मनिष यांच्याकडे नोकरी लावून दिली. अर्चनाने सचिनला पुत्तेवारच्या हत्येची सुपारी दिली. तिने सार्थकचे नाव काहीही झाले तरी समोर यायला नको असे स्पष्ट सांगितले होते. सहा महिन्यांपासून अर्चना व आरोपी पुत्तेवार यांच्या हत्येची संधी शोधत होते.
Hit and Run Case: असा झाला तपास
बालाजीनगर मध्ये पुरुषोत्तम यांना कारखाली चिरडल्यानंतर फरार असलेल्या सचिनला गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याने अटक केली. त्याने घाट रोड परिसरातून कार खरेदी केल्याचे आढळून आले. बालाजीनगर अपघात केल्यावर त्याने छिंदवाडा मार्गावर ही अपघात केल्याचे समोर आले. पोलिसांनी सचिन व त्याच्या माहितीनुसार निरजला अटक केली. सार्थक बागडे यांच्या सांगण्यावरून खून केल्याचे दोघांनी सांगितले. त्यानंतर सुपारी देणाऱ्या अर्चना यांचे नाव आले.
सुरुवातीला हिट अँड रन प्रकरण
नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी आज (11 जून) पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 82 वर्षीय पुरुषोत्तम पुट्टेवार रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आपल्या पत्नीची भेट घेऊन घरी जात होते. 22 मे रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मानेवाडा इथल्या बालाजी नगर परिसरात एका कारनं पुरुषोत्तम पुट्टेवार यांना धडक दिली. यानंतर त्यांना मानकापूर येथील अलेक्सिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं. इथं त्यांचा मृत्यू झाला. मानकापूर पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर पुरुषोत्तम पुट्टेवार यांचा मुलगा आणि आरोपी अर्चना पुट्टेवारचा नवरा मनिष पुट्टेवार यांनी अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
त्यानंतर अजनी पोलिसांनी चौकशी केली असता त्यांना सीसीटीव्ही फुटेज मिळालं. त्यावरून त्यांनी हिट अँड रन प्रकरणाची नोंद करून कार चालक निरज निमजेला अटक केली. हे प्रकरण फक्त इथपर्यंतच मर्यादित नाही असा संशय पोलिसांना आला. यात हत्येचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला होता. त्यानंतर पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुन्हे शाखेनं पुन्हा एकदा तपास सुरू केला आणि यात धक्कादायक बाबी समोर आल्या.
हे फक्त हिट अँड रनचं (Hit and Run Case) प्रकरण नाहीतर सुपारी देऊन केलेली हत्या आहे हे पोलीस तपासांत समोर आलं.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!