Lok Sabha Election
Lok Sabha Election:लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यासाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठीची प्रचाराची मुदत उद्या सायंकाळी संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर आज सायंकाळी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकत्रित जाहीर सभा होत आहे. या सभेमध्ये हे दोन नेते काय भूमिका मांडणार याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं असणार आहे.
लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) राज ठाकरे यांनी एनडीएच्या उमेदवारांसाठी काही सभा घेतल्याचं पाहायला मिळालं आहे. त्या सभांमधून उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेवर टीका केल्याचं पाहायला मिळालं आहे.तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अलिकडे झालेल्या काही सभांमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केली आहे. त्यांच्या शिवसेनेला नकली शिवसेना असंही मोदींनी म्हटलं आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे अशाप्रकारे एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ आहे.
मुंबईतील मतदानाच्या पार्श्वभूमीवर ही सभा होत आहे. त्यामुळं मराठी मते कुणाच्या बाजूनं वळणार यासाठी ही सभा महत्त्वाची ठरू शकते. त्यासाठीच राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांना मराठी मतांसाठी एकत्र यावं लागलं का? असा प्रश्न त्या निमित्ताने उपस्थित होत आहे.मुंबईतील मतदानाच्या पार्श्वभूमीवर ही सभा होत आहे. त्यामुळं मराठी मते कुणाच्या बाजूनं वळणार यासाठी ही सभा महत्त्वाची ठरू शकते. त्यासाठीच राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांना मराठी मतांसाठी एकत्र यावं लागलं का? असा प्रश्न त्या निमित्ताने उपस्थित होत आहे.
Lok Sabha Election: राज ठाकरे काय म्हणाले?
राज ठाकरे यांनी यावेळी बोलताना मोदींच्या कामाचं कौतुक केलं. त्यांनी धाडसी निर्णय घेतल्याचं राज ठाकरे म्हणाले.”मोदींच्या पहिल्या पाच वर्षांच्या कामावर 2019 मध्ये बोललो. उध्दव ठाकरे, शरद पवारांवर बोलण्यात वेळ घालवायची गरज नाही. ते सत्तेत येणार नाहीत, कशाला त्यांच्यावर बोलायचं.
बाबरीचा ढाचा पडला तेव्हा इतक्या वर्षात राम मंदीर बनेल असेल असं वाटलं नव्हतं. पण मोदींनी ते करून दाखवलं. मोदींमुळे काश्मीर हा भारताचाच एक भाग आहे हे सिध्द झालं. 370 कलम मोदींमुळे हटलं. तीन तलाक सारखे विषय मोदी नसते तर झालेच नसते,” असं राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरेंनी सत्तेत आल्यानंतर मोदींकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या. “मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या, देशाच्या अभ्यासक्रमात मराठा साम्राज्याच्या 125 वर्षाचा इतिहास समाविष्ट करून मुलांना शिकवावा आणि शिवरायांच्या गडकिल्ल्यांना ऐतिहासक गतवैभव मिळवून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय समिती तयार करून त्यादिशेनं काम व्हावं. तसंच मुंबई-गोवा महामार्ग लवकरात लवकर करावा,” अशा अपेक्षा राज ठाकरेंनी व्यक्त केल्या.
मोदी नवा मंत्र 24×7 फॉर 2047
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी बोलताना काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. गांधीजींच्या सल्ल्यानुसार स्वातंत्र्यानंतर काँग्रेस विसर्जित केली असती तर देश किमान 5 दशकं पुढं असता, असं मोदी म्हणाले.
“देशानं जबाबदारी दिल्यानंतर देशाची अर्थव्यवस्था 10 वर्षांत 11 व्या क्रमांकावरून 5 व्या क्रमांकावर आणली आणि लवकरच तिसऱ्या स्थानी असेल. मी देशाला विकसित करेल अशी गॅरंटी देतो. मोदी 24×7 फॉर 2047 या मंत्रासह आणि हर पल आपके नाम, हर पल देश के नाम…” अशा पद्धतीनं काम करणार असल्याचं मोदी म्हणाले.”कलम 370 हटवणं अशक्य वाटणारे लोक नैराश्याच्या गर्तेत बुडालेले होते. पण आम्ही ते करून दाखवलं. जगातली कोणतीही शक्ती पुन्हा 370 आणू शकणार नाही.”
