अमिताभ आणि प्रभासच्या आगामी ‘कल्की 2898’ सिनेमाची रिलीज डेट झाली जाहीर

Kalki 2898 AD

Kalki 2898 AD: सध्या सगळीकडे चर्चा आहे ती प्रभासचा (Prabhas) आगामी सिनेमा ‘कल्की 2898’ एडी (Kalki 2898 AD) चीकलियुग आणि कल्की अवतार यावर बेतलेला हा सिनेमा पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. पण आता या सिनेमाची रिलीज डेट निर्मात्यांनी पुढे ढकलली असून आता हा सिनेमा 9 मे एवजी जूनमध्ये रिलीज होणार आहे.

नुकतंच कल्की सिनेमाच नवीन पोस्टर रिलीज केल आहे. या पोस्टरवर प्रभास, दीपिका आणि अमिताभ बच्चन यांच्या सिनेमातील पात्रांची झलक पाहायला मिळतेय, आणि या पोस्टरला हा सिनेमा 27 जून ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अस कॅप्शन दिलंय. वाळवंट, युद्ध अस या पोस्टरवर दिसत असून सिनेमाच पोस्टर संगळ्यांनाच पसंत पडल आहे.

Kalki 2898 AD

या सिनेमाची दिग्दर्शन नाग आश्विन यांनी केल असून ही एक साय फाय फिल्म आहे. गेल्या आठवड्यात या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीस आला. या टीझरमध्ये अमिताभ हे अश्वत्थामाच्या भूमिकेत दिसणार असल्याच रिव्हील करण्यात आल. अश्वत्थामा शिवलिंगाची पूजा करत असताना अचानक त्यांना काही संकेत दिसतात आणि ती वेळ जवळ आलीये अस म्हणतात आणि स्वतची अश्वत्थामा ही ओळख उघड करतात. अस दाखवण्यात आलंय.

तर प्रभास या सिनेमात भेरव ही भूमिका साकारत असून दीपिका पद्मा ही भूमिका साकारतेय तर कमल हसन कालीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. विशेष करून या सिनेमात महाभारताच्या युद्धाच्या शेवटापासून ते 2898 सालापर्यंतचा प्रवास दाखवण्यात येणार आहे पण या सिनेमात जास्तीत जास्त भारतीय संस्कृति दिसेल असा प्रयत्न केल्याच दिग्दर्शकांनी म्हंटल आहे.

ही एक बिग बजेट साय फाय फिल्म असून तब्बल 600 करोंडमध्ये हा सिनेमा बनवल्याच सिनेमाच्या टीमने जाहीर केल आहे. तेलुगू आणि हिंदी भाषेत हा सिनेमा रिलीज होणार असून काही सीन हिंदी व्हर्जनसाठी नव्याने शूट करण्यात आले आहेत. ए ए फिल्म्स आणि सि अस्वनी दत्त यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.

प्रेक्षकांना मिळणार सरप्राइज

Kalki 2898 AD (कल्की 2898 एडी) या चित्रपटाच्या सोशल मिडिया आकाऊंटवरून नुकतीच एक खास फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोमध्ये अमिताभ बच्चन हे खास लुकमद्धे दिसत आहेत. यामध्ये अमिताभ बच्चन यांचा चेहरा पूर्णपणे बँडेजने झाकलेले दिसत आहे. त्यांचे फक्त डोळे दिसत आहेत. अमिताभ बच्चन यांच्या या फोटोला कॅप्शन् देण्यात आल, ‘तो कॉन आहे?हे जाणून घेण्याची वेळ आली आहे. 21 एप्रिल रोजी सायंकाळी 7:15 वा. अमिताभ बच्चन यांच्या फोटोवर “समय आ गया है” असही लिहिलेल दिसत आहे. आता आज ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाची टीम कोणत सरप्राइज देणार आहे? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

Kalki 2898 AD

कधी रिलीज होणार चित्रपट?

‘कल्की 2898 एडी’ हा चित्रपट 27 जून 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. चित्रपटाच्या सेटवरील फोटो सोशल मिडियावर व्हेरल झाले आहे. यामध्ये प्रभास, दीपिका, दिशा पटानी, अमिताभ बच्चन आणि कमल हसन असे मोठे कलाकार या सिनेमात बघायला मिळणार आहे. सध्या या चित्रपटाने प्रचंड लक्ष वेधून घेतले आहे. याशिवाय सर्व चाहत्यांना सिनेमाच्या रिलीजची आतुरता आहे.

‘Kalki 2898 AD’ च्या रिलीज तारखेच्या अगदी डॉन महीने अगोदर सिनेमाची डेट सोशल मिडियावर जाहीर करण्यात आलीय. सोशल मिडियावर निर्मात्यांनी याविषयी मोठी घोषणा केलीय. त्यामुळे सर्वाची उत्सुकता शिगेला आहे. काहीच दिवसांपूर्वी सिनेमातील अमिताभ यांची भूमिका असलेला अश्वत्थामाचा लुक रिव्हील करण्यात आलेला.

Kalki 2898 AD: प्रभासचे आगामी चित्रपट?

‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाच्या व्यक्तिरिक्त प्रभास चे आणखी काही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तो ‘द राजा साब’ या चित्रपटात दिसणार आहे, ज्याचे शूटिंग सध्या हैदरबादमध्ये सुरू आहे. तसेच प्रभास हा ‘कनप्पा’ या चित्रपटात कॅमिओ देखील करणार आहे.

‘कल्की 2898 एडी’ हा या वर्षातील सर्वात महागडा चित्रपट

बाजेटच्या दृष्टिकोनातून, या वर्षी सर्वात ,ओटी पैज ‘कल्की 2898 एडी’ वर ठेवण्यात आली आहे. त्याचे बजेट 600 कोटी आहे. तेलुगू सिनेमाचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक नाग आश्विन यांनी ते बनवले आहे. हिंदीसोबतच हा चित्रपट तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड आणि इंग्रजीसह इतर भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हा चित्रपट प्रभाससाठी खूप महत्वाचा ठरणार आहे कारण गेल्या वर्षी त्याचा ‘आदिपुरुष’ हा चित्रपट ही 600 कोटींच्या बजेटमध्ये बनला होता. पण तो फ्लॉप ठरला होता. तर ‘सालार’ 590 कोटींचा व्यवसाय करण्यात यशस्वी ठरला.

अधिक हिट व ताज्या बातम्या या आपल्या MHTimes24 ह्या संकेतस्थळावर वर दिल्या जातात. दिवसभरातील ताज्या बातम्या, राजकारण, खेळ, मनोरंजन आणि इतर घटनांच्या विस्तृत मराठी बातम्यांसाठी अपडेट रहा. अशा ताज्या बातम्या आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. अधिक हिट बातम्या दररोज पाहण्यासाठी MHTimes24.com ला भेट द्या.

मित्रांनो अधिक हिट न्यूजसाठी आमच्या WhatsApp Group जॉईन व्हा !!!