“आज मुंबईत अटल सेतू आहे. मुंबई मेट्रोचा विस्तार होत आहे, मुंबई लोकलचं आधुनिकीकरण होत आहे, नवी मुंबईत विमानतळ बनत आहे, वंदे भारत रेल्वे धावत आहेत आणि देशाची पहिली बुलेट ट्रेनही मुंबईला मिळणार आहे,” असंही मोदी यावेळी म्हणाले.
मराठी विरुद्ध गुजराती वादाची पाश्वभूमी?
मुंबईत अनेक भागात मोठ्या संख्येने मराठी मतदार आहेत. अनेक मतदारसंघात मराठी मतं निर्णायक सुद्धा ठरतात.
मुंबईत सहा पैकी तीन लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha Election) शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होत आहे. या तीन मतदारसंघात मशाल विरुद्ध धनुष्यबाण या दोन चिन्हांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार विरुद्ध शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार यांच्यात मुख्य लढत होताना दिसेल. यामुळे या मतदारसंघांमध्ये मराठी मतांचं विभाजन स्पष्ट असेल असं चित्र आहे. तर इतर दोन मतदारसंघांमध्ये मराठी विरुद्ध अमराठी उमेदवार अशी थेट लढत आहे. यामुळे सहापैकी पाच मतदारसंघांमध्ये मराठी मतदारांचा कौल हा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
यातही वंचित बहुजन आघाडीने ही स्वतंत्र उमेदवार दिल्याने अल्पसंख्याकांच्या मतांचं विभाजनही महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमध्ये होईल असं स्पष्ट आहे. मराठी माणसासाठी आणि मुंबईत मराठी अस्मितेसाठी म्हणून शिवसेनेचा जन्म झाला. सुरुवातीच्या काळात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांनी मराठीच्या मुद्यावरच आंदोलनं केली आणि पक्षचा विस्तार केला.
मुंबईत मराठी माणसाला नोकरीसाठी प्राधान्य द्यावं आणि परप्रांतियांविरोधात भूमिका घेतच शिवसेनेला मुंबईत मराठी मतदारांची मोठी साथ मिळाली. यानंतर राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना करताना हीच भूमिका घेतली आणि त्यांना सुरुवातीला मराठी मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला. मुंबईत काँग्रेसची पारंपरिक मराठी मतं सोडली तर एकगठ्ठा मराठी मतं ही शिवसेनेला मिळत आल्याचं दिसतं. मनसे हा पक्ष आल्यानंतर मराठी मतांचं विभाजन होताना दिसलं. परंतु यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या दोन गटांत मराठी मतांचं विभाजन निश्चित आहे.
ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक संदीप प्रधान यांच्यानुसार मुंबईत तीन मराठी मतदार आहेत. ते सांगतात, “उच्च मध्यमवर्गीय भाजपकडे झुकलेला दिसतो. तर एक मराठी मतदारांचा वर्ग उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेल्याने नाराज असलेला आहे. परंतु एक मोठा मराठी मतदारांचा वर्ग हा ज्यापद्धतीने बाळासाहेबांची शिवसेना फोडली गेली आणि पक्षाचं नाव, चिन्ह ठाकरेंकडून घेतलं गेलं यासाठी भाजप आणि शिंदे गटावर नाराज आहे. यामुळे मला वाटतं मराठी मतदारांचं विभाजन या निवडणुकीत (Lok Sabha Election) प्रामुख्याने या यानुसार होईल.”
प्रधान सांगतात,”मराठी मतदारांचा एक वर्ग उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या राजकीय निर्णयासोबत आहे. शिवसेनेत आपापसात लावलेली भांडणं हे अजिबात न आवडलेला मतदार लक्षणीय आहे. शिवसेना फोडली नसती तर कदाचित मुंबईतील बहुसंख्य मराठी मतदार हा भाजपच्या बाजूने दिसला असता. परंतु शिवसेनेत फूट पडल्याने भावनिकदृष्ट्याही मराठी मतदार नाराज दिसतो आहे.”
“हा मतदार एकतर उद्धव ठाकरे यांच्या बाजूने मतदान करेल किंवा मतदानाला बाहेरच पडणार नाही. जसं बारामतीत मतदान कमी झालं. पवार विरुद्ध पवार लढाईत कोणाची साथ द्यायची हे ठरवण्याची क्षमता मतदारांमध्ये नव्हती ते मतदानाला बाहेर पडले नाहीत. असं काहीसं चित्र मुंबईतही दिसू शकतं,” असंही ते सांगतात.
अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.
मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